कळायचे बंदचि होत पूर्ण
क्रिस् गेल कालासम कृष्णवर्ण
केले तयें बॉलर हो विवर्ण
ब्याटिंग त्याची पुरते सुवर्ण
आहेत साचे जरि लोक फार
आय्पीलची कीर्त पहा अपार
त्यातेहि हातोडिमाणूस येक
क्रिस गेल आख्यान सांगेन येक
पुण्यासवे खेळले बंगळूर
ब्याटिंग घेई, रन काढि फार
मिसाइले वर्षती जैं अपार
छक्के तसे मारितो फारफार
मारोनिया सिक्सर सर्व ग्रौंडी
केली तये फिल्डरें कानकोंडी
मागेपुढे ऑफ व ऑन बौंड्री
लोकांचिया गेलचि नाम तोंडी
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
पळे कधी जास्त न तो फुकाचा
त्यासाठी हा सिक्सरू खेळ साचा
जो ऐंशि वा शंभर मीटरांचा
आरंभि इब्राहिमखान जैसा
जो गारद्यां मारि पहा अपैसा
तैं गेलने तीस चेंडूंत फक्त
हो ठोकली सेंचुरी पूर्ण सक्त
त्रेसष्ट धावा - द्वि-शतां रनांस
यासाठिची जी षटकेहि वीस
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मारे पहा एकटा गेल खवीस
वन्डे असो वा विस ओव्हरींचे
पैं शॉट याचे बहुता परींचे
फाष्टर् असो वा स्पिनही असो तो
चेंडू सदाचा नभि धाडतो तो
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
तैं प्रेक्षकू होतसे फील्डराचा
कंपौंडमागोनि घेवोनि कॅचां
हो फील्डरू होतसे प्रेक्षकाचा
सचिन जिमि शतक पर |
मॅक्ग्राथ मिडल स्टंप पर |
त्यों तडीपार सिक्सर पर |
क्रिस गेल राज है ||
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5281
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
होय, हे फक्त तो गेलच करू शकेल
In reply to मस्त! by पैसा
खुपच छन....
आले गेल च्या मना...
गेल हा मनुष्यप्राणी नाही.....
त्यांतेही दोनशे उणे पंचवीस
मस्तच..
भारी लिहिलय की. मजा आली
_/\_
__/\__ लै भारी रे बॅट्या..
+१
In reply to __/\__ लै भारी रे बॅट्या.. by गणामास्तर
खल्ल्लास आहे ! ! ! ! !
मस्त रे!
:-)
मस्त !!
सही!
कवितेच्या दुव्याबद्दल बहुत
In reply to सही! by सुधीर
लै भारी... एकदम खतरनाक
वाह
हा हा हा.. भारीच लिव्हलय..
मस्त!!
साधु साधु !!!!
वा बॅट्समॅन हो...
जबरदस्त म्हणजे एकदमच जबरदस्त.
आवडलं (हे आपलं तू कंपूत
_/\_
(No subject)
ब्याटिंग जेव्हा करि गेल साचा
छान
___/\____
कालच्या सामन्यात जे घडले
सर्व प्रतिसादकांचे मनापासून
सुंदर रचना !
आवडले
In reply to सुंदर रचना ! by मदनबाण
धन्यवाद
In reply to सुंदर रचना ! by मदनबाण
एक नंबर रे ब्याम्या.
या शिघ्रकाव्याबद्दल दंडवत
सचिन जिमि शतक पर |
बॅटींग ही आवडली आणि कविताही,
जबरी गेलाख्यान !
क्रिकेट पाहीला नाही पण काव्य
यूट्यूबवर आहे का ही इनींग..?