Skip to main content

मायक्रोवेव्ह ओव्हन्सचा उपयोग-मदत ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 13/05/2013 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मंडळी खूप दिवसापासून काथ्याकूट लिहितो पूर्वपरिक्षणापर्यंत जातो आणि पुन्हा धागा कशाला काढायचा असा विचार करुन पुन्हा धागा क्यानसल करायचो. पण आज रहा न गया. मंडळी, माझ्याकडे एल.जीचा मायक्रोव्हेव ओव्हन आहे. त्याच्या उपयोग कसा करावा ते काही समजत नाही. एल्जीचे मॅन्युअल पाठ होत आले आहे, पण त्याचा नीट उपयोग अजून करता येत नाही. एलजी माओ मधे विविध प्रकारचे अ‍ॅटोमॅटीक असे फंक्शन्स आहेत. पण, गेली काही वर्षापासून मावेओ चा उपयोग फक्त पापड भाजण्यापूर्ताच केला आहे. मायक्रोव्हेव ओव्हन्स उपयोग कसा करावा त्यासाठी तुनळीवर अनेक धागे पाहिले, गुगलून पाहिलं. मायबोलीवरचा एक मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही एक उत्तम असा धागा काळजीपूर्वक वाचून झाला पण आमच्या ज्ञानात काही उजेड पडेना. मायक्रोव्हेव च्या सेटींग, त्याचे तापमानाचे सेटींग आणि मग आपल्यालाला पाहिजे तसा मेनू भाजून-करुन झाला पाहिजे. आमच्याकडे मिळणारे 'वामट' नावाचा माश्याचा प्रकार त्याला कसाही करा त्याची भाजी जबरा होते. या माशांचे फ्राय करण्याचा मूड काल उसळून आला. कंटकी टाईप. मासे मस्त कापून बिपून आलं,लसून,मिरचीचा पेष्ट लावले आणि ग्रील सेटींमधे अगदी २५ मिनिटे त्यात ठेवले अजिबात व्यवस्थित असा फ्राय झाला नाही. पुन्हा ग्यासवर ते फ्राय करण्यात आले, काल आमचं किचनमधे प्रचंड हसं झालं. मायक्रोवेव्ह ओव्हन मधे शीरा,उकमा,पोहे, करता येतात. चिकन,मासे, मस्त फ्राय करता येतात. वांग्याचं चांगलं भरीत करता येतं. वगैरे मित्र हो, या सर्व कृती त्यात होत असतील, करता येत असतील तर त्याला मी मूकलो आहे. तेव्हा, मायक्रोवेव्ह ओव्हनस मधे काय शिजवता येतं, काय फ्राय करता येतं, ते कसं केलं पाहिजे, भांडे कोणते वापरले पाहिजे, कोणत्या सेटींग्स कशा केल्या पाहिजेत, विविध मायक्रोवेव्ह ओ. मधे हे सर्व कसं करतात त्याची माहिती मिळाली तर काथ्याकूटाचा हेतू सफल होईल म्हणून हा प्रपंच. विनंती : चुलीवरचे भरीत अहाहा. चुलीवरच्या भाकरी अहाहा. ग्यासवर जी मजा ती मजा इथे नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे.

वाचने 53441
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

>>मायक्रोवेव्ह मधे पोहे फार मस्त होतात. म्हणजे पोह्यांची चव नेहमीपेक्षा वेगळी आणि अप्रतिम असणं हे मुलीच्या घरी मायक्रोवेव्ह असल्याचं लक्षण आहे तर !!.

In reply to by सूड

नुसते ओक्के नाही रे सूड. ;) मुलीला आपल्या प्राडाँनी विचारलेलाच प्रश्न विचारायचा. मावे मध्ये काय काय करता येते?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

कांदेपोहे खूप आवडतात. पण यात कांदा दिसत नाही. असो. प्रयोग केल्या जाईलच. आजच करतो ब्रेकफाष्टला.

In reply to by आजानुकर्ण

अगबाई कांदा राहिलाच की. कामाच्या गडबडीत विसरायलाच झाल. चिरलेला कांदा हळदी बरोबरच टाकावा. तसे कांद्या शिवाय पण पोहे चांगले लागतात. फक्त केल्या केल्या लगेच खाल्ले पाहिजे.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

माफ करा, पण पोहे मावेमध्ये करणे मला वेळखाऊ वाटते. प्रत्येक १-२ मिनीटांनी, ५-६ वेळा काढुन बघायचे असेल तर गॅसवर सोप्पे पडणार नाही का? फोडणी पण मावेमध्ये दिली तर जिरे-मोहरी आतमध्ये उडणार नाही का? व परत सगळे साफ करावे लागणार ना? कांदा पूर्णपणे शिजेल का? शंका खरोखरच मनात आल्या म्हणून विचारते आहे.

