Skip to main content

(तू)

लेखक प्यारे१ यांनी सोमवार, 29/04/2013 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
बोटांवर चिकटलेल्या फेविक्विकच्या थेंबासारखा तू . पापण्यांच्या कोपर्‍यांवर साठणार्‍या घाणीसारखा तू . रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन भरकटलेल्या बेवड्यासारखा तू . हवा मारुन मारुन न पेटणार्‍या रॉकेल संपलेल्या स्टोव्हसारखा तू . हिवाळ्यातल्या थंडीत गारठलेल्या खिडकीखाली थरथरणार्‍या मांजराच्या पिलासारखा तू . टळटळीत दुपारी तापलेल्या ढगांखालून वाहणार्‍या घामाच्या धारेसारखा तू . सूर्यास्ताच्या वेळी हटकून नेहमीच्या जागी पाय वळणारा तू . तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू .... तू, तू आणि तू ... सांग रे नालायका, हो तूच तू कुठे चचला आहेस?
लेखनविषय:

वाचने 4934
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

बाब्बो, काय केलेस रे हे त्या कवितेचे?? ;) असो. विडबंनकारांना __/\__!! :)

In reply to by बॅटमॅन

प्यारे श्वा, मध्वा नि युवा एकाच नजरेने पाहतो. ;) बादवे हे राहीलेच की, पनीर खाताच खाजणारी अ‍ॅलर्जी तू... ;)

In reply to by भावना कल्लोळ

हा 'प्रेमानं' वापरला जाणारा शब्द आहे. चचणे = खपणे = हरवणे = मरणे अशा विविधार्थाने वापरला जातो. उदा. : गावाकडे एखादा थोडा अप्रिय माणूस मेला की अमुक अमुक चचला म्हणण्याची पद्धत आहे. -४थी स्कॉलरशिपला पास झालेला प्यारे ;)

तोंडी नाव आलं तरी ठसठसणार्‍या विखारी जखमेसारखा तू
या ऐवजी तोंडी नाव आल तरी फटफटणार्‍या अस्सल शिव्यांसारखा तू हे कस वाटेल कविवर्य?