✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कर्मविपाक

ढ
ढालगज भवानी यांनी
गुरुवार, 05/02/2013 - 07:32  ·  लेख
लेख
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे. मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे. खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे. एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
20108 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

लहान मुलांचा खून वगैरे होतो

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 16:00 नवीन
लहान मुलांचा खून वगैरे होतो त्याचे स्पष्टीकरण कसे द्यायचे मग? त्यांनी या जन्मी काय कर्म केले ज्याचे त्यांना फळ मिळाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी

मनीषा
गुरुवार, 05/02/2013 - 16:18 नवीन
ते त्यांचे दुदैव म्हणावे आणखी काय.. आणि घडणारी प्रत्येक बरी वाईट घटना काय कर्माचे फळ असते का? आता तुम्ही आधी 'शुची' होता.. त्याची 'ढालगज भवानी' झालात.. हे कुठल्या कर्माचे फळ म्हणायचे? :) (सॉरी.. कृ. ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

घडणारी प्रत्येक घटना ही

गवि
गुरुवार, 05/02/2013 - 16:35 नवीन
घडणारी प्रत्येक घटना ही कर्मांचे संचित असते यात वादच नाही. पण ती आपल्याच कर्मांचे संचित असते आणि त्यातही शक्यतो बरे वाईट जे केले त्याचा बरावाईट परतावा नंतर देऊन स्कोर सेटलिंग करणारे असते ही समजूत अगदीच बिनबुडाची दिसते. घडणारी प्रत्येक घटना ही असंख्य पाहतामोजता न येणार्‍या जुन्या आणि अगदी त्याक्षणीच्या अनप्रेडिक्टेबल घडामोडींमुळे घडते. त्या सर्व घटना या जितक्या क्लिष्टतेने एकत्र येतात ते पाहणं किंवा त्यातून काही अर्थ लावणं / शास्त्र शोधणं हे शक्य आहे का ते मला माहीत नाही, पण ते वर्थ नाही असं वाटतं. अपघात होणं हे त्या रस्त्याची देखभाल, वाहनाची देखभाल, टायरचा पातळपणा, आदल्या रात्री रस्त्यात खिळा पडलेला असणं, वाहनचालकाच्या मनात त्या वेळी आलेला विचार, त्या विचाराची सैरभैर करण्याची आणि ड्रायव्हिंगवरचा ताबा सुटवण्याची क्षमता, ड्रायव्हरला असलेले आजार, त्यासाठी घेतलेले औषध, त्यातला झोपवण्याचा गुण, आजार मुळात होण्यास कारण ठरलेली त्याची वर्षानुवर्षांची जीवनशैली, व्यसन, खेरीज समोरच्या वाहनाचा ताबा सुटलेला असताना केवळ आपण त्याच्या रस्त्यात त्याचवेळी "असणं", आपण त्याचवेळी हातात आपलं मूल घेतलेलं असणं, जिथे ट्रक आपल्या अंगावर आला त्या जागेची भौतिक रचना (मागे कातळ असणे आणि पळण्याची जागा नसणे) अशा असंख्य गोष्टींची बेरीज असते. तीही रेषीय बेरीज नव्हे. कदाचित गुणाकारही म्हणता येईल. पण आपण चूक अशी करतो की आपण आपल्या बर्‍यावाईटाच्या दृष्टीनेच मोजमाप करतो. "मी" अमुक केलं म्हणून "मला" अपघात झाला. अरे नाही बाबा.. तू केलंस किंवा आणखी शंभर सजीव निर्जीव वस्तूंनी मिळून जाणता अजाणता जे केलं त्याचा त्या क्षणीचा परिणाम म्हणून तुझ्या शरीरावर ट्रक चढला, तुझ्या ज्या भागावरुन ट्रकचं चाक गेलं त्या भागाला इजा झाल्याने शरीराचा महत्वाचा रक्तप्रवाह थांबला आणि त्यामुळे तुझ्या शरीराचं चलनवलन थांबलं. आता यामधे जगाला, निसर्गाला, या सर्व व्यापाराला "कोण" मेला किंवा काय मोडलं याने काही फरक पडत नाही. आपापतः त्या जागी "मी" असतो तेव्हा मला, माझ्या नातेवाईकांना थेट झळ बसल्याने "व्हाय मी?" हा तीव्र प्रश्न पडतो आणि हे उत्तर शोधणं अत्यंत निकडीचं वाटतं आणि मग त्यातून अशा थियरीज उभ्या राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

मी आणि माझं ह्या कक्षेत

प्यारे१
गुरुवार, 05/02/2013 - 16:52 नवीन
मी आणि माझं ह्या कक्षेत जोपर्यंत गोष्ट येत नाही (ही कक्षा माझा देश नि त्यातले सगळे लोक व तद्नुषंगानं येणारं सगळं, माझा ग्रह (पृथ्वी) अशीही असू शकते ) तोवर मी त्यावर शक्यतो विचार करत नाही. विचार झालाच अथवा केलाच तर त्यातून जास्त करुन शोक अथवा विषाद उत्पन्न होतो ज्यानं घ टना परिस्थितीमध्ये विशेष फरक पडत नाही. माझं मर्यादित जग ही माझ्या कक्षेची व्याप्ती असताना, इतर कुणाबद्दल अहित चिंतण्यापेक्षा, त्याला जबाबदार धरण्यापेक्षा, त्याचा रागराग करण्यापेक्षा, त्याचा सूड घेण्यापेक्षा मला कर्मविपाकाची थिअरी जास्त प्रिय आहे. थोडं अवांतरः 'मी आणि माझे ऐसे, विसरले जयाचे अंतःकरण तो सन्यासी निरंतर जाण' असं माऊली म्हणतात तेव्हा त्यांना अपेक्षित अर्थ हा असतो की 'माझे' पणाची भावना गेल्यावर सगळीकडे समानत्व दिसतं. त्यामुळं इथं आल्याची गेल्याची, फायद्याची अथवा नुकसानीची भाषा बंद होते. क्षुल्लक स्वार्थ शिल्लक न राहिल्यानं असलेल्याच आनंदाची पुनर्प्राप्ती होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

इथं मी म्हणजे एक व्यक्ती होय.

प्यारे१
गुरुवार, 05/02/2013 - 16:53 नवीन
इथं मी म्हणजे एक व्यक्ती होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आँ?

मन१
गुरुवार, 05/02/2013 - 16:20 नवीन
लहान मूल एखाद्या दुर्दैवी घटानेत विनाकारण बळी जाते. पण मग "काही का असेना पण स्पष्टीकरण देता यावे" अशी भूमिका आहे का?मग स्पष्टीकरण देता येइल अशी एखादी कल्पना स्वतःच करायची किम्वा इतर कुणीतरी रचलेली कल्पना मान्य करायची असे काही आहे का? समजलं नाही. म्हणजे समजूत घालून घेण्यासाठी आपण ही कल्पना करतोय हे मान्य आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

हो थोडीशी "अफूच" आहे. मान्य

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 17:51 नवीन
हो थोडीशी "अफूच" आहे. मान्य आहे. अधिकारी व्यक्तीने, अधिकारवाणीने, माझ्या बुद्धीला झेपेल/समजेल असे काही सांगीतले नाही. तेव्हा कल्पना करुन, उत्तरे शोधूनच मला प्रवास करावा लागणार. मेंदू-मनाची कवाडे बंद तर करता येत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

'असं का घडलं?' हा प्रश्न

इनिगोय
Fri, 05/03/2013 - 19:20 नवीन
'असं का घडलं?' हा प्रश्न प्रत्येकालाच कधी स्वतःच्या, कधी इतरांच्या बाबतीत पडतोच की. त्याचं उत्तर शोधण्याची निकड किती आहे, हे घटनेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. एखादी व्यक्ती परक्या देशात 23 वर्षं तुरुंगात पडते, किंवा चार वर्षांची मुलगी अत्याचाराला सामोरी जाऊन मरून जाते, तेव्हा त्या प्रसंगात तीच का सापडली, हे शोधावंसं वाटणं साहजिक नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

असे का घडले ?

गवि
Fri, 05/03/2013 - 19:32 नवीन
असे का घडले ? आणि तिच्या बाबतीतच का घडले हे पूर्ण वेगळे आहे. दोन्ही प्रश्न आपापल्या जागी व्हॅलिड आहेत. पण तीच का याची काराणमीमांसा वेगळीकडेच जाते. घटना घडते ती घडते. आपापत: तिच्याशी घडते. आपण व्यक्तीला केंद्रस्थानी मानून तिची कर्मे अन जन्म यांचे हिशेब करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनिगोय

छ्या !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 05/02/2013 - 13:38 नवीन
नाव बदलून देखील काही फरक नाही. असो... केळ्याचा पाक ऐकून होतो, पण हा कर्मविपाक पहिल्यांदाच पाहिला.
  • Log in or register to post comments

पाकाचा आस्वाद घ्या. त्यात पडतायं कशाला?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 14:01 नवीन
म्हणजे प्रश्नच संपला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मी एका गाडीतून जात होतो.

प्यारे१
गुरुवार, 05/02/2013 - 14:16 नवीन
मी एका गाडीतून जात होतो. गाडीने जाताना सिग्नल तोडला, पुढे जाऊन गाडीने दोन चार लोकांना चिरडलं. तसाच पुढं गेलो. रात्रीची वेळ असल्यानं कुणी पकडलं नव्हतं. पुढं जाऊन गाडी दरीत पडली. गाडी वापरण्यासारखी राहिली नव्हती. मी गाडीतून बाहेर पडलो. जसं गाडीतून बाहेर पडलो, मला काही आठवेनासं झालं. नवीन गाडी घेतली. नेहमीसारखं मजेत सुरु झालं. थोड्या दिवसांनी एसीपी प्रद्युमन आपल्या दया, अभिजीत, साळुंके सगळ्यांना घेऊन आले. नि म्हणाले (तेच हाताचा भांगडा करत) प्यारे तुम्ने गाडी चलाते हुए सिग्नल तोडा हय, लोगोंको बडी बेरहमीसे कुचला हय. तुम्ही फांसी होगी! दयानं एक वाजवल्यामुळं आधीच झिणझिण्या येत होत्या. मी म्हणालो, एसीपी, मी माझी गाडी एकदम व्यवस्थित चालवतो आहे. बघा. ते म्हणे नाही. तुझी आधीची गाडी आठव. मी म्हणालो आठवत नाही. तुला शिक्षा होणारच. एसीपी दुष्ट आहे. खटला झाला, मी हल्ली एका ठिकाणी असतो. त्याला तुरुंग म्हणतात. मी जो गुन्हा केला नाही त्याची शिक्षा मला मिळते आहे असं मला वाटतं. सीआयडी तुरुंगात बघतो. मस्त जेवण असतं, हल्ली तुरुंगातच मजा वाटते.
  • Log in or register to post comments

स्टोरी मस्त आहे. उदाहरणही

गवि
गुरुवार, 05/02/2013 - 14:29 नवीन
स्टोरी मस्त आहे. उदाहरणही खास. इथे मुळात तू ज्यांना उडवलं त्यांनीच आधी काहीतरी जाणता अजाणता असं केलं होतं की त्याचं फळ तू त्यांना दिलंस. मग ते फळ त्यांना देण्याचं तुझं काम म्हणजे पुण्यच असायला हवं. पण नाही.. ते वाईट कृत्य ठरतंय. तुझ्या लेखी ते पाप म्हणून पडतंय. नंतर तुला कोणीतरी उडवून किंवा अन्य मार्गाने पीडा देऊन ते चुकतं करतं.. पण त्या कोणाच्या तरी बाबतीत स्वतःकडे आणखी पाप घेऊनच तेही हे कृत्य करतात. या सर्व विषयात आणि तुझ्या गोष्टीमधेही मुख्य गृहीतक असं आहे की १. तथाकथित ठार मारणं ="दुरित" = "पाप" = "निगेटिव्ह" किंवा मदत करणं = "पुण्य" "पॉझिटिव्ह" इ इ २. अशा गोष्टींचा पाठपुरावा करणारे आणि हिशोब ठेवणारे, बॅलन्स करु इच्छिणारे एसीपी प्रद्युम्न आणि कानाखाली आवाज काढणारे कोणीतरी "दया" अस्तित्वात आहेत. असं एकदा मानलं की बाकी सर्व ठीकच आहे. पण हे मानता येणं कठीणच की. निसर्ग किंवा तत्सम काही एंटिटीच्या नियमांनी सर्व गोष्टी घडतात आणि त्या अतर्क्य आहेत असं म्हटलं तर मग अमुक म्हणजे पापच आणि तमुक म्हणजे पुण्यच आणि तेही कधीना कधी बॅलन्स झालंच पाहिजे हे सर्व कशापाई म्हणे? निसर्गाला काय फरक पडतो प्यारेने चार पादचार्‍यांना उडवले काय किंवा एखाद्या दरडीने एखादे झोपडे झोपवले काय किंवा भूकंपाने दहा हजार लोक होत्याचे नव्हते केले काय? हिशेबाची कल्पना आपलीच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दुसर्‍या कुणाला दोष देणं-

प्यारे१
गुरुवार, 05/02/2013 - 15:34 नवीन
दुसर्‍या कुणाला दोष देणं- अमुक मुळे तमुक झालं इ,इ, द्वेषानं ,मत्सरानं जळणं- मी गरीब, तो श्रीमंत, तो सुंदर मी कुरुप, काळा गोरा, उंच, बुटका इ.इ. गर्वानं, अहंकारानं (अहंगंड/न्यूनगंड दोन्ही)फुगणं - मी लई हुशार, मी लई मठ्ठ हे सगळं बंद होण्यासाठी वरची सिस्टीम. तुम्ही त्या सिस्टीमला मानत नाही पण असेच निर्मत्सर, निरंहकार, निर्लेप सारखे वागता तर तुम्हाला सगळं समजलंय. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणताना द्वेष करतो नि सुखी आहे, गर्व आहे नि सुखी आहे ह्या काँट्रॅडिक्टरी वाक्यांना कुठंतरी संपवायला हवं की. ह्या सगळ्याचा मुख्य हेतू सुखानं आयुष्य जगणं = सुखदु:खरुप द्वंद्व संपवणं. नि ह्याच सुखरुप अवस्थेत देह सोडणं हा आहे. ते नाही जमलं तर हरला. जमलं तर जिंकला. नो द सिस्टम, युज इट, गेट रिझल्ट्स, फर्गेट सिस्टम. सिस्टीम मध्ये अडकायचं नाही. गणितातला क्ष उत्तर मिळाल्यावर पकडून नाही बसत. सोडून देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हम्म

रमताराम
गुरुवार, 05/02/2013 - 14:19 नवीन
मर्ढेकरांच्या 'पिपात मेले ओल्या उंदिर' या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

मला

इरसाल
गुरुवार, 05/02/2013 - 16:00 नवीन
मोक्ष मिळाला की नाही हे मला कसे कळणार. आणी कळाले तरी तो मी नसणार मग त्याचा मला काय फायदा? बरं ज्यांना मोक्ष मिळाला त्या आत्म्यांना देव स्वतःजवळ ठेवुन आपली इनव्हेन्ट्री का बरे वाढवत आहेत ? मागच्या ६०/६५ वर्षात लोकसंख्येची बोंबाबोंब करत असताना इतकी संख्या देव कशी मॅनेज करत आहेत ?
  • Log in or register to post comments

मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 05/02/2013 - 16:33 नवीन

मुळात ह्या कर्मविपाकवाद्यांना एका प्रश्नाचं उत्तर कध्धिही देता आलेलं नाही.

तो प्रश्न असा-'' की माझा हा जन्म व त्यातिल घटना हा जर मागच्या जन्माचा हिशोब आहे,आणी तो जन्म त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब,,,तर असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे.
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?''
  • Log in or register to post comments

असं मागे जाता जाता मला कधि ना कधि सर्वात पहिला जन्म असणारच आहे

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 17:44 नवीन
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं
या एका मुद्यानं सर्व कर्मसिद्धांत निकालात निघतो. यू आर राइट!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ......

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 18:05 नवीन
नॅचरल नंबर्स = १-२-३-४ ....... रियल नंबर्स = ....-५,-४,-३, -२,-१,०,१,२,३..... इथे मागे मागे जात आदि (सुरुवात) कुठे मिळतो? मग रियल नंबर्स ही कल्पना फोल धरायची का? निकालात काढायची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

गणना आणि स्मृती या दोन भिन्न गोष्टी आहेत

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 18:08 नवीन
गणनेचा आणि कर्मसिद्धांताचा काही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

उत्तर देता नाही आलं की संबंध

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 18:11 नवीन
उत्तर देता नाही आलं की संबंध नाही का? माझे मत आहे संबंध आहे. दोन्ही ना आदि ना अंत अशा कन्सेप्ट्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

जाऊ दे ना.

सामान्य वाचक
गुरुवार, 05/02/2013 - 19:42 नवीन
अंत म्हणाल तर , तो ही नक्की आहे, पण आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे. हे सगळे सगळ्यांना पटले पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

नाही अट्टाहास नाही. जितके

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 19:44 नवीन
नाही अट्टाहास नाही. जितके प्रश्न उपस्थित होतात चांगलेच आहे. स्वतःच्या श्रद्धा, समजुती, भ्रम तर भ्रम( ऑर व्हॉटेव्हर) रिव्हिझीट (चाचपण्याची) करण्याची संधी मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

कधी कधी.

सामान्य वाचक
गुरुवार, 05/02/2013 - 20:18 नवीन
अति प्रश्न & चर्चा , याने आणखी गोंधळ होऊ शकतो. चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. अन्यथा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

ओके.

ढालगज भवानी
गुरुवार, 05/02/2013 - 20:29 नवीन
:) ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

अति प्रश्न & चर्चा , याने आणखी गोंधळ होऊ शकतो.

विटेकर
Fri, 05/03/2013 - 15:47 नवीन
हे अगदी मान्य ! चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. हे तर १०० % खरे आहे.. काय वाट्टेल ते चालू आहे झालं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

+१

मूकवाचक
Fri, 05/03/2013 - 15:51 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

+१

सस्नेह
गुरुवार, 05/02/2013 - 19:52 नवीन
विश्वात अशा कोणत्याही दोन गोश्टी नाहीत ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. विघटन केले असता सर्व गोष्टी मूलतः अणूंनीच ना बनल्या आहेत ? 'माती असशी मातीत मिळशी....'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

मग मला त्या जन्मात जे मिळालं

श्रिया
Sat, 05/04/2013 - 12:34 नवीन
मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?'
' अ.आ. तुमच्या प्रश्नाचं हे समाधानकारक उत्तर असेलच असे नाही, पण मला ह्या संबधित हा एक सिद्धांत तार्किक वाटतो, कि आपण सगळे "आत्मा"रुप आहोत आणि परमात्म्याचे अंश आहोत.परमात्म्याचे अंश असल्याने आत्म्याला अल्पस्वातंत्र्यहि आहे. सुरवातीला सर्व जीवात्मे परमात्म्याच्या निकट सान्निध्यात (व कर्मबंधनातून मुक्त)होते .पण जीवात्म्यांना परमात्म्यापासून विलग होऊन स्वतंत्र होण्याची इच्छा झाली, त्यांची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी परमात्म्याने भौतिक जगाची निर्मिती केली व जीवात्म्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना तशी जीवन परिस्थिती उपलब्ध करून दिली. अशाप्रकारे भौतिक जगातील "पहिल्या जन्माची" सुरुवात झाली. व तेथून आपल्या कर्माप्रमाणे जीवात्मा पुढचे जीवन जगत आहे. पण त्याचे अंतिम उद्दिष्ट पुन्हा परमात्म्याच्या निकट सान्निध्यात जाणे हे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

श्रिया....

अत्रुप्त आत्मा
Sat, 05/04/2013 - 17:38 नवीन
तुमच्या संपूर्ण प्रतिसादाचं सार-रूप ,मला पहिला जन्म देवाने दिला आणी त्यावेळेसंही ''जे'' काहि दिलं ते त्यानीच दिलं असं होइल...मला हे तात्विक दृष्ट्या किंवा १ मुद्दा म्हणून मान्य आहे.कारण त्यामुळे पुनर्जन्माच्या सूत्राला १ सुसंबद्धता मिळते.(परंतु,तरिही- हे सर्व घडवणारा देव किंवा तशी तत्सम नैसर्गिक शक्ति पुरावा देऊन सिद्ध करा असं म्हटलं की हे ही गृहीतक निकालात निघतं...कारण मुळात हे असलं काहि अस्तित्वातच नाहिये.) पण मी हा वाद यामुद्यावर सोडुन द्यायला तयार आहे.माझ्या सारख्यांचं भांडण निव्वळ एखादी गोष्ट/गृहीतक खरं की खोटं या एकमेव कारणासाठी नाहीच. धर्माच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टीत
हे खरं/खोटं करण्याचं मूळ कारण
हे त्यामागिल विषमता लबाडी शोषण अन्याय हे सर्व आहे... हा कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा नशिब मानायला लावणारी कोणतिही सिस्टिम आपल्यावर दोन प्रकारे अतिक्रमण करते... पैकी पहिला प्रकार--- आपल्याला नशिबाच्या पाठिमागे दडायची सोय उपलब्ध होणे.याचे गैरफायदे म्हणजे कोणत्याही कामात अपयश आलं की,आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले असले काय/नसले काय - ''हे माझ्या नशिबातच नव्हतं'' असं म्हणण्याची आपली तयारी होते. त्यामुळे अनेकदा आपल्या अडचणीवरचं/अपयशामागचं खरं कारण कळायची कुठलिच शक्यता शिल्लक उरत नाही. (जी नशिबा शिवाय विचार केला तर असतेच असते.) आपण आपल्या/दुसर्‍याच्याही बाबतीत हेच वाक्य उच्चारतो-की ''सालं नशिबात नसेल त्याच्या'' किंवा ''अजुन योग आलेला नाही'' अश्या अनेक प्रकारे याची अभिव्यक्ति होत असते. नोकरी न लागण्यामागे खरी कारणं असतात, बेकारी/समाजात नोकरदारांच्या प्रमाणात नोकर्‍यांची असलेली अल्प उपलब्धता. त्याशिवाय ''मी अमुक इतकं आणी अमुक अश्या प्रकारचं शिकलोय,म्हटल्यावर मला तमुक प्रकारचीच नोकरी मिळाली पाहिजे... साहेबाचं शिक्षण आणी चपराश्याची नोकरी का करू?'' अश्या पद्धतीचा न्याय्य असला तरी परिस्थितिकडे डोळेझाक करणारा सूर. नशिबाचा दुसरा पछाडणारा प्रकार-हा याच कर्मविपाकाच्या धार्मिक सिद्धांताचा भाग आहे..त्या नुसार पुढे चातुर्वण्य संकप्लना आणी त्या अनुषंगानी आजच्या काळात केलेला चातुर्वण्य समर्थकांचा खोडसाळ अपप्रचार-दुट्टप्पीपणा इत्यादी सर्वकाही... म्हणजे वाद उपस्थित झाला,की ''चातुर्वण्य आंम्ही जन्माधिष्ठित मानत नाही कर्माधिष्ठित(च) मानतो'' असं म्हणायचं,मग ''धर्मशास्त्रातंही तसच सांगितलय'' अशी मखलाशी करायची...मग आमच्या सारख्यानी-''कर्माधिष्ठित मानता तर ''तशी व्यवस्था गेल्या हज्जारो वर्षात कुणी का निर्माण केली नाही???,आणी सध्या आपण का निर्माण करत नाही???'' असं विचारलं की तोंड बंद झाल्यामुळे एकतर उखडायचं/चिडायचं तरी किंवा वादातून पळ काढायचा... याच पद्धतिने मी आमच्या भिक्षुक वर्गात कायम १ आव्हान देत असतो-की जर का तुंम्ही जातिचे गुण हे जन्मसिद्ध न मानता कर्म सिद्ध मानता तर, ज्याला मोटार चालवता येते तो ड्रायव्हर या कर्मगत विभागणी प्रमाणे ज्याला वेदमंत्र नीट म्हणता येतील,तो हिंदू समाजातल्या कोणत्याही जातितला माणुस हिंदु पुरोहित असं करायला तुंम्ही का तयार होत नाही???- वेदपाठ शाळेत कोणत्याही हिंदू मुला/मुलिला प्रवेश का देत नाही???-तर मग मात्र हे चालत नाही आणी हा अधिकार(?) फक्त ब्राम्हणांनाच..वगैरे भाषा सुरु होते. (त्यात अनेक पुरोहित मंत्र म्हणताना अस्खलित अशुद्ध म्हणतात ते मात्र चालतच--''केश्वाय न्मः/नारायनाय न्मा:/माध्वाय न्मा:'' र्‍ह्स्व/दीर्घ/जोडा(मारलेली) गुरुत्वहीन अक्षरं/विसर्गांच्या उच्च्चारी चुका या बाबतीत तर न बोललेच बरं...१विनोदी फार्स व्हायचं बळ असलेलं साहित्य-साधन आहे ते...!) म्हणजे एकिकडे लायकतेची भाषा करायची,दुसरीकडे त्याच लायकतेच चाललेलं स्खलन मात्र सहजतेनी बघायचं... असा हा सगळा गोंडस पसारा आहे... त्यामुळे कर्मविपाक इत्यादी बद्दलची चर्चा सुरु झाली की त्याच्या बाजुनी बोलताना माणसाच्या इहलौकिक दृष्ट्या असलेल्या गुण/अवगुणांना/नैतिकतेला हताशी घेऊन ''कर्म'' या गोष्टिचा अर्थ गृहीत धरायचा..पण दुसरीकडे धर्मात प्रत्येक वर्ण/जातिच्या बाबतीत सांगितलेल्या ''कर्मा''ला मात्र साफ दुर्लक्षित करायचं... असा हा संपूर्ण दुटप्पी खेळ आजही चालू आहे...
म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रिया

+१०००००००००००००००००००००००००००

बॅटमॅन
Sat, 05/04/2013 - 18:13 नवीन
+१०००००००००००००००००००००००००००००००००००............ नाद खुळा प्रतिसाद. अत्रुप्त आत्म्याशी पूर्णतः सहमत!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

>>>>म्हणुनच हे उपरोक्त सर्व

प्यारे१
Sat, 05/04/2013 - 18:15 नवीन
>>>>म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही छान. बाकी माणसामध्ये लोभ, चुका करण्याची, फसवण्याची प्रवृत्ती हे दुर्गुण 'जात्याच' आहेत त्याचे हे सगळे परिणाम आहेत. धर्मच नव्हे तर सगळीच क्षेत्रे व्यापून पुन्हा हे दुर्गुण तोंड वर काढून बसलेलेच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

उत्तर देता नाही आलं की संबंध नाही का?

संजय क्षीरसागर
गुरुवार, 05/02/2013 - 22:38 नवीन
संबंध नाही हेच उत्तर आहे. गणना सुरू होण्यापूर्वी संख्या ही कल्पना नव्हती. अ आचं म्हणणंय प्रथम जन्माचं संचित कसं आलं? आता या दोन्हीचा काय संबंध आहे?
  • Log in or register to post comments

कर्मविपाक ? पक पक पकाक...

अग्निकोल्हा
गुरुवार, 05/02/2013 - 23:32 नवीन
मी कायम जागे राहु शकत नाही मी कायम झोपलेलाही अजिबात राहु शकत नाही मी केवळ श्वास आत घेउन राहु शकत नाही वा नुसताच बाहेर सोडत राहु शकत नाही जे शरीर मिळाल ते सुध्दा स्थिर नाही सतत बदल होतोय त्यात थोडक्यात जिथ बघतोय तिथ उर्जेच रुपांतर होताना दिसतय स्थिर असं काहीच भासत नाही म्हणूनच जेव्हां अटल अविचल मोक्षाची कल्पना निर्माण होते प्रॉमिस्ड लँड , कायमचा स्वर्ग स्गळ्याच मनाच्या कल्प्नाशक्तिच्या भरार्‍या असं मन जे स्वतःच स्थिर नाही कधी अनुभव देत तर कधी डुलक्या काढतं थोडक्यात मी नुसताच जन्मलेला राहणे शक्यच नाही (अमर) परीणामी मृत्युरुप हे सुध्दा माझे कायमच्या मुक्कामाचे स्थान नाही...
  • Log in or register to post comments

क्रियेला प्रतीक्रिया......

अशोक पतिल
गुरुवार, 05/02/2013 - 23:46 नवीन
खर म्हणजे या विश्वात प्रत्येक पदार्थाची ( ग्रह असोत की अणु,मुलकण इ.) काटेकोर आखुन दिलेली गती ,कक्शा असते. युगानुयुगे त्यात तिळमात्रही फरख नसतो.इतकी सुसुत्रता असते. या मागे काहीतरी प्रेरणा असेलच.या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती. तसेच प्रत्येक क्रियेला प्रतीक्रिया असते या नियमा नुसार प्रत्येक कर्माला फळ हे असणारच. आपले आचार विचार हे फक्त या जन्मातले नसुन ते मागचे संचित असु शकतील. नाहीतर प्राण्याचा मेंदु व मानवाचा मेंदु या मधे इतका फरख कसा असता ? या एकाच जन्मात भाव भावना कश्या विकसित झाल्या असत्या ? मानवी जिवनात अंसख्य नाती गोती परस्पर सबंध हा मागील जिवनाचा सामुहीक परस्पर कर्म विपाकाचा परिणाम असु शकेल.
  • Log in or register to post comments

गोड गैरसमज.

अग्निकोल्हा
Fri, 05/03/2013 - 00:06 नवीन
या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती.
मुळात विश्वात अराजकता नाहीये हाच कित्ती कित्ती मोठा गोड गैरसमज आहे.. मला तर बुआ प्रचंड अराजकता सगळीकडे दिसत आहे... काय परफेक्ट आहे इथे ? हा आता हे इंपर्फेक्शनच एक परफेक्ट गोश्ट निर्माण/नियंत्रित करते आहे असा समाज विषेश कारणाने बाळगायचा हव्यास असेल तर.... _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अशोक पतिल

पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा

बॅटमॅन
गुरुवार, 05/02/2013 - 23:49 नवीन
पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा योगवासिष्ठात स्वतः वसिष्ठांनी घालवल्यामुळे आपण तर ब्वॉ जाम खूश आहोत. सोनारानेच कान टोचले ते एक बरं झालं.
  • Log in or register to post comments

जरा इस्कट नीट. समजू दे

प्यारे१
गुरुवार, 05/02/2013 - 23:57 नवीन
जरा इस्कट नीट. समजू दे आम्हाला देखील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी काय लै डीप बीप नै वाचायला.

बॅटमॅन
Fri, 05/03/2013 - 00:03 नवीन
मी काय लै डीप बीप नै वाचायला. पण जिक्तं उमागलं तिक्तं सांगतो. वसिष्ठ म्हणतात, की पूर्वसुकृताचा बाऊ करण्यात काही अर्थ णाही. मागल्या जन्मीचे गाठोडे साठलेले असले तरी या जन्मी ते वाढत नाही, तितकेच राहते. त्यामुळे या जन्मात आपण किती हातपाय हलवतो त्यावर आपण पुर्वसुकृतावर किती वरताण करतो ते , पक्षी आपला उत्कर्ष अवलंबून आहे. तस्मात, पुरुषप्रयत्न हाच सर्वांत महत्वाचा हा संदेश वसिष्ठ देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओक्के.

प्यारे१
Fri, 05/03/2013 - 00:09 नवीन
ओक्के. असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे. रेखा तितुकी पुसोनि जाते, हे तो प्रत्यक्ष प्रत्यया येते, तेणे डोळेझाकणी करावी,काय निमित्य? आधीच्या प्रतिसादाचा अर्थ वेगळा वाटतोय दादा. पूर्वसुकृत ही कंसेप्ट नाहीच असं वसिष्ठ म्हणतात असं वाटतंय एकदम. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

नै ना, तसं नै म्हणत वसिष्ठ.

बॅटमॅन
Fri, 05/03/2013 - 00:40 नवीन
नै ना, तसं नै म्हणत वसिष्ठ. सिवाजी: पूर्वसुकृत कसे तयार होते याबद्दल वसिष्ठ काय म्हणाले ते आता लक्षात नाही, मला तूर्त मगाशी सांगितले इतकेच लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पन मग ?

अग्निकोल्हा
Fri, 05/03/2013 - 00:11 नवीन
पूर्वसुकृताचा बाऊ करण्यात काही अर्थ णाही. मागल्या जन्मीचे गाठोडे साठलेले असले तरी या जन्मी ते वाढत नाही, तितकेच राहते.
असं असेल तर पूर्वसुकृताचे साठलेले गाठोडे मुळात जमा कसे बरे झाले असेल ? यावर त्यांनी काय सांगितलयं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हो ना कसे साठले ते गाठोडे ओ

ढालगज भवानी
Fri, 05/03/2013 - 00:42 नवीन
हो ना कसे साठले ते गाठोडे ओ बॅट्स :????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अग्निकोल्हा

ते पाहिले पाहिजे. मी आपला

बॅटमॅन
Fri, 05/03/2013 - 03:16 नवीन
ते पाहिले पाहिजे. मी आपला पूर्वसुकृताचे ओझे घ्यायचे कारण नाही हे वाचूनच खूश झालो, म्हटलं च्यायला काही का असेना, या जन्मात आपल्या हातात सर्व काही आहे ही तर लै भारी गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ढालगज भवानी

हं! अध्यात्म!

साऊ
Fri, 05/03/2013 - 06:52 नवीन
हं! अध्यात्म! शुची ताई तुअम्च नाव आव्डल.
  • Log in or register to post comments

कुठपर्यंत आलो आपण ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/03/2013 - 08:37 नवीन
गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न कुठपर्यंत आला आहे ? -दिलीप बिरुटे (गुढ गोष्टीं/घटनेचा नाद असलेला)
  • Log in or register to post comments

दोन बेसीक गोष्टी आहेत...

अर्धवटराव
Fri, 05/03/2013 - 08:51 नवीन
जीवंतपणा व स्वातंत्र्य. या दोन गोष्टी जर पटल्या (ते पटावच लागतं... त्याला पुराव्यानी शाबीत करता येत नाहि.) तर "कर्म" म्हणजे काय हे कळ्तं. एकदा कर्म कळलं कि कर्मविपाक देखील समजतो. मुळात कर्म आणि फळ हे वेगवेगळे नाहित. कर्माचं डीराईव्ह्ड फॉर्म म्हणजे विपाक. विपाकाचं इंटीग्रेटेड फॉर्म म्हणजे कर्म. ज्याच्याकडे डेरीव्हेशन आणि इंटीग्रेशनच्या समीकरणांनी बघितल्या जातं ते जीवन. या जीवनाची मूळ प्रॉपर्टी म्हणजे स्वातंत्र्य. अर्धवटराव
  • Log in or register to post comments

कर्म माझं

स्पा
Fri, 05/03/2013 - 11:08 नवीन
मागच्या जन्मी काहीतरी भयंकर कर्म केलेलं असणार त्याचं परिणाम स्वरूप असल्या वांझोट्या चर्चा मिपावर वाचाव्या लागतायेत.. कसले बोळे तुम्ब्लेत लोकांचे अरारा कहर........... अवांतर : " शुची" हेच नाव चांगल होतं
  • Log in or register to post comments

वांझोट्या चर्चा? आँ? लाडक्या

गवि
Fri, 05/03/2013 - 11:12 नवीन
वांझोट्या चर्चा? आँ? लाडक्या पुतण्या, अरे मग तू सुचव ना गर्भार चर्चाविषय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गर्भार चर्चाविषय..

स्पा
Fri, 05/03/2013 - 11:20 नवीन
गर्भार चर्चाविषय..
चालू द्या आमचा पास आमची तेवढी बौद्धिक कुवत नाही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा