✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी
Mon, 05/13/2013 - 10:36  ·  लेख
लेख
नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अ‍ॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे. मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं. मायबोलीवरचा एक मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही एक उत्तम असा धागा काळजीपूर्वक वाचून झाला पण आमच्या ज्ञानात काही उजेड पडेना. मायक्रोव्हेव च्या सेटींग, त्याचे तापमानाचे सेटींग आणि मग आपल्यालाला पाहिजे तसा मेनू भाजून-करुन झाला पाहिजे. आमच्याकडे मिळणारे 'वामट' नावाचा माश्याचा प्रकार त्याला कसाही करा त्याची भाजी जबरा होते. या माशांचे फ्राय करण्याचा मूड काल उसळून आला. कंटकी टाईप. मासे मस्त कापून बिपून आलं,लसून,मिरचीचा पेष्ट लावले आणि ग्रील सेटींमधे अगदी २५ मिनिटे त्यात ठेवले अजिबात व्यवस्थित असा फ्राय झाला नाही. पुन्हा ग्यासवर ते फ्राय करण्यात आले, काल आमचं किचनमधे प्रचंड हसं झालं. मायक्रोवेव्ह ओव्हन मधे शीरा,उकमा,पोहे, करता येतात. चिकन,मासे, मस्त फ्राय करता येतात. वांग्याचं चांगलं भरीत करता येतं. वगैरे मित्र हो, या सर्व कृती त्यात होत असतील, करता येत असतील तर त्याला मी मूकलो आहे. तेव्हा, मायक्रोवेव्ह ओव्हनस मधे काय शिजवता येतं, काय फ्राय करता येतं, ते कसं केलं पाहिजे, भांडे कोणते वापरले पाहिजे, कोणत्या सेटींग्स कशा केल्या पाहिजेत, विविध मायक्रोवेव्ह ओ. मधे हे सर्व कसं करतात त्याची माहिती मिळाली तर काथ्याकूटाचा हेतू सफल होईल म्हणून हा प्रपंच. विनंती : चुलीवरचे भरीत अहाहा. चुलीवरच्या भाकरी अहाहा. ग्यासवर जी मजा ती मजा इथे नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
53137 वाचन

💬 प्रतिसाद (129)

प्रतिक्रिया

३ महिने

तुषार काळभोर
Mon, 05/13/2013 - 15:54 नवीन
३ महिने झाले, ते सुट्टीवरच हैत!:;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

ऑ

कुंदन
Mon, 05/13/2013 - 18:37 नवीन
थकबाकी मिळाल्यावर ओवन घेतला काय की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मी भरपूर वापरते मायक्रोवेव्ह.

कवितानागेश
Mon, 05/13/2013 - 15:39 नवीन
मी भरपूर वापरते मायक्रोवेव्ह. कारण मला गॅससमोर उभे राहायचा भयंकर कंटाळा येतो. :) पण सध्या इंटर्नेट कनेक्शन गंडलय. :( ते सुधारलं की सांगते.
  • Log in or register to post comments

पसंद अपनी अपनी

मोहन
Mon, 05/13/2013 - 15:53 नवीन
मा.ओ. हे किचन मधले सहयोगीक उपकरण आहे. हे ध्यानात घेतले की त्याच्या मर्यादा पाळून बरेच उपयोग करता येतात. शेंगदाणे , रवा इ. भाजणे अप्रतीम होतात. उपमा, सांजा , भाज्या , इ. ना फोडणी घालून आणि गाजर /दुधी हलवा वगैरे दुध्,साखर इ. घालुन फक्त शिजवण्याचे काम फार कमी वेळात व कमी त्रासात होते. माझा आवडता पदार्थ सूप. भाज्या आवडतील तशा उकडून पाणी, मीठ, मीरे/सूप क्यूब टाकून ७-८ मी. गरमा गरम सूप तयार ! हे सर्व सोलो मा.ओ. वापरून करता येतात. ग्रील, किंवा कन्वेक्शन फारसे वापरात येत नाही. काही गोष्टींची काळजी घ्यायला लागते. कुठलाही पदार्थ "फिट & फरगेट" पध्धतीने होत नाही. एक , दोन मिनीटांनी सारखे ढवळावे लागते. अगदी पाणी / कॉफीत सुद्धा एक-दोन वेळा चमचा हलवावा लागतो. बटाटे , कांदे, वांगे इ. शीजवायचे/भाजायचे असल्यास , ४-५ ठिकाणी टोचुन आतली वाफ बाहेर पडेल असे करावे लागते म्हणजे स्फोट वगैरे होत नाही. अंडे म्हणुनच उकडता येत नाही. मा.ओ. मधे शक्य तोवर काचेचीच भांडी वापरवी. मा.वे. सेफ प्लास्टीक हे बहुत करून जाहिराती पर्यंतच मर्यादित असते. माझ्या लहानपणी आमच्या गावी, घरी ग्यास घेतला . काकांनी पहिल्याच दिवशी ह्यावरच्या स्वयंपाकाला काही चुलीवरच्या स्वयंपाकाची सर नाही म्हणून तो फक्त चहा - कॉफी पुरताच मर्यादित ठेवला. आमची आजी बिचारी लाकडा -़कोळ्शाचा धुर सहन करत राहीली.
  • Log in or register to post comments

