खरं तर थोडा बायकी विषयच.
मध्यम वयाची माझी व्याख्या ही की असे वय जेव्हा पहील्यांदाच आपली आई, आपल्याला उमजू लागली आहे आणि मुलगी जी की इतका काळ अतिशय सन्निध होती ती पौगंडावस्थेत प्रवेश करती झाल्याने दुरावू लागली आहे, असे वय.
आईला लहानपणी "आई" म्हणून आणि फक्त "आई" म्हणून पाहीलेले असते. बालपणी, "आईला अन्य व्यक्तीमत्वच नाही, रोल नाही" हा चश्मा डोळ्यांवरुन न काढता आल्याने असंख्य वेळा तिला समजून घेता आलेले नसते , जे की आता समजून घेता येते. तिच्याकडे सर्वात आधी एक हाडामासाची माणूस म्हणून बघता येते आणि नंतर स्त्री, बायको, मुलगी ,बहीण अगदी सून, नणंद अन भावजयसुद्धा या तिच्या नात्यांना, त्यातील संघर्षांना आता समजून घेता येते. या सर्व संघर्षातूनही तिने आपल्याकरता जपलेले केवळ, निव्वळ दैवी ममत्व आता कुठे समजू लागते. कारण आता मुलीला वाढवताना, शहाणी करताना आपण त्या भूमिकेत शिरलेलो असतो.... अक्षरक्षः "इन युवर ओन मदर्स शूज."
आई रागावली की पूर्वी ज्या इन्टेन्सिटीने, प्रखरतेने आपण तिच्याक्डे पहात मुकाट ऐकलेले असते त्याच कारणासाठी, त्याच प्रखरतेने आता आपल्या मुलीचे निरागस डोळे आपल्यावर वरचेवर रोखले जातात. कुठे तरी हे रिव्हर्स देजा वू जाणवत असते व या जगण्यातूनच स्वतःच्या आईची भूमिका कळून येत असते.
आई रागावल्यानंतर काही वेळाने आपल्याला जवळ घेताना ज्या वैषम्ययुक्त रागाने आपण तिचा हात झिडकारलेला असतो अगदी तस्साच आपला हात आपली मुलगी झिडकारत असते. अन कुठेतरी आईची कळकळ आपल्याला आयुष्यात पहील्यांदा समजून येत असते. तीच गोष्ट परत परत "सुरक्षिततेच्या टीप्स" देण्याबद्दल. आपली मुलगी म्हणते "ममा हाऊ मेनी टाइम्स यु आर गॉना टेल मी? आय अॅम नॉट अ बेबी एनीमोअर" अन पूर्वीच्या आपण अगदी हेच मराठीतून बोललेलो आपल्या डोळ्यासमोर लख्ख उभे राहते.
आई अन मुलगी दोघींना व्यवस्थित समजण्याचा हा काळ. एक साक्षात भूतकाळातील आपणच तर दुसरी आपलीच कार्बन कॉपी... वेड्या नाईव्ह आत्मविश्वासात, जग जिंकायला निघालेली. "अगं! थांब जरा ऐक माझं. जग तुला वाटतं तितकं विश्वासार्ह ना...." पण ती आहे कुठे ऐकायला? अन खरच हेच शब्द ऐकायला आपण तरी कुठे थांबलो होतो जागेवर मग आपली लेक मात्र थांबेल ही अपेक्षा कशी करावी?
आईकडून खूप काही स्ट्रेन्थ्स मिळालेल्या असतात, तिच्या पुण्याईचं, संस्कारांचं कवच मिळालेलं असतं. पण आपलं वेडं मन मात्र विचारत राहतं - ही सर्व पुण्याई व सुकृत , हे संस्कार मी पुढच्या पीढीला, माझ्या लेकीला दिले का? मी कुठे चुकले तर नसेन, आपल्या आईइतका "परफेक्ट जॉब" आपण करु शकलो का? व्यावहारीक भाषेत सांगायचं झालं तर माझी लेक सर्वार्थाने, तिची काळजी घेऊ शकेल का? अन याचं रेडीमेड उत्तर कोणाकडेच नसतं कारण ते उत्तर फक्त काळच देणार असतो. हा तीनपदरी वेणीसारखा नाजूक तिढा काळच सोडवणार असतो. आपण मनातल्या मनात प्रार्थना करत, संयम ठेवून,पिलाला धडपडत पण तेजस्वीपणे भरारी घेताना पहाणार असतो.
