✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

भ
भडकमकर मास्तर यांनी
Tue, 05/07/2013 - 17:14  ·  लेख
लेख
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात. समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच. मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद... “ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई. “पण जातीय म्हणजे काय?” “ जातीय म्हणजे अश्लील” “ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ” असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो. दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत... मध्यंतर त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं... मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं... मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते. मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो. मग नावं येताना ---- श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
विडंबन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
64776 वाचन

💬 प्रतिसाद (154)

प्रतिक्रिया

हो मी पण १०००० वेळा सहमत..

पिलीयन रायडर
Wed, 05/08/2013 - 17:05 नवीन
हो मी पण १०००० वेळा सहमत.. थोडा ऐसपैसपणा आवडतोच आपल्यला.. रक्तातच आहे ना.. पण फक्त काही टिपीकल कोकणस्थी गोष्टी पण मस्त असतात.. ते नारळ बिरळ खवुन घालतात सगळ्यात.. फारच मस्त..!! आणि त्यांच्यावर काही बाबतीत विश्वास टाकता येतो.. जेव्हा ४ म्हणतील तेव्हा ४ वाजताच येतील.. सांगितील तेवढेच येतिल.. आनि सुचना पण नीट.. "आम्ही ४ ला दोघे जण येत आहोत, जेवाय्ला थांबणार नाही".. हेच आम्च्या घरात " येतोय संध्याकाळी" असा (नशीब) फोन (तरि) करतात!! किती, कोण, कधी, कशाला ह्याच काही उत्तर नसतं.. पण तरि आपलीच माणसं आहेत.. जास्त आली एक्दम तरी चटाचटा मदत पण करतील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

रैट्ट यू आर.

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 17:07 नवीन
:) रैट्ट यू आर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

हल्लीच

पैसा
Wed, 05/08/2013 - 17:32 नवीन
एक वाक्य वाचलं होतं.

कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल याचा भरवसा नाही!

पळा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा !!

सूड
Wed, 05/08/2013 - 17:37 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅ हॅ हॅ.

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 17:48 नवीन
हॅ हॅ हॅ. असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही. -श्रेयअव्हेर: बाजीप्रभू फ्रॉम पावनखिंड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तितकीच त्यातली गंमत

बाळ सप्रे
Wed, 05/08/2013 - 17:07 नवीन
तितकीच त्यातली गंमत
सहमत.. परंतु उपाध्येंचे आजकालचे टीव्हीवरील कार्यक्रम पाहता "तेवढी गंमत" सोडून आजकाल फक्त राशींचीच कास धरून अक्षरशः बुवाबा़जी केल्यासारखी वाटते.. नशीब गाडगीळांनी काही ह्यालेखापुढे आणखी कोकणस्थांची री नाही ओढली .. तेवढीच गंमत राखली..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

पण निरीक्षणं मजेशीर आहेत

बाळ सप्रे
Wed, 05/08/2013 - 13:31 नवीन
पण निरीक्षणं मजेशीर आहेत
एवढंच खर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मस्त

सुधीर मुतालीक
Tue, 05/07/2013 - 18:44 नवीन
लिखाण भन्नाट !
  • Log in or register to post comments

हे बहुदा क्रिएटीव मुक्तक, विडंबन असेलही...

अग्निकोल्हा
Tue, 05/07/2013 - 19:02 नवीन
कारण चित्रपट न बघता केवळ दिग्दर्शकाची इंग्रजी शब्दांनी भरलेली "मराठी माज" मुलाखत बघूनच आपण आपल्या कल्पनाशक्तिचा विस्तार केलाय म्हणजे दाद तर द्यावीच... पण म्हणुनच त्याची निखळताही हरवली आहे व टारगेटेड झालय. असो यापुढे पहिल्यांदा विडंबन व नंतर मुख्य धागा प्रकाशित व्हायचाही पायंडा पडल्यास त्याला जबाबदार संस्थळ असेल.
  • Log in or register to post comments

