✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

बरसाली...

व
विसोबा खेचर यांनी
Mon, 04/22/2013 - 15:49  ·  लेख
लेख
बरसाली.. इटारसी नागपूर मार्गावरील एक लहानसं स्थानक. या स्थानकाला मुंबै-दिल्लीची ऐट नाही की तसा बडेजाव नाही. परंतु येथील विलक्षण निवांतपणा आणि अगदी नीरव शांतता मन मोहून टाकते.. सभोवताली अगदी भरपूर, नजर जाईस्तोवर हिरवागार झाडझरोरा.. झाडं अगदी फलाटावर आलेली. किंबहुना, झाडीतूनच थोडी साफसफाई करून स्थानक उभारलं आहे असं म्हणूया.. दिवसाकाठी एखाद-दुसरी पाशिंजर थांबेल तेवढीच काय ती जाग.. एरवी अगदी निसर्गरम्य नीरव शांतता.. barasaalii एफ वाय-एस वाय, किंवा फार तर टी वाय चं वय असावं.. वर्गातल्याच एखादीशी नुकतंच सूत जमलेलं असावं..आणि दोघांनी उन्हं उतरल्यावर हळूच येथे यावं.. फलाटावरच एखाद्या झाडाखाली निवांत बसावं..थोडंसं रुसव्याफुगव्याचं तर थोडंसं गुलुगुलू बोलावं.. "गाणं म्हण ना एखादं.. " त्याने थोडा आग्रह करावा.. तिनं लाजेनं थोडं चूर व्हावं, थोडं गोरंमोरं व्हावं आणि मग 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' हे गाणं म्हणावं.. तीन सांजा होऊन अंधारू लागावं आणि मग दोघांनी पुन्हा उद्या भेटण्याच्या आणाभाका घेऊन निघावं.. जाताना स्टेशन मास्तरवजा तिकिट कलेक्टराकडून थोडं कौतुकवजा दटावूनही घ्यावं... : ) अजून साला त्या वयात काय पायजेल..?! -- तात्या.. सॉरी, --शेखर अभ्यंकर, एफ वाय बीकॉम. : )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
15336 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

गुड वन

मन१
Mon, 04/22/2013 - 16:12 नवीन
गुड वन.... लिहित रहा तात्या.
  • Log in or register to post comments

:)

नीलकांत
Mon, 04/22/2013 - 16:13 नवीन
तात्या बॅक इन फॉर्म म्हणावे का?
  • Log in or register to post comments

:)

धमाल मुलगा
Mon, 04/22/2013 - 16:52 नवीन
तात्यानुं, नोष्टॅल्जिक नोष्टॅल्जिक एकदम? हं? :)
  • Log in or register to post comments

खी: खी: शेवटची सही आवडली.

शुचि
Mon, 04/22/2013 - 16:57 नवीन
खी: खी: शेवटची सही आवडली. कथन मस्तच.
  • Log in or register to post comments

तरंगणारं वय! मस्तच.

प्यारे१
Mon, 04/22/2013 - 17:03 नवीन
तरंगणारं वय! मस्तच.
  • Log in or register to post comments

आपल्याला बुआ एकदम हे गाणेच

निनाद मुक्काम …
Mon, 04/22/2013 - 17:13 नवीन
आपल्याला बुआ एकदम हे गाणेच ऐकावेसे वाटले हा लेख वाचून
  • Log in or register to post comments

+१*११११११११११११

कोमल
Mon, 04/22/2013 - 17:55 नवीन
+१*११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अजून साला त्या वयात काय

रुमानी
Mon, 04/22/2013 - 17:18 नवीन
अजून साला त्या वयात काय पायजेल..?! मस्तच की
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Mon, 04/22/2013 - 17:38 नवीन
त्या वयात पोचवलंत की आम्हाला!
  • Log in or register to post comments

फटू बघून मिरज-धारवाड

बॅटमॅन
Mon, 04/22/2013 - 17:41 नवीन
फटू बघून मिरज-धारवाड प्रवासातील लोंढा, अळणावर, मुगद ही स्टेशने आठवली. अगदी अस्साच फील!
  • Log in or register to post comments

लै भारी ठिकाण..

कोमल
Mon, 04/22/2013 - 17:54 नवीन
लै भारी ठिकाण.. आणि लेखन पण.. टी.ई.-बी.ई. च्या आठ्वणी जाग्या झाल्या.. ;)
  • Log in or register to post comments

आवडलं.

प्रचेतस
Mon, 04/22/2013 - 18:00 नवीन
आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्त..

हरिप्रिया_
Mon, 04/22/2013 - 18:22 नवीन
:) मस्त.. अशीच निवांत स्टेशन आठवली.. कधीतरी सगळी काम सोडून खरच जाउन बसायला आवडेल :) (तुम्ही म्हणता त्या वयात पण परत जायला जमल तर बेस्टच ;) )
  • Log in or register to post comments

व्वा

मी-सौरभ
Mon, 04/22/2013 - 18:38 नवीन
तात्या जियो!!
  • Log in or register to post comments

आवडले...

मुक्त विहारि
Mon, 04/22/2013 - 22:04 नवीन
त्या काळावर छान "रोशनी" टाकलीत,,
  • Log in or register to post comments

मस्त....

सुहास झेले
Mon, 04/22/2013 - 22:10 नवीन
मस्त.... :) :)
  • Log in or register to post comments

ह्म्म्म... पुर्वीचं *** राहिलं नाहि.

अर्धवटराव
Mon, 04/22/2013 - 22:37 नवीन
आमच्या वेळी हे असं नव्हतं. अवांतरः अरे तात्या... तुझं पुर्वाश्रमीचं (शब्द मुद्दाम वापरला आहे) नाव शेखर आहे होय... मला उत्सुकता होती :) मित्रा... भूतकालीन वसंत बहारची चाहुल लागतेय... आता लेखणी थांबवु नकोस हि विनंती. (बालमंदीरातला) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

मर्यादापुरुष..

उपास
Tue, 04/23/2013 - 01:44 नवीन
तात्या, शंभर शब्दांची मर्यादा घातलेयस का? येउंदे फर्मास अजून.. सालं इंजिनिअरींगच्या नादात आम्हाला मुंबईच्या बाहेर पडायचा चानस भेटला नाही.. त्यामुळे हेवाच वाटतो असं वाचलं की ;)
  • Log in or register to post comments

क्या बात हैं.

श्रीरंग_जोशी
Tue, 04/23/2013 - 02:11 नवीन
या स्थानकाचं वर्णन वाचून राज कपूरच्या दिवाना चित्रपटातलं टूमदार रेल्वे स्थानक डोळ्यासमोर उभं राहिलं. वाह तात्या, दिल खूष कर दियां!!
  • Log in or register to post comments

मला आता या पत्त्याचा काही

स्पंदना
Tue, 04/23/2013 - 04:54 नवीन
मला आता या पत्त्याचा काही उपयोग नाही, पण पोरांना दाखवुन ठेवते. सार्‍यांच्याच आयुष्यात कधी ना कधी हिरवळ येतेच, त्यासाठी हिरव्या रंगात रंगलेले हे स्थान कधीही सुरेखच. तात्या मस्तु!
  • Log in or register to post comments

मस्त लेख - मस्त प्रतिसाद!

पांथस्थ
गुरुवार, 04/25/2013 - 10:13 नवीन
तात्या, बर्‍याच दिवसांनी तुमचे नविन लेखन वाचायला मिळाले. तुम्ही परत लिहिते होता आहात हे बघुन आनंद झाला. अपर्णातै,
सार्‍यांच्याच आयुष्यात कधी ना कधी हिरवळ येतेच
क्या बात है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

काळजात

निमिष ध.
Tue, 04/23/2013 - 07:16 नवीन
तात्यानु अरे काळजात कळ आली बघ. कसले जीवघेणे वर्णन केलेस. लिहिता रहा!
  • Log in or register to post comments

छान

तिमा
Tue, 04/23/2013 - 13:16 नवीन
तात्या, वर्णन आवडले पण फारच त्रोटक वाटले. फोटो बघून 'ही वाट दूर जाते' हे गाणं आठवलं.
  • Log in or register to post comments

आवडले.. पण अजून लिहिले असते

ऋषिकेश
Tue, 04/23/2013 - 13:27 नवीन
आवडले.. पण अजून लिहिले असते तर अधिक आवडले असते
  • Log in or register to post comments

अजून साला त्या वयात काय

अग्निकोल्हा
Tue, 04/23/2013 - 14:20 नवीन
अजून साला त्या वयात काय पायजेल..? खल्लास. लेखाचा न्हवे मनाचा शेवट झाला... काही बोलायला उरलच नाही :) थोडं भान आलं अन शब्द आपसुकत मनावर उमटले... ते वयच खरं तर अजुन (पुन्हा एकदा) पाहिजे.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे

विसोबा खेचर
Wed, 04/24/2013 - 11:20 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे आभार.. :)
  • Log in or register to post comments

झकास

मी_आहे_ना
गुरुवार, 04/25/2013 - 10:36 नवीन
तात्या, मस्त एकदम! पण "अजून साला त्या वयात काय पायजेल..?" असं आत्ता वाटतं हो... :)
  • Log in or register to post comments

हा लेख वाचल्या पासुन

jaypal
गुरुवार, 04/25/2013 - 10:51 नवीन
३/४ दा शोभा घुर्टुंना ऐकतोय
  • Log in or register to post comments

सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे

विसोबा खेचर
गुरुवार, 04/25/2013 - 12:14 नवीन
सर्व प्रतिसादकर्त्या रसिकांचे मनापासून आभार.. :)
  • Log in or register to post comments

हे साम्य कसं काय

चौकटराजा
गुरुवार, 04/25/2013 - 13:45 नवीन
शेखरभाउ, तुझी ती गायची ओळ व माझी शेंम टू शिएम कशी काय भौ ? तिन्ही सांजा ...पर्वतीचा उतार....नाद जसा वेणूत.....मग शेवट..साक्षी ऐसे अमर करूनी .....त्याच दिवशी ..रादर त्याच संध्येला गायलेले.... झूला धनकका धीरे धीरे हम झूले अंबर तो क्या है तारोंके भी लब चूमे मस्तीमे झूमे और सभी गम भूले पीछे ही मुडते मुडते निगाहे.....आ ...जा चल दे कही दूर. फरक एवढाच की तिच्या हातात एंगेजमेंट रिंग होती (मीच दिलेली बरं )
  • Log in or register to post comments

क्या बात है!

निरन्जन वहालेकर
गुरुवार, 04/25/2013 - 14:20 नवीन
क्या बात है तात्या ! ! ! अजून साला त्या वयात काय पायजेल..?! खरच
  • Log in or register to post comments

फोटो मस्तच आलाय..

तुमचा अभिषेक
गुरुवार, 04/25/2013 - 16:41 नवीन
फोटो मस्तच आलाय.. कोकण रेल्वेवर देखील अशीच मनमोहक स्थानके.. असाच उल्हासित करून जाणारा रेल्वेट्रॅक आहे.. कधीतरी चैन खेचून खास फोटोसाठी उतरावे..
  • Log in or register to post comments

बास बास..! मस्त फोटु आणि छान

माजगावकर
Mon, 04/29/2013 - 11:49 नवीन
बास बास..! मस्त फोटु आणि छान लेख...
  • Log in or register to post comments

तात्या फोटो तुम्ही

jaypal
Mon, 04/29/2013 - 14:11 नवीन
काढला आहे का? असल्यास या क्षेत्रातही पारगंत दिसता
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा