✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

निवृत्त नाथांच्या कथा

र
रामदास यांनी
गुरुवार, 04/25/2013 - 11:26  ·  लेख
लेख
आज पहाटे मी दचकून जागी झाले. तशी माझी झोप सावधच असते पण आज काहीतरी विचीत्रच झालं. माझ्या गालावर कुणीतरी हलकेच हात फिरवतंय असं आधी वाटलं. मग झोपेतच ओळखीचा सुगंध आल्यासारखं वाटलं. बर्‍याच वर्षांनी असं काहीतरी झालं पण गालावर पिस फिरवणारा स्पर्श हळूहळू सगळ्या चेहेर्‍यावरच फिरायला लागला आणि मी दचकून ..दचकून कसली जवळजवळ किंचाळतच उठले. डोळे उघडले तर काय ह्यांचाच चेहेरा समोर . मी म्हटलं "काय हो हे !!! घाबरवून टाकलंत मला" आणि काही काळवेळ .." असं म्हटल्यावर ह्यांचा चेहेरा आणखीच ओशाळगत झाला. "अगं मी उठवणार नव्हतो तुला पण अगदी नाईलाजच झाला." बेडरुमच्या निळ्या अंधारात मला नक्की काही कळेना. "अहो चक्क गालावरून हात फिरवताय आणि ... मग माझं लक्ष ह्यांच्या हाताकडे गेलं . मी उठले बाई पटकन आणि दिवे लावले. ह्यांचे हात ओलसर दिसत होते . "काय हो हे हातावर "? "अगं आजपासून मी सकाळी फिरायला जाणार होतो ना .बाहेर बर्‍यापैकी थंडी असेल म्हणून म्हटलं जरा तुझं क्रीम लावू या " "बरं मग" ? "अगं थोडं हातावर घ्यावं म्हटलं तर बाहेरच येईना" - मग ? मग काही नाही अंधारात ट्युब जरा जास्तच पिळली तर फस्कन तळाहातापासून कोपरापर्यंत उडलं ". "आता एव्हढं महागडं क्रीम वाया का घालवा म्हणून तुझ्या चेहेर्‍यावर लावत होतो तर .... आता हळूहळू मी वर्तमानात आले. गेले साताठ दिवस हा सकाळी फिरायला जाण्याचा कार्यक्रम अमलात आणण्याची तयारी चालाली होती. सुरुवातीला मी पण सोबत यावं म्हणून आग्रह चालला होता. मग काल रात्री मला म्हणाले "तर मग तू येणार नाहीस ना सकाळी " मी नाही म्हटल्यावर " मी एकटाच जाईन ची " घोषणा करून हे झोपले . अगदी झोप लागता लागता माझ्या लक्षात आलं की मला सोबत न्यायचा प्लान नव्हताच पण मी अगदी माझ्या तोंडानी नाही म्हणेपर्यंत आग्रह चालला होता . आपल्याला हवे ते दुसर्‍याकडून वदवून घेण्याची ही ट्रीक तीस वर्षं जुनी आहे आणि सालाबाद प्रमाणे यंदाही मी फशी पडलेच. पण हे कळेपर्यंत मेली झोपच लागली. ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- ..... नंतर हे कधी बाहेर पडले हे कळायच्या आतच मला पुन्हा एकदा झोप लागली ती अगदी मानसीने दारावर टकटक करून आणि आई उठताय ना ? असं चार वेळा विचारल्यावर जाग येईपर्यंत . तो पर्यंत महाराज सकाळचा फेरफटका आटपून आलेले नव्हते. अर्थात मला हे काही नविन नव्हतं .यांच्या उपक्रमाचं वेळापत्रक असंच असणार हे मला इतक्या वर्षाच्या संसारानंतर माहीती होतं . शाळेच्या भूगोलाच्या बाईंनी शिकवलेलं ज्ञान संसारात वापरणारी गृहीणी बहुतेक मी एकटीच असेन. बाईंनी वर्गात शिकवलेलं मला अजूनही लख्ख आठवतं. "समजा आज चंद्र साडेसहा वाजता उगवला तर दुसर्‍या दिवशी तो पसतीस मिण्टं उशीरा मग तिसर्‍या आणखी पसतीस मिण्टं उशीरा ....आणि पंधरा दिवसानी गायब म्हणजे उगवणारच नाही "ह्यांच्या उत्साहाचं अगदी अस्संच असतं .दर दिवशी थोडी थोडी घट होत शेवटी उपक्रम बंद करण्याच्या कारणांची यादी जाहीर होते आणि उपक्रम संपतो आणि दुसरा सुरु होतो. आणि हे अगदी पुराव्यानिशी शाबीत करण्यासाठी कपाटात सगळी एक्झीबिट एक ते अनंत ज्ञानेश्वरी-जपाची माळ आणि काउंटर- शाखेचा गणवेश- एक दुर्बीण -चार कसलेतरी दगड -दहा बारा सिड्या - अ‍ॅमवेचं किट - शेरबाजाराची पुस्तकं मी जपून ठेवलीत. हा विचार मनात येईस्तो श्वासाची मेली लय चुकलीच. मला यांची काळजी वाटायला लागली . आधी बिस्कीट जास्तच भिजलं आणि कपाच्या तळाशी गेलं मग चहाच सांडला. बाबा म्हणतात ते अगदी खरंय लय हटी -दुर्घटना घटी. तोपर्यंत माझ्याकडे मकरंद -मानसी -मुकुल एकाच वेळी बघतायत हे पण लक्षात आलं नव्हतं .झालं मग प्रश्नोत्तरं सुरु . "आई बाबा कुठे गेलेत "? मकरंद "कुणाबरोबर फिरायला जाणारेत सांगीतलंय का"? मानसी "आबा एकटेच गेले ? म्हणून तू रागावलीस ? "मुकुल आणि हे प्रश्न संपेस्तो मकरंदनी एक लांब श्वास घेऊन सोडला . आज घरात सुंगध कसला येतोय ? ह्यांनी पिळलेल्या ट्युबचा घमघमाट आता बाहेरपर्यंत आला होता. मी बापडी सांगणार तरी काय ? मग मुकुलच म्हणाला "हा आज्जीच्या क्रीमचा वास " आता शहाण्या सुनेनी गप्प बसावं ना ? पण नाही तिच्या डोक्यात चौकशीचं रक्त सळसळायला लागलं आणि त्यातला वाईट्ट प्रश्न म्हणजे "आई तुम्ही नाईट क्रीम सकाळी लावलंत का ? " मग मुकुल म्हणाला " नाही काई .आज्जी बसली टुबवर आणि मग .... खरं काय ते सांगणारंच होते तेव्हढ्यात महाराज आले . अहाहा काय ध्यान. चित्पावन संघाच्या सभेत मिळालेला केशरी टी शर्ट -शाखेत घालून जायची हाफ पँट..आणि बहीणीनी चार वर्षापूर्वी अमेरीकेतून पाठवलेले स्पोर्ट शूज ... आता यातली एकेक वस्तू म्हणजे यांचे एकेक उपक्रम .. खाकी हाफ पॅट म्हणजे त्यातल्या त्यात नविनच .ती पण एक मोठी कथाच ... ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मध्यंतरी कधीतरी एकदा सकाळी हे स्टेशनवर गेले होते. कुठलंतरी पथक काहीतरी मोहीम यशस्वी करून मुंबईत परत आलं होतं त्याच्या स्वागतासाठी. ह्यांच्याच भाषेत सांगायचं तर संकीर्ण उद्योग. पहाटे बाहेर पडले होते ते साडेसात आठला घरी परत आले. ह्यांचा चेहेरा वाचून मला कळलं की काहीतरी नविन संकीर्ण उद्योगाचा शोध लागला आहे ह्यांचे संकीर्ण उद्योग म्हटले की माझ्या डोक्याचा तवा हलके हलके गरम व्हायला लागतो. काही दिवसानी मोहरी तडतडावी इतका गरम होतो पण आताशा या उद्योगांकडे मी अगदी तटस्थ नजरेनी बघते. या उद्योगाचे खिळे स्क्रू बिजागर्‍या हळूहळू ढिल्या - मोकळ्या करत राहते. मग संकीर्ण उद्योग कोसळला तरी मी बापडी नामानिराळी. एकूण परीस्थितीचा अंदाज घेता चहा पिता पिता त्या उद्योगाची अधिकृत घोषणा कानावर पडणार आहे असा तर्क बांधला आणि अगदी तस्संच झालं. "तुला माहीत्ये अंजू आज सकाळी येताना मी काय पाह्यलं ?" मी श्वास छातीत पूर्ण भरून घेतला. बाबा टिव्हीवर सांगतात तसं माझं लक्ष कपाळाच्या मध्यभागी आणून म्हटलं "अहो मला कसं कळणार काय ते तुम्हीच सांगा ." श्वास सोडला आणि यांचं उत्तर ऐकण्यापूर्वी डब्ब्ल श्वास आत घेतला. "अगं -पडवळनगर मध्ये सकाळची शाखा चालू आहे." प्रकरण फारसं धोकादायक नसल्याचं माझ्या लक्षात आलं आणि मी फसक्न श्वास सोडला आणि म्हटलं "अहो काहीतरी काय शाखा काय सकाळी उघडत नाही. बाळासाहेब गेले त्याच आठवड्यात सकाळी उघडल्या असतील " आता यांचा चेहेरा जरा चमकायला लागला. मला म्हणाले "अगं सेनेची शाखा नाही गं .शाखा म्हणजे राष्टीय स्वयंसेवक संघ." आता माझ्या माहेरी सगळेच संघे.त्यामुळे मला काही फारसा धक्का बसला नाही पण हे शाखेत जाणार म्हणून जरा काळजी वाटायला लागली. हे तिकडे गेले की चारपाच तरी माणसं शाखेत येण्याची बंद होतील याची मला खात्री होती. फार वर्षांपूर्वी हे आमच्या कडे आले होते आणि यांची आणि माझ्या भावाची राजूची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल चर्चा चालू होती. त्याचं बोलून झाल्यावर ह्यांनी समाजवादावर बोलायला सुरुवात केली. नंतर संक्रांतीला गेले तेव्हा कळलं की राजू आता युक्रांदमध्ये गेलाय !!!! मी म्हटलं अहो हा सगळ्या तुमच्या चर्चेचा परीणाम.त्यावर हे म्हणाले मी कुठे युक्रांदचा सदस्य आहे. मला फक्त राजूच्या मनातला वैचारीक गोंधळ दूर करायचा होता म्हणून मी थोडीशी माहीती त्याला दिली. थोडक्यात काय तर इतर संकीर्ण उद्योगाप्रमाणे हा खटाटोप थोड्याच दिवसात आटपेल हे कळल्यावर माझा श्वास आपोआप नॉर्मल !!! बाबा म्हणतात ते खरंय .श्वास म्हणजे जीवन .जसे जीवन तसा श्वास . ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------त्या दिवशी बहुतेक मंगळवार होता. शुक्रवारी खाकी हाफ प्यांटी आणि पांढर्‍या शर्टाचे कडक घडीबंद जोड घरात आले. रात्री झोपण्यापूर्वी यांचे चिटोरी सर्वीस चालू होती. घरातल्या सगळ्यांच्या हातात हे अधून मधून बारीक सारीक चिठ्ठ्या देत असतात. म्हणजे माझा वाढदिवस असला तर माझ्या नकळत मकरंदच्या हातात एक चिटोरं : 'आईचा वाढदिवस २९ तारखेला आहे." मी विचारलं "काय हो आज कुणासाठी "? हे म्हणाले "माझ्यासाठीच" "म्हणजे काय ? "मी विचारलं " रविवारी कित्येक वर्षांनी शाखेत जाणार आहे म्हणून तयारी करतो आहे." असं म्हणत माझ्या हातात एक चिटोरं दिलं त्यावर लिहीलं होतं " केशरी गुहे समीप मत्त हत्ती चालला." मी म्हटलं अहो मोठ्यांच्या शाखेत काय हे गाणं म्हणतील का ? त्याला उत्तर म्हणून दुसरं चिटोरं भारता जागा रहा नविन संकीर्ण उद्योग जरा जडच जाणार हे माझ्या लक्षात आलं पण मी बापडी काय करणार होते ? उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून मी म्हटलं अहो तुम्हाला काही आठवतंय का आता ?आणि लक्षात आलं की आपलं चुकलंच गड्या . नंतर अर्धा तास सायं शाखा -प्रभात शाखा -प्रदोष शाखा आणि चर्म वेत्र -छुरीका -दंड ह्या विषयावर व्याख्यान. मी चार जांभया दिल्यावर यांच्या डोक्यात प्रकाश पडला .दिवे मालवून माझ्या शेजारी पडले आणि माझ्या गळ्यात हात घालून विचारतात कसे ? " मला अजूनही क्रमीका एक -दोन -तीन सगळं काही येतं ?आणि बळेच माझा चेहेरा स्वतःकडे वळवून म्हणाले "मग " " काय विचार आहे ?" मी म्हटलं "काही नाही .संघ विकीऱ." आणि पाठमोरी होतं झोपून गेले. जागरणाचा उत्साह माझ्यात काही शिल्लक नाही. ( क्रमशा )
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26823 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

वा!

नंदन
गुरुवार, 04/25/2013 - 11:32 नवीन
हे नुस्तं नाव वाचून. आता सावकाश घुटक्याघुटक्याने लेख वाचायचा.
  • Log in or register to post comments

+१११११११११११११. असेच म्हणतो.

बॅटमॅन
गुरुवार, 04/25/2013 - 11:49 नवीन
+१११११११११११११. असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

सूड
गुरुवार, 04/25/2013 - 11:53 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

बर्र्र वाचतोय..

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/25/2013 - 11:43 नवीन
बर्र्र वाचतोय.. पुढे काय होतय ते बघुया. अर्थात पुढचा भाग आला तर.
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
गुरुवार, 04/25/2013 - 11:48 नवीन
मस्त! तुम्हीच मागे लिहिलेले निवासी आईचे स्वगत आठवले.
आणि त्यातला वाईट्ट प्रश्न म्हणजे "आई तुम्ही नाईट क्रीम सकाळी लावलंत का ? "
ह्यांचे संकीर्ण उद्योग म्हटले की माझ्या डोक्याचा तवा हलके हलके गरम व्हायला लागतो. काही दिवसानी मोहरी तडतडावी इतका गरम होतो पण आताशा या उद्योगांकडे मी अगदी तटस्थ नजरेनी बघते. या उद्योगाचे खिळे स्क्रू बिजागर्‍या हळूहळू ढिल्या - मोकळ्या करत राहते.
हा खास समर्थ टच!
  • Log in or register to post comments

..वाचतेय.

कवितानागेश
गुरुवार, 04/25/2013 - 11:52 नवीन
..वाचतेय. :)
  • Log in or register to post comments

:)

पैसा
गुरुवार, 04/25/2013 - 12:01 नवीन
खासच! शेवटचं क्रमश: वाचून जीव भांड्यात पडला!
  • Log in or register to post comments

खास

लाल टोपी
गुरुवार, 04/25/2013 - 12:03 नवीन
रामदास काकांची शैली...मस्तच
  • Log in or register to post comments

मस्त.....

नन्दादीप
गुरुवार, 04/25/2013 - 12:10 नवीन
मस्त.....
  • Log in or register to post comments

दमदार

श्रावण मोडक
गुरुवार, 04/25/2013 - 12:43 नवीन
दमदार सुरवात झाली आहे.
  • Log in or register to post comments

मजेदार !

सस्नेह
गुरुवार, 04/25/2013 - 12:47 नवीन
मजेदार ! Image removed.
  • Log in or register to post comments

तुम्ही खरंच "समर्थ" आहात!!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/25/2013 - 13:34 नवीन
तुम्ही खरंच "समर्थ" आहात!!!
  • Log in or register to post comments

खासच...

मन१
गुरुवार, 04/25/2013 - 13:41 नवीन
ज्यासाठी मुद्दाम मिपावर यावं असं काहीतरी. पुभाप्र.
  • Log in or register to post comments

नावापासूनच

विसुनाना
गुरुवार, 04/25/2013 - 13:49 नवीन
कथेच्या नावापासूनच रामदास टच आहे. खुसखुशीत (असे म्हणायचे नाही असे ठरवूनही म्हणवे लगते )...तर खुसखुशीत विनोद. पुढेपुढे आणखी खुमासदार होवो ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

मजा आली

स्मिता.
गुरुवार, 04/25/2013 - 13:51 नवीन
मजा आली वाचतांना... आणि खालचं क्रमशः बघून बरं वाटलं.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
गुरुवार, 04/25/2013 - 13:59 नवीन
हेच बोल्तो ... पुढचा भाग येऊद्यात लवकर काकाश्री... - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

पूर्ण वाचू शकलो नाहीये....

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/25/2013 - 14:18 नवीन
=)) पूर्ण वाचू शकलो नाहीये.... निवांत बसून वाचेन!
  • Log in or register to post comments

सुम्दर नर्मविनोदी लेखन.

राही
गुरुवार, 04/25/2013 - 14:54 नवीन
सुम्दर नर्मविनोदी लेखन. गंगाधर गाडगिळांच्या 'कडू आणि गोड'(या लेखात कडू असे फारसे काही नाहीय म्हणा.) किंवा बंडूच्या कथांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

__/\__

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 04/25/2013 - 15:06 नवीन
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाण्याखेरीज काहीही करु शकत नाही, याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं.

आतिवास
गुरुवार, 04/25/2013 - 15:18 नवीन
लेखन आवडलं. "क्रमशः" आहे म्हणून तर जास्तच आवडलं :-)
  • Log in or register to post comments

व्वा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/25/2013 - 15:21 नवीन
झकास खुसखुशीत. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

किती आपल्या आयुष्यातलेच

स्पंदना
गुरुवार, 04/25/2013 - 16:14 नवीन
किती आपल्या आयुष्यातलेच वाटावे असे प्रसंग, किती साधे तरी किती भावपुर्ण. अगदी नात्याचे पिळे हळुवार उलगडत जातात तुमच्या लेखनशैलीने. सुरेख!
  • Log in or register to post comments

कडक

झकासराव
गुरुवार, 04/25/2013 - 16:48 नवीन
कडक :)
  • Log in or register to post comments

छानच.. पुढील भागाची वाट पाहणे

ऋषिकेश
गुरुवार, 04/25/2013 - 17:17 नवीन
छानच.. पुढील भागाची वाट पाहणे आले
  • Log in or register to post comments

सगळ्यात बेष्टः "क्रमश:"

आदूबाळ
गुरुवार, 04/25/2013 - 18:02 नवीन
सगळ्यात बेष्टः "क्रमश:" :)
  • Log in or register to post comments

आधी बिस्कीट जास्तच भिजलं आणि

शुचि
गुरुवार, 04/25/2013 - 18:12 नवीन
आधी बिस्कीट जास्तच भिजलं आणि कपाच्या तळाशी गेलं मग चहाच सांडला.
वा!!! मस्तच लेख वाचायला मजा येतेय. लवकर टाका.
  • Log in or register to post comments

सायं शाखा -प्रभात शाखा

रेवती
गुरुवार, 04/25/2013 - 18:24 नवीन
सायं शाखा -प्रभात शाखा -प्रदोष शाखा आणि चर्म वेत्र -छुरीका -दंड वा! मजा आहे वाचकांची. लेखन आवडले. तुमचे लेखन आवडल्याचा/नावडल्याचा स्पष्ट प्रतिसाद मी नेहमी देते आणि माझ्या पाकृंवर फक्त एक प्रश्न टाकून तुम्ही निघून जाता हे अनेक दिवसांपूर्वी लक्षात आले आहे.
  • Log in or register to post comments

सहीच.....वाचतोय

सुहास झेले
गुरुवार, 04/25/2013 - 18:47 नवीन
सहीच.....वाचतोय :) :)
  • Log in or register to post comments

निवृत्ती नाथांच्या कथा असं

किसन शिंदे
गुरुवार, 04/25/2013 - 20:35 नवीन
निवृत्ती नाथांच्या कथा असं शिर्षक वाचलं. :D काकूस हि गोष्ट तरी पुर्ण करणार का??
  • Log in or register to post comments

मस्तच....

प्राध्यापक
गुरुवार, 04/25/2013 - 20:39 नवीन
बर्‍याच दिवसांनी मिपावर काहीतरी चांगल वाचायला मिळाल्,रामदास काका आता दुसर्‍या भागाला जास्त वेळ लावु नका.
  • Log in or register to post comments

विंटरेस्टिंग.

गणपा
गुरुवार, 04/25/2013 - 21:01 नवीन
विंटरेस्टिंग.
  • Log in or register to post comments

आपल्याला दोन्ही रामदास आवडतात.

अर्धवटराव
गुरुवार, 04/25/2013 - 21:03 नवीन
तो सज्जनगड निवासी, आणि हा मिपानिवासी. आयुष्य सुंदर, मजेदार बनवायला दोघांचेही साहित्य मोलाचे :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

एकदम मनातले बोललात बघा..

मुक्त विहारि
गुरुवार, 04/25/2013 - 21:36 नवीन
हेच म्हणतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

वेळ काढुन अगदी शांतपणे

मदनबाण
गुरुवार, 04/25/2013 - 21:17 नवीन
वेळ काढुन अगदी शांतपणे आनंदाने वाचायचा धागा. :) आता तरी पुढच्या भागासाठी ताटकाळत ठेवु नका ! तो सॉफ्टवेअरवाल्यांचा पुढच्या भागाची अजुन वाट पाहतोच आहे...
  • Log in or register to post comments

आवडले...

मुक्त विहारि
गुरुवार, 04/25/2013 - 21:36 नवीन
पु.भा.प्र.
  • Log in or register to post comments

छान. संसाराला तीस-चाळीस वर्षं

राजेश घासकडवी
गुरुवार, 04/25/2013 - 21:50 नवीन
छान. संसाराला तीस-चाळीस वर्षं झाल्यानंतर नवऱ्याकडे बघण्याचा स्थितप्रज्ञ दृष्टिकोन सुंदर टिपला आहे. पुढे घडणाऱ्या सगळ्या खेळाची दिशा लय काय असणार हे तोपर्यंत माहित झालेलं असतं. त्या अंतिम ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत पोचण्यापूर्वी अंधारात चाचपडणं, धडपडणं, चिडचिडणंही झालेलं आहे या बाईचं, हेही नकळत सांगितलेलं आहे. नवऱ्याचं व्यक्तिचित्रण चालू असलं तरी तितक्याच प्रमाणात नरेटरीणबाईंचंही चाललं आहे.
  • Log in or register to post comments

When Peter talks about Paul,

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 04/25/2013 - 22:01 नवीन
When Peter talks about Paul, you learn a lot about Paul!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अंमळ

पैसा
गुरुवार, 04/25/2013 - 22:06 नवीन
गडबड झाली काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

तंग ऑफ स्लिप?

स्पंदना
Fri, 04/26/2013 - 07:16 नवीन
तंग ऑफ स्लिप? अग पैसाताई ते कुडकुडताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

ओ तायांनो! ते बरूबर

बिपिन कार्यकर्ते
Fri, 04/26/2013 - 08:04 नवीन
ओ तायांनो! ते बरूबर ल्हिल्यालं हाये! नीट वाचा.... आणि समजून घ्या! :) ... विंग्रजीतलं प्रसिद्ध वाक्य आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

न्हाय वो!

स्पंदना
Fri, 04/26/2013 - 08:08 नवीन
न्हाय वो! पी चा पॉ झालाय. :)) :)) (देवा ! हा नुसता योगायोग म्हणावा का काय?:| माझ्याच नशीबी हे उत्तर देण्याचा योग का म्हणुन लिहिला गेला?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

होय होय ते असं हवं ना - When

शुचि
Fri, 04/26/2013 - 21:13 नवीन
होय होय ते असं हवं ना - When Peter talks about Paul, you learn a lot about Peter!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

+१

मुक्तसुनीत
गुरुवार, 05/09/2013 - 04:12 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

आवडले....

काकाकाकू
गुरुवार, 04/25/2013 - 21:53 नवीन
आधी घाईत निवृत्ती नाथांच्या कथा असे वाचले....पण नंतर नीट सविस्तर वाचले. पुढिल भागाची वाट आम्ही दोघे पहात आहोत.
  • Log in or register to post comments

हे वाचल्यावर परत एकदा

काकाकाकू
Fri, 04/26/2013 - 00:28 नवीन
शिर्षक वाचलं मी पण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काकाकाकू

मी अगोदर शीर्षक वाचलं तेव्हा

सूड
गुरुवार, 04/25/2013 - 22:16 नवीन
मी अगोदर शीर्षक वाचलं तेव्हा 'निवृत्तीनाथांच्या कथा असं लिहाचंय का तुम्हाला' असा (खवचट) प्रश्न विचारायला सरसावलो. पण म्हणलं लेखक कोणाय बघू. लेखकाचं नाव वाचल्यानंतर म्हणलं ही स्पेलिंग मिस्टेक असणं शक्यच नाही आणि मग मात्र धागा उघडल्याचं सार्थक झालं, नेहमीप्रमाणेच !! ;)
  • Log in or register to post comments

आता आणखी तहान लागली, लवकर येऊ द्यात पुढचे भागही.

बहुगुणी
गुरुवार, 04/25/2013 - 22:47 नवीन
(परकायाप्रवेशाची अफाट ताकद आहे या माणसात, लेखनशैलीला पुन्हा एकदा सलाम!)
  • Log in or register to post comments

परवाच

श्रावण मोडक
गुरुवार, 04/25/2013 - 23:54 नवीन
परवाच, रामदासांच्या काही कथा वाचत होतो. पूर्वीच्या. इथंच प्रसिद्ध झालेल्या. अचानक वाटून गेलं, हा माणूस लिहायचा का थांबलाय... त्यांना विचारायचं ठरवलं, आणि ही कथा आली. साला... असं सारखं वाटत रहावं. असं वाटलं त्याचं कारण असलेली कथा, गडबोले आणि का रे, ऐसी माया....
  • Log in or register to post comments

मला पण तुमच्या लिखाणाबद्दल

बांवरे
Fri, 04/26/2013 - 00:16 नवीन
मला पण तुमच्या लिखाणाबद्दल हेच्च वाटतं ओ ! पण साला काही येतच नै नवीन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

सुरूवात आवडली !

बांवरे
Fri, 04/26/2013 - 00:15 नवीन
सुरूवात आवडली ! पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा