Skip to main content

कर्मविपाक

लेखक ढालगज भवानी यांनी गुरुवार, 02/05/2013 07:32 या दिवशी प्रकाशित केले.
"सामान्य वाचक" यांची "महाराज" या लेखावरील "कर्माच्या गती गहन असतात" अशी प्रतिक्रिया वाचून जालावर याविषयी काही लेख आहेत का याचा शोध घेतला. एक साईट सापडली. या साईटवरती लेख मिळाले. पैकी एका लेखातील खालील चपखल उपमा आवडली. ती शेअर करते आहे. मला तरी ती पटते. पूर्वी लो. टिळकांच्या "गीतारहस्य" ग्रंथातील "कर्मविपाक" विवेचन वाचून मंत्रमुग्ध झाल्याचे पक्के स्मरते. कदाचित सतत या व अशा विषयांवरील लेख वाचून "कंडीशनींग" झाले असल्याने मला पटत असेल. पण निदान हिंदू धर्म व त्यातील "कर्मविपाक" सिद्धांत, "नशीब/नियती" या अतिशय गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तरी करतो. जे निश्चितच कौतुकास्पद आहे. खालील उतारा संपूर्णतः वरील साईटवरुन घेतलेला आहे. एका मोठ्या पिंपामध्ये प्रथम गहू टाकले, मग त्यावरती तांदुळाचा थर ओतला, तांदूळावर डाळ घातली, पुढे त्यावर दगडाचा चुरा टाकून त्यावर लोखंडाचा चुरा टाकला, आणि सर्वात शेवटी उत्तमोत्तम मौल्यवान रत्ने टाकून ते पिंप भरुन टाकले. त्यानंतर पिंपाच्या खालच्या दिशेने एक छिद्र पाडले. छिद्र पाडल्यावर त्या छिद्रातून आपण ज्या क्रमाने वस्तू भरल्या असतील,त्याच क्रमाने त्या वस्तू बाहेर पडायला सुरुवात होइल.मनुष्याचे जीवन असेच आहे. अनेक जन्मांच्या संचयित कर्मांचा काही भाग प्रारब्धरुपाने, स्वत:बरोबर घेऊन मनुष्य जन्माला येतो. हे प्रारब्ध म्हणजे जणू भोगरुपी कर्मांनी भरलेले एक पिंप असते.जन्माला येताना या पिंपाला एक छिद्र पाडले जाते, आणि सांगीतले जाते यातून जे जे जसेजसे खाली पडेल त्याचा स्वीकार कर आणि जीवन जग.सुरवातीला छान बासमती तांदूळ, डाळ व गहू टाकले असतील तर मनुष्याला छान पुलाव आणि पुरनपोळीचा स्वाद घेता येईल. परंतु पुढे तो स्वाद घेत असतानाच दगड आणि लोखंडाचा चुरा पडावयास सुरुवात होईल. असे होताक्षणी मनुष्याचा आरडा ओरडा सुरु होइल की "काय हे! मला हा चुरा का खावा लागतो आहे? मूळात तो चुरा त्यानेच कधीतरी साठविला आहे याची आठवन त्याला होणार नाही ही कर्मरहस्याची अजून एक मेख आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 20209
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

In reply to by संजय क्षीरसागर

उत्तर देता नाही आलं की संबंध नाही का? माझे मत आहे संबंध आहे. दोन्ही ना आदि ना अंत अशा कन्सेप्ट्स आहेत.

In reply to by ढालगज भवानी

अंत म्हणाल तर , तो ही नक्की आहे, पण आपल्या बुद्धीच्या पलीकडचा आहे. हे सगळे सगळ्यांना पटले पाहिजे हा अट्टाहास कशासाठी?

In reply to by सामान्य वाचक

नाही अट्टाहास नाही. जितके प्रश्न उपस्थित होतात चांगलेच आहे. स्वतःच्या श्रद्धा, समजुती, भ्रम तर भ्रम( ऑर व्हॉटेव्हर) रिव्हिझीट (चाचपण्याची) करण्याची संधी मिळते.

