मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...

भडकमकर मास्तर · · जनातलं, मनातलं
गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग... हल्ली गोखल्यांची पाठ सारखी दुखते. समारंभात त्यांना अचानक पाठदुखीचा ऍटॅक येतो पण ते सावरतात. समारंभ संपताना आईला मुलाचा फोन येतो. मुलगा परदेशात. बहुधा पश्चिमेला. लंडन. मुलाला ऒर्कुट फ़ेस्बुक समाजसेवा करायची सवय अस्ते. मुलाचं नाव श्याम.श्यामच्या आजोबांचंच नाव त्याला ठेवलेलं. श्यामचे आजोबा कोकणात माध्यमिक शाळेत उपमुख्याध्यापक होऊन निवृत्त. तिकडे त्यांची आंब्याची काही कलमं. तेही कोकणस्थ असल्याने ए लॉअ पील सोस्टे नोनॉ अस्तातच. मुलगा यांच्या जातीचा फ़ेस्बुक ग्रुप चालवत असतो.हे तो आईला सांगतानाएक फोनवरचा संवाद... “ जात म्हणू नये. जात शब्द फ़ार जातीय वाटतो श्याम.. समाज म्हणावं.” श्यामची आई. “पण जातीय म्हणजे काय?” “ जातीय म्हणजे अश्लील” “ ओके मॉम, यापुढे समाज म्हणेन ” असा हा आईचं ऐकणारा श्याम दर महिन्याला काही ज्वलंत विषयांवर प्रत्यक्ष मीटिंगा घेत असतो.“आपण्न्क्कीकुठूनआलो?” या विषयावरच्या मीटिंगला श्याम अर्थातच एका (ए लॉअ पील सोस्टे नोनॉ) मुलीच्या प्रेमात पडतो. “आपणएव्ढेहुशार्कसे?” या विषयावरच्या पुढच्या मीटिंगला तो तिला प्रपोज करतो आणि “ हल्लीआप्ल्यामुलीबाहेर्जातीतलग्नंकाकर्तात?” या ज्वलंत विषयावरच्या मीटिंगमध्ये ती त्याला होकार देते. आता होकार मिळाल्यावर एकूणच श्यामचे समाजाच्या मीटिंगमधले लक्ष उडते. लग्नच वगैरे ठरवल्याने आता या समाजसेवेची आपली गरज संपली हे त्याच्या लक्षात येते. मग तो तिच्याबरोबर माय्देशी परततो. दरम्यानच्या काळात मुंबईत काही मिशावाले राजकारण राजकारण खेळत असतात. काही प्युअर पोलिटिकल गेम असतात तर काही भेसळीचे पोलिटिकल गेम असतात.तर काय होतं, मध्येच बच्कन दोन रहस्यमय खून होतात .. या खुनांचं खापर की काय ते श्यामवर फुटतं आणि श्यामला अटक होते. ती अर्थातच मिशावाल्या मंडळींची राजकीय खेळी असते. गोखले विविध वकील मंडळी, पोलीस खात्यातली मंडळींकडे संसदीय पद्धतीने प्रयत्न करून पाहतात... अर्ज विनन्त्या करतात पण काहीच होत नाही. अचानक एका पोलीसस्टेशनमध्ये त्यांची पाठ परत दुखायला लागते आणि ते चक्कर येऊन पडतात. मग जोरात झांजा वाजत वाजत... मध्यंतर त्यांचा पाठीचा विकार बळावलेला असतो. आणि गोखल्यांना इस्पितळात दाखल व्हायला लागते. तपासणीत असे कळते की गोखल्यांना पाठीचा कणा आहे पण जो आहे तो खूपच मृदू आहे, तकलादू आहे... त्यामुळे तो कणा ताठ राहत नाही. दु:खी गोखल्यांचे त्राण इतके गेलेले असते की मला ऑप्रेशन नको असे ते ओरडत असतात. त्याच वेळी त्यांची पत्नी एक अफलातून उपाय करते.गोखले इस्पितळात असतानाच त्यांची पत्नी टेप रेकॉर्डरवर ती मदरलॅन्डची प्रेयर वाजवते. "नमस्ते सदा.." ची ती लहानपणी ऐकलेली म्हटलेली ट्यून ऐकून गोखले गहिवरतात, आनंदाने नाचू लागतात, पाठीचे दुखणे कुठल्या कुठे पळून जातं. नर्सेस, वॉर्डबॉय, हाउसमन, कन्सल्टंट सारं हॉस्पिटल आनंदी होते, मग काय कदम ताल करत ते आनंदाने ऑप्रेशन थिएटरकडे जातात. . मग गोखल्यांचे त्याच दिवशी ऑप्रेशन होते आणि त्यांच्या पाठीत लाकडी रॉड बसवतात. मग त्यांचा कणा एकदम ताठ होउन जातो. भुलीच्या गुंगीतही त्यांना ती लहानपणची शिस्त आठवते... काय ती शिस्त अन काय ती बौद्धिकं... मग गोखल्यांना ऑप्रेशनच्या रात्री स्वप्न पडतं, त्यात त्यांचे बाबा आठवतात...शाखेवरती रोज लाठीकाठीचे खेळ शिकलेले आठवतात. मल्लखांब तलवारबाजी, कबड्डी, दोरीवरचा मल्लखांब असले मराठी मर्दानी खेळ दिसायला लागतात. “ताठ कणा हाच बाणा “ हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांना आठवतं... मग ते अचानक उजव्या हाताने छाती पिटत "माज आहे मला माज आहे मला" असे ओरडत उठतात. इस्पितळाचा ड्रेस काढून पांढरा शर्ट आणि खाकी अर्धी विजार चढवतात . डॉक्टर त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण तरी गोखले मात्र “ मेलो तरी बेहत्तर पण लढाई माझी आहे” असं सांगतात. मग मागे झान्जा वाजायला लागतात."कोकणस्थ " अशी आरती सुरू होते. मदरलॆंडची प्रेयर घुमायला लागते.. हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात. मागे सारी मराठी असल्याचा माज असलेली जनता एकही मराठी शब्द न बोलता "एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " अशा घोषणा देत ताठ कण्याने धावू लागते. मग वाटेत येणारे सारे "अनएड्युकेटेड लॉब्रेकर्स पीसहेटर्स सोशली अन्स्टेबल नॉनसेन्स" गुंड दंडाचा प्रसाद खातात , ताठ कण्याच्या लाथा खातात , , गोखले ताठ कण्याने जोरात भाषण करायला लागतात “ आम्ही भित्रे नाही, आम्ही बुद्धिमान आहोत”... आता हे बौद्धिक घेणार या भीतीने सारे वाईट्ट लोक थरथर कापू लागतात, रडायला लागतात, बनावट साक्षीदार पळून जातात, खर्यात साक्षी दिल्या जातात, मिशावाले गुंड सरळ येतात. मग श्यामला जामीन मिळतो . मग डी एस पी आणि जज साहेब “हाच खरा शूर “ असं म्हणत गोखल्यांचं अभिनन्दन करतात.. मग परत भाषण, “ मी कोकणस्थ आहे पण मी जातीय नाही, मी संघात जायचो पण मी पोलिटिकल नाही, मी रस्त्यात मारामारी करतो पण मी गुंड नाही... “ वगैरे वगैरे ... असे हा आहे पण तो नाही असे भाषण सोळा मिनिटे चालल्यावर “कोकणस्थ” असा जोरात आवाज काढून आरती संपते. सिनेमाही संपतो. मग नावं येताना ---- श्याम घरी येतो आणि त्याचं लग्न होतं आणि तो पुन्हा जालीय समाजसेवेत बुडून जातो ... त्या वर्षीचा भारतरत्न पुरस्कार गोखल्यांना मिळतो...पुरस्कार स्वीकारायला ते अर्थातच खाकी विजार आणि पांढर्या शर्टात जातात.

वाचने 64815 वाचनखूण प्रतिक्रिया 154

In reply to by अर्धवट

तुमचा अभिषेक Tue, 05/07/2013 - 17:24
मला पण हेच जाणून घ्यायचे आहे... यात गंमत काय अन खरे किती.. हे वाचताना जे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले तंतोतंत तसे तर नसणार एवढे नक्की..

In reply to by तुमचा अभिषेक

इनिगोय Tue, 05/07/2013 - 17:32
हे कोकणस्थ नावाच्या टॅमिल सिनेमाचं वर्णन आहे असं वाटतंय.

In reply to by इनिगोय

प्यारे१ Tue, 05/07/2013 - 18:51
+९१२ परा ला चेपुवर विचारलेला 'प्रश्ण' पुन्हा विचारतो. ३.५ % तले किती कोकणस्थ? त्यातले किती शिणेमे बघणार? कसा पिच्चर चालणार? संघात कोकणस्थ असतात का हा पुरवणी प्रश्ण कुणीतरी विचारला होता. - 'स्व'स्थ प्यारे

In reply to by प्यारे१

तुमचा अभिषेक Tue, 05/07/2013 - 20:02
कोकणस्थांवरचा सिनेमा कोकणस्थच बघणार हे गृहीतकच चुकीचे आहे, उत्सुकता नॉनकोकणस्थांनाच आधी खेचून नेईल जसे या धाग्यात होणार आहे..

In reply to by अर्धवट

भडकमकर मास्तर Tue, 05/07/2013 - 18:18
डिस्क्लेमर : हे सिनेमाचं परीक्षण नाही..सिमेनेमा रिलीज व्हायचाय.. तो न पाहता , दिग्दर्शकाची इंग्रजी शब्दांनी भरलेली " मराठी माज" मुलाखत बघून लिहिलेली अंदाजे गोष्ट आहे... पिक्चर पहायचा की नाही, आवडतो की नाही ते आपापले थेटरात जाऊन पाहून ठरवावे :)

बाळ सप्रे Tue, 05/07/2013 - 17:57
बराच वेळ लागला समजायला. मग सकाळमधल्या चित्रपटांच्या जाहीरातीच पान बघितलं. सचिन खेडेकरचं शाखेच्या गणवेषातल चित्र आठवलं पण चित्रपटाच नाव "कोकणस्थ" आहे हे नीट वाचलं नव्हतं..

तर्री Tue, 05/07/2013 - 17:58
कोकणस्थ ( स्वा-खर्चाने तिकीट काढून ) सिनेमाला जातात आणि कोकणस्थांच्या गुण अवगुण यांचे चर्वितचर्वण करणारे ही जातात - एकुणात निर्मात्याचा बक्कळ फायदा. कथा यथातथाच दिसतीय ! त्या संघाला मात्र उगा कोकणस्थांच्या दावणीला बांधलाय. संघात परभाषिक ब्राम्हण व मराठा समाजाचे कार्यकर्ते , स्वयंसेवक अधिक आहेत.

अमित Tue, 05/07/2013 - 18:03
हॉस्पीटलच्या सीनची प्रेरणा मा. मनोजकुमारांच्या सदाबहार 'क्लर्क' वरून घेतल्यासारखी वाटते.

काकाकाकू Tue, 05/07/2013 - 18:04
झकास आहे!! -
....हातात कालच्या सर्जरीतून उरलेला दांडका घेऊन ते धावायला लागलेले पाहून डॉक्टर हबकतात....

गवि Tue, 05/07/2013 - 18:21
पूर्वी कुठेतरी सुधीर गाडगीळांचा लेख वाचला होता. एका ब्लॉगवर त्याची कॉपी सापडली. तिथली मूळ लिंकच इथे डकवत आहे. त्या ब्लॉगवरील यूआरएल http://marathijagatratlam.blogspot.in/2010/04/koknastha.html इति मूळ संस्थळाचा स्पष्ट उल्लेख आणि श्रेयनिर्देश. सगळंच काही खरं किंवा कोंकणस्थांशी स्पेसिफिक नाही, पण निरीक्षणं मजेशीर आहेत. :) A B

In reply to by गवि

श्रीरंग_जोशी Tue, 05/07/2013 - 19:00
सुधीर गाडगीळांचा लेख आवडला. बाकी मूळ लेखही आवडला पणा भडकमकर मास्तरांचे पूर्वीचे अजरामर लेख अनेकदा वाचले असल्याने यावेळी जरा अपेक्षाभंग झाला. अवांतर - कर्मधर्मसंयोगाने जाती, पोटजाती याविषयी जुजबीच माहिती आजवर मिळाल्याने कोकणस्थ, देशस्थ व कराडे (की कर्‍हाडे) यापलिकडली नावं ऐकली की गोंधळ होतो जसे सारस्वत, चित्पावन वगैरे. यावर जालावरील सुटसूटीतपणे कोणी समजावून सांगेल का कॄपया? जालावर बरीच माहिती आहे अन क्लिष्टही वाटली.

In reply to by श्रीरंग_जोशी

आदूबाळ Tue, 05/07/2013 - 19:33
"चहा चाचणी" करा. चहाच्या कपाला (बर्‍याचदा) रेघ असते. त्या रेघेखाली चहा असेल तर को. बरोब्बर रेघेला टेकला असेल तर क. रेघ ओलांडून बशीत सांडला असेल तर दे. आणि चहाबरोबर खायला पण आलं असेल तर गौ.सा.

In reply to by आदूबाळ

श्रीरंग_जोशी Tue, 05/07/2013 - 19:39
धन्यवाद!! रोचक आहे चाचणी. गौ.सा. हे केवळ 'अक्षता' जाहिरातींमध्येच वाचलय. प्रत्यक्षात कुणी भेटलं असेलही पण ठावूक नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

चित्पावन = कोकणस्थ सारस्वत = सर्वात चलाख जात. ब्राह्मण्य पण टिकवले आणि मांसाहाराचा हक्क पण मिळवला. (हे माझ्या एका मराठा मित्राचे मत). तर ही चलाख जात सर्वसाधारणपणे गोवा, कारवार आणि सिंधुदुर्ग या भागात रहात असे. त्यापूर्वी सरस्वतीच्या किनारी रहात असे. आता कुठेही राहतात, अगदी मुंबई पुणे किंवा अमेरिका वगैरे. अधिक माहिती हवी असेल तर सांगा, पैसातैंबरोबर मिळून टीम सारस्वत सुरु करेन आणि लेखमाला काढेन.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

श्रीरंग_जोशी Wed, 05/08/2013 - 07:13
चित्पावन हा शब्द बरेचदा ऐकला पण चित्पावन = कोकणस्थ हे एवढे स्पष्टपणे प्रथमच वाचावयास मिळाले. द्वारकानाथ संझगिरींच्या सामाजिक भानाची पवित्र जाणीव या लेखाद्वारे सारस्वतांबद्दल चांगली माहिती मिळाली होती. मिपाच्या धोरणांत बसत असेल तर या विषयावर लिहिले गेल्यास समाधान वाटेल.