In reply to by सखी

फोडणी उडत नाही,फोडणीतली मिरची सुध्दा उडत नाही, कांदा मस्त खरपुस होतो. अगदि बिन्धास्त वापरा. वेळेचे म्हणाल तर गॅस आणि मावे मधे जवळ जवळ सारखाच लागतो. पण मावेचा फायदा असा की एकदा टायमिंग सेट केले की झाले. गॅस लक्षात ठेवुन बंद करावा लागतो. जास्तवेळ गॅस चालु राहिला तर पोह्यातन धुर निघतो. (खालचा कारपलेला पोह्यांचा थर बाजुला काढला तर उरलेले कुरकुरीत पोहे पण छान लागतात.) घरात एकटे असताना शक्यतो मावेच वापरावा. (मावे. मधे बरेच यशस्वी प्रयोग केलेला)

अन उपयुक्त ! मावेओ मध्ये रवा, शेंगदाणे, कोरडे मसाले जसे धणे, जिरे इ. फारच छान भाजले जातात. पोहे, साबुदाण्याची खिचडी गॅसपेक्षा चांगले होतात. दूध, पाणी इ. गरम करण्यासाठी उपयुक्त. (उकळण्यासाठी नव्हे.) वांगी फार छान आतपर्यंत शिजतात. नंतर पुन्हा गॅसवर भाजल्यास भरीत 'स्मोक टच' बनते. बाकी, मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही असे मत आहे.

In reply to by सस्नेह

बाकी, मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही असे मत आहे
अगदी अगदी ... मावेओची अन् गॅसची तुलनाच शक्य नाही! चुलीची चव गॅसला अजिबातच नाही!! गारगोटीने पेटविल्रेल्या काटक्या नि वाळक्या पानांची सर तर कश्शा-कश्शालाच नाही!!! ... ... अन् कच्च्या कंदमूळांची तर बातच वेगळी!!!!! (आदिमानव) सुनील

In reply to by सुनील

+१ चिखल लावून शेकोटीत टाकून उकडलेली अंडी आणि वालाच्या शेंगा, बटाटे आणि मसाला लावून मडक्यात टाकलेलं चिकन म्हणजेच पोपटी याची सर चिकन ग्रीलला नाही.

In reply to by सस्नेह

करण्याचा विषय निघालाच आहे म्हणून विचारतो, भरीत करताना घ्यायची वांगी आतून किडलेली नाहीत हे कसं ओळखावं? भाजल्यानंतर वांगं किडलेलं असल्याचं समजलं तर सगळ्या प्लानचा विचका झाल्यासारखं होतं.

In reply to by सूड

वांग्यांवर कुठेही छोटे-मोठे छिद्र असेल तर ते वांगे आतुन किडलेले असू शकते. त्यामुळे विकत घेताना पाहूनच घ्यावे. बाकी, मिपावर कोणी शेतकरी-बागायतदार असतील तेच सांगू शकतील.

In reply to by सूड

साधारणपणे वांगी घेतांना ती ताजी, मऊसर असावीत. बाहेरून तरी कोठून कीड किंवा तत्सदृश्य काही असायला नको. आकार गोल आणि बसका नसून लांब असावा. भरीताची वांगी मोठी असतात त्यामुळे त्यांच्यावर हाताने चापट्या मारून बघावं. त्यातून येणारा आवाज नक्की कसा ते असं लिहून सांगता येणार नाही पण नेहमी भाज्या-फळं घेणार्‍यांना सवयीने कळते. सबंध वांग्याची आतून घनता एकसारखी असल्याचे त्या आवाजाने कळते. तश्या वाग्यात कीड निघायची शक्यता कमी असते. अवांतरः भरीताची वांगी सुरीने टोचे पाडून सिरॅमिक प्लेटमधे ठेवल्यास मावेओमधे छान शिजतात. त्याला भाजल्याची आणि धूराची खरपूस चव येत नाही पण गॅस नसल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.

In reply to by सूड

वांगी किडकी असल्याचे दोन गोष्टींमुळे समजते १)वांग्यावर काळे छिद्र असते, २)वांग्याचा आकार एकाच बाजूला आकसलेला दिसतो.

In reply to by सस्नेह

मावेओ अन गॅसची तुलना होऊ शकत नाही , कारण दोन्ही आपापल्या जागी फिट्ट आहेत. काही पदार्थ मावेओ मध्ये उताम होतात अन काहीना गॅस बरा. काहीतरी गोंधळ वाटला म्हणून स्पष्टीकरण.

मला मात्र वांगी मावेत भाजता आली नाहीत. घरभर विचित्र वास सुटला होता. तेव्हापासून कानाला खडा. ग्रील मोडवरच भाजायची असतात नं?

In reply to by सुप्रिया

वांग्याना बाहेरून टोचे देऊन तेल लावून मायक्रो मोडमधे ३-४ मिनिटे ठेवावीत. नंतर बाहेरून गॅसवर भाजावीत.

मिपाकर मित्र हो, आपल्या प्रतिसादानं मा.वे.ओ.तील पाककृती करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. आज गिनिपिंगसाठी काबूलीचनाचा वापर करण्यात आला. काबूली चना पातळबेसनपीठ मीठ,मिरचीच्या साह्याने मस्त स्नॅक्सचा फ्राय अ‍ॅटम जमला. (म्हणजे भाजला) काबूलीचनाची भाजी मस्त जमली आहे. एकूणच काय कॉम्फीडन्स वाढला आहे. ज्ञानोबाचे पैजार यांनी समजावून सांगितलेले कांद्या पोह्यांचा प्रयोग करण्यात येईल. बाकी, पाककृत्या अजून येऊ द्या. (फोटो लवकरच डकवतो)

छान मस्त आलेत फोटो. मस्त जमतय कि ओ सर तुम्हला :)

मावे मधे sandwitches पण करतात काही लोक. कुठल्या मोडवर ब्रेड भाजावा? वातड नाही का होत?

In reply to by सुप्रिया

छ्या.. तसा प्रयत्न करुन झाला. मस्त टोस्ट होतील अशा आशेने ब्रेड आत टाकले. अगदी काही सेकंद गरम केले आणि उघडून पाहिले तर भाजले जाणे सोडाच, आक्रसून निम्म्या आकाराचे झाले होते आणि तेही वातड. तवा बेष्ट.

अरे व्वा..! मिपाच्या बल्लवाचार्यांच्या टोळक्यात स्वागत आहे.

आता आठवल. काँबीनेशन नावाचा मोड आहे आहे का हो तुमच्या मावेला सर? तर कोंबडी मसाल्यात (तंद्उर) टाका. काँबीनेशन मोड मध्ये बारिक तारांच ग्रील चालत. तर त्या ग्रील्वर कोंबडीचे तुकडे एका डीशमध्ये ठेवा, अन कोंबडीच्या वजनाचा आकडा फिड करा. हुवी गया तंदुर !

In reply to by स्पंदना

>>> काँबीनेशन नावाचा मोड आहे आहे का हो तुमच्या मावेला सर? हो आहे. >>>तर त्या ग्रील्वर कोंबडीचे तुकडे एका डीशमध्ये ठेवा, ग्रीलवर डीश कशाला ठेवायची मग ? नुसते ग्रीलवर पसरुन टाकले असते पीस. पण, आता तुम्ही म्हणत आहात तर करुन पाहीन. >>>>कोंबडीच्या वजनाचा आकडा फिड करा हाहा. गंमतच असते या ओव्हनमधे. पाहतो आणि फीड ब्याक देतो. -दिलीप बिरुटे