In reply to by ढालगज भवानी

अति प्रश्न & चर्चा , याने आणखी गोंधळ होऊ शकतो. चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. अन्यथा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त

In reply to by सामान्य वाचक

हे अगदी मान्य ! चर्चा करायची तर त्या विषयातील माहिती असलेल्या, अधिकारी व्यक्तीशी करावी. हे तर १०० % खरे आहे.. काय वाट्टेल ते चालू आहे झालं

In reply to by ढालगज भवानी

विश्वात अशा कोणत्याही दोन गोश्टी नाहीत ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. विघटन केले असता सर्व गोष्टी मूलतः अणूंनीच ना बनल्या आहेत ? 'माती असशी मातीत मिळशी....'

In reply to by अत्रुप्त आत्मा

मग मला त्या जन्मात जे मिळालं ते त्याच्या मागे जन्म नसताना त्यात कुठून आलं?'
' अ.आ. तुमच्या प्रश्नाचं हे समाधानकारक उत्तर असेलच असे नाही, पण मला ह्या संबधित हा एक सिद्धांत तार्किक वाटतो, कि आपण सगळे "आत्मा"रुप आहोत आणि परमात्म्याचे अंश आहोत.परमात्म्याचे अंश असल्याने आत्म्याला अल्पस्वातंत्र्यहि आहे. सुरवातीला सर्व जीवात्मे परमात्म्याच्या निकट सान्निध्यात (व कर्मबंधनातून मुक्त)होते .पण जीवात्म्यांना परमात्म्यापासून विलग होऊन स्वतंत्र होण्याची इच्छा झाली, त्यांची हि इच्छा पूर्ण करण्यासाठी परमात्म्याने भौतिक जगाची निर्मिती केली व जीवात्म्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना तशी जीवन परिस्थिती उपलब्ध करून दिली. अशाप्रकारे भौतिक जगातील "पहिल्या जन्माची" सुरुवात झाली. व तेथून आपल्या कर्माप्रमाणे जीवात्मा पुढचे जीवन जगत आहे. पण त्याचे अंतिम उद्दिष्ट पुन्हा परमात्म्याच्या निकट सान्निध्यात जाणे हे आहे.