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर Wed, 05/08/2013 - 12:24
मला गाडगीळांचे सगळे मान्य आहे कोकणस्थ असतात खरे आटोपशीर, वक्तशीर.. घोळ घालणे, पसारा करणे हे त्यंच्या स्वभावातच नाही.. देशस्थांच्या घोळ घालण्याचा मला कधी कधी फार राग येतो. कोकणस्थ लोक इतरांच्या फंदात पडत नाहीत.. म्हणजे नातेवाईक उगाच घरात जास्त लुड्बुड करत नाहीत असे मला वाटते आणि आवडतेही.. फक्त दिड दिवसाचा गणपती आणि खड्याच्या गौरी हे मात्र मला न झेपणारे आहे.. तिथे मात्र देशस्थीच पसारा आवडतो..!

In reply to by पिलीयन रायडर

तुम्ही विषयांतर करत कोकणस्थ व देशस्थ अशी फुकाची तुलना करत प्रतिसाद लिहिला म्हणूनच बहुदा त्याला पंख लागले. बात निकलेगी तो बहुत दूर जायेगी. पेशवाईत न रमणारा देशस्थ

In reply to by निनाद मुक्काम …

पिलीयन रायडर Wed, 05/08/2013 - 13:35
आँ?? मी आहे देशस्थ... मला कोकणस्थ लोकांच्या सवयी आवडतात असं लिहिलं.. बरं दोघातही काही चांगले गुण असतात असंही लिहिलं.. आणि उगच कोकणस्थ लोकांना "पुणेरी" म्हणुन हिणवतात जे मला खटकतं अस लिहिलम.. ह्यात काय फुकाचा वाद?? अवंतरः- प्रतिसाद टाकल्या क्षणी मला वेब पेज एरर आला.. आणि २ मिनिटात परत पाहिलं तर अक्खा प्रतिसाद उडाला!!

In reply to by पिलीयन रायडर

संपादक मंडळ Wed, 05/08/2013 - 13:50
तुमचा प्रतिसाद कुणीही उडवला नाही. तांत्रीक अडचणींमुळे नीट सेव्ह झाला नसावा.

In reply to by संपादक मंडळ

पिलीयन रायडर Wed, 05/08/2013 - 14:11
हो मला ९९% हेच वाटत होतं की तुम्ही तो उडवला नाही.. पण निनाद ह्यांनी तो वाचला आणि आता दिसत नाही ह्याचं आश्चर्य वाटलं म्हणुन १% डाउट आला!!

In reply to by पिलीयन रायडर

कोणाच्या सवयी आवडतांना त्या आवडतात हे सांगण्यासाठी इतरांना कोपरखळ्या कश्याला मारायच्या ते मला समजत नाही , ह्या गाडगीळ महाशय स्वतःच्या लोकांचे कोड कौतुक , वैशिष्ट्ये सांगताना इतरांना कमी लेखून हा लेख एकांगी केला होता. अनेक देब्रा कम्युनिटी वर ह्याला प्रत्युत्तर देणारे लेख म्हणूनच निर्माण झाले. त्यात चिंता करीतो विश्वाची म्हणणारे ठोसर व चिंता करीतो खंगलेल्या पोटाशी असे म्हणणारा अंतू बर्वा अशी तुलना केली होती , कोकणस्थ समाजात संत का निर्माण करू शकले नाही असेही विचारण्यात आले. सी के पी समूहाला ब्राह्मण समाजातून बेदखल कोणी केले असे सुद्धा विचारण्यात आले. मुळात देब्रा व कोब्रा ह्यांची तुलना करायचे प्रयोजनच काय समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण करावेच कशाला अशीच लोक बिग्रेडी मनोवृत्तीला नकळत खतपाणी घालतात. व कोकणस्थ सिनेमातून आपली पोळी पिकवून घेण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात इतर जाती नाहीत का असा मला खरच प्रश्न पडतो.