ह्याच कारणांसाठि

दिपक.कुवेत
Mon, 05/13/2013 - 15:54 नवीन
अजुन ओव्हन घ्यायचा मुहुर्त लागला नाहिये. आय मीन नुसता मायक्रोवेव्ह आहे पण त्याचा उपयोग असाच चहा, पाणी, पापड भाजणे, हलक्या वस्तुंचा प्लॅटफॉर्म ह्या गोष्टिंसाठि होतोय. ईकडे गॅस (शेगडि) आणि ओव्हन असं दुहेरी कॉम्बिनेशन मिळतं ज्यात केक वगैरे करु शकतो. मुळात जरा जास्त वेळ लागला तरि चालेल पण मला स्वःताला गॅसवर शीजवलेलं अन्नच आवडतं.
  • Log in or register to post comments

जेवढे खातो तेवढेच धुतो

आजानुकर्ण
Mon, 05/13/2013 - 17:05 नवीन
मायक्रोवेव्ह ओवन ही अत्यंत उपयोगी गोष्ट आहे असा माझा अनुभव आहे. माझ्या आवडत्या पाककृती १. चहाः मायक्रोवेवचा वापर करुन अत्यंत उत्कृष्ट चहा होतो. प्रत्येक वेळी कन्सिस्टंटली चांगला चहा मला तरी गॅसवर करता येत नाही. शिवाय गॅसवर केलेल्या चहामध्ये अनेकदा चहाचा खरा स्वाद जाणवत नाही. मायक्रोवेवमध्ये २ मिनिटे पाणी उकळावे, शक्यतो पाणी चांगले उकळू द्यावे. नंतर कप बाहेर काढून त्यात चहाच्या पुडीची पिशवी किंवा चहा पूड (ही ठेवण्यासाठी एक दांडीचा साचाही मिळतो) टाकावी. साधारण २ ते २.५ मिनिटे ब्रू होऊ द्यायवा. नंतर चहापूड काढून टाकावी. चहाचे तापमान साधारणपणे ९० से. पर्यंत उतरते. आता यात चवीप्रमाणे रुम टेंपरेचरला आलेले दूध टाकावे. चहाचे तापमान ७० ते ७५ पर्यंत उतरते. आणखी पाच से तापमान उतरले की चहाची परफेक्ट चव लागते. ही रेसिपी सापडल्यापासून चहाचे गाळणे, काळे झालेले भांडे, एकट्यासाठी चहा करायचा असला तरी १० मिनिटे बेसिनसमोर घालवणे या गोष्टी माझ्या आयुष्यातून कमी झाल्या आहेत. याचे सर्व श्रेय माझ्या ९०० वॅटच्या मायक्रोवेवला आहे. चवीत बदल म्हणून मी कधीकधी सोयामिल्क वापरतो त्यानेही एक छान नट्टी चव येते. २. बटाट्याची किंवा रताळ्याची कोशिंबीरः अनेकदा भाजी वगैरे केल्यानंतर ती कमी पडते आहे किंवा पटकन संपेल असे लक्षात येते. किंवा काहीतरी तोंडी लावणे असावे असे वाटते. बटाट्याची किंवा रताळ्याची कोशिंबीर हे माझे ऑल टाईम फेवरिट तोंडीलावणे आहे. मात्र जेव्हा ही कोशिंबीर करावीशी वाटते तेव्हा कुकर ऑलरेडी लावून झालेला असतो. मग मायक्रोवेवमध्ये पाच मिनिटात पटकन बटाटा किंवा रताळे उकडून घेतले की छानपैकी कोशिंबीर करता येते. ३. ढोकळाः चितळेंचे ढोकळा मिक्स पाण्यात मिसळून मायक्रोवेवमध्ये चार मिनिटात मस्त जाळीदार आणि चविष्ट ढोकळा तयार होतो. बाकी शिळे अन्न गरम करणे वगैरे उपयोग आहेतच. मला स्वतःला त्यात गरम केलेली पोळी आवडत नाही. फार ओलसर व चिकट वाटते. कधीकधी मी त्यात अंड्याचे हाफ फ्राय वगैरेही करतो. पण त्याचा फारच घमघमाट घरात सुटतो. :( थोडक्यात 'जेवढे खातो तेवढेच धुतो' असे संक्षी ष्टाईल म्हणायचे असले आणि खाण्यासाठी जास्त व भांडी धुण्यासाठी कमी वेळ खर्च करायचा अल्यास मायक्रोवेव ओवन उत्तम.
  • Log in or register to post comments

दमलेल्या गुलामाची कहाणी

आदूबाळ
Mon, 05/13/2013 - 18:15 नवीन
गुलामखान्यातून घरी यायला मला बर्‍याचदा भरपूर उशीर व्हायचा. सर्वत्र निजानीज. गारगोट्या अन्न मेजावर झाकून ठेवलेले. मगः
  • काचेच्या ताटात सगळे जेवण वाढून घ्यावे
  • आख्खं ताटच्या ताट मा वे ओ मध्ये सरकवावे
  • मोडबीडची चिंता न करता ५० सेकंद लावावे
  • 'टिंग' असा घंटानाद होताच बाहेर काढून त्वरित पोटात लोटावे
  • तृप्तीची ढेकर येते का, याची दोन मिन्टे वाट पहावी
  • बर्मुडा घालून निवांत झोपून जावे
  • Log in or register to post comments

आदुबाळा....

दिपक.कुवेत
Mon, 05/13/2013 - 19:28 नवीन
पहिल्या पायर्‍या समजु शकतो पण शेवटच्या कॄतीच म वे ओशी कन्केशन कळलं नाहि....म्हणजे मा वे ओ मधील जेवला नाहिस तर बर्मुडा घालून तुला निवांत झोप येत नाहि? (कॄ.ह.घे. रे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

ह.च घे. आ.

आदूबाळ
Mon, 05/13/2013 - 20:42 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत

म्हणजे??

प्रभाकर पेठकर
Tue, 05/14/2013 - 03:02 नवीन
बर्मुडा घालून निवांत झोपून जावे
म्हणजे सुरुवातीच्या पाचही पायर्‍या बर्म्युडा न घालताच करावयाच्या आहेत??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

:)))

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 05/14/2013 - 11:50 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

ठ्ठो !!

कपिलमुनी
Tue, 05/14/2013 - 20:19 नवीन
काका ....हसवून मारताय आता !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

प्रथम स्टेटस सिम्बॉल म्हणून

खाद्यप्रेमी
Mon, 05/13/2013 - 18:21 नवीन
प्रथम स्टेटस सिम्बॉल म्हणून आलेला मायक्रोवेव खर तर गुणी आहे. पण सर्वसाधारणपणे त्याचा उपयोग अन्न गरम करण्यासाठीच केला जातो. मायक्रोवेव आपल्याकडे पाश्चात्य देशातून आला. पाश्चात्य आणि भारतीय पाककृतींमध्ये काही मूलभूत फरक आहेत त्यामुळे आपल्या तर्‍हेचा स्वयंपाक मायक्रोवेवमध्ये बनविताना काही मर्यादा येणे अपरिहार्य आहे. कारण आपल्याकडे फ्रोझन फूड वापरले जात नाही. उलट तळणे, परतणे अधिक. पण मायक्रोवेवमधे ही कामे करता येत नाहीत. केवळ मायक्रोवेव वापरुन संपूर्ण स्वयंपाक करणे शक्य नाही मात्र त्यातील गुणांचा योग्य वापर करुन काही आपले व काही परप्रांतीय/परदेशीय पदार्थ त्यात करता येतात. म्हणूनच मायक्रोवेव आणला म्हणजे आता गॅसला सुट्टी अस म्हणता येणार नाही. ही वरील वाक्ये "उषा पुरोहित" यांच्या "मायक्रोवेव खासियत" या पुस्तकातील आहेत. मायक्रोवेवमधे रवा, शेंगदाणे, लाडू साठी बेसन, चिवड्यासाठी पोहे या गोष्टी विनासायास भाजता येतात. सुरळीच्या वड्या मायक्रोवेवमधे सुरेख होतात. पण साधा भात, वरण (डाळ) या गोष्टी मात्र कुकरमधेच पटकन होतात. त्यामुळे या गोष्टींसाठी मात्र मायक्रोवेव वापरु नये. समजण्यासाठी एक कृती देत आहे. सुरळीच्या वड्या: साहित्यः १/२ कप बेसन १ चमचा मैदा साखर व लिंबू रस प्रत्येकी १/२ चमचा पाऊण कप दही पाऊण कप पाणी हिरवी मिरची पेस्ट थोडीशी मीठ चवीनुसार फोडणीसाठी - तेल, मोहोरी, हींग, हळद खोबरं, कोथींबीर - सजावटी साठी कृती: गॅसवर नेहेमीसारखी फोडणी करुन घ्यावी. काचेच्या बाऊल मधे दही व पाणी एकत्र घुसळुन घ्या. यात मिरची पेस्ट, साखर, लिम्बाचा रस, मीठ घालून ढवळा. यात बेसन आणि मैदा घालून मिक्स करा. बाऊल "हाय" मोड वर ४ मिनिटे ठेवा. बाहेर काढून मिक्स करा. पुन्हा "हाय" मोड वर ४ मिनिटे ठेवा. बाहेर काढून मिक्स करा. जर मिश्रणाला चकाकी आलेली असेल तर पीठ तयार आहे असे समजावे. आता पीठ चांगले घोटून घ्यावे व पटकन ताटाच्या मागच्या बाजूला किंवा ओट्यावर पसरावे. पसरताना पीठ पातळ पसरावे. ही क्रिया पटकन करावी लागते कारण शिजवलेलं पीठ पटकन घट्ट होत जातं. २ मिनिटांनी साधारण १.५ - २ इंचाच्या पट्ट्या कापाव्या व त्यांचा रोल करावा. या रोलवर फोडणी घालावी व खोबरं, कोथींबीर घालावी.
  • Log in or register to post comments

का हो ह्या मध्ये जिल्ब्या

माझीही शॅम्पेन
Mon, 05/13/2013 - 18:41 नवीन
का हो ह्या मध्ये जिल्ब्या पाडून मीपा-वर डकावता येतात का ?
  • Log in or register to post comments

बिरुटेसर मायक्रोव्हेव घेतल्याबद्दल अभिनंदन

वेताळ
Mon, 05/13/2013 - 19:48 नवीन
त्यात काय काय बनवता येते ते खालील प्रमाणे देत आहे. १)चिकन तंदुरः एका दिवशी मस्त पणे आपल्याकडील गाडीतुन बाहेर फिरायला पडावे.जास्तीत जास्त करुन रहदारी किंवा खवैयागल्लीतुन फिरावे. फिरण्याची वेळ ज्यादा करुन संध्याकाळची ७ ते ८ वाजताची असावी.फिरताना एकाद्या मस्त हॉटेल किंवा ठेल्यावर जिथे प्रसिध्द तंदुर मिळते अश्या ठिकाणी जावावे. मस्तपैकी तंदुर विकत घ्यावे. सोबत तंदुर कांदामिक्स पण घ्यावे.इकडुन तिकडुन फिरुन झालेवर घरी यावे. घरी आलेनंतर चिकन तंदुर नीटपणे बाहेर काढुन प्लेट मध्ये घ्या.आता आपला ओव्हन गरम करण्याच्या मोडवर सेट करा. तंदुर त्यात ठेवुन मस्तपैकी गरम करा. आता गरम केलेले तंदुरचे वेगवेगळे पीस करुन घ्या.प्लेट मध्ये ते पीस व तंदुरवाल्याकडुन आणलेला कांदामिक्स व्यवस्थित भरुन सर्व्ह करा. टिपः तंदुर विकत घेताना शक्यतो ज्यादाच घ्या. कारण घरी ओव्हनवर गरम करुन खाताना भान हरपुन जाते. बाकीच्या पाकृ पुन्हा कधीतरी टाकेन. परत एकदा बिरुटेसर ओव्हन घेतल्याबद्दल अभिनंदन.
  • Log in or register to post comments

मायक्रोवेव बंद असताना पण

खेडूत
Mon, 05/13/2013 - 23:05 नवीन
मायक्रोवेव बंद असताना पण वापरता येतो. मटकी/ मूग साताठ तास भिजवून चाळणीत निथळत ठेवावेत. एका तासाने कपड्यात घट्ट बांधून थोड्या उबदार झालेल्या मायक्रोवेव ओवन मध्ये ठेवावेत. स्विच बंद असल्याची खात्री करावी. दुसऱ्या दिवशी झकास मोड येतात.
  • Log in or register to post comments

मावेओ अन माओ वाचून हा माओवाद

बॅटमॅन
Tue, 05/14/2013 - 03:08 नवीन
मावेओ अन माओ वाचून हा माओवाद तर नव्हे ना अशी शंका येऊ लागली आहे ;) :D
  • Log in or register to post comments

हेच म्हणायला आलो होतो,

प्यारे१
Tue, 05/14/2013 - 12:12 नवीन
हेच म्हणायला आलो होतो, ब्याम्याने मुह की बात छीन ली. बाकी हा मा.ओ.वाद म्हणजे 'कौटुंबिक साम्यवाद' तर नव्हे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

कौटुंबिक साम्यवाद>>कहर!!!!!!

