Skip to main content

नट्यांचे रहस्य

लेखक राजा सोव्नी यांनी बुधवार, 24/04/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
रती,रंभा ,मेनका सावध झाल्या , मधुबाला,स्मिता ,मुनरो जैश्या वरती गेल्या, एकमेका करती सेलफोन, आपल्या पेक्षा ह्या सुंदर कोण? देवांना घातली त्यांनी आण , स्वर्गात नाही अप्सरांचे वाण , नका आणू स्वर्गात एकाही नटीला, पोचल्या असल्या जरी साठीला , तथास्तु म्हंटले देवांनी , निश्वास सोडला आप्सरांनी , धरतीवर झाला नट्यांचा सुळसुळाट , साठी उलटली तरी हलवती नितिंब,पाठ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5684
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

धरतीवर झाला नट्यांचा सुळसुळाट , साठी उलटली तरी हलवती नितिंब,पाठ
पाठ कशी हलवितात? 'सुळसुळाट' ला यमक जुळत असले तरी पटत नाही. त्या ऐवजी, धरतीवर नट्यांचा सुळसुळाट अती, साठी उलटली तरी हलवती नितंब, छाती. हे जास्त चपखल झालं असतं. अश्लिल वाटणारं असेलही परंतु अश्लिलतेचा बडगा फक्त ह्याच धाग्यावर कशा करीता??

In reply to by प्रभाकर पेठकर

म्हणजे पाकशास्त्रासारखंच काव्यशास्त्रात देखील चवदार टंकायची कला साध्य आहे काकांना :) अर्धवटराव

चालायचंच! ज्याला जे जमतंय असं वाटतं ते ती माणसं करत राहतात. कुणी नाचत राहतात; कुणी कविता लिहित राहतात; त्यात काय एवढं :-)

यावरुन आशा भोसलेंचे 'बाई मी पतंग उडवीत होते' हे गाणं एकदम आठवलं!

In reply to by तिमा

चढाओढीने चढवीत होते ग बाई मी पतंग उडवीत होते... होता झकास सुटला वारा वर पतंग अकरा-बारा एकमेकांना अडवित होते ग बाई मी पतंग उडवीत होते... बहोत खुब गाण आहे. बरं झालं आठवण करुन दिलीत आज दिवस एकदम मस्त जाणार.

In reply to by तिमा

तिमा __/\__ भयाण खपलोय सदर गाणं , सदर शब्द घालून म्हणून पहिले अरारारा =)) =))