वरील सगळे प्रतिसाद वाचले नाहीत, बरेच आहेत. मी मावेमध्ये जे पदार्थ करते त्यांची कृती एकतर जालावरून किंवा मावे कुकिंग टाईप भेट आलेल्या पुस्तकातून घेतली आहे याची कृपया नोंद घ्यावी. ;)माझ्या माहेरी सगळी सेतीम्ग्ज वापरली जातात. मला तेवढा उत्साह नाही. पण पोहे, उपमा, शिरा, भाज्या शिजवणे, दाणे भाजणे, खारे शेम्गादाने तयार करणे, दूध, पाणी गरम करणे, पापड भाजणे, गडबडीच्यावेळी बटाटा उकडणे. कधीतरी पावभाजी करणे. मोदकाची उकड, सारण करणे असे करते. आता दरवेळी करतेच असे नाही पण बरेचदा करते. आपण जसजसे वापर करत जातो तश्या नवीन युक्ती सुचत जातात. माझा हा दुसरा मावे आहे. पहिला काही कारण नसताना (स्फोट वगैरे) बंद पडला. पदार्थ गरम करताना म्हणून जे झाकण मिळते ते माझ्याशिवाय वापरायचा उत्साह कोणाला नसतो. मग पदार्थाचे शिंतोडे उडतात. बटाटे उकडताना त्याला सुरीने, फोर्कने टोचून घेते. अजूनही आठवायला बसले तर बरेच पदार्थ करते असे वाटते. याशिवाय मावेचा एक फायदा दिसून आलाय. घरातील सदस्यांखेरीज जे पाहुणे असतात त्यांना प्रत्येकाला आपापल्या पसम्तीने दूध पाणी गरम करून मिळते, बरेचजण त्यांचे तेच हे काम करून टाकतात.

In reply to by रेवती

पोहे, उपमा, शिरा, भाज्या शिजवणे, दाणे भाजणे, खारे शेम्गादाने तयार करणे, दूध, पाणी गरम करणे, पापड भाजणे, गडबडीच्यावेळी बटाटा उकडणे. कधीतरी पावभाजी करणे. मोदकाची उकड, सारण करणे असे करते. आता दरवेळी करतेच असे नाही पण बरेचदा करते. खरं म्हणजे अजून या धाग्यातून व्यवस्थित अशी माहिती मिळालेली नाही. आपण सांगाल अशी अपेक्षा. आम्हाला बेसीक माहिती हवी आहे. जसं की एका काचेचं झाकणबंद भांड घ्या. भांड्यात पोहे,हळद,शेंगदाणे,मीठ,अमूक तमूक टाकून झाल्यानंतर भांडे काँबीग मोड मधे १० मिनिटे (पॉवर किती ? ) ठेवा पैकी पहिल्या चार मिनिटातर बटन स्टॉप करुन भांडे बाहेर काढा त्याला चमच्याने पोहे खालीवर करुन घ्या. पुन्हा भांडे मावेओत ठेवा. आता पुन्हा राहीलेले मिनिट्स पूर्ण करण्याकरिता स्टार्टचे बटन दाबा आता पुन्हा तीन मिनिटानंतर पोहे खालीवरुन करुन घ्या. पुन्हा राहीलेली मिनिटे पूर्ण करण्यासाठी भांडे मधे ठेवा. आता तुमचे पूर्ण दहा मिनिटे झाली आहेत. आता एकदम भांडे मावेओतून काढू नका. कमीत कमी दोन मिनिटे त्याला मावेओतच ठेवा. आता आपले पोहे तयार झाले आहेत. धन्यवाद. ( असं तपशीलवार माहिती हवी आहे) -दिलीप बिरुय्टे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशी सगळी माहिती तूनळीवर सुधा कुलकर्णी या बाईंचे व्हिडीओ आहेत. चांगले आहेत. नमुन्यादाखल खारे दाणेhttp://www.youtube.com/watch?v=OR2sKQ8_en4&feature=share&list=UUr56P0A0… उप्पिट http://www.youtube.com/watch?v=qEiuSBm8vwA&feature=share&list=UUr56P0A0… यामध्ये अगदी मिनिटामिनिटाचा हिशोब आहे.

In reply to by रेवती

सूधा कुलकर्णी ह्यांचेच मी पुस्तकं सुचवले होते ह्या धाग्यावर. मायक्रोवेव्ह ग्रिल - कन्व्हेक्शन कुकरी गाईड

माओचा पदार्थतल्या जीवनसत्वांवर विपरीत परिणाम होतात असं ऐकल होतं. त्यात कितपत तथ्य आहे?

In reply to by अनुप ढेरे

आवं ढेरे साहेब, आपला प्रश्न एकदम बरोबर आहे. पण, एकदा मावेओत हे पदार्थ जमायला लागले की मग जीवनसत्त्वांवर परिणाम होतो का ? माणसावर त्याचा परिणाम होतो का ? वीज बील किती येते ? मावेओचे संभाव्य धोके ? असं टप्प्या टप्पानं चर्चा पुढे नेऊ असे वाटते, काय म्हणता ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

म्हण्जे इंचा इंचाने धागा पुढे नेणार तर! लक्ष ठेवून आहे हां! (धाग्यावर. मिळणार्‍या माहितीमुळे..)

In reply to by अनुप ढेरे

अतिशय कमी. खरं तर मा वे ओ ने अन्नद्रव्यांचा र्हास सर्वात कमी होतो खालील दुवे पहा http://www.health.harvard.edu/fhg/updates/Microwave-cooking-and-nutriti… http://www.arimifoods.com/microwave-oven-kills-nutrients-%E2%80%93-who-…

मित्र हो, आत्ता सकाळी (भ्राप्रवे) ला मस्त पोहे मावेओत करता आले. पोहे खातांना कोण आनंद झाला काय सांगू. आपण म्याट्रीकला चांगल्या मार्कानं पास झालो तेव्हाची त्या आनंदाची आठवण झाली. सर्वप्रथम शेंगदाणे क्वीक मोडमधे म्हणजे एक मिनिट चांगले भाजून घेतले. गळाबंद काचेच्या भांड्यात तेल, जीरे,मोहरी,कांदे, मिरची,कढीपत्ता दोन मिनिटे मायक्रो मोडमधे फोडणी दिली. फोडणी दिलेल्या भांड्यात भिजवले पोहे, शेंगदाणे, ह्ळद,मीठ, टाकून मायक्रोमोडमधे पाच मिनिटे ठेवले. मित्र, हो पोहे तयार. एकूणच काय आपल्या प्रतिसादांनी 'कुछ करणे की चाहत' निर्माण झाली. आपलं मला माहिती नाही. पण, मावेओचं दडपण सालं निघून गेलं. मात्र गेल्या दोन तीन दिवसात मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत. नॉनव्हेज अ‍ॅटम फसू लागले आहेत. असो....! यापुढेही, मायक्रोवेव्ह ओव्हन्समधे काही प्रयोग केला, यशस्वी झाला, फसला तर त्या पाककृतीच्या सुख दु:खाच्या गोष्टी तुम्हाला नै सांगायच्या तर मग कोणाला सांगायच्या नै का... तेव्हा सवडीनं सर्वं सांगेनच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

मोबाईल अजिबात चालू नव्हता त्याला चार्जींगला लावल्यामुळे फोटो काढता आले नाहीत पण फोटो हवेच होते, असे मलाही वाटत होतं. पुढल्या वेळी फोटो काढेन. मन की बाते. : प्राडॉ. वल्लीशेठ तुमच्यावर अविश्वास तर दाखवत नाही ना.... ;) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नै नै. तसं नै. पण मिपावर पाकृला फोटोंशिवाय मजा नै. :)

In reply to by प्रचेतस

पाककृतीला फोटो हे पाहिजेच. कोरड्या पाककृत्यांना मजा नाही. आपण अनेकदा पाककृतींना फोटोची मागणी करतो ती यासाठीच. बाकी, अविश्वासाची नुसती गम्मत. :) @ पैजार बॉ, कौतुकाबद्दल धन्स. अजून खूप शिकत राहू....!!! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे हो!!!!!!!!! ह्या फोटूच्या गडबडीत सरांच्या यशस्वी पाकृबद्दल अभिनंदन करायचं राहिलंच. अभिनंदन सर.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

>>>चला, गंगेत घोड न्हायल. आज रव्वार आहे, तुम्हाला काय माहिती? 'घोडं' अजून आळसावलेलंच असेल ;) मावेओ मधले पोहे मस्त लागतात. -सासुरवाडीहून 'सप्रेम' मिळालेल्या मावेओ चे पोहे खाल्लेला प्यारे ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे नुसताच मायक्रोवेव्ह कि मायक्रोवेव्ह + कन्व्हेक्शन असं आहे? कारण नुसत्याच मायक्रोवेव्ह मधे फोडणी होईल का ही शंका आहे.

In reply to by शिल्पा ब

आपली शंका बरोबरच असेल पण मी केलं ते असंच केलं. अधिक वेळ दिला पाहिजे याच्याशी सहमत. पोहे आणि अन्य पाककृती करणार्‍यांनी फोडणीसाठी किती वेळ आणि कोणता मोड वापरला पाहिजे, त्याची जर माहिती दिली तर आनंद वाटेलच. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी अजुन मायक्रोवेव्ह मधे एकही पाकृ केलेली नाही त्यामुळे काहीच सांगु शकत नाही पण तुम्ही म्हणताय तसे पोहे करुन बघते जमताहेत का.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रचंड अभिनंदन, बिरुटे सर. एखाद्या कट्ट्याला हे असे मायक्रोवेव्ही पोहे घेऊन यावे. आपण हे यश साजरे करू.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मासे आणि चिकनपीस मात्र मस्त पैकी तांबूस होतील असे भाजता आले नाहीत. काँबी मोड वापरून पहावा. मावे मोड अन्न आतपर्यंत खोलवर समप्रमाणात शिजवतो पण अन्नाचा रंग बदलत नाही. कन्व्हेक्शन मोड अन्नपदार्थांचा बाहेरचा थर जास्त गरम करतो आणि त्यांला तांबूस रंग आणतो (ब्राउनींग) व खरपूस (क्रिस्प) बनवतो. काँबी मोड मध्ये माओ आणि कन्व्हेक्शन हे दोन्ही मोड वापरत असल्याने दोन्हींचा फायदा मिळतो. ब्राउनिंग न केल्यास उत्तम शिजलेले पदार्थही दिसायला कच्चे असल्यासारखे "दिसतात". त्यामुळे काँबी मोड मांस-मासे यांना विशेषतः उपयुक्त आहे. तुमच्या माओ प्रयोगांना शुभेच्छा ! फोटो बघणेच्छूक...

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दोन्ही ओव्हन कशापद्धतीने पदार्थ गरम करतात/शिजवतात हे लक्षात घेतल्यास 'काँबिनेशन' का, कसे, किती आणि केंव्हा वापरावे हे ठरवता येते. मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये ठराविक किरण पदार्थावर पडून त्या पदार्थातील सूक्ष्म जलबिंदूंना इतक्या जोरात घुसळतात की ते एकमेकांवर घासून उष्णता निर्माण होते. हे पदार्थाच्या संपूर्ण वस्तुमानात एकाच वेळी होत असल्याने पदार्थ थेट आंत पासून गरम होतो/शिजतो. पारंपारीक (कन्व्हेक्षन) ओव्हन मध्ये, गरम झालेल्या कॉइलवरून आलेल्या गरम लाटा आतील पंख्यामुळे पदार्थाच्या संपर्कात येतात. आणि विज्ञानाच्या उष्ण्तेच्या नियमानुसार उष्ण हवेच्या संपर्कात आलेला पदार्थाचा सर्वात बाहेरचा थर प्रथम तापतो आणि अतिरिक्त उष्णता पुढच्या (आंतील) थराकडे पाठवितो, तसा तो आतला थर तापू लागतो. ही साखळी पदार्थाचा सर्वात आंतील थर तापे पर्यंत चालू राहाते आणि पदार्थ शिजतो. आधीच शिजलेला पदार्थ 'ब्राऊनिंग्' साठी कन्व्हेक्षन मोडमध्ये ठेवला जातो. ह्यात उष्णतेची पातळी किती ठेवली आहे ह्यावर शिजलेल्या पदार्थाचे 'ब्राऊनिंग' अवलंबून असते. एका थराकडून दुसर्‍या थराकडे उष्णता पाठविण्याच्या वेगापेक्षा, येणार्‍या उष्णतेचा वेग जास्त असेल तर बाहेरचा थर जास्त शिजून 'करपू' लागतो. ते 'करपणे' नियंत्रीत ठेवून पदार्थ आपल्याला पाहिजे तेवढाच करपविणे म्हणजेच 'ब्राऊनिंग'. गॅसच्या किंवा कोळशाच्या शेगडीवरही ह्याच नियमाने पदार्थ शिजतो, करपतो, जळतो. बार्बिक्यू करताना बार्बिक्यू शेगडीत कोळशांची रचना कमी आणि भरपूर अशी दोन विभागात करतात. कमी कोळशांच्या विभागात चिकन शिजते. कारण येणारी उष्णता आणि पुढच्या थराकडे हस्तांतरीत होणारी उष्णता ह्यांचा वेग समान असतो त्यामुळे चिकन करपण्याआधी उष्णता पुढच्या थराकडे गेल्याने चिकन करपत नाही. पण चांगले आंत पर्यंत शिजते. ते तसे शिजल्यावर जास्त कोळशांच्या विभागावर ठेवले जाते. इथे येणार्‍या उष्ण्तेचा वेग हस्तांतरीत होण्यार्‍या उष्णतेच्या वेगापेक्षा जास्त असतो त्यामुळे चिकन बाहेरून 'ब्राऊन' होऊ लागते. 'ब्राऊनिंग' का होते? प्रत्येक पदार्थात साखरेचा अंश असतो. अति उष्ण्तेने, उष्णतेच्या संपर्कातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन साखरेला उष्णता मिळते. आणि त्या साखरेचे 'कॅरमलायझेशन' होऊ लागते. 'कॅरमलायझेशन' प्रक्रियेत साखरेचे रुपांतर कार्बनमध्ये होते ते किती प्रमाणार झाले आहे त्या नुसार 'बाऊन' ते 'ब्लॅक' असा रंगाचा प्रवास असतो. तोच आपण नियंत्रीत करत असतो. ह्या प्रक्रियेसाठी उष्णता १४० अंश सेंटी पेक्षा जास्त असावी लागते. मायक्रोवेव्ह मोडवर ब्राऊनिंग का होत नाही? मायक्रोवेव्हचे कार्य वर सांगितल्याप्रमाणे पदार्थातील जलबिंदूंना घुसळण्याच्या प्रक्रियेतून होते. पाण्याचा गुणधर्म म्हणजे १०० सेंटी ला पाण्याचे वाफेत रुपांतर होते म्हणजे पाणी १०० सेंटीच्या वर तापू शकत नाही. आणि कॅरमलायझेशन प्रक्रिया १४० सेंटीच्या पुढे सुरु होते. त्यामुळेच पाण्यात बटाटा फक्त शिजतो. पण तेलात शिजतो सुद्धा आणि ब्राऊन सुद्धा होतो. कारण तेलाची उष्णता १४० सेंटीच्या वर जाऊ शकते. (उत्कलन बिंदूतील फरक). ह्या प्रक्रियेची कारणमिमांसा मायलार्ड नांवाच्या कोणी शास्त्रज्ञाने शोधून काढली त्यामुळे ह्या प्रक्रियेला 'मायलार्ड प्रक्रिया' असेही म्हणतात.

In reply to by प्रभाकर पेठकर

सुरवातीला तंदुर प्रकार करुन बघितले. पदार्थामधिल अंगचा ओलावा नष्ट झाल्याने पदार्थ चिवट/ रबरी झाले होते. हॉटेल सारखे रसदार/लुसलुशीत तंदुरी कबाब कसे करायचे?

In reply to by jaypal

कुठला पदार्थ केला होता? आंच कमी ते मध्यम असावी. प्राथमिक शिजल्यावर पदार्थ बाहेर काढून त्यावर बटर किंवा तुप लावावे. अशाने बाहेरील थर शिजून पदार्थातील नैसर्गीक ओलावा टिकून राहतो. ही बटर किंवा तुप लावण्यची प्रक्रिया २ ते ३ वेळा करावी लागते.बटर/तुप इ.इ. बरोबर मधून मधून जे उरलेले मॅरिनेशन असते त्याचेही थर द्यावेत. त्यानेही पदार्थातील पाणी शिल्लक राहुन पदार्थ शिजतो पण चिवट होत नाही. कोळशाच्या शेगडीवर बार्बिक्यू करताना शेगडीत भरमसाठ कोळसे घालू नये. आवश्यक असतील तेवढेच घालावेत. जसजसे कमी होतील तसतसे वाढवावे. निखार्‍यापासून पदार्थ ६ इंच वर असावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

मी चिकन तंदुर आणि चिकन बोनलेस कबाब करुन बघितले होते. आता नव्याने तुम्ही सांगतल्या प्रमाणे करुन बघतो

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नॉनव्हेज अ‍ॅटम फसू लागले आहेत.
प्रा.डॉ. बिरूटेसर, मावे सुचवतोय तुम्हाला नॉन्वेज सोडा म्हणून ;) पोहे कशे छान्छान झाले बघा. :)

मायक्रोवेव्हचा वापर शक्यतो टाळावा,यात तयार केलेले अन्न शरीरास अपायकारक आहे.मी स्वतः ऑफिस मधल्या मायक्रोवेव्हचा सुद्धा वापर टाळतो...आणि घरी मायक्रोवेव्ह विकत घ्यायचे टाळले आहे. अधिक माहिती इथे :- The Proven Dangers of Microwave Ovens Microwave Ovens Kill Food, and Eventually, YOU! https://www.youtube.com/watch?v=EsaxhMvSv3Y

In reply to by मदनबाण

अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्या आंतरजालावरून सतत प्रसिद्ध होत असतात. त्यांना साध्या इंग्लिशमध्ये होक्स (hoax) म्हणतात. अशा बातम्या बर्‍याचदा इतक्या शास्त्रिय वाटतील अशा प्रस्तावित केलेल्या असतात की सर्वसामान्य जनता त्याला सहज बळी पडून बकरा बनतात. बर्‍याचदा अशा बातम्यांचा लोकांना उल्लू बनवणे हाच उद्देश असतो. पण त्यातल्या काही, विशेषतः आरोग्याशी संबद्धीत असलेल्या होक्सवर विश्वास ठेवणे धोकादाय ठरू शकते.... तेव्हा सावधान ! हा प्रकार इतका बोकाळला आहे की याच्या विरोधी अनेक अँटी-होक्स संस्थळे आहेत जी शास्त्रीय कसोटीवर अशा बातम्या तपासून त्यांचे खरेखोटेपण प्रसिद्ध करतात. नमुन्यादाखल वरच्या वरच्या बातमीची शहानिशा करणारे एक संस्थळ : museum of hoaxes internet hoaxes हे कीवर्डस् वापरून शोध घेतल्यास अजून अशी अनेक होक्सबस्टर संस्थळे सापडतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

एक्का काका, तुमच्या मताशी मी काही प्रमाणात सहमत आहे.बर्‍याचदा दुवा देताना तो योग्य माहितीचा आहे का हे पहायला हवे आणि हा विचार अनेकवेळा माझ्या मनात डोकावतो... इंटरनेटवर योग्य आणि खात्रीशीर माहिती शोधणे हल्ली कठीण होत चालले आहे,वॄत्तपत्र्,वॄत्तवाहिन्या या वरील दुवे ग्राह्य धरले जातात्,पण इतर माहिती देताना ती योग्यच असेल असे सांगणे कठीण आहे. आत्ता या मायक्रोव्हेव विषयावर अनेक माहिती जालावर उपलब्ध आहे,अगदी विकीपिडीयावर सुद्धा.पंरंतु कुठली माहिती कितपत पूर्ण आहे हे सांगणे कठीण्,कारण यात सातत्याने भर पडत असते... www.huffingtonpost.com या संकेस्थळावर मायक्रोव्हेव संबंधी माहिती आहे,ती सुद्धा एका डॉक्टर ने दिलेली,मग विचार केला की हा डॉक्टर सुद्धा होक्स आहे का ? कारण इंटरनेटवर नुसत्या माहितीचा नव्हे तर व्यक्तींच्या प्रोफाइलचा होक्स असु शकतो,किंवा ती व्यक्ती सुद्धा होक्स असु शकते,ज्या संस्थळावरुन माहिती आपण वाचतो तेच किती सत्य माहिती सांगते या विषयी कुठेतरी माहिती मिळायला हवी...huffingtonpost.com या संस्थळा बाबत अजुन तरी मला तशी माहिती मिळवता आली नाही. आता या संस्थाळावरील दुवा देतो:- http://www.huffingtonpost.com/dr-mercola/microwave-cancer_b_684662.html जालावरील योग्य माहितीचा पडताळा कसा केला जावा ? किंवा या विषयी कुठे अधीक माहिती मिळेल ? जाता जाता :- होक्स साईट सुद्धा मिळणारी माहिती कितपत सत्य असु शकते असा सध्या विचार मनात डोकावत आहे.

In reply to by मदनबाण

अरे लेका, दुष्परिणाम कशाचे होत नाही ते एकदा सांग बरं....!!! आम्ही आता ओव्हन्समधे पापड भाजण्याच्या पुढे चाललो आहोत हे काय बघवेना का तुम्हाला. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुष्परिणाम कशाचे होत नाही ते एकदा सांग बरं....!!! हॅहॅहॅ... ;) अवांतर :--- मनुष्य प्राणी ज्या वेगाने निसर्गाचा र्‍हास करतोय्,आणि त्याच्या पासुन वेगाने लांब जातो आहे... तेव्हा कशा कशाचे दुष्परिणाम येणार्‍या मानव जातींच्या पिढीला भोगायला लागतील ते सांगणे कठीणच ! जाता जाता :--- सर जर वेळ मिळाला तर या वेगळ्या विषयावर सुद्धा वाचा. REPORT ON CELL TOWER RADIATION