बॅटमॅन
Tue, 05/14/2013 - 14:12 नवीन
कौटुंबिक साम्यवाद>>कहर!!!!!! =)) =)) =)) भारीच हो प्यारेजी. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सर... सगळ्यात सोपे पोहे.

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/14/2013 - 09:37 नवीन
मायक्रोवेव्ह मधे पोहे फार मस्त होतात. पोहे धुवुन चाळाणीत निथळत ठेवावे. मावे मधे एका काचेच्या बाउल मधे तेल मोहरी, जीरे कडीपत्ता, मिरच्या इ घालुन साधारण दिड ते दोन मिनीट ठेवावे मोहरी तडतडली की त्यात हळद घालुन हलवुन पुन्हा एक ते दिड मिनीट ठेवावे. फोडणी जळत नाहीना या कडे लक्ष ठेवावे. तो पर्यंत पोह्यातले पाणी पुर्णपणे निथळलेले असेल. त्यावर चवी प्रमाणे मिठ आणि थोडी साखर घालावी व पोहे मा.से.मधे असलेल्या फोडणीत टाकावे.निट ढवळुन फोडणी सगळी कडे निट पसरली आहेना याची खात्री करावी व परत साधारण दोन ते तिन मिनिट मा.वे. मधे ठेवावे. बाहेर काढुन हलवुन परत दोन ते तिन मिनीट. मग त्यावर चिरलेली कोथिंबीर, खोवलेले खोबर घालुन चांगले हलवुन परत दोन मिनिटे. झाले पोहे तयार. बाउल वर एक झाकण ठेउन चार ते पाच मिनीटे वाफ पोह्यात मुरुन द्यावी. मग मस्त पैकी डिश मधे घेउन लिंबु पिळुन हदडावेत. ज्यांना पोह्यात दाणे आवडत असतील त्यांनी फोडणीतच दाणे घालावे. यातला कोणताही पदार्थ सोयी नुसार / आवडीनुसार कमी जास्त करावा. पोहे करताना कन्व्हेक्षन किंवा ग्रील वापरु नये. मा.वे. मधे शिरा, सांजा व साबुदाणा खिचडी सुध्दा फार छान होते. वैधानिक इशारा :- पोहे खरोखर अप्रतिम होत असल्या मुळे लग्न झालेल्या पुरुषंनी हा प्रयोग घरी एकटे असतानाच करावा. अन्यतः होणार्‍या परीणामांना आम्ही जबाबदार असणार नाहि. (पोहेकर)
  • Log in or register to post comments

ओक्के

सूड
Tue, 05/14/2013 - 16:53 नवीन
>>मायक्रोवेव्ह मधे पोहे फार मस्त होतात. म्हणजे पोह्यांची चव नेहमीपेक्षा वेगळी आणि अप्रतिम असणं हे मुलीच्या घरी मायक्रोवेव्ह असल्याचं लक्षण आहे तर !!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नुसते ओक्के नाही रे सूड.

अभ्या..
Tue, 05/14/2013 - 19:44 नवीन
नुसते ओक्के नाही रे सूड. ;) मुलीला आपल्या प्राडाँनी विचारलेलाच प्रश्न विचारायचा. मावे मध्ये काय काय करता येते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काही म्हणा, हा सुडक्या आजकाल

बॅटमॅन
Wed, 05/15/2013 - 18:25 नवीन
काही म्हणा, हा सुडक्या आजकाल लग्नाळू झालाय फार ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 17:00 नवीन
कांदेपोहे खूप आवडतात. पण यात कांदा दिसत नाही. असो. प्रयोग केल्या जाईलच. आजच करतो ब्रेकफाष्टला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अगबाई कांदा राहिलाच की.

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 05/15/2013 - 09:38 नवीन
अगबाई कांदा राहिलाच की. कामाच्या गडबडीत विसरायलाच झाल. चिरलेला कांदा हळदी बरोबरच टाकावा. तसे कांद्या शिवाय पण पोहे चांगले लागतात. फक्त केल्या केल्या लगेच खाल्ले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

माफ करा

सखी
Wed, 05/15/2013 - 22:05 नवीन
माफ करा, पण पोहे मावेमध्ये करणे मला वेळखाऊ वाटते. प्रत्येक १-२ मिनीटांनी, ५-६ वेळा काढुन बघायचे असेल तर गॅसवर सोप्पे पडणार नाही का? फोडणी पण मावेमध्ये दिली तर जिरे-मोहरी आतमध्ये उडणार नाही का? व परत सगळे साफ करावे लागणार ना? कांदा पूर्णपणे शिजेल का? शंका खरोखरच मनात आल्या म्हणून विचारते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बिन्धास्त वापरा

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 05/17/2013 - 09:31 नवीन
फोडणी उडत नाही,फोडणीतली मिरची सुध्दा उडत नाही, कांदा मस्त खरपुस होतो. अगदि बिन्धास्त वापरा. वेळेचे म्हणाल तर गॅस आणि मावे मधे जवळ जवळ सारखाच लागतो. पण मावेचा फायदा असा की एकदा टायमिंग सेट केले की झाले. गॅस लक्षात ठेवुन बंद करावा लागतो. जास्तवेळ गॅस चालु राहिला तर पोह्यातन धुर निघतो. (खालचा कारपलेला पोह्यांचा थर बाजुला काढला तर उरलेले कुरकुरीत पोहे पण छान लागतात.) घरात एकटे असताना शक्यतो मावेच वापरावा. (मावे. मधे बरेच यशस्वी प्रयोग केलेला)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखी

मस्त धागा

सस्नेह
Tue, 05/14/2013 - 11:43 नवीन
अन उपयुक्त ! मावेओ मध्ये रवा, शेंगदाणे, कोरडे मसाले जसे धणे, जिरे इ. फारच छान भाजले जातात. पोहे, साबुदाण्याची खिचडी गॅसपेक्षा चांगले होतात. दूध, पाणी इ. गरम करण्यासाठी उपयुक्त. (उकळण्यासाठी नव्हे.) वांगी फार छान आतपर्यंत शिजतात. नंतर पुन्हा गॅसवर भाजल्यास भरीत 'स्मोक टच' बनते. बाकी, मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही असे मत आहे.
  • Log in or register to post comments

हो ना! गॅस अन चुलीचीपण होत

स्पंदना
Tue, 05/14/2013 - 13:39 नवीन
हो ना! गॅस अन चुलीचीपण होत नव्हती, अन त्या आधी कुकरमध्ये शिजलेला भात लोकांना घश्याखाली उतरत नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

अगदी अगदी ...

सुनील
Tue, 05/14/2013 - 14:34 नवीन
बाकी, मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही असे मत आहे
अगदी अगदी ... मावेओची अन् गॅसची तुलनाच शक्य नाही! चुलीची चव गॅसला अजिबातच नाही!! गारगोटीने पेटविल्रेल्या काटक्या नि वाळक्या पानांची सर तर कश्शा-कश्शालाच नाही!!! ... ... अन् कच्च्या कंदमूळांची तर बातच वेगळी!!!!! (आदिमानव) सुनील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

+१

सौंदाळा
Tue, 05/14/2013 - 14:41 नवीन
+१ चिखल लावून शेकोटीत टाकून उकडलेली अंडी आणि वालाच्या शेंगा, बटाटे आणि मसाला लावून मडक्यात टाकलेलं चिकन म्हणजेच पोपटी याची सर चिकन ग्रीलला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

परफेक्ट प्रतिसाद

आजानुकर्ण
Tue, 05/14/2013 - 16:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

भरीत

सूड
Tue, 05/14/2013 - 17:19 नवीन
करण्याचा विषय निघालाच आहे म्हणून विचारतो, भरीत करताना घ्यायची वांगी आतून किडलेली नाहीत हे कसं ओळखावं? भाजल्यानंतर वांगं किडलेलं असल्याचं समजलं तर सगळ्या प्लानचा विचका झाल्यासारखं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

छिद्रेश्वनर्था बहुली भवंती.

प्रभाकर पेठकर
Tue, 05/14/2013 - 20:19 नवीन
वांग्यांवर कुठेही छोटे-मोठे छिद्र असेल तर ते वांगे आतुन किडलेले असू शकते. त्यामुळे विकत घेताना पाहूनच घ्यावे. बाकी, मिपावर कोणी शेतकरी-बागायतदार असतील तेच सांगू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वांगी

स्मिता.
Tue, 05/14/2013 - 20:27 नवीन
साधारणपणे वांगी घेतांना ती ताजी, मऊसर असावीत. बाहेरून तरी कोठून कीड किंवा तत्सदृश्य काही असायला नको. आकार गोल आणि बसका नसून लांब असावा. भरीताची वांगी मोठी असतात त्यामुळे त्यांच्यावर हाताने चापट्या मारून बघावं. त्यातून येणारा आवाज नक्की कसा ते असं लिहून सांगता येणार नाही पण नेहमी भाज्या-फळं घेणार्‍यांना सवयीने कळते. सबंध वांग्याची आतून घनता एकसारखी असल्याचे त्या आवाजाने कळते. तश्या वाग्यात कीड निघायची शक्यता कमी असते. अवांतरः भरीताची वांगी सुरीने टोचे पाडून सिरॅमिक प्लेटमधे ठेवल्यास मावेओमधे छान शिजतात. त्याला भाजल्याची आणि धूराची खरपूस चव येत नाही पण गॅस नसल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

वांगी किडकी असल्याचे दोन

सस्नेह
Tue, 05/14/2013 - 22:13 नवीन
वांगी किडकी असल्याचे दोन गोष्टींमुळे समजते १)वांग्यावर काळे छिद्र असते, २)वांग्याचा आकार एकाच बाजूला आकसलेला दिसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लोक्स हो,

सस्नेह
Sun, 05/19/2013 - 13:19 नवीन
मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही , कारण दोन्ही आपापल्या जागी फिट्ट आहेत. काही पदार्थ मावेओ मध्ये उताम होतात अन काहीना गॅस बरा. काहीतरी गोंधळ वाटला म्हणून स्पष्टीकरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

वान्ग्याचं भरीत.

सुप्रिया
Tue, 05/14/2013 - 17:31 नवीन
मला मात्र वांगी मावेत भाजता आली नाहीत. घरभर विचित्र वास सुटला होता. तेव्हापासून कानाला खडा. ग्रील मोडवरच भाजायची असतात नं?
  • Log in or register to post comments

वांग्याना बाहेरून टोचे देऊन

सस्नेह
Tue, 05/14/2013 - 22:15 नवीन
वांग्याना बाहेरून टोचे देऊन तेल लावून मायक्रो मोडमधे ३-४ मिनिटे ठेवावीत. नंतर बाहेरून गॅसवर भाजावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्रिया

मस्त हो अजून येऊ द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/15/2013 - 10:39 नवीन
मिपाकर मित्र हो, आपल्या प्रतिसादानं मा.वे.ओ.तील पाककृती करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आज गिनिपिंगसाठी काबूलीचनाचा वापर करण्यात आला. काबूली चना पातळबेसनपीठ मीठ,मिरचीच्या साह्याने मस्त स्नॅक्सचा फ्राय अ‍ॅटम जमला. (म्हणजे भाजला) काबूलीचनाची भाजी मस्त जमली आहे. एकूणच काय कॉम्फीडन्स वाढला आहे. ज्ञानोबाचे पैजार यांनी समजावून सांगितलेले कांद्या पोह्यांचा प्रयोग करण्यात येईल. बाकी, पाककृत्या अजून येऊ द्या. (फोटो लवकरच डकवतो) Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात है ....!

रुमानी
Wed, 05/15/2013 - 11:21 नवीन
छान मस्त आलेत फोटो. मस्त जमतय कि ओ सर तुम्हला :)
  • Log in or register to post comments

अजून एक शंका

सुप्रिया
Wed, 05/15/2013 - 11:30 नवीन
मावे मधे sandwitches पण करतात काही लोक. कुठल्या मोडवर ब्रेड भाजावा? वातड नाही का होत?
  • Log in or register to post comments

छ्या.. तसा प्रयत्न करुन झाला.

गवि
Wed, 05/15/2013 - 12:25 नवीन
छ्या.. तसा प्रयत्न करुन झाला. मस्त टोस्ट होतील अशा आशेने ब्रेड आत टाकले. अगदी काही सेकंद गरम केले आणि उघडून पाहिले तर भाजले जाणे सोडाच, आक्रसून निम्म्या आकाराचे झाले होते आणि तेही वातड. तवा बेष्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुप्रिया

व्वा...!

प्रभाकर पेठकर
Wed, 05/15/2013 - 11:31 नवीन
अरे व्वा..! मिपाच्या बल्लवाचार्यांच्या टोळक्यात स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

आता आठवल.

स्पंदना
Wed, 05/15/2013 - 17:46 नवीन
आता आठवल. काँबीनेशन नावाचा मोड आहे आहे का हो तुमच्या मावेला सर? तर कोंबडी मसाल्यात (तंद्उर) टाका. काँबीनेशन मोड मध्ये बारिक तारांच ग्रील चालत. तर त्या ग्रील्वर कोंबडीचे तुकडे एका डीशमध्ये ठेवा, अन कोंबडीच्या वजनाचा आकडा फिड करा. हुवी गया तंदुर !
  • Log in or register to post comments

धन्स.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/15/2013 - 18:39 नवीन
>>> काँबीनेशन नावाचा मोड आहे आहे का हो तुमच्या मावेला सर? हो आहे. >>>तर त्या ग्रील्वर कोंबडीचे तुकडे एका डीशमध्ये ठेवा, ग्रीलवर डीश कशाला ठेवायची मग ? नुसते ग्रीलवर पसरुन टाकले असते पीस. पण, आता तुम्ही म्हणत आहात तर करुन पाहीन. >>>>कोंबडीच्या वजनाचा आकडा फिड करा हाहा. गंमतच असते या ओव्हनमधे. पाहतो आणि फीड ब्याक देतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

वरील सगळे प्रतिसाद वाचले

रेवती
Fri, 05/17/2013 - 10:18 नवीन
वरील सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, बरेच आहेत. मी मावेमध्ये जे पदार्थ करते त्यांची कृती एकतर जालावरून किंवा मावे कुकिंग टाईप भेट आलेल्या पुस्तकातून घेतली आहे याची कृपया नोंद घ्यावी. ;)माझ्या माहेरी सगळी सेतीम्ग्ज वापरली जातात. मला तेवढा उत्साह नाही. पण पोहे, उपमा, शिरा, भाज्या शिजवणे, दाणे भाजणे, खारे शेम्गादाने तयार करणे, दूध, पाणी गरम करणे, पापड भाजणे, गडबडीच्यावेळी बटाटा उकडणे. कधीतरी पावभाजी करणे. मोदकाची उकड, सारण करणे असे करते. आता दरवेळी करतेच असे नाही पण बरेचदा करते. आपण जसजसे वापर करत जातो तश्या नवीन युक्ती सुचत जातात. माझा हा दुसरा मावे आहे. पहिला काही कारण नसताना (स्फोट वगैरे) बंद पडला. पदार्थ गरम करताना म्हणून जे झाकण मिळते ते माझ्याशिवाय वापरायचा उत्साह कोणाला नसतो. मग पदार्थाचे शिंतोडे उडतात. बटाटे उकडताना त्याला सुरीने, फोर्कने टोचून घेते. अजूनही आठवायला बसले तर बरेच पदार्थ करते असे वाटते. याशिवाय मावेचा एक फायदा दिसून आलाय. घरातील सदस्यांखेरीज जे पाहुणे असतात त्यांना प्रत्येकाला आपापल्या पसम्तीने दूध पाणी गरम करून मिळते, बरेचजण त्यांचे तेच हे काम करून टाकतात.
  • Log in or register to post comments

तपशीलवार सांगा की मग.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/17/2013 - 11:12 नवीन
पोहे, उपमा, शिरा, भाज्या शिजवणे, दाणे भाजणे, खारे शेम्गादाने तयार करणे, दूध, पाणी गरम करणे, पापड भाजणे, गडबडीच्यावेळी बटाटा उकडणे. कधीतरी पावभाजी करणे. मोदकाची उकड, सारण करणे असे करते. आता दरवेळी करतेच असे नाही पण बरेचदा करते. खरं म्हणजे अजून या धाग्यातून व्यवस्थित अशी माहिती मिळालेली नाही. आपण सांगाल अशी अपेक्षा. आम्हाला बेसीक माहिती हवी आहे. जसं की एका काचेचं झाकणबंद भांड घ्या. भांड्यात पोहे,हळद,शेंगदाणे,मीठ,अमूक तमूक टाकून झाल्यानंतर भांडे काँबीग मोड मधे १० मिनिटे (पॉवर किती ? ) ठेवा पैकी पहिल्या चार मिनिटातर बटन स्टॉप करुन भांडे बाहेर काढा त्याला चमच्याने पोहे खालीवर करुन घ्या. पुन्हा भांडे मावेओत ठेवा. आता पुन्हा राहीलेले मिनिट्स पूर्ण करण्याकरिता स्टार्टचे बटन दाबा आता पुन्हा तीन मिनिटानंतर पोहे खालीवरुन करुन घ्या. पुन्हा राहीलेली मिनिटे पूर्ण करण्यासाठी भांडे मधे ठेवा. आता तुमचे पूर्ण दहा मिनिटे झाली आहेत. आता एकदम भांडे मावेओतून काढू नका. कमीत कमी दोन मिनिटे त्याला मावेओतच ठेवा. आता आपले पोहे तयार झाले आहेत. धन्यवाद. ( असं तपशीलवार माहिती हवी आहे) -दिलीप बिरुय्टे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा

रेवती
Fri, 05/17/2013 - 15:41 नवीन
अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा कुलकर्णी या बाईंचे व्हिडीओ आहेत. चांगले आहेत. नमुन्यादाखल खारे दाणेhttp://www.youtube.com/watch?v=OR2sKQ8_en4&feature=share&list=UUr56P0A09Yv1679DY0pUTRQ उप्पिट http://www.youtube.com/watch?v=qEiuSBm8vwA&feature=share&list=UUr56P0A09Yv1679DY0pUTRQ यामध्ये अगदी मिनिटामिनिटाचा हिशोब आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आणि निशामधुलिका बाईंचेही

रेवती
Fri, 05/17/2013 - 16:41 नवीन
आणि निशामधुलिका बाईंचेही व्हिदीओज तूनळीवर आहेत. त्यात मावे रेसिप्या मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा