Skip to main content

सन्मान

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 10/05/2013 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे कधी करतो सलगी, बोचर्‍या जुन्या क्षणांशी वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2466
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे
व्वाह! क्या बात है।
घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
बहोत खुब।

ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे -दिलीप बिरुटे

फार दिवसांनी अप्रतिम शायरी ऐकली.

वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे
ज्जे बात!!