In reply to by निनाद मुक्काम …

पिलीयन रायडर Wed, 05/08/2013 - 16:23
बर जे काही तुम्हाला वाटते ते तुम्ही गाडगीळांना बोला.. मला का सांगताय? मला त्यांचे मुद्दे पटले.. मी देशस्थ असुनही.. कारण ते गुण दिसतात जागोजागी.. आता प्रत्येक वाक्यावर उत्तर असतच की हो.. त्यामुळे फेसबुक वर तसे लिहिल्या गेले ह्यात आश्चर्य ते काय? कोकणस्थांमध्ये दुर्गुण नाहितच असं कोण म्हणतय? माझ्या प्रतिसादात तुम्हाला फुकाचा वाद कुठे दिसला ते सांगा.. मी जे म्हणलच नाही ते तुम्हाला वाटत असण्याची दाट शक्यता आहे.. आणि महाराष्ट्रात इतर जाती आहेत की नाहीत ह्याचा उहापोह करण्यात मला स्वारस्य नाही..

In reply to by पिलीयन रायडर

@मला का सांगताय? त्यांच्या लेखाचा संधर्भ घेऊन तुम्ही येथे अवांतर केले तुमच्या प्रतिसादात देब्रा व कोब्रा ह्यांची तुलना पहिली म्हणून खरडले. म्हणून तुमचा उल्लेख केला.

In reply to by निनाद मुक्काम …

पिलीयन रायडर Wed, 05/08/2013 - 17:13
दादा.. इथे सी.के.पि.. त्यांच्या सुंदर /खडुस मुली पासुन ते मनोजकुमारचा क्लर्क पर्यंत गप्पा चालु आहेत.. त्या अवांतराबद्दल पण बोला ना.. आणि तुलना ना।इच केली.. कारण तुलनेमध्ये आपन एक गोष्ट दुसरिपेक्षा वरचढ आहे असे आपल्याला सुचवायचे अस्ते.. मी असं काहीही केलेलं नाहीये.. असो.. एक तर दोन देशस्थ कोकणस्था वरुन वाद घालत आहेत हेच फार ऑड आहे.. आणि इत्क्या फाल्तु मुद्द्यावर लिहीत बसायचा टंकाळा आल्याने मी पुढे लिहीनच ह्याची शश्वति नाही ...त्यामुळे पुरे आता...

In reply to by निनाद मुक्काम …

बॅटमॅन Wed, 05/08/2013 - 16:27
कोणाच्या सवयी आवडतांना त्या आवडतात हे सांगण्यासाठी इतरांना कोपरखळ्या कश्याला मारायच्या ते मला समजत नाही ,
हेच म्हणतो. याचमुळे गाडगिळांचा लेख गंडला आहे.

In reply to by बॅटमॅन

गवि Wed, 05/08/2013 - 16:50
"राशीचक्र" मधे कसे लोकांचे नमुने वर्णिले आहेत. ते ऐकताना हसू येतं. त्या त्या नमुनाप्रकाराचा राशीशी जोडलेला संबंध अगदीच रँडम असतो. त्यात खूप जनरलायझेशन असतं. सर्वत्र दिसणार्‍या लक्षणसमूहांचे ते केवळ एकत्रीकरण आहे आणि "अरे.. पाहिलाय मीही असला मनुष्य माझ्या आजुबाजूला" ही ओळख पटते. तितकीच त्यातली गंमत. गाडगीळांच्या लेखात कोंकणस्थांचे म्हणून दिलेले गुण अनेक अ-कोंकणस्थात बर्‍याच जास्त प्रमाणात पाहिलेले आहेत. याहीपुढे जाऊन असं म्हणावंसं वाटतं की हा जो काही तथाकथित शिस्तशीरपणा, टाईट लिप प्रवृत्ती, सगळीकडे थोडक्यात अन आटोपशीर, मोजून मापून असणं, सगळीकडे नियमित असणं, वेंधळेपणा नसणं अशी लक्षणं मनुष्यप्राण्याची उत्तम लक्षणं आहेत यावरच माझा विश्वास नाही. कशाला हवा तो इतका टोकदार पर्फेक्शनिस्ट अप्रोच.. असू दे घर जरा पसरलेलं.. जाऊदे लोणच्याचा ओघळ जरा मिठात.. सांडू दे चहा बशीत.. पिऊ की फुर्र करुन.. थांबू दे की पंगत कोणा आत्याबाईंचा येण्यासाठी.. कशाला उरकून घ्यायचं? असू दे की जरा ढिसाळपणा आयुष्यात.. निवांत मजेत सुशेगाद जगावं... त्यालाच तर मनुष्य म्हणायचं..

In reply to by गवि

बॅटमॅन Wed, 05/08/2013 - 16:56
राशीचक्र" मधे कसे लोकांचे नमुने वर्णिले आहेत. ते ऐकताना हसू येतं. त्या त्या नमुनाप्रकाराचा राशीशी जोडलेला संबंध अगदीच रँडम असतो. त्यात खूप जनरलायझेशन असतं. सर्वत्र दिसणार्‍या लक्षणसमूहांचे ते केवळ एकत्रीकरण आहे आणि "अरे.. पाहिलाय मीही असला मनुष्य माझ्या आजुबाजूला" ही ओळख पटते. तितकीच त्यातली गंमत.
एकदम सहमत.
कशाला हवा तो इतका टोकदार पर्फेक्शनिस्ट अप्रोच.. असू दे घर जरा पसरलेलं.. जाऊदे लोणच्याचा ओघळ जरा मिठात.. सांडू दे चहा बशीत.. पिऊ की फुर्र करुन.. थांबू दे की पंगत कोणा आत्याबाईंचा येण्यासाठी.. कशाला उरकून घ्यायचं? असू दे की जरा ढिसाळपणा आयुष्यात.. निवांत मजेत सुशेगाद जगावं... त्यालाच तर मनुष्य म्हणायचं..
बाकी प्रतिसादही उत्तमच, पण हा पोर्शन म्हंजे खास गविटच :) याबद्दल एक जोर्दार देशस्थी दाद दिल्या गेली आहे तुम्हाला ;)

In reply to by बॅटमॅन

पिलीयन रायडर Wed, 05/08/2013 - 17:05
हो मी पण १०००० वेळा सहमत.. थोडा ऐसपैसपणा आवडतोच आपल्यला.. रक्तातच आहे ना.. पण फक्त काही टिपीकल कोकणस्थी गोष्टी पण मस्त असतात.. ते नारळ बिरळ खवुन घालतात सगळ्यात.. फारच मस्त..!! आणि त्यांच्यावर काही बाबतीत विश्वास टाकता येतो.. जेव्हा ४ म्हणतील तेव्हा ४ वाजताच येतील.. सांगितील तेवढेच येतिल.. आनि सुचना पण नीट.. "आम्ही ४ ला दोघे जण येत आहोत, जेवाय्ला थांबणार नाही".. हेच आम्च्या घरात " येतोय संध्याकाळी" असा (नशीब) फोन (तरि) करतात!! किती, कोण, कधी, कशाला ह्याच काही उत्तर नसतं.. पण तरि आपलीच माणसं आहेत.. जास्त आली एक्दम तरी चटाचटा मदत पण करतील!!

In reply to by बॅटमॅन

पैसा Wed, 05/08/2013 - 17:32
एक वाक्य वाचलं होतं.

कोकणस्थांकडे किती आणि देशस्थांकडे कधी जेवायला मिळेल याचा भरवसा नाही!

पळा!!!

In reply to by पैसा

बॅटमॅन Wed, 05/08/2013 - 17:48
हॅ हॅ हॅ. असल्या खरवडींना आम्ही दाद देत नाही. -श्रेयअव्हेर: बाजीप्रभू फ्रॉम पावनखिंड.

In reply to by गवि

बाळ सप्रे Wed, 05/08/2013 - 17:07
तितकीच त्यातली गंमत
सहमत.. परंतु उपाध्येंचे आजकालचे टीव्हीवरील कार्यक्रम पाहता "तेवढी गंमत" सोडून आजकाल फक्त राशींचीच कास धरून अक्षरशः बुवाबा़जी केल्यासारखी वाटते.. नशीब गाडगीळांनी काही ह्यालेखापुढे आणखी कोकणस्थांची री नाही ओढली .. तेवढीच गंमत राखली..

अग्निकोल्हा Tue, 05/07/2013 - 19:02
कारण चित्रपट न बघता केवळ दिग्दर्शकाची इंग्रजी शब्दांनी भरलेली "मराठी माज" मुलाखत बघूनच आपण आपल्या कल्पनाशक्तिचा विस्तार केलाय म्हणजे दाद तर द्यावीच... पण म्हणुनच त्याची निखळताही हरवली आहे व टारगेटेड झालय. असो यापुढे पहिल्यांदा विडंबन व नंतर मुख्य धागा प्रकाशित व्हायचाही पायंडा पडल्यास त्याला जबाबदार संस्थळ असेल.

तिमा Tue, 05/07/2013 - 21:03
मास्तरांनी लिहिलेली गोष्ट जर खरी असेल तर, हा चित्रपट निव्वळ कोकणस्थांची चेष्टा करण्यासाठीच काढला आहे असे वाटते. कोकणस्थांचे जे गुण-अवगुण आहेत ते सार्‍यांना माहिती आहेत. पण ते अधोरेखित करुन, त्यांना मुद्दामहून प्रकाशझोतात आणण्याचे काम गेली काही वर्षे हे नाटक-सिनेमा व सिरियलवाले करत आहेत. मग ते अत्यंत कृत्रिम सानुनासिक संवाद, त्या काळ्या टोप्या, त्या काळ्याभोर मिशा, ती लाल आलवणे,यांचा रतीब घातला जातो. बाकीच्यांना काय, आयतेच 'तोंडीलावणे' मिळते. ब्रिगेडवाल्यांचे लक्ष जाऊन, आपोआपच काडी टाकली जाते. हे सगळे अगदी पद्धतशीर चालू आहे असे वाटते. आम्हाला फक्त शांतपणे जगू द्या, एवढीच आमची किमान अपेक्षा आहे. - एक स्वाभिमानी कोकणस्थ, तिमा.

In reply to by मुक्त विहारि

श्रीरंग_जोशी Tue, 05/07/2013 - 21:33
हेच म्हणतो. वर माझ्या प्रतिसादामुळे चर्चा किंचीत नको त्या दिशेला वळत आहे त्याबद्दल क्षमस्व. माझ्या सुदैवाने रोजच्या व्यवहारात जात व धर्माचा विचारही न करण्याच्या परिस्थितीत व अनेक जातिधर्मांच्या शेजार्‍यांच्या व मित्रंडळींच्या सहवासात मी लहानाचा मोठा झाल्याने अशा विचारांपासून नेहमीच दूर राहिलोय.

In reply to by तिमा

बॅटमॅन Wed, 05/08/2013 - 00:24
तिमांच्या पूर्ण प्रतिसादाशी सहमत. विशेषतः कृत्रिम सानुनासिक संवाद सर्वांत जास्त डोक्यात जातात. बाकी, देशस्थांनाही अंमळ हायलाईट करावे असे कधी कधी वाटते. ब्राह्मण म्हटले की कोकणस्थ हेच डिफॉल्ट क्यारेक्टर घेणे हा अतिशय तर्कदुष्ट प्रकार आहे. त्या निमित्ताने बाकीच्या पोटजाती किमान अस्तित्वात आहेत इतके कळाले तरी लै झाले. असो. -एक स्वाभिमानी देशस्थ, बॅटमॅन.

In reply to by बॅटमॅन

श्रीरंग_जोशी Wed, 05/08/2013 - 00:35
तीन वर्षांपूर्वी एका मिपाकराने (छोटा डॉन की टारझन?) पूणे आयपीएल संघनिर्मिती झाल्यावर एकाहून एक पुणेरी संवाद लिहिले होते (जसे आम्ही फक्त दिवसाच सामना खेळणार, रात्रीच्या सामन्याचे दुप्पट पैसे लागतील) जे जालावर भयंकर वेगाने फिरत होते. तर बहुधा स्टार माझा ने ते ध्वनिफितीच्या रुपाने प्रसिद्ध केले होते व त्यात ते अतिरेकी सानुनासिकपणे म्हंटले गेले होते. मी तरी आजवर इतके सानुनासिक बोलणार्‍या कुणालाही प्रत्यक्ष भेटलो नाही. जुन्या मराठी चित्रपटांमध्ये तसे बोलणारी पात्रे असायची.

In reply to by श्रीरंग_जोशी

बॅटमॅन Wed, 05/08/2013 - 01:17
ओह ओक्के. पण जुनी मराठी, त्यातसुद्धा पुणे परिसरातील ब्राह्मणी "शुद्ध मराठी" नामक बोली सानुनासिक होती हे खरेच आहे. लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया मध्ये १९२२ साली पुण्यातील कोणी घारू प्रधान नामक माणसाने एक कथा वाचून दाखवली त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते तिथे ऐकता येईल. ती साईट फार सुंदर आहे, जुनी कोंकणी, वर्‍हाडी, इ. बर्‍याचि बोली ऐकावयास मिळतील. तसेच संपूर्ण भारतातील विविध भाषा १०० वर्षांपूर्वी प्रत्यक्ष बोलल्या कशा जायच्या, त्याचे प्रत्यंतर मिळेल. हा लै मोठा खजिना आहे. तूर्त १९१९ सालचे पुणेरी मराठीतील रेकॉर्डिंग इथे ऐकता येईल.

In reply to by बॅटमॅन

ढालगज भवानी Wed, 05/08/2013 - 01:48
ह्म्म प्रधान = सी के पी :) ______________________ काय रे बॅटमन तूच "अस्मितांची गळवे" हा शब्दप्रयोग रुढ केलास ना? आता तूच देशस्थी अस्मिता दाखवतोयस ;)

In reply to by ढालगज भवानी

बॅटमॅन Wed, 05/08/2013 - 01:56
हम्म :) बाकी अस्मितागळवे हा माझा शब्दप्रयोग नाही. त्याच्या लोकप्रियतेत अजून काहींचा हातभारही आहे. आणि हे बरंय च्यायला, देशस्थांनी जरा काही लिहिलं की आलेच ;)

In reply to by ढालगज भवानी

सीकेपी मुली दिसायला सॉलिड असतात. अवांतर :- रेवती आज्जीच्या मंडळात काही मला एन्ट्री मिळणार नाही, तुम्ही मंडळ सुरु केलेत तर सांगा हां :-) (सीकेपीण प्रेमी) विमे

In reply to by ढालगज भवानी

हाहाहा खरय खरय शीकेपी मुली चान चान असतात (ठांकू ठांकू बरं का)
घसा खाकराल्याचा आवाज ;-)

In reply to by ढालगज भवानी

आणि ते मंडळाचे सांगा की. त्याला बगल देऊ देणार नाही मी... घोट्याला बाशिंग बांधून तयार असलेला विमे

In reply to by ढालगज भवानी

सूड Wed, 05/08/2013 - 09:06
सिकेपींच्या पोरी सुंदर असतात यात वादच नाही पण कधीकधी प्रश्न पडतो की महाराष्ट्रात देशस्थ, कोकणस्थ, क-हाडे, सारस्वत येवढे सोडून बाकी जाती नसतातच की काय !! ;)

In reply to by सूड

जोशींनी जितके विचारले तितके मी सांगितले. ते ही माहित होते म्हणून. इतर जातींवर ऐसी अक्षरे वर अख्खी लेखमाला आली होती, इच्छुकांनी ती वाचावी.

In reply to by सूड

ढालगज भवानी Wed, 05/08/2013 - 11:56
आहेत ना!! सूड, माझी सासू सोनार आहे. इथे फक्त ही माफक अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपल्या जातीची माहीती द्या. जितकी माहीती मिळेल उत्तम आहे. शेअर करा हीच हेल्दी अपेक्षा आहे. अन कोणी कोणाला अडवलं नाहीये.

In reply to by ढालगज भवानी

ढालगज भवानी Wed, 05/08/2013 - 13:15
सोनार हा व्यवसाय झाला मला वाटतं "दैवज्ञ ब्राह्मण" ही जात झाली. बहुगुणी यांनी अतिशय दैवज्ञांच्या खाद्यसंस्कृतीवर सुंदर लेख दाखविला होता. आईंना , मला खूप आवडला. इथे शेअर करत आहे.

In reply to by ढालगज भवानी

सूड Wed, 05/08/2013 - 14:02
>>इथे फक्त ही माफक अपेक्षा आहे की प्रत्येकाने आपल्या जातीची माहीती द्या. जितकी माहीती मिळेल उत्तम आहे. एखादा लेख, जमल्यास लेखमालाच पाडीन म्हणतो सोनारांच्या जाती-पोटजातींबद्दल*. एखादवेळेस तुझ्या सासूबाईंची मदत घ्यावी लागेल. :) *मला सविस्तर आणि पूर्ण माहिती मिळाल्यानंतरच, अन्यथा नाही. :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

देशस्थ व सी के पी मुलींचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे सोनाली आणि ममता ह्या बॉलीवूड अभिनेत्री आहेत. सी के पी मुली नुसत्या सुंदर नसतात तर अतिशय सुगरण असतात. व त्यांना जातीने त्यांचे पारंपारिक खाद्यपदार्थ शिकवले जातात. हे त्यांचे वैशिष्ट्ये आहे.

In reply to by अभ्या..

ढालगज भवानी Wed, 05/08/2013 - 03:10
आयला विमेंनी कॉपी राईटचा खडूसपणा केला म्हणून मी बॅटीची बाजू घेऊन दाखवली. आता खडूस कोण? विमे!!! ते सुंदर असतील तर मला माहीत नाही ;)

In reply to by तिमा

महेश चा विरुद्ध सिनेमाचा मराठी रिमेक म्हणजे कोकणस्थ आता हिंदीत जेमतेम चाललेल्या ह्या सिनेमाचा देशी अवतार आणून त्यामागे कोकणस्थ लेबेल लावून त्यात नायकाच्या अंगावर संघाचा पोशाख चढवून ताठ कणा हाच बाणा हे वाक्य राज ठाकरे ह्यांना सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बोलायला लावून मांजरेकर शिळ्या कढीला परत उत आणत आहेत. सलमान व बच्चन ह्यात ऐश्वर्या सोडली तर महेश हा अजून एक समान धागा आहे. ते दोघे सुद्धा ह्या सिनेमाचे प्रमोशन आपल्या परीने करत आहेत, संघाचा पोशाख असलेला नायक ह्यामुळेच सिनेमाची बरेवाईट प्रसिद्धी आपसूकच होते जी आजच्या काळात गरजेची झाली आहे. सध्या महाराष्ट्रात जातीय राजकारण करण्याचे प्रयत्न जोरात चालू आहेत. ब्रिगेड मराठ्यांना कट्टर व्हा असे सांगते, आत्ता त्याला उत्तर म्हणून ब्राह्मणांनी सुद्धा कट्टर व्हावे अशी विचार धारा आभासी जगतात वाचायला मिळते. त्याला असे शिणेमे खतपाणी घालतात. अवांतर ह्या शिनेमात आमचा खेडेकर का बरे घेतला. महेशने बर्व्यांच्या सुनील ला खरे तर कोकणस्थ म्हणून कोकणस्थ ह्या सिनेमात प्राधान्य द्यायला हवे होते.