ललित लिहीण्यासारख काहीस करण्याचा पहिलाच प्रयत्न आहे, माहित नाही कसा झाला आहे. जाणकारांनी समजून घ्यावे व जे चुकले असेल राहून गेले असेल ते समजवावे…….
मेघनाद…
---------------------------------------------------------------------------------
कोकणातलं घर पण अगदी जुन्या पद्धतीच म्हणजे मातीच्या भिंतीचं किंवा शेणाने सारवलेल्या जमिनींच नव्हत, तर व्यवस्थित रंगवलेल, पांढरी-काळी फरशी असलेलं आणि ऐसपैस जागा असलेल अस. ह्या घरामध्ये बरीच धामधूम सुरु होती कारण होते ते त्या घरातील मोठ्या मुलाच दोन दिवसात होणार असलेल लग्न.
राजीव तर अगदी खुशीत होता कारण त्याच्या आवडत्या मावस भावाच्या लग्नाला तो मुंबईतून खास आलेला होता. राजीव नुकताच दहावीची परीक्षा देऊन आलेला होता, वय सोळा वर्षांच असल्यामुळे शारीरिक आणि मानसिक बदल घडत होते व राजीवला नवीन पालवी फुटल्यासारख वाटत होत. त्यातून भरपूर मजा करता येईल असा हा घरचाच आनंदसोहळा होता. मावशीच्या घरातील चार माणसं शिवाय लग्नाच्या निमित्ताने आलेले सर्व नातेवाईक ह्या मुळे लग्नाची कामं, बडबड, विनोदाना अगदी उधाण आलेलं होत. राजीव देखील सर्व कामात अगदी हिरीरीने भाग घेत होता. मुळातच दिसायला देखणा, पुरेशी उंची आणि बांधेसूद शरिरयष्टी असल्यामुळे राजीव सर्वांच लक्ष वेधून घेत होता.
लग्नाच्या आदल्या दिवशी ग्रहमख झाला होता त्यात राजीवने अतिशय उत्तम असे छायाचित्रण करून सर्वांची वाहवा मिळवली होती. तसेच घरातील काम, लग्नाच्या सामानाची जुळवाजुळवी, बांधाबांध ह्या सर्व कामात देखील राजीवने व्यवस्थित मदत केली होती. प्रवासाची आवड आणि कामातील चोखी बघून काकांनी त्याची लग्नाच्या हौल वरती सामान आणि पाहुणे नेणाऱ्या सुमो मध्ये नेमणूक केली, फ़िरायला मिळणार हि कल्पना तर राजीवला खूपच आवडली. आदल्या दिवशी दुपारपासून त्याच्या हौल वरच्या फेऱ्या सुरु झाल्या, चार फेर्यांमध्ये सर्व सामान जागेवर पोहोचल. राजीव आणि त्याचे भाऊ लग्न होणार असलेल्या भावासकट हौलच्या अंगणात बसून वधु पक्षाच्या येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात फोन वरून मंडळी जवळ आली असल्याचा निरोप मिळाला. सर्व जण तयार झाले स्वागतासाठी, राजीव तर सर्वात पुढे होता.
मिनी बस हौलच्या गेट मधून आत शिरली आणि सर्व मंडळी खाली उतरू लागली, राजीव सर्वांच स्वागत गुलाबाच फुल देऊन करत होता. एक सुंदर आणि राजीवच्याच वयाची असलेली लाल रंगाचा ड्रेस घातलेली ललना बसमधून उतरून राजीवच्या पुढ्यात आली, संधिकालाच्या सूर्यकिरणात दिसलेलं तीच रूप म्हणजे जणू सोनेरी केसांची परीच! ह्या तिच्या पहिल्याच दर्शनाने राजीवची विकेटच पडली होती, राजीवने नकळतच तिच्या हातात गुलाबाच फुल दिलं, त्यानिमित्याने झालेला तिच्या बोटांचा कोमल स्पर्श राजीवला सुखावून गेला. त्यानंतरची बरीच गुलाबाची फुले ताटातच राहून गेली. सर्व मंडळी आतील खोल्यांमध्ये निघून गेली. राजीव मात्र तसाच अंगणात घुटमळत उभा होता त्याच्या नजरेसमोर सारखा तो नाजूक पण अनोळखी चेहरा दिसत होता. त्या ऐका सेकंदाच्या नाजूक स्पर्शाने आणि निरागस नजरेने राजीवचे भावविश्व अगदिच बदलून गेले होते. राजीवच्या आईने मारलेल्या हाकेने राजीव भानावर आला होता आणि त्याला आठवल होत कि तो कशासाठी आलेला आहे.
राजीवने पटापट नवीन कपडे चढवून हौलमध्ये एन्ट्री मारली, बरीच माणसं जमली होती आताशा हौल मध्ये परंतु राजीवची नजत मात्र एकच व्यक्ती शोधत होती. त्याच आता कशातच लक्ष लागत नव्हतं, अगदी बेचैन झाला होता आणि सहजच त्याच्या ओठावर गाण्याचे बोल उमटले “पल पल दिल के~~ पास तुम रेहती हो.
क्रमशः
वाचने
2323
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला प्रयत्न.
अकालि सौंदर्यत्व प्राप्त
In reply to चांगला प्रयत्न. by सस्नेह
हम आपके है कौन सारख वाटत असलं
येउ द्या पुढचा भाग
छान रे..