लोक विचारती आम्हा, का दर्द आमच्या शायरीत आहे
अहो व्यथांना सन्मानिण्याची, हीच आमची रीत आहे
वाटते दु:खासही कधी,दिसावे सुंदर आपणही
लेखणीत म्हणून ते आमच्या, यथेच्छ शृंगार करीत आहे
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही
ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे
कधी करतो सलगी, बोचर्या जुन्या क्षणांशी
वागणे जरासे आमचे, आमच्याच विपरीत आहे
घेतला दगाही काही, ऐश्या सफाईने आम्ही
दगाबाज अजून आमची, वाहवा करीत आहे
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2480
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु
व्वाह! क्या बात है।
बहोत खुब।
+१
In reply to ये फुलवितो तुलाही, सांगतो दु by स्पंदना
असेच म्हणते..
खुपच छान.. आवडेश
क्या बात है.
ये फुलवितो तुलाही, सांगतो दु:खास आम्ही
ऐकतो ते ही स्वतःला, आताशा सावरीत आहे
-दिलीप बिरुटे
कल्पना खूप आवडल्या.
कल्पना खूप आवडल्या.
केवळ सुरेख...!
केवळ सुरेख...!
बोहोत खूब...!
बोहोत खूब...! :-)
माशाल्ला!!
फार दिवसांनी अप्रतिम शायरी ऐकली.
__/\__
ज्जे बात!!