ओढून ताणून कोकणस्थ

तिमा
Tue, 05/07/2013 - 21:03 नवीन
मास्तरांनी लिहिलेली गोष्ट जर खरी असेल तर, हा चित्रपट निव्वळ कोकणस्थांची चेष्टा करण्यासाठीच काढला आहे असे वाटते. कोकणस्थांचे जे गुण-अवगुण आहेत ते सार्‍यांना माहिती आहेत. पण ते अधोरेखित करुन, त्यांना मुद्दामहून प्रकाशझोतात आणण्याचे काम गेली काही वर्षे हे नाटक-सिनेमा व सिरियलवाले करत आहेत. मग ते अत्यंत कृत्रिम सानुनासिक संवाद, त्या काळ्या टोप्या, त्या काळ्याभोर मिशा, ती लाल आलवणे,यांचा रतीब घातला जातो. बाकीच्यांना काय, आयतेच 'तोंडीलावणे' मिळते. ब्रिगेडवाल्यांचे लक्ष जाऊन, आपोआपच काडी टाकली जाते. हे सगळे अगदी पद्धतशीर चालू आहे असे वाटते. आम्हाला फक्त शांतपणे जगू द्या, एवढीच आमची किमान अपेक्षा आहे. - एक स्वाभिमानी कोकणस्थ, तिमा.
  • Log in or register to post comments

जावु द्या हो!!!

मुक्त विहारि
Tue, 05/07/2013 - 21:21 नवीन
सोडून द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

+१

श्रीरंग_जोशी
Tue, 05/07/2013 - 21:33 नवीन
हेच म्हणतो. वर माझ्या प्रतिसादामुळे चर्चा किंचीत नको त्या दिशेला वळत आहे त्याबद्दल क्षमस्व. माझ्या सुदैवाने रोजच्या व्यवहारात जात व धर्माचा विचारही न करण्याच्या परिस्थितीत व अनेक जातिधर्मांच्या शेजार्‍यांच्या व मित्रंडळींच्या सहवासात मी लहानाचा मोठा झाल्याने अशा विचारांपासून नेहमीच दूर राहिलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

अतिशय योग्य बोललात...

मुक्त विहारि
Tue, 05/07/2013 - 21:39 नवीन
जाती बाबतीत ठीक आहे पण धर्मा बद्दल म्हणाल तर माझे अनुभव फार वाईट आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

तिमांच्या पूर्ण प्रतिसादाशी

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 00:24 नवीन
तिमांच्या पूर्ण प्रतिसादाशी सहमत. विशेषतः कृत्रिम सानुनासिक संवाद सर्वांत जास्त डोक्यात जातात. बाकी, देशस्थांनाही अंमळ हायलाईट करावे असे कधी कधी वाटते. ब्राह्मण म्हटले की कोकणस्थ हेच डिफॉल्ट क्यारेक्टर घेणे हा अतिशय तर्कदुष्ट प्रकार आहे. त्या निमित्ताने बाकीच्या पोटजाती किमान अस्तित्वात आहेत इतके कळाले तरी लै झाले. असो. -एक स्वाभिमानी देशस्थ, बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सानुनासिक संवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 05/08/2013 - 00:35 नवीन
तीन वर्षांपूर्वी एका मिपाकराने (छोटा डॉन की टारझन?) पूणे आयपीएल संघनिर्मिती झाल्यावर एकाहून एक पुणेरी संवाद लिहिले होते (जसे आम्ही फक्त दिवसाच सामना खेळणार, रात्रीच्या सामन्याचे दुप्पट पैसे लागतील) जे जालावर भयंकर वेगाने फिरत होते. तर बहुधा स्टार माझा ने ते ध्वनिफितीच्या रुपाने प्रसिद्ध केले होते व त्यात ते अतिरेकी सानुनासिकपणे म्हंटले गेले होते. मी तरी आजवर इतके सानुनासिक बोलणार्‍या कुणालाही प्रत्यक्ष भेटलो नाही. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये तसे बोलणारी पात्रे असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओह ओक्के. पण जुनी मराठी,

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 01:17 नवीन
ओह ओक्के. पण जुनी मराठी, त्यातसुद्धा पुणे परिसरातील ब्राह्मणी "शुद्ध मराठी" नामक बोली सानुनासिक होती हे खरेच आहे. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये १९२२ साली पुण्यातील कोणी घारू प्रधान नामक माणसाने एक कथा वाचून दाखवली त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते तिथे ऐकता येईल. ती साईट फार सुंदर आहे, जुनी कोंकणी, वर्‍हाडी, इ. बर्‍याचि बोली ऐकावयास मिळतील. तसेच संपूर्ण भारतातील विविध भाषा १०० वर्षांपूर्वी प्रत्यक्ष बोलल्या कशा जायच्या, त्याचे प्रत्यंतर मिळेल. हा लै मोठा खजिना आहे. तूर्त १९१९ सालचे पुणेरी मराठीतील रेकॉर्डिंग इथे ऐकता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

ह्म्म प्रधान = सी के पी

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 01:48 नवीन
ह्म्म प्रधान = सी के पी :) ______________________ काय रे बॅटमन तूच "अस्मितांची गळवे" हा शब्दप्रयोग रुढ केलास ना? आता तूच देशस्थी अस्मिता दाखवतोयस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हम्म

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 01:56 नवीन
हम्म :) बाकी अस्मितागळवे हा माझा शब्दप्रयोग नाही. त्याच्या लोकप्रियतेत अजून काहींचा हातभारही आहे. आणि हे बरंय च्यायला, देशस्थांनी जरा काही लिहिलं की आलेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

हाहाहा अरे मग जरा सी के

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 02:02 नवीन
हाहाहा :) अरे मग जरा सी के पींच्या बाजूनेही बोल की. मग बघ कसा फुल सपोर्ट करते :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सीकेपी मुली दिसायला सॉलिड

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 02:10 नवीन
सीकेपी मुली दिसायला सॉलिड असतात. अवांतर :- रेवती आज्जीच्या मंडळात काही मला एन्ट्री मिळणार नाही, तुम्ही मंडळ सुरु केलेत तर सांगा हां :-) (सीकेपीण प्रेमी) विमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

हाहाहा खरय खरय शीकेपी मुली

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 02:12 नवीन
हाहाहा खरय खरय शीकेपी मुली चान चान असतात :) :) (ठांकू ठांकू बरं का)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

हाहाहा खरय खरय शीकेपी मुली

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 02:33 नवीन
हाहाहा खरय खरय शीकेपी मुली चान चान असतात (ठांकू ठांकू बरं का)
घसा खाकराल्याचा आवाज ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

आणि ते मंडळाचे सांगा की.

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 02:34 नवीन
आणि ते मंडळाचे सांगा की. त्याला बगल देऊ देणार नाही मी... घोट्याला बाशिंग बांधून तयार असलेला विमे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

बगल नका देऊ, काख द्या

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 02:38 नवीन
बगल नका देऊ, काख द्या =)) =)) (ही ही पी जे) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

सहमत !!

सूड
Wed, 05/08/2013 - 09:06 नवीन
सिकेपींच्या पोरी सुंदर असतात यात वादच नाही पण कधीकधी प्रश्न पडतो की महाराष्ट्रात देशस्थ, कोकणस्थ, क-हाडे, सारस्वत येवढे सोडून बाकी जाती नसतातच की काय !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

(No subject)

गवि
Wed, 05/08/2013 - 10:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

जोशींनी जितके विचारले तितके

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 10:12 नवीन
जोशींनी जितके विचारले तितके मी सांगितले. ते ही माहित होते म्हणून. इतर जातींवर ऐसी अक्षरे वर अख्खी लेखमाला आली होती, इच्छुकांनी ती वाचावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आहेत ना!! सूड, माझी सासू

