क्रिस गेलाख्यान.
लेखनविषय:
कळायचे बंदचि होत पूर्ण
क्रिस् गेल कालासम कृष्णवर्ण
केले तयें बॉलर हो विवर्ण
ब्याटिंग त्याची पुरते सुवर्ण
आहेत साचे जरि लोक फार
आय्पीलची कीर्त पहा अपार
त्यातेहि हातोडिमाणूस येक
क्रिस गेल आख्यान सांगेन येक
पुण्यासवे खेळले बंगळूर
ब्याटिंग घेई, रन काढि फार
मिसाइले वर्षती जैं अपार
छक्के तसे मारितो फारफार
मारोनिया सिक्सर सर्व ग्रौंडी
केली तये फिल्डरें कानकोंडी
मागेपुढे ऑफ व ऑन बौंड्री
लोकांचिया गेलचि नाम तोंडी
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
पळे कधी जास्त न तो फुकाचा
त्यासाठी हा सिक्सरू खेळ साचा
जो ऐंशि वा शंभर मीटरांचा
आरंभि इब्राहिमखान जैसा
जो गारद्यां मारि पहा अपैसा
तैं गेलने तीस चेंडूंत फक्त
हो ठोकली सेंचुरी पूर्ण सक्त
त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस
यासाठिची जी षटकेहि वीस
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मारे पहा एकटा गेल खवीस
वन्डे असो वा विस ओव्हरींचे
पैं शॉट याचे बहुता परींचे
फाष्टर् असो वा स्पिनही असो तो
चेंडू सदाचा नभि धाडतो तो
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
तैं प्रेक्षकू होतसे फील्डराचा
कंपौंडमागोनि घेवोनि कॅचां
हो फील्डरू होतसे प्रेक्षकाचा
सचिन जिमि शतक पर |
मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर |
त्यों तडीपार सिक्सर पर |
क्रिस गेल राज है ||
वाचने
5273
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
जोरदार बॅटिंग रे बॅट मॅना! बाकी २०/२० मधे कधीतरी डबल शेंच्युरी गेल नावाचे वादळच करील!
In reply to मस्त! by पैसा
:)
होय, हे फक्त तो गेलच करू शकेल, अजून कुणाच्या बसची बात ही नाही. केशवसुत म्हणतात त्याप्रमाणे गेलही म्हणतो:
"फटक्यास माझ्या कुंपण पडणे मला न साहे | तेच पतित की, आखडिती प्रदेश फटक्याचा |" :)
खुपच छन....
तेथे कुणाचे चालेना..
गेल हा मनुष्यप्राणी नाही.....हा बहुतेक मागच्या जन्मीचा महाबली भिम आणी हिडींबेचा पुत्र घटत्कोच असावा.अक्षरशः बोलर्सची कत्तल करतो हा प्राणी....
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मारे पहा एकटा गेल खवीस>>>
तु ही आज ब्याट-म्यान करणार नाहिस बहुतेक ;-)
तु ही आज ब्याट-म्यान करणार नाहिस बहुतेक ;-)समयोचित.. आवडलं!
भारी लिहिलय की. मजा आली वाचायला. :)
त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस यासाठिची जी षटकेहि वीस त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीसकडक!
__/\__ लै भारी रे बॅट्या.. मान गये.
In reply to __/\__ लै भारी रे बॅट्या.. by गणामास्तर
+१
खल्ल्लास आहे ! ! ! ! !
खत्त्त्तरनाक !
भारी आहात आपण.
मस्त रे!
:-)
मस्त !!
काव्यरसाचा पण कडक शॉट! (वाचता वाचता वाटत होतं की एखाद कडव्याच्या शेवटि गा का पा असतं नं तसं येईल, पण नाही आलं) यावरून अर्धवटरावांची (पेटवी लंका हनुमंत) आठवली.
In reply to सही! by सुधीर
कवितेच्या दुव्याबद्दल बहुत धन्यवाद :) खत्तरनाक कविता आहे एकदम!!!