हा संयम, हे वाट पहाणे खरच खूप अवघड असते.
वाचने
8857
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत. अगदी मनापासुन सहमत.
चांगलय....
सुंदर प्रकटन...
प्रौढत्व..
वाहवा..
In reply to प्रौढत्व.. by प्रभाकर पेठकर
वा काका..
In reply to प्रौढत्व.. by प्रभाकर पेठकर
छान!
सुरेख
छान लिहिले आहेस शुचि.
जाणीवा..
In reply to छान लिहिले आहेस शुचि. by यशोधरा
हो, तुम्हांला काय म्हणायचं
In reply to जाणीवा.. by प्रभाकर पेठकर
+१००
In reply to हो, तुम्हांला काय म्हणायचं by यशोधरा
छान
पेठकर व यशोधरा यांचे तसेच
लेखन आवडले.
क्या बात है!!! अगदी बरोबर
In reply to लेखन आवडले. by तर्री
छान...
१००% सहमत.
अगदि खरंय
प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत
+१
In reply to प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत by राजेश घासकडवी
आपण लहान असताना आपल्या
In reply to प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत by राजेश घासकडवी
खरं तर थोडा बायकी विषयच.
In reply to प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत by राजेश घासकडवी
+१
In reply to प्रकटन आवडलं. थोडक्या शब्दांत by राजेश घासकडवी
दवणीय
-१.
In reply to दवणीय by स्पा
-१
In reply to -१. by बॅटमॅन
येस्स. दवणीय म्हंजे
In reply to -१ by स्पा
दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा
In reply to येस्स. दवणीय म्हंजे by बॅटमॅन
हर्कत नाही. मी हा शब्द
In reply to दवणीय म्हंजे नीतीमूल्यांचा by स्पा
थांबवा हा वाद रे :)
In reply to हर्कत नाही. मी हा शब्द by बॅटमॅन
(No subject)
In reply to थांबवा हा वाद रे :) by ढालगज भवानी
कीपीटप
In reply to थांबवा हा वाद रे :) by ढालगज भवानी
धन्यवाद
In reply to कीपीटप by अभ्या..
+1
In reply to कीपीटप by अभ्या..
ए "उदो" नाही रे "उदे" म्हणजे
In reply to +1 by स्पा
वाचनखूण..
In reply to दवणीय by स्पा
>>>ज्या दिवशी बाप होशील
In reply to वाचनखूण.. by धमाल मुलगा
ये लगा सिक्सर
In reply to >>>ज्या दिवशी बाप होशील by प्यारे१
बंधन?
In reply to >>>ज्या दिवशी बाप होशील by प्यारे१
हो स्पा, विभाग सुरु झाला आणि
In reply to दवणीय by स्पा
सहमत
छान लिहिलंय
छान लिहिले आहे...
सूंदर !
छान
भूमिका बदल
(No subject)
अगदी हेच म्हणते. फार अवघड!
हा दोन पिढ्यातील संघर्ष
क्या बात है!
In reply to हा दोन पिढ्यातील संघर्ष by देशपांडे विनायक
ढम्या वडीलांचं प्रेम आईपेक्षा
In reply to क्या बात है! by धमाल मुलगा
आमचाबी आन्भव थोडासा
>>>नुकतीच इहलोकाची यात्रा
In reply to आमचाबी आन्भव थोडासा by चौकटराजा
अप्रतिम
२००८
सुरेख आणि प्रांजळ प्रकटन!
खरं
आयला...
अतिशय छान लेख
सर्वांचे खूप आभार