असुर कोण ? (१)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
असुर कोण ? (१)
मागील एका धाग्यात "असुर" बद्दल उल्लेख झाला होता. आज असुर बद्दल काही माहिती बघू. ही माहिती दोन प्रकारांनी पाहिली पाहिजे. पहिली आपले वैदिक/पौराणिक वाङ्मय काय सांगते व दुसरी ऐतिहासिक/वांशिक माहिती. लहानपणापासून दैत्य, दानव, असुर, राक्षस हे सगळे एक, क्रूर, दुष्ट, अन्यायी, देवांचे शत्रु, थोडक्यात वाईट. अर्थात जरी हे सगळे भिन्न असले तरी एकाच वर्गांत ढकलले गेलेले. रावण. नरकासुर, हिरण्यकश्यपु वगैरे. या विरुद्ध दुसरी बाजू मोठ्या विद्वानांनी घेतलेली, विशेषत: साम्यवादी विद्वानांनी मांडलेली. त्यात असुर हे आर्य येण्यापूर्वीचे भारतातील रहिवासी. सुसंस्कृत, नागरी, शांतताप्रिय. सिन्धु संस्कृती यांची. आक्रमक आर्यांनी यांचा बिमोड केला. पुरावा म्हणून इंद्र-वृत्र युद्धाचे उदाहरण देतात. वर्गविद्रोहाचे उदाहरण. आपण दोघांकडेही बघू
वेदांमध्ये इन्द्र-वृत्र यांच्या युद्धाचे वर्णन आढळते. देव-असुरांमधील सर्वात जास्त गाजलेले युद्ध. कोण हा वृत्र? त्याकरिता एक वंशावळ पाहिली पाहिजे.ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रातले दोन, (१) मरिची व (२) दक्ष प्रजापती. मरिचीचा मुलगा कश्यप याला दक्षाने आपल्या तेरा मुली भार्या म्हणून दिल्या. त्यातील एक अदिती. अदितीला १२ मुलगे, अदितीची मुले म्हणून त्यांना आदित्य म्हणावयाचे. आज आपल्याला त्यांतील तीन बघावयाचे आहेत. (१) त्वष्टा, (२) इन्द्र व (३) वरुण. त्वष्टा व इन्द्र भाऊ-भाऊ. त्वष्ट्याचा मुलगा त्रिशिरा. हा इन्द्राचा पुतण्या. हा मोठा तपस्वी, जितेंद्रिय असून वेदांचे अध्ययन करत असे. एकदा देवगुरू बृहस्पती रागावून इन्द्राला सोडून गेला तेव्हा इन्द्राने याला देवगुरू म्हणून नेमले. तर असा हा त्रिशिरा इन्द्रपद मिळावे या इच्छेने तप:चर्या करू लागला म्हणून इन्द्राला भिती वाटू लागली व त्याने त्रिशिराचा वध केला ! आपल्या मुलाला इन्द्राने मारले म्हणून त्वष्ट्याला राग आला व इन्द्रवधार्थ पुत्र निर्माण करण्यासाठी त्याने एक यज्ञ केला. त्यामुळे झालेला मुलगा म्हणजे वृत्र. पण यज्ञात उच्चारांत चूक झाली म्हणून इन्द्राचा वध होण्याऐवजी इन्द्राकडून वृत्राचाच वध झाला. म्हणजे इन्द्राने आपले दोन पुतणे मारले व यामुळे त्याच्यामागे ब्रह्महत्येचे पातक लागले. देव-असुरांतला हा झगडा म्हणजे कोल्हापुर जिल्ह्यात जमीन वाटपावरून भावाभावात मारामारी व्हावी असा मामला होता.
आता जरा वरुणाकडे वळू. ऋग्वेदात वरुणाचा उल्लेख असुरो विश्ववेदा,(सारे विश्व जाणणारा असुर), असुर:पित न: (असुरांचा पिता), असुरस्य वेधस: (असुरांचा प्रजापती) असा केला आहे. हा असुरांचा प्रजापती वरुण वैदिकांची प्रमुख देवता आहे. म्हणजे असुर हे आर्यांच्या कळपातीलच आहेत. बाहेरचे, "उपरे" नव्हेत. वरुणाचा मुलगा भृगु व अंगिरा हे "वारुणी" वरुणाचे पुत्र म्हणून ओळखले जातात. भृगूचा मुलगा शुक्र हा असुरांचा गुरु जसा बृहस्पती देवांचा. ऋग्वेदात "असुर" यज्ञाचे निर्माते असे म्हटले आहे. इन्द्रपदासाठी भांडणं होत असतील तर सर्व भांडणांची जातकुळी एकच, कौरव-पांडच, यादव, मोगल राजे, राघोबा-नारायणराव पेशवे यांच्यातल्या वैरासारखीच. असुरांतीलच बली, प्रल्हाद वगैरे देवविरोधी नव्हतेही. म्हणजे सगळे काही एकच होते असेही नव्हे. जसजसे जगभर(फक्त भारतातच असे नव्हे) पसरू लागली तेव्हा दोहोंत काही फरक पडलेलाही दिसतो, उदा. वेदांत रुद्राला त्याने यज्ञात विघ्ने आणू नयेत म्हणून त्याची प्रार्थना केलेली दिसते तर असुरांचे लाडके दैवत शंकरच ! असो. आता असुर मुळचे कुठले ते पाहू.
इ.स.पूर्व १५००-२००० च्या दरम्यान आर्य घोड्यावरून दौडत आले, इथल्या शांततावादी रहवास्यांना जिंकून, त्यांचा बिमो’ड करून, त्यांच्या संस्कृतीचा (हडप्पा) नाश केला ही संकल्पना आता मोडींत निघाली आहे. भारतात अनेक प्रकारचे लोक इ.स.पूर्व ४०००-५००० पासून येतच होते, आर्य त्यातले, असुरही त्यातलेच. आलेल्या सगळ्यांनी येथील रहिवासी व एकमेकांशी जुळवून घेतले व साधारणत: सहिष्णुतेने वागून एका समाजाची घडी बसवली. झगडे नव्हते का? होते की. माणुस फार शांतताप्रिय प्राणी म्हणून कधीच नावाजलेला नव्हता. पण त्याचे स्वरूप आक्रमक-स्थानिक असे नव्हते ( उदा. दाशराज्ञ युद्ध). फार कशाला, नावजलेल्या भारतीय युद्धात कौरव-पांडव ( व त्यांचे थोडे नातेवाईक ) सोडले तर बाकीचे राजे युद्धाची खुमखुमी म्हणून आले होते की नाही ?
पुढे बौद्ध धर्माचा प्रसार, चीन, अतिपूर्व, मध्य आशियात झाला तेव्हा कोण घोडे-धनुष्यबाण घेऊन गेले होते ? स्थानिकांनी बाहेरची संस्कृती स्विकारली म्हणजे तलवारीच्या धाकाखालीच हे काही खरे नव्हे. (त्या॒ची सुरवात झाली इस्लाम व त्यानंतर ख्रिश्चन धर्म प्रसारकांपासून. ते सोडा.) जर वरील मांडणी पटत नसेल तर उपक्रमवरील श्री. चंद्रशेखर यांचे "सुरकोटलाचा अश्व " हे तीन लेख वाचा. अभ्यासपूर्ण आहेत. उपक्रमवरचे लेख ’आपल्या"करिता नाहीत असेच समजावयाचे कारण नाही. वाचाच.
इ.स.पूर्व ५०००-७००० या काळात गेलात तर काय दिसले असते ? कास्पिअन ( कश्यप ?) समुद्रापासून पूर्वेकडे पंजाबपर्यंत व पश्चिमेकडे पार हंगेरीपर्यंत निरनिराळ्या टोळ्या स्वैर संचार करत होत्या. "व्हिसा-पासपोर्ट" वगैरे भानगड नव्हती ना. बायका-पोरे, गुरेढोरे घ्यावयाची व मनाला वाटेल तिकडे सुटावयाचे. वाटेत भेटलेल्या लोकांत मिसळून जावयाचे, गरज पडली तर युद्धे करावयाची. जिंकलात तरीही तेथे थांबले पाहिजेच असेही नाही. खर्या अर्थाने "जिप्सी". आज तुम्ही जिथे आहात तेथेही मागून पुढून, वरून खालून दुसर्या टोळ्या येतच असत. आज पूर्वेला जाताजाता पंजाब लागला म्हणजे पुढेला गंगेकडे जायचे असेही नाही. दक्षिणेकडे वळा वा परत घूमजाव करून इराणकडे वळा. वस्ती छोट्या छोट्या गावांत विखुरलेली होती, राज्ये लहान लहान होती. साम्राज्ये नव्हतीच. तर भारतातील परिस्थिती अशी होती. या लहान लहान वस्त्यामंध्ये तथाकथित आर्य, असूर, नाग, हुण, वानर, राक्षस, यक्ष सगळे नांदत होते. निरनिराळ्या प्रकारची आराधना करत होते. युद्धे होत नव्हतीच असे नाही पण एकुण गुण्यागोविंदाने चालले होते असे म्हणावयास हरकत नाही. यात असुर कुठे बसतात ते आता पुढील भागात बघू..
शरद
प्रतिक्रिया
छान
इरावती कर्वे यांचे "युगांत"
युगांत
पर्व.. भैरप्पा..
+११११११११११११.
-११११११११११११
महाभारताची कहाणी प्रत्यक्ष
हम्म.
मला तरी कंटाळवाणे वाटले नाही
संपूर्ण महाभारत वाचलेले असेल
हम्म अंमळ असहमतीशी सहमत इथे
उत्तम सुरुवात.
छान सुरुवात!
माझ्या पिल्लुच्या वर्गात एक
एक असीरीयन मुलगा
त्याचे आई वडील इराण मधुन आलेत
ईंटरेस्टिंग. बहुतेक सीरिअन
शक्य आहे...
इंटरेस्टिंग! अल् मध्ये
आताचे जॉर्डन, लेबॅनॉन, सिरिया
फटूबद्दल धन्यवाद देवाशेजारी
एकेरी उल्लेख
तुम्ही चित्रगुप्त आहात
जॉर्डन लिखाणाच्या यादीत
हर्कत नै, येऊद्या जॉर्डन
नेटवर शोध घेताना हे सापडले.
छान माहिती. पुभाप्र
पण आर्य दक्षिणेकडच्या द्रविड
वाचतोय... पुभाप्र.
वाचत आहे..
असुर हल्ली अजिबातच दिसत नाही.
लेख आवडला