लै भारी... एकदम खतरनाक :) :)
बॅमॅ - दंडवत स्विकारा...
ख्रिस गेलने हाणले मणामणाने,
प्रसवले शीघ्रकाव्य ब्याटमणाने...
(गुस्ताखी माफ असावी)
हा हा हा.. भारीच लिव्हलय.. कविता आवडत नाही की कळत नाहीत पण क्रिकेटचे वेड या धाग्यात खेचून घेऊन आले..
मस्त!!
साधु साधु !!!!
हे तूच करू जाणेस रे बाबा.
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस मारे पहा एकटा गेल खवीस:)) १० कडव्यांतून १० षटकार लगावलेत की तुम्ही सुद्धा... बेष्टच...
जबरदस्त म्हणजे एकदमच जबरदस्त.. बॅट्समॅन गेल और बॅटमॅन, तुस्सी ग्रेट हो :)
आवडलं (हे आपलं तू कंपूत म्हणून )
बाकी कोण गेल?
- धन्यवाद
कहर.... लईच झ्याक !
सचिन जिमि शतक पर |
मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर |
हे लई म्हणजे लईच भारी!
जे.पी.
:D :D
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
तैं प्रेक्षकू होतसे फील्डराचा
कंपौंडमागोनि घेवोनि कॅचां
हो फील्डरू होतसे प्रेक्षकाचा
भारी :)
जबराट लिवलया!
बॅट्समॅन गेल आणी बॅटमॅन.....कहर आहेत दोघेही.
बॅटमॅना ___/\____ स्विकारावा.
कालच्या सामन्यात जे घडले त्यामुळे पुण्याचे नाव आता क्रिकेट खेळल्या अन बघितल्या जाणार्या सर्व लोकांना कायमचे लक्षात राहिल एवढे मात्र नक्की.. ;)
बाकी कवितेतील,
त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस
यासाठिची जी षटकेहि वीस
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मारे पहा एकटा गेल खवीस
हे कडवे खासच.. :)
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार :)
सुंदर रचना ! :)
मी देखील एक तोडका-मोडका प्रयत्न करुन पाहतो...
कैसे करावे ते वर्णन
राज्यात असता आवर्षण
क्रिकेट पाहुने सर्व जन
म्हणे फलंदाजीत गुंतले मन
हा हा काय म्हणावे
कोणी कोणास सांगावे
दुष्काळी राज्यास लागले
कैसे हे व्यसन भलते
लोक तिन्ही दिशेस भटकती
तरी जला अभावी प्राण ठेवती
त्याच राज्यी ही चालली
मौज भलतीच पाहिली
नसता चाड मनास
कैसे भान जनास
खेळ चालला हा मुजोर
हा तर पैशाचा माज फार...
बाण म्हणे सकल जनास
विचारावे अंतरीच्या मनास
काय उत्तर मिळते
शोधुन ते जरी पहावे.
In reply to सुंदर रचना ! by मदनबाण
बाणाख्यान आवडले!
In reply to सुंदर रचना ! by मदनबाण
धन्यवाद :)
बाणाख्यान आवडले हेवेसांनल :)
एक नंबर रे ब्याम्या. :)
या शिघ्रकाव्याबद्दल दंडवत घ्यावा.
_/\_
सचिन जिमि शतक पर | मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर | त्यों तडीपार सिक्सर पर | क्रिस गेल राज है ||कविता वाचोण भूषण कवी आनंदिले असतील वर
बॅटींग ही आवडली आणि कविताही, खरच खुपच छान !
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मारे पहा एकटा गेल खवीस
बॅटींग बघुन डोळ्यांचे पारणे फिटले व कविता वाचुन मनाचे.... !!
जबरी गेलाख्यान !
क्रिकेट पाहीला नाही पण काव्य जबरदस्त झाले आहे.
यूट्यूबवर आहे का ही इनींग..?
बाकी ब्याम्या.. तोडलंस लेका!!!
मस्त!