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 11:56 नवीन
आहेत ना!! सूड, माझी सासू सोनार आहे. इथे फक्त ही माफक अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपल्या जातीची माहीती द्या. जितकी माहीती मिळेल उत्तम आहे. शेअर करा हीच हेल्दी अपेक्षा आहे. अन कोणी कोणाला अडवलं नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सोनार हा व्यवसाय झाला मला

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 13:15 नवीन
सोनार हा व्यवसाय झाला मला वाटतं "दैवज्ञ ब्राह्मण" ही जात झाली. बहुगुणी यांनी अतिशय दैवज्ञांच्या खाद्यसंस्कृतीवर सुंदर लेख दाखविला होता. आईंना , मला खूप आवडला. इथे शेअर करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

ओक्के

सूड
Wed, 05/08/2013 - 14:02 नवीन
>>इथे फक्त ही माफक अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपल्या जातीची माहीती द्या. जितकी माहीती मिळेल उत्तम आहे. एखादा लेख, जमल्यास लेखमालाच पाडीन म्हणतो सोनारांच्या जाती-पोटजातींबद्दल*. एखादवेळेस तुझ्या सासूबाईंची मदत घ्यावी लागेल. :) *मला सविस्तर आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच, अन्यथा नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

अरे जरूर. मी आईंना विचारून

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 14:22 नवीन
अरे जरूर. मी आईंना विचारून हवी ती मदत करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

देशस्थ व सी के पी मुलींचे

निनाद मुक्काम …
Wed, 05/08/2013 - 13:18 नवीन
देशस्थ व सी के पी मुलींचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे सोनाली आणि ममता ह्या बॉलीवूड अभिनेत्री आहेत. सी के पी मुली नुसत्या सुंदर नसतात तर अतिशय सुगरण असतात. व त्यांना जातीने त्यांचे पारंपारिक खाद्यपदार्थ शिकवले जातात. हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

च्यायला, कॉपीराईट घेऊन

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 05/08/2013 - 02:07 नवीन
च्यायला, कॉपीराईट घेऊन टाकायला हवा पटकन :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

ओ सारस्वत गपा

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 02:09 नवीन
ओ सारस्वत गपा ;) (शीकेपी) - ढालगज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ते हेच ना

अभ्या..
Wed, 05/08/2013 - 02:56 नवीन
ते काल काय तरी सांगत होतीस ना शुचितै. ते सुंदर = खडूस वगैरे. ते हेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

आयला विमेंनी कॉपी राईटचा

ढालगज भवानी
Wed, 05/08/2013 - 03:10 नवीन
आयला विमेंनी कॉपी राईटचा खडूसपणा केला म्हणून मी बॅटीची बाजू घेऊन दाखवली. आता खडूस कोण? विमे!!! ते सुंदर असतील तर मला माहीत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हीहीही

अभ्या..
Wed, 05/08/2013 - 03:15 नवीन
बॅट्या स्वभावाने फारच चांगला आहे बुवा. =)) =)) =)) झाला का कॉन्वर्स सिध्द? (आता हाणतय...पळा ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

अब्याडब्या, आमचा मास्क असतो

बॅटमॅन
Wed, 05/08/2013 - 03:17 नवीन
अब्याडब्या, आमचा मास्क असतो मध्ये, त्याआडचा चेहरा कुणाला दिष्णार म्हणे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सानुनासिक

पैसा
Wed, 05/08/2013 - 09:02 नवीन
फक्त कोकणस्थच नव्हे तर कोकणातले बहुतांश लोक बोलतात. कोंकणी भाषा ऐकून बघा कधी तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

महेश चा विरुद्ध सिनेमाचा

निनाद मुक्काम …
Wed, 05/08/2013 - 02:14 नवीन
महेश चा विरुद्ध सिनेमाचा मराठी रिमेक म्हणजे कोकणस्थ आता हिंदीत जेमतेम चाललेल्या ह्या सिनेमाचा देशी अवतार आणून त्यामागे कोकणस्थ लेबेल लावून त्यात नायकाच्या अंगावर संघाचा पोशाख चढवून ताठ कणा हाच बाणा हे वाक्य राज ठाकरे ह्यांना सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बोलायला लावून मांजरेकर शिळ्या कढीला परत उत आणत आहेत. सलमान व बच्चन ह्यात ऐश्वर्या सोडली तर महेश हा अजून एक समान धागा आहे. ते दोघे सुद्धा ह्या सिनेमाचे प्रमोशन आपल्या परीने करत आहेत, संघाचा पोशाख असलेला नायक ह्यामुळेच सिनेमाची बरेवाईट प्रसिद्धी आपसूकच होते जी आजच्या काळात गरजेची झाली आहे. सध्या महाराष्ट्रात जातीय राजकारण करण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत. ब्रिगेड मराठ्यांना कट्टर व्हा असे सांगते, आत्ता त्याला उत्तर म्हणून ब्राह्मणांनी सुद्धा कट्टर व्हावे अशी विचार धारा आभासी जगतात वाचायला मिळते. त्याला असे शिणेमे खतपाणी घालतात. अवांतर ह्या शिनेमात आमचा खेडेकर का बरे घेतला. महेशने बर्व्यांच्या सुनील ला खरे तर कोकणस्थ म्हणून कोकणस्थ ह्या सिनेमात प्राधान्य द्यायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

सिनेमाची गोष्ट खरी नाही.. मी

शरदिनी
Tue, 05/07/2013 - 21:51 नवीन
सिनेमाची गोष्ट खरी नाही.. मी इथे नेहमी येत नाही पण धाग्यात जे काही आहे ते निव्वळ म्हणजे हा निव्वळ आचरटपणा अहे... खरंतर घोर अपमान आहे.. काहीच्या काही लिहितात झालं लोक... १. कणा ताठ करण्यासाठी कोणीही डॉक्टर लाकडी दंडुका पाठीत बसवणार नाही.. अ श क्य २. दोन खून नक्की कोणाचे होतात हे लिहिलेले नाही. अर्धवट काहीतरी ज्ञान आहे... ३. आणि किती ते परत परत इंग्लिश? लॉ अबायडिंग की काय ते? ४. रस्त्यात मारामारी केली म्हणून कोणाला भारतरत्न मिळेल काय? माझा या गोष्टीचा आणि गोष्ट लिहिणार्‍याचा निषेध.. स्पष्ट बोलायला मी काही घाबरत नाही. इथे लोक असले काही भयंकर वाचून आनंद घेत आहेत बघून सखेद आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments

शांत व्हा तै. कुठे त्या

प्यारे१
Tue, 05/07/2013 - 22:02 नवीन
शांत व्हा तै. कुठे त्या मास्तरांच्या नादी लागता? (एक शब्द आहे ह्यासाठी काय ते आत्म... का काय्तरी वाईट्ट शब्द आहे.) लिहीणारा लिहून जातो आपल्याला त्रास देऊन जातो, ह्याच्यापुढची ओळ काही जमेना हो. तुम्ही बर्‍याच दिवसात कविता नाहीत केली ती? जरा कराना पूर्ण. कराना प्लीज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी

आत्मक्लेष??

सूड
Tue, 05/07/2013 - 22:57 नवीन
हाच शब्द का हो प्यारेकाका? अवांतरः ह्या भडकमकरमास्तरांकडे कुठे लक्ष देता, एक झक्कपैकी कविता होऊन जाऊदेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

नाही शरदिनीताई तुम्ही शांत

स्पंदना
Wed, 05/08/2013 - 05:43 नवीन
नाही शरदिनीताई तुम्ही शांत होउ नका. उअद्याचा सुर्य या भडकमकर मास्तरांनी पाहिला नाही पाहिजे. अशे कविता पाडा;अशी कविता पाडा की ती मनातल्या मनातही वाचताना जीभ वळुन वळुन तीचा पार गुंताळा झाला पाह्यजे. मग बघु मजा या मास्तरांची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शरदिनी

अरेरे !!!! कस्ल्या कस्ल्या

भडकमकर मास्तर
Wed, 05/08/2013 - 13:00 नवीन
अरेरे !!!! कस्ल्या कस्ल्या अश्लील सुपार्‍या देताय त्यांना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

बाप रे.........!!! इतका भयावह

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/07/2013 - 22:45 नवीन
बाप रे.........!!! इतका भयावह झालाय शिनूमा ?
  • Log in or register to post comments

हैला! असा सिनेमा खरच आहे हे

रेवती
Wed, 05/08/2013 - 04:03 नवीन
हैला! असा सिनेमा खरच आहे हे तूनळीवर पाहून खात्री केली राव! मला वाटलं मास्तर नेहमीप्रमाणे चेष्टा करतायत. यावेळी अशा लेखाला फसायचे नाही असे पक्के ठरवले होते. मागल्यावेळी (जालिंदर जलालाबादीच्यावेळी) खरच असे लेखक असल्याचे वाटले होते. मी मारे देशस्थ अशा शिर्षकाचा लेख पाडायला घेतला होता. ;) आता कंफूजन झाले. मास्तरांवर विश्वास ठेवायचा की नाही? असच मला शरदिनीताईंबद्दल वाटतं.
  • Log in or register to post comments

झी टिव्हीचे सगळे पुरस्कार

सुहास
Wed, 05/08/2013 - 06:00 नवीन
२०१३-१४ साठीचे झी टीव्हीचे बेस्ट मराठी चित्रपटासाठीचे सगळे पुरस्कार या सिनेमास मिळतील..! पण आपणतरी हा चित्रपट टीव्हीवर आलाच (आणि वेळ मिळाला) तरच पाहू.. कारण आम्ही संजय दत्त, संजय गुप्ता, महेश मांजरेकर, अनिल कपूर यांचे पिक्चर (स्वतःचे पैसे देऊन) पाहणे हा देशद्रोह समजतो... जादा माहीतीसाठी खालील लिंक पहा.. http://www.outlookindia.com/article.aspx?216640 --सुहास
  • Log in or register to post comments

व्वा मास्तर..वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/08/2013 - 07:34 नवीन
मास्तर, पाय लागो. आजच्या दिवसाची सुरुवात झकास झाली. चित्रपटाची उत्तम ओळख करुन दिली असेच म्हणेन. धन्स. लेखनातील काही प्रसंगांनी हहपुवा झाली. 'हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात” आणि 'आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत” या अशा बौद्धिकांनी प्रचंड गंभीर झालो. ;) (चित्रपट पाहतांना हे प्रसंग मजा आणतील) चित्रपट नक्की पाहीन. चित्रपटाकडे जाण्याची पायवाट दाखवल्याबद्दल मन:पूर्वक आभार. आणि मास्तर येत चला. शर्दिनीतैलाही नमस्कार सांगा. अवांतर : काल सचिन खेडेकर आणि आणि त्या कुलकर्णीबै कोणत्या तरी मराठी वाहिन्यांवर होते. (हिंदी चित्रपटाच्या धर्तीवर) आणि चित्रपटातल्या भूमिका कशा जीव ओतून केल्यावर ती कलाकृती कशी श्रेष्ठ होते वगैरे सांगत होते. आपण प्रेक्षकातील एक झालो की 'काही गोष्टी, विषय चित्रपटात आणतांना काय केलं पाहिजे, संवाद कसे असले पाहिजे, हे लक्षात येतं म्हणाले. एक प्रेक्षक म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे आणायचे आहे ते मला तरी उत्तम समजलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आय्ला

इरसाल
Wed, 05/08/2013 - 10:03 नवीन
डु आयडी ने आपल्या स्वतःच्या धाग्यावर प्रतिसाद देता येतो :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा