✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

थोडे मर्मबंधातील ...

ढ
ढालगज भवानी यांनी
Mon, 05/06/2013 - 13:09  ·  लेख
लेख
खरं तर थोडा बायकी विषयच. मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय. आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते. तिच्याकडे सर्वात आधी एक हाडामासाची माणूस म्हणून बघता येते आणि नंतर स्त्री, बायको, मुलगी ,बहीण अगदी सून, नणंद अन भावजयसुद्धा या तिच्या नात्यांना, त्यातील संघर्षांना आता समजून घेता येते. या सर्व संघर्षातूनही तिने आपल्याकरता जपलेले केवळ, निव्वळ दैवी ममत्व आता कुठे समजू लागते. कारण आता मुलीला वाढवताना, शहाणी करताना आपण त्या भूमिकेत शिरलेलो असतो.... अक्षरक्षः "इन युवर ओन मदर्स शूज." आई रागावली की पूर्वी ज्या इन्टेन्सिटीने, प्रखरतेने आपण तिच्याक्डे पहात मुकाट ऐकलेले असते त्याच कारणासाठी, त्याच प्रखरतेने आता आपल्या मुलीचे निरागस डोळे आपल्यावर वरचेवर रोखले जातात. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते. आई रागावल्यानंतर काही वेळाने आपल्याला जवळ घेताना ज्या वैषम्ययुक्त रागाने आपण तिचा हात झिडकारलेला असतो अगदी तस्साच आपला हात आपली मुलगी झिडकारत असते. अन कुठेतरी आईची कळकळ आपल्याला आयुष्यात पहील्यांदा समजून येत असते. तीच गोष्ट परत परत "सुरक्षिततेच्या टीप्स" देण्याबद्दल. आपली मुलगी म्हणते "ममा हाऊ मेनी टाइम्स यु आर गॉना टेल मी? आय अ‍ॅम नॉट अ बेबी एनीमोअर" अन पूर्वीच्या आपण अगदी हेच मराठीतून बोललेलो आपल्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते. आई अन मुलगी दोघींना व्यवस्थित समजण्याचा हा काळ. एक साक्षात भूतकाळातील आपणच तर दुसरी आपलीच कार्बन कॉपी... वेड्या नाईव्ह आत्मविश्वासात, जग जिंकायला निघालेली. "अगं! थांब जरा ऐक माझं. जग तुला वाटतं तितकं विश्वासार्ह ना...." पण ती आहे कुठे ऐकायला? अन खरच हेच शब्द ऐकायला आपण तरी कुठे थांबलो होतो जागेवर मग आपली लेक मात्र थांबेल ही अपेक्षा कशी करावी? आईकडून खूप काही स्ट्रेन्थ्स मिळालेल्या असतात, तिच्या पुण्याईचं, संस्कारांचं कवच मिळालेलं असतं. पण आपलं वेडं मन मात्र विचारत राहतं - ही सर्व पुण्याई व सुकृत , हे संस्कार मी पुढच्या पीढीला, माझ्या लेकीला दिले का? मी कुठे चुकले तर नसेन, आपल्या आईइतका "परफेक्ट जॉब" आपण करु शकलो का? व्यावहारीक भाषेत सांगायचं झालं तर माझी लेक सर्वार्थाने, तिची काळजी घेऊ शकेल का? अन याचं रेडीमेड उत्तर कोणाकडेच नसतं कारण ते उत्तर फक्त काळच देणार असतो. हा तीनपदरी वेणीसारखा नाजूक तिढा काळच सोडवणार असतो. आपण मनातल्या मनात प्रार्थना करत, संयम ठेवून,पिलाला धडपडत पण तेजस्वीपणे भरारी घेताना पहाणार असतो. हा संयम, हे वाट पहाणे खरच खूप अवघड असते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8826 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

सहमत. अगदी मनापासुन सहमत.

स्पंदना
Mon, 05/06/2013 - 13:14 नवीन
सहमत. अगदी मनापासुन सहमत. त्यात मुली तश्या प्रखर असतात. मुल त्यांच्या कोषात जातात, बोलतच नाहीत तर मुली खडे बोल सुनवायला लागतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत,"मी करते" असा एक जोरदार आत्मविश्वास असतो. आणि खर सांगायच तर आपणही जरा जास्तच हळव्या असतो.
  • Log in or register to post comments

चांगलय....

मन१
Mon, 05/06/2013 - 13:15 नवीन
चांगलं मांडलय
  • Log in or register to post comments

सुंदर प्रकटन...

विसोबा खेचर
Mon, 05/06/2013 - 13:20 नवीन
सुंदर प्रकटन...
  • Log in or register to post comments

प्रौढत्व..

प्रभाकर पेठकर
Mon, 05/06/2013 - 13:37 नवीन
लेखात मांडलेल्या विचारांशी, भावनांशी १००% सहमत. फक्त वाईट एवढेच वाटले की असा अनुभव 'फक्त आईलाच येतो' असा सुर जाणवला. वडिलांचेही तस्सेच अनुभव असतात. शाळकरी आणि महाविद्यालयिन वयात घरच्यांना फसवून, अंधारात ठेवून केलेल्या कांही 'धाडसी' गोष्टी, अगदी प्रसंगी जीवावर बेतणार्‍या असणार्‍याही, आता आपला मुलगा करत तर नसेल नं? ह्या विचारांनी फार अस्वस्थ होतं. पण शांतपणे विचार केल्यावर जाणवतं आपल्यावर जे घरचे संस्कार होते त्यानेच आपल्याला 'वाहवत' जाण्यापासून रोखलं आहे. तेंव्हा मुलावर प्रभावी संस्कार करणं, संवाद चालू ठेवणं हे आणि एवढेच आपल्या हातात असते. जे स्वातंत्र्य आपल्याला 'त्या' वयात आवश्यक वाटत होते ते आपल्या 'त्याच' वयात आलेल्या मुलाला द्यावं पण, जागरूक राहूनच. मला, वैयक्तिकरित्या, पस्तिशीच्या पुढे आई-वडीलांचे संस्कार कसे महत्त्वाचे होते/आहेत हे जाणवायला लागले. कदाचित त्यालाच परिपक्वता म्हणत असावेत. आई वडिलांचे संस्कार जसे आठवतात तसेच त्यांनी आपल्या बाबतीत केलेल्या चुकाही, त्यांच्या आपल्यावरील निस्सिम प्रेमापोटीच झाल्या होत्या हे कळायचेच वय म्हणजे प्रौढत्व.
  • Log in or register to post comments

वाहवा..

अर्धवट
Mon, 05/06/2013 - 20:28 नवीन
वाहवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

वा काका..

वाटाड्या...
Mon, 05/06/2013 - 20:56 नवीन
"मला, वैयक्तिकरित्या, पस्तिशीच्या पुढे आई-वडीलांचे संस्कार कसे महत्त्वाचे होते/आहेत हे जाणवायला लागले." ह्या वाक्याला मनापासुन दाद..बाकी लेख आणि तुमचा प्रतिसाद छानच... - वाट्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

छान!

नगरीनिरंजन
Mon, 05/06/2013 - 13:58 नवीन
छान!
  • Log in or register to post comments

सुरेख

चाणक्य
Mon, 05/06/2013 - 14:01 नवीन
प्रकटन.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहेस शुचि.

यशोधरा
Mon, 05/06/2013 - 14:05 नवीन
छान लिहिले आहेस शुचि. पेठकरकाकांनीही दुसरी बाजू चांगली मांडली आहे, पण ते म्हणत आहेत तसा सूर वगैरे काही जाणवला नाही मला.
  • Log in or register to post comments

जाणीवा..

प्रभाकर पेठकर
Mon, 05/06/2013 - 14:10 नवीन
ज्या वयात आपल्याला 'आई' समजू लागते (किंवा तसं वाटतं) त्याच वयात आपल्याला आपले वडिलही समजू लागतात (किंवा तसं वाटतं). पण वडिलांचा साधा उल्लेखही न आल्याने मी तसे म्हंटले आहे. अर्थात, लेखिकेचा तसा काही उद्देश नाही/नव्हता हे ही मान्य आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हो, तुम्हांला काय म्हणायचं

यशोधरा
Mon, 05/06/2013 - 14:28 नवीन
हो, तुम्हांला काय म्हणायचं आहे ते समजलं मला पण जाणून बूजून ह्यात वडिलांचा अनुल्लेख केलेला आहे असं नाही वाटलं असं म्हणते आहे मी. लेखाचा फोकस आई- मुलीचं नातं एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही कसं संक्रमित होत रहातं ह्याची जाणीव हा आहे, असं वाटतं आणि तो लेखिकेचा स्वतःचा अनुभव आहे, असंही. तेह्वा जितकं आणि जे लिहिलं आहे ते विषयाला धरुनच आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

+१००

प्यारे१
Mon, 05/06/2013 - 14:41 नवीन
+१०० मुळातच हे प्रकटन एक स्वानुभवातून आलेलं स्वगत असावं असं वाटतं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

छान

मूकवाचक
Mon, 05/06/2013 - 14:14 नवीन
धागा आणि पेठकर काकांचा प्रतिसाद दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments

पेठकर व यशोधरा यांचे तसेच

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 14:31 नवीन
पेठकर व यशोधरा यांचे तसेच अन्य सर्वांचे आभार.
आई- मुलीचं नातं एका पिढीतून दुसर्‍या पिढीतही कसं संक्रमित होत रहातं ह्याची जाणीव हा आहे, असं वाटतं
+१००
  • Log in or register to post comments

लेखन आवडले.

तर्री
Mon, 05/06/2013 - 14:40 नवीन
रिव्हर्स दे-जावू शी मात्र स्तब्ध राहिला गेलो होतो. तो क्षण मात्र मोठा अनाकलनीय सुन्दर होता.
  • Log in or register to post comments

क्या बात है!!! अगदी बरोबर

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 14:45 नवीन
:) क्या बात है!!! अगदी बरोबर आपलेच तरुण डोळे आपल्यावर इन्टेन्स्ली रोखलेला तो क्षण असतो. गुड कॅच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

छान...

Pearl
Mon, 05/06/2013 - 15:24 नवीन
छान...
  • Log in or register to post comments

१००% सहमत.

भावना कल्लोळ
Mon, 05/06/2013 - 15:47 नवीन
शुचि ताई,सध्या मी हे सर्व अनुभवत आहे आणि या सर्व अनुभवात मला माझी आई नव्याने गवसत आहे.
  • Log in or register to post comments

अगदि खरंय

काकाकाकू
Mon, 05/06/2013 - 16:40 नवीन
आई नेहेमी म्हणते मला (हो, अजूनहि म्हणते - आईला मुलं नेहमीच लहान!) की "अरे, तू त्या भुमिकेत गेलास म्हणेजे तुला कळेल". पुढे जेव्हा मुलं मुलींची फ्रॅक्चर्स झाली, एखाद्या विषयात काठावर पास झाली, 'पंधरा मिनिटं' हरवली....त्या त्या भुमिकातनं बाप म्हणून वावरताना माझ्या या अशा प्रसंगात आई-दादांचं काय झालं असेल ते नेमकं कळलं! माझ्यापुरता तरी शेवटच्या (अतिशय नेटकेपणाने मांडलेल्या) पॅराग्राफमधे एक बदल करावा लागेल - आईकडून -> आई-वडिलांकडून. छान लिहिलं आहेस.
  • Log in or register to post comments

प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत

राजेश घासकडवी
Mon, 05/06/2013 - 16:43 नवीन
प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत रिव्हर्स दे जा व्हू चे अनुभव छान मांडले आहेत. आपण लहान असताना आपल्या पालकांकडे एक व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी भूमिका म्हणून बघतो. तसं होतंय हे आपल्याला जाणवतही नाही, उलट तेच आपल्याकडे एक भूमिका म्हणून बघतात आणि व्यक्ती म्हणून विश्वास ठेवत नाहीत याचा राग येतो. काळ गेल्यावर टेबलं फिरतात, याच नाण्याचं दुसरं चित्र जगायला मिळतं, लागतं. हे छान दाखवलं आहे.
खरं तर थोडा बायकी विषयच.
अशी अपोलोजेटिक सुरूवात मात्र खटकली. माझ्या मते लेखन दर्जेदार असतं किंवा नसतं. चांगलं लिहिलेलं वाचकांना नेहमीच भिडतं. मग त्याला बायकी विषय पुरुषी विषय अशी लेबलं लावण्याची गरज पडत नाही.
  • Log in or register to post comments

+१

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/06/2013 - 16:50 नवीन
आपलेच डोळे एकमेकांकडे जेव्हा रोखुन बघतात त्यांच्याकडे तटस्थ पणे पहाणारी तिसरी बाजु हि मजेदार असावी. त्या वेळी कसे बरं वाटत असेल? हे प्रकटन आवडले हे.वे.सां. न. (उत्सुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आपण लहान असताना आपल्या

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 17:33 नवीन
आपण लहान असताना आपल्या पालकांकडे एक व्यक्ती म्हणून बघण्याऐवजी भूमिका म्हणून बघतो. तसं होतंय हे आपल्याला जाणवतही नाही, उलट तेच आपल्याकडे एक भूमिका म्हणून बघतात आणि व्यक्ती म्हणून विश्वास ठेवत नाहीत याचा राग येतो.
नेमके आणि तंतोतंत!!! भारीच हो गुर्जी. :) (थोडे थोडे डोळे उघडलेला) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

खरं तर थोडा बायकी विषयच.

सुबोध खरे
Mon, 05/06/2013 - 20:35 नवीन
चांगलं लिहिलेलं वाचकांना नेहमीच भिडतं. मग त्याला बायकी विषय पुरुषी विषय अशी लेबलं लावण्याची गरज पडत नाही. शत प्रती शत बरोबर. बाकी लेख उत्कृष्टच आहे. प्रश्नच नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 05/09/2013 - 04:11 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

दवणीय

स्पा
Mon, 05/06/2013 - 17:00 नवीन
:) अवांतर : अबोली विभाग झाला का सुरु ? ;)
  • Log in or register to post comments

-१.

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 17:33 नवीन
दवणीय नाही, वाचनीय म्हण स्पांडू. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

-१

स्पा
Mon, 05/06/2013 - 17:38 नवीन
दवणीय is नॉट = to वाचनीय असे म्हणायचे आहे का तुज
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

येस्स. दवणीय म्हंजे

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 17:44 नवीन
येस्स. दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा काढा किंवा गेलाबाजार वाप्रूनवाप्रून शिळ्या झालेल्या शब्दांच्या तेलात तळ्ळेल्या जिल्ब्या असा अर्थ वाचलाय. हा लेख तसा आजिबात वाटत नसल्याने म्हणालो इतकेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा

स्पा
Mon, 05/06/2013 - 17:45 नवीन
दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा काढा किंवा गेलाबाजार वाप्रूनवाप्रून शिळ्या झालेल्या शब्दांच्या तेलात तळ्ळेल्या जिल्ब्या असा अर्थ वाचलाय
चे चे .. फारच चुकीचा अर्थ घेतलात ब्वा असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हर्कत नाही. मी हा शब्द

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 19:28 नवीन
हर्कत नाही. मी हा शब्द चांगल्या अर्थाने वापरलेला वाचला नसल्यामुळे तसे वाटले, णो पिराब्ळेम :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