In reply to by श्रिया

तुमच्या संपूर्ण प्रतिसादाचं सार-रूप ,मला पहिला जन्म देवाने दिला आणी त्यावेळेसंही ''जे'' काहि दिलं ते त्यानीच दिलं असं होइल...मला हे तात्विक दृष्ट्या किंवा १ मुद्दा म्हणून मान्य आहे.कारण त्यामुळे पुनर्जन्माच्या सूत्राला १ सुसंबद्धता मिळते.(परंतु,तरिही- हे सर्व घडवणारा देव किंवा तशी तत्सम नैसर्गिक शक्ति पुरावा देऊन सिद्ध करा असं म्हटलं की हे ही गृहीतक निकालात निघतं...कारण मुळात हे असलं काहि अस्तित्वातच नाहिये.) पण मी हा वाद यामुद्यावर सोडुन द्यायला तयार आहे.माझ्या सारख्यांचं भांडण निव्वळ एखादी गोष्ट/गृहीतक खरं की खोटं या एकमेव कारणासाठी नाहीच. धर्माच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टीत
हे खरं/खोटं करण्याचं मूळ कारण
हे त्यामागिल विषमता लबाडी शोषण अन्याय हे सर्व आहे... हा कर्मविपाकाचा सिद्धांत किंवा नशिब मानायला लावणारी कोणतिही सिस्टिम आपल्यावर दोन प्रकारे अतिक्रमण करते... पैकी पहिला प्रकार--- आपल्याला नशिबाच्या पाठिमागे दडायची सोय उपलब्ध होणे.याचे गैरफायदे म्हणजे कोणत्याही कामात अपयश आलं की,आपण प्रामाणिक प्रयत्न केलेले असले काय/नसले काय - ''हे माझ्या नशिबातच नव्हतं'' असं म्हणण्याची आपली तयारी होते. त्यामुळे अनेकदा आपल्या अडचणीवरचं/अपयशामागचं खरं कारण कळायची कुठलिच शक्यता शिल्लक उरत नाही. (जी नशिबा शिवाय विचार केला तर असतेच असते.) आपण आपल्या/दुसर्‍याच्याही बाबतीत हेच वाक्य उच्चारतो-की ''सालं नशिबात नसेल त्याच्या'' किंवा ''अजुन योग आलेला नाही'' अश्या अनेक प्रकारे याची अभिव्यक्ति होत असते. नोकरी न लागण्यामागे खरी कारणं असतात, बेकारी/समाजात नोकरदारांच्या प्रमाणात नोकर्‍यांची असलेली अल्प उपलब्धता. त्याशिवाय ''मी अमुक इतकं आणी अमुक अश्या प्रकारचं शिकलोय,म्हटल्यावर मला तमुक प्रकारचीच नोकरी मिळाली पाहिजे... साहेबाचं शिक्षण आणी चपराश्याची नोकरी का करू?'' अश्या पद्धतीचा न्याय्य असला तरी परिस्थितिकडे डोळेझाक करणारा सूर. नशिबाचा दुसरा पछाडणारा प्रकार-हा याच कर्मविपाकाच्या धार्मिक सिद्धांताचा भाग आहे..त्या नुसार पुढे चातुर्वण्य संकप्लना आणी त्या अनुषंगानी आजच्या काळात केलेला चातुर्वण्य समर्थकांचा खोडसाळ अपप्रचार-दुट्टप्पीपणा इत्यादी सर्वकाही... म्हणजे वाद उपस्थित झाला,की ''चातुर्वण्य आंम्ही जन्माधिष्ठित मानत नाही कर्माधिष्ठित(च) मानतो'' असं म्हणायचं,मग ''धर्मशास्त्रातंही तसच सांगितलय'' अशी मखलाशी करायची...मग आमच्या सारख्यानी-''कर्माधिष्ठित मानता तर ''तशी व्यवस्था गेल्या हज्जारो वर्षात कुणी का निर्माण केली नाही???,आणी सध्या आपण का निर्माण करत नाही???'' असं विचारलं की तोंड बंद झाल्यामुळे एकतर उखडायचं/चिडायचं तरी किंवा वादातून पळ काढायचा... याच पद्धतिने मी आमच्या भिक्षुक वर्गात कायम १ आव्हान देत असतो-की जर का तुंम्ही जातिचे गुण हे जन्मसिद्ध न मानता कर्म सिद्ध मानता तर, ज्याला मोटार चालवता येते तो ड्रायव्हर या कर्मगत विभागणी प्रमाणे ज्याला वेदमंत्र नीट म्हणता येतील,तो हिंदू समाजातल्या कोणत्याही जातितला माणुस हिंदु पुरोहित असं करायला तुंम्ही का तयार होत नाही???- वेदपाठ शाळेत कोणत्याही हिंदू मुला/मुलिला प्रवेश का देत नाही???-तर मग मात्र हे चालत नाही आणी हा अधिकार(?) फक्त ब्राम्हणांनाच..वगैरे भाषा सुरु होते. (त्यात अनेक पुरोहित मंत्र म्हणताना अस्खलित अशुद्ध म्हणतात ते मात्र चालतच--''केश्वाय न्मः/नारायनाय न्मा:/माध्वाय न्मा:'' र्‍ह्स्व/दीर्घ/जोडा(मारलेली) गुरुत्वहीन अक्षरं/विसर्गांच्या उच्च्चारी चुका या बाबतीत तर न बोललेच बरं...१विनोदी फार्स व्हायचं बळ असलेलं साहित्य-साधन आहे ते...!) म्हणजे एकिकडे लायकतेची भाषा करायची,दुसरीकडे त्याच लायकतेच चाललेलं स्खलन मात्र सहजतेनी बघायचं... असा हा सगळा गोंडस पसारा आहे... त्यामुळे कर्मविपाक इत्यादी बद्दलची चर्चा सुरु झाली की त्याच्या बाजुनी बोलताना माणसाच्या इहलौकिक दृष्ट्या असलेल्या गुण/अवगुणांना/नैतिकतेला हताशी घेऊन ''कर्म'' या गोष्टिचा अर्थ गृहीत धरायचा..पण दुसरीकडे धर्मात प्रत्येक वर्ण/जातिच्या बाबतीत सांगितलेल्या ''कर्मा''ला मात्र साफ दुर्लक्षित करायचं... असा हा संपूर्ण दुटप्पी खेळ आजही चालू आहे...
म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही

In reply to by अत्रुप्त आत्मा

+१०००००००००००००००००००००००००००००००००००............ नाद खुळा प्रतिसाद. अत्रुप्त आत्म्याशी पूर्णतः सहमत!!!!!!!

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>>म्हणुनच हे उपरोक्त सर्व सोडुन केवळ धार्मिकतेनी सांगितलेले जातिचे गुण नाही,तर नैसर्गिकपणे असलेले माणसांचे इहलौकिक गुण जमेला धरून ''तुंम्हाला'' कर्मसिद्धांताचा खेळ हवा असेल तर माझ्यासारख्याचा त्याला मुळीच विरोध नाही छान. बाकी माणसामध्ये लोभ, चुका करण्याची, फसवण्याची प्रवृत्ती हे दुर्गुण 'जात्याच' आहेत त्याचे हे सगळे परिणाम आहेत. धर्मच नव्हे तर सगळीच क्षेत्रे व्यापून पुन्हा हे दुर्गुण तोंड वर काढून बसलेलेच आहेत.

संबंध नाही हेच उत्तर आहे. गणना सुरू होण्यापूर्वी संख्या ही कल्पना नव्हती. अ आचं म्हणणंय प्रथम जन्माचं संचित कसं आलं? आता या दोन्हीचा काय संबंध आहे?

मी कायम जागे राहु शकत नाही मी कायम झोपलेलाही अजिबात राहु शकत नाही मी केवळ श्वास आत घेउन राहु शकत नाही वा नुसताच बाहेर सोडत राहु शकत नाही जे शरीर मिळाल ते सुध्दा स्थिर नाही सतत बदल होतोय त्यात थोडक्यात जिथ बघतोय तिथ उर्जेच रुपांतर होताना दिसतय स्थिर असं काहीच भासत नाही म्हणूनच जेव्हां अटल अविचल मोक्षाची कल्पना निर्माण होते प्रॉमिस्ड लँड , कायमचा स्वर्ग स्गळ्याच मनाच्या कल्प्नाशक्तिच्या भरार्‍या असं मन जे स्वतःच स्थिर नाही कधी अनुभव देत तर कधी डुलक्या काढतं थोडक्यात मी नुसताच जन्मलेला राहणे शक्यच नाही (अमर) परीणामी मृत्युरुप हे सुध्दा माझे कायमच्या मुक्कामाचे स्थान नाही...

खर म्हणजे या विश्वात प्रत्येक पदार्थाची ( ग्रह असोत की अणु,मुलकण इ.) काटेकोर आखुन दिलेली गती ,कक्शा असते. युगानुयुगे त्यात तिळमात्रही फरख नसतो.इतकी सुसुत्रता असते. या मागे काहीतरी प्रेरणा असेलच.या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती. तसेच प्रत्येक क्रियेला प्रतीक्रिया असते या नियमा नुसार प्रत्येक कर्माला फळ हे असणारच. आपले आचार विचार हे फक्त या जन्मातले नसुन ते मागचे संचित असु शकतील. नाहीतर प्राण्याचा मेंदु व मानवाचा मेंदु या मधे इतका फरख कसा असता ? या एकाच जन्मात भाव भावना कश्या विकसित झाल्या असत्या ? मानवी जिवनात अंसख्य नाती गोती परस्पर सबंध हा मागील जिवनाचा सामुहीक परस्पर कर्म विपाकाचा परिणाम असु शकेल.

In reply to by अशोक पतिल

या स्थीरांकावरच विज्ञांनाचे नियम कार्य करतात.अन्यथा या विश्वात अराजकता माजली असती.
मुळात विश्वात अराजकता नाहीये हाच कित्ती कित्ती मोठा गोड गैरसमज आहे.. मला तर बुआ प्रचंड अराजकता सगळीकडे दिसत आहे... काय परफेक्ट आहे इथे ? हा आता हे इंपर्फेक्शनच एक परफेक्ट गोश्ट निर्माण/नियंत्रित करते आहे असा समाज विषेश कारणाने बाळगायचा हव्यास असेल तर.... _/\_

पूर्वसुकृत या कल्पनेतील हवा योगवासिष्ठात स्वतः वसिष्ठांनी घालवल्यामुळे आपण तर ब्वॉ जाम खूश आहोत. सोनारानेच कान टोचले ते एक बरं झालं.

In reply to by प्यारे१

मी काय लै डीप बीप नै वाचायला. पण जिक्तं उमागलं तिक्तं सांगतो. वसिष्ठ म्हणतात, की पूर्वसुकृताचा बाऊ करण्यात काही अर्थ णाही. मागल्या जन्मीचे गाठोडे साठलेले असले तरी या जन्मी ते वाढत नाही, तितकेच राहते. त्यामुळे या जन्मात आपण किती हातपाय हलवतो त्यावर आपण पुर्वसुकृतावर किती वरताण करतो ते , पक्षी आपला उत्कर्ष अवलंबून आहे. तस्मात, पुरुषप्रयत्न हाच सर्वांत महत्वाचा हा संदेश वसिष्ठ देतात.

In reply to by बॅटमॅन

ओक्के. असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे. रेखा तितुकी पुसोनि जाते, हे तो प्रत्यक्ष प्रत्यया येते, तेणे डोळेझाकणी करावी,काय निमित्य? आधीच्या प्रतिसादाचा अर्थ वेगळा वाटतोय दादा. पूर्वसुकृत ही कंसेप्ट नाहीच असं वसिष्ठ म्हणतात असं वाटतंय एकदम. असो.

In reply to by प्यारे१

नै ना, तसं नै म्हणत वसिष्ठ. सिवाजी: पूर्वसुकृत कसे तयार होते याबद्दल वसिष्ठ काय म्हणाले ते आता लक्षात नाही, मला तूर्त मगाशी सांगितले इतकेच लक्षात आहे.

In reply to by बॅटमॅन

पूर्वसुकृताचा बाऊ करण्यात काही अर्थ णाही. मागल्या जन्मीचे गाठोडे साठलेले असले तरी या जन्मी ते वाढत नाही, तितकेच राहते.
असं असेल तर पूर्वसुकृताचे साठलेले गाठोडे मुळात जमा कसे बरे झाले असेल ? यावर त्यांनी काय सांगितलयं ?

In reply to by ढालगज भवानी

ते पाहिले पाहिजे. मी आपला पूर्वसुकृताचे ओझे घ्यायचे कारण नाही हे वाचूनच खूश झालो, म्हटलं च्यायला काही का असेना, या जन्मात आपल्या हातात सर्व काही आहे ही तर लै भारी गोष्ट आहे.

गूढ गोष्टीचा/घटनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न कुठपर्यंत आला आहे ? -दिलीप बिरुटे (गुढ गोष्टीं/घटनेचा नाद असलेला)

जीवंतपणा व स्वातंत्र्य. या दोन गोष्टी जर पटल्या (ते पटावच लागतं... त्याला पुराव्यानी शाबीत करता येत नाहि.) तर "कर्म" म्हणजे काय हे कळ्तं. एकदा कर्म कळलं कि कर्मविपाक देखील समजतो. मुळात कर्म आणि फळ हे वेगवेगळे नाहित. कर्माचं डीराईव्ह्ड फॉर्म म्हणजे विपाक. विपाकाचं इंटीग्रेटेड फॉर्म म्हणजे कर्म. ज्याच्याकडे डेरीव्हेशन आणि इंटीग्रेशनच्या समीकरणांनी बघितल्या जातं ते जीवन. या जीवनाची मूळ प्रॉपर्टी म्हणजे स्वातंत्र्य. अर्धवटराव

मागच्या जन्मी काहीतरी भयंकर कर्म केलेलं असणार त्याचं परिणाम स्वरूप असल्या वांझोट्या चर्चा मिपावर वाचाव्या लागतायेत.. कसले बोळे तुम्ब्लेत लोकांचे अरारा कहर........... अवांतर : " शुची" हेच नाव चांगल होतं

In reply to by स्पा

वांझोट्या चर्चा? आँ? लाडक्या पुतण्या, अरे मग तू सुचव ना गर्भार चर्चाविषय...

In reply to by स्पा

गर्भार अन गाभण चर्चाविषय सुरू कर्न्रर्‍यांच्या परतिक्शेत. (बट्ट-मण्ण).

In reply to by बॅटमॅन

अर्र.. मला गंभीर असं म्हणायचं होतं.. ;) बादवे वांझोट्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय हो बट्टशास्त्री.. ? सपुत्रिक, पुत्रवंत / पुत्रवती, अवांझोटी, गर्भवती, किंवा कसे?

In reply to by गवि

हे शब्द तसे बरोबरच आहेत, पण वांझोटीला जण्रल विरुद्धार्थी शब्द म्हंजे प्रसवक्षम, किंवा बहुप्रसव म्हटले तरी चालेल. अवांझोटीही चालायला हर्कत नसावी. (षट्कॉमिकपारंगत, कार्टूनमूर्धन्य) बट्टमान्य शास्त्री.

साला मला तर हे कर्मविपाक नाव ऐकल्यावर, एखाद्या तोंडात टाकताक्षणी विरघळणार्‍या म्हैसूरपाकाची आठवण होते अन सगळं गोविंद गोविंद होऊन जातं. :)

In reply to by बॅटमॅन

कर्मविपाक आणि मैसूरपाक यात बरंच साम्य आहे हो.. वरील वाक्य अवांतर टाळण्यासाठी. आता मुख्य प्रश्न. आपला आवडता मैसूरपाक कोणता? अ. साजुक तुपातला मऊ असा मैसूरपाक जो प्रत्यक्ष मैसुरात जास्त ठिकाणी मिळतो: A आणि ब. खुटखुटीत काहीसा कडक पिवळा मैसूरपाक, जो महाराष्ट्रात लोकल मिठाईदुकानांमधे खायची लहानपणापासून सवय झाली आहे: B पैकी कर्मविपाकाशी जास्त साम्य साधणारा कोणता?

In reply to by गवि

पहिला मैसूरपाक मी अजूनपर्यंत खाल्लाच नाही. (हाय कंबख्त वगैरे टोमणे ऐकायच्या तयारीनेच सांगतो आहे) दुसराच खाल्ला आहे. मिरजेत ष्ट्यांडकडून दर्ग्याकडे जाणार्‍या रोडवर एक टर्न घेतला की एका बोळात एक हलवाई आहे. त्याच्याकडचा मैसूरपाक आत्तापर्यंत खाल्लेला सर्वांत ब्येष्ट मैसूरपाक आहे. मैसूरपाक त्वांडात घाट्ल्याबरुबर पाक विरघळतंय एकदम. तस्मात, दुसर्‍या प्रकारचा मैसूरपाक हाच आमच्यालेखी कर्मविपाकाशी सर्वांत जास्त साधर्म्य राखून आहे.

In reply to by गवि

तो पैलावाला आहे तो काय फक्त मैसुरात मिळतो असें नाही. फोंड्यात श्रीकृष्ण डेअरीच्या दुकानात मिळतो. कशाला आठवण करून दिलीत? आता एक तर मन मारायला पाहिजे नाहीतर डाएटचे तीनतेरा झालेले बघायला पाहिजेत. :(

In reply to by पैसा

आता एक तर मन मारायला पाहिजे हापिसात साहेब नि बाहेर (भावी) आमची "ही" मारते तेवढं पुरे आहे की.

In reply to by मन१

असा झाला काय लफरा? तुझ्याबद्दल फार सहानुभूती वाटते रे! भावी ही ला एवढा घाबरतोस, तर पुढे कसं व्हायचं तुझं? असो. तर मनाला नाय मारीत. संध्याकाळी मैसूरपाक घेऊनच येते!

In reply to by गवि

दक्षिण भारतातील साजूक तूपातील म्हैसूर पाक ... अरारारा खल्लास चविष्ट लागतो......नका आठवण काढू राव.

In reply to by ढालगज भवानी

हा कोईमतूर् च्या " श्रीकृष्ण" चा ! तूप निथळत असते नुस्ते... बंगलोर आणि चेन्ने मधे त्यांची साखली आहे. दोन्ही विमानतळावर मिळतो. एकदम झक्कास !

सुरुवात झाली एकोहम बहुस्याम पासून .. आणि शेवट होणार आहे तिथेच ..पुन्हा त्या परब्रह्मापाशी ! जिज्ञासूंनी ( केवळ वादासाठी वाद घालणारांनी नव्हे) दासबोधातील विश्वाची उभारणी आणि संहारणी हे प्रकरण समजून घ्यावे. मग हे काय आहे ? तुमचा आमचा हा जन्म आणि मागचे -पुढचे, सारे ही त्या परमात्म्याची लीला आहे. किंबहुना आपल्याला पुरुषार्थ गाजवण्याची संधी आहे . आपआपल्या वकुबाने तो करावा हे निश्चित आपल्या हाती आहे. तो दयाळु नाही तर न्यायी आहे.. आपण आपल्याच सत्कर्माची आणि दुश्कर्माची फले भोगत असतो, व्रुथा वाद करण्यात अर्थ नाही. परमात्म्याने अवतार घेऊन पुरुषार्थाने प्रतिकूल परिस्थिती बदलता येते हे दाखवून दिले आहे.( वनवासी व्हावे लागले, बायको पळवून नेली, साह्य देखील माकडांचे !) आपण ती सगुण रुपे डोळयासमूर ठेऊन आपला पुरुषार्थ गाजवावा आणि समन्वय साधावा, नरदेह सार्थकी लावावा. या जन्मात केलीली सारे कर्मे carry forword होतात, सत्कर्मे करित रहावे, मोक्श मिळणारच ! अधिक महितीसाठी " कर्माचा सिद्धांत" हे हिराभाई ठक्कर यांचे छोटेखानी पुस्तक वाचवे. अप्रतिम आहे. I have complete clarity and no doubts on this topic !

नाहीतर तर कर्मविपाकात बुडुन मरायला वेळ कुणाला आहे? पहिल्यादा मला वाचताना दारु बनवायची प्राचीन कृती वाटली नंतर पहिल्या धारेची पिल्यासारखी झिंग आली.डोळ्यासमोर अंधारी आली. बाकी चालु दे