थांबवा हा वाद रे :)

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 19:32 नवीन
:) हाहाहा .... ऐक ना मी एकदा "नंदन" यांच्या लेखावर प्रतिक्रिया दिली होती "नंदन यांचे लेख म्हनजे जणू उंबराच्या फूलासारखे दुर्मीळ व पर्वणीचे असतात" अशा टाइप. सगळ्यांनी इतकी खेचली होती की म्हणे नंदन स्वतः लेखांना "दवणीय" वगैरे म्हणतात अन त्यांच्या लेखावर अशी "दवनीय" प्रतिक्रिया यावी हाच तो पोएटीक का काय न्याय म्हणे =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

बॅटमॅन
Mon, 05/06/2013 - 19:33 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

कीपीटप

अभ्या..
Mon, 05/06/2013 - 19:37 नवीन
बाकी काहीही असो, शुचितै अगदी मनापासून लिहीते. जसे डोक्यात आले तसे सरळ टाइप करते हे नक्की. :) अगदी प्रतिसाद पण मनापासून एंजॉय करणारी आहे ही. कीपीटप शुचि. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

धन्यवाद

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 19:37 नवीन
:) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+1

स्पा
Mon, 05/06/2013 - 20:17 नवीन
भवानी मातेचा.... ुउदो उदो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ए "उदो" नाही रे "उदे" म्हणजे

ढालगज भवानी
Mon, 05/06/2013 - 20:31 नवीन
ए "उदो" नाही रे "उदे" म्हणजे "उगव" कुंडलिनी जागृत हो/उगव/माझ्या सहस्रार चक्रात चढ वगैरे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वाचनखूण..

धमाल मुलगा
Mon, 05/06/2013 - 17:40 नवीन
बेट्या,एक काम कर, वाचनखूण साठवून ठेव. अगदी शुचि (स्वारी स्वारी...भवानी) म्हणते तसं पोरं मोठी व्हायला लागल्यावर वगैरे लांबचं आहे, ज्या दिवशी बाप होशील त्याच्या दुसर्‍याच दिवशी हाच धागा काढून वाच... मग आपण बोलू! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

>>>ज्या दिवशी बाप होशील

प्यारे१
Mon, 05/06/2013 - 17:50 नवीन
>>>ज्या दिवशी बाप होशील त्याच्या दुसर्‍याच दिवशी आधी लग्न कर हो ;) सीरियसली सेम टु सेम प्रतिसाद देण्याची इच्छा होती. अर्थात दोष त्याचा नाही, सध्या तो एका काठावर आहे. दुसर्‍या काठावर गेला की कळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ये लगा सिक्सर

स्पा
Mon, 05/06/2013 - 17:55 नवीन
आधी लग्न कर हो
ख्याक =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बंधन?

धमाल मुलगा
Tue, 05/07/2013 - 17:16 नवीन
बापुस व्हायला अन लेकराबद्दलची काळजी जाणवायला लग्नाचं बंधन असलंच पाहिजे असंच काही नाही बरंका प्यारेभैय्या! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हो स्पा, विभाग सुरु झाला आणि

यशोधरा
Mon, 05/06/2013 - 20:52 नवीन
हो स्पा, विभाग सुरु झाला आणि अतिशय उत्तम रीत्य सुरु आहे. ह्या लेखाशी काय संबंध आहे त्याचा अवांतर म्हणूनही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सहमत

मॄदुला देसाई
Mon, 05/06/2013 - 17:25 नवीन
ह्म्म काय बोलू...प्रत्येक वाक्याशी सहमत. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते. रोज एकादातरी हाच विचार मनात येतो.
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय

पैसा
Mon, 05/06/2013 - 18:01 नवीन
छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

छान लिहिले आहे...

मुक्त विहारि
Mon, 05/06/2013 - 18:38 नवीन
मस्त..
  • Log in or register to post comments

सूंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 05/06/2013 - 18:47 नवीन
सुंदर प्रकटन... पालकाचे अनुभवविश्व चपखल शब्दांत !
  • Log in or register to post comments

छान

अभ्या..
Mon, 05/06/2013 - 19:31 नवीन
छान :)
  • Log in or register to post comments

भूमिका बदल

राही
Mon, 05/06/2013 - 20:17 नवीन
सुंदर प्रगटन.बालक-पालक नातं जोपासायला खरंच अवघड,त्या त्या क्षणी दोघांनाही न उलगडणारं,भूतकाळाची चिरफाड करीत भविष्यकाळ जगायला लावणारं. पण केवळ बालक-पालकच नव्हे तर इतरत्रही भूमिका बदलताना हाच गुंता होतो. जसे सहकर्मचारी (किंवा आपण) बॉस झाल्यावर नाते बदलते,टेबलाच्या बाजूंची अदलाबदल झाली की दृष्टिकोण बदलतो.आपली आणि समोरच्याची विचारसरणी भिन्न वाटत असली तरी एकाच जीवनधारेचा तो उगमाकडचा आणि मुखाकडचा भाग आहे हे ज्या वयात जाणवू लागते, ते प्रौढत्व,ती परिपक्वता.
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/06/2013 - 23:05 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments

अगदी हेच म्हणते. फार अवघड!

रेवती
Tue, 05/07/2013 - 06:18 नवीन
अगदी हेच म्हणते. फार अवघड! फाजील आत्मविश्वास, सटासटा बोलून मोकळे होणे, सगळं काही गणितासारखे आयुष्य असावे असे वाटणे, वाद घालणे. काळजी करून रोज माझे दोन केस तरी पांढरे होत असतील. रोज शाळेत जाताना, खेळायला जाताना त्याच त्या सूचना मी देते पण मलाही आई तश्याच सूचना द्यायची तेंव्हा "आता तू काय म्हणणारेस ते समजलं, दार नीट लावून घे, पीप होलमधून बघितल्याशिवाय दार उघडू नकोस, अनोळखी माणसाशी बोलू नकोस." असे म्हणत असे, आता माझा मुलगा शाळेत निघताना "तू अमूक एक असंच सांगणारेस ना" असं विचारतो, तरी सांगत राहते. मी मुलाला हेच सांगतीये ना हे माझी आई दम देऊन कबूल करून घेते. ;) आणि हेही सांगते की अजून तर सुरुवात आहे. हैराण होतात पालक! एका मैत्रिणीची मुलं दहावी बारावीची झाल्यापासून तिचा स्वभाव भलताच बदललाय. सतत काळजी. आपण आजकाल बोलायला मोकळेपणाही देतो म्हणून वाट्टेल ते विचारत राहणे, मग आपण रागावणे. मोकळेपणा आणि अगोचरपणा यातला फरक काय हे रोज रोज तेच सांगावं लागतय. पैश्याचे नियोजन साधे, सोपे, अवघड कसेही सांगितले तरी आपण सुलतान असल्यागत राहणे पाहून तर घामच फुटतोय.
  • Log in or register to post comments

हा दोन पिढ्यातील संघर्ष

देशपांडे विनायक
Tue, 05/07/2013 - 08:38 नवीन
हा दोन पिढ्यातील संघर्ष कुणालाच चुकला नाही छान लिहिले आहे . मुलाला ENGINEERIG COLLEGE वसतिगृहात ठेवल्यावर दोन वर्षे झोपेतून एकदम मधेच जाग येत असे. जरूर नसताना भूतकाळ आठवे. बायको विचारणार काय झाले ? तिला सांगण्यासारखे असते तर झोप कशाला उडाली असती ? नशीब थोर. मुलगा पहिली २ वर्षे FIRST CLASS मधे उत्तीर्ण झाला त्यामुळे तो आता नक्की ENGG होणार हि खात्री पटली झोप चालू झाली
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा