नमस्कार,
अबोली नावाचा नवा विभाग मिपावर सुरू करायचे ठरले. पाडव्याला याची घोषणा झाली. आता एवढ्यात हा विभाग सुरू होईल.
अपेक्षेप्रमाणे मिपावर याबाबतीत उलटसुलट चर्चा सुरू झाली. मिपावर काही एक नवीन होतंय तर त्यावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया अपेक्षीत आहेत. काहींना हा विभाग आवडला तर काहींना अजिबात नाही आवडला. काहींनी आपला संबंधच नाही त्यामुळे कोरड्या शुभकामना दिल्यात तर काहींनी विभाग कधी सुरू होतो अशी चौकशीसुध्दा केली. मात्र काही लोकांच्या प्रतिक्रिया जरा मर्यादा सोडलेल्या वाटल्या त्याचे वाईट वाटले. आता त्याचे कारण काय? याच्या खोलात जायला नको. मात्र तरीही काही विचार या निमीत्ताने मांडायचे आहेत.
मिपावर स्त्रीयांना त्यांच्या विषयावर बोलायला तेवढे मोकळे वातावरण नाही असा काहींचा सुर होता. मला असं म्हणायचं होतं की विषय जसा असेल तसा मिपाकर प्रतिसाद देतात. उत्तम विषय असला तर डोक्यावर घेतील आणि नाहीच पटलं तर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा' देऊन चेष्टा करतील. मिपाची प्रकृती अशीच आहे. मात्र तरी प्रश्न त्यांचा उरतोच, की आमच्या रोजच्या आयुष्यात असं खुप काही असतं जे आमच्यासाठी खुप महत्वाचं असतं मात्र पुरूषांसाठी त्याची काहीच किंमत नसते. किंवा असे काही विषय आहेत की ज्यावर पुरूषांनी बोलणे सुध्दा अपेक्षीत नसते. मात्र मुख्य बोर्डावर अशी सुचना तर देऊ शकत नाही ना, की यावर केवळ निमंत्रीतांनीच बोलणे अपेक्षीत आहे... हे शक्य नाही... मात्र एक शक्य आहे की एक असा कप्पा तयार करता येऊ शकतो जेथे अश्या विषयांवर चर्चा होऊ शकते. अन्य लोकांना या भागात प्रवेश नसेल, कारण हे चर्चा विषय त्यांच्यासाठी नसतील, त्यांना ज्या विषयांशी संबंध नाही किंवा चर्चेत केवळ टर उडवायच्या शिवाय ज्यांना सहभाग देता येणार नाही त्यांना धागा अवांतरात नेण्याची मुभा नको. ह्या एका साध्या विचारावर हा विभाग आहे.
मात्र काल परवा उत्साहात निघालेल्या धाग्यांत जे तारे तोडल्यागेलेत ते वाईट वाटावेत असेच आहेत. त्यात असा विभाग काढायला नको होता इतपत बोलणे किंवा मतप्रदर्शन ठिक आहे, मात्र ज्या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाचा निषेध करावासा वाटत असेल त्या संकेतस्थळावर आपण येऊच नये ना ! तसे मात्र नाही, येथे यायचे आणि उगाच राळ उडवत रहायची असा प्रकार हा आहे. मिपा व्यवस्थापन चालवून घेतय... मऊ लागतंय... असा प्रकार हा वाटतोय. मी कधी नव्हे तर एवढा कठोर बोलतोय मात्र यासाठी झालेला वैताग एवढा आहे की असं बोलावं लागतंय.
त्यानंतर ह्या विभागात काहीही गुप्त राहणार नाही असा प्रचार चालला आहे. खरं तर ह्या विभागात गुप्त राहण्यासारखे काहीच नसेल. ह्या विभागात 'त्यांना' वाचनमात्र ठेवावे ज्यांना या विषयात सामान्यतः रस नसतो म्हणून वेगळा विभाग, मग केवळ वाचनमात्रच न ठेवता प्रवेशच नको असा विचार केला. यात अगदी लिंगाधारीत अन्याय कारक रचना वगैरे असे काही नाही. आणि स्त्री- पुरूष समानतेचाही असा काही विचार आवश्यक नाही. कारण ह्या सरळ्या स्त्रीया मुख्य बोर्डावर लिहीणार आहेतच. त्यामुळे हा विभाग हॅक करून दाखवण्याच्या गप्पा करने सर्वथा अनाठाई आहे. स्त्रीयांच्या विशेष विभागात पुरूषांनी येऊ नये असा संकेत आपण ठरवतोय. याउप्पर कुणी घुसखोरी केलीच तर त्या विकृतीला आपण काय म्हणावं ? त्यामुळे ह्या विभागात काय चालतंय याच्याशी अन्य लोकांना काहीही रस असू नये. काही चुकीचं होणार नाही , वातावरण उत्तम रहावं यासाठी संपादक आहेत ते काळजी घेतील. या विभागाबाबत ज्यांना आपला विरोध नोंदवायचा आहे ते मला व्यनि करू शकतात. त्यामुळे माझ्या काही जवळच्या मित्रांना विनंती आहे की काळजी करू नका असा विभाग निघाल्यामुळे काही लागलीच जगबुडी होणार नाही.
ह्याच चर्चेत काही अश्या प्रकारची कागाळी झाली आहे की ज्याने संपादकांना बडवे वगैरे उपमा देण्यात आली आणि त्याला एका राजकीय उल्लेखाचा संदर्भ दिल्याने ते नकारात्मक उद्द्येशाने बडवे बोलल्यासारखे होते. हे अत्यंत चुकीचे आहे. आणि अजिबात मान्य नाही. संपादक आपल्यातीलच एक आहेत. आपला वेळ ते आपल्या मिपासाठी देतात. त्यांच्या कष्टांची कल्पना मला पुर्णपणे आहे. त्यामुळे त्या कमेंटवर व्यवस्थापन कारवाई तर करेलच मात्र अन्य सर्व सदस्यांना पुन्हा एकदा सुचना देतो की संपादकांविषयी काहीही बोललेलं खपवून घेणार नाही.
काही लोक कायम मिपावर येतात ते मिपाविषयी, मिपा व्यवस्थापना विषयी वाईट बोलायलाच येतात असे दिसते. कारण चांगल्या चर्चांत यांचा सहभाग नसतो. चांगले लेख यांना लिहीता येत नाही. मात्र नावे ठेवायलाच हे येतात असे दिसते. अश्या लोकांना सुधारण्यासाठी बराच वेळ दिलेला आहे. यापुढे खरडवहीत सुध्दा चुकीचे लिहीलेले आढळले तर अश्या लोकांवर कारवाई केली जाईल.
शेवटी पुन्हा एकदा सर्व सदस्यांना आवाहन आहे की मिपा व्यवस्थापन जे करते त्याबाबत चर्चा करण्याची आपले मत प्रदर्शन करण्याची सर्वांना मुभा आहे. मात्र मिपाचं वातावरण आपल्या लिहीण्याने गढूळ होत असेल तर असे लेखन जाहीर न करता मला व्यक्तिगत निरोप पाठवा. माझ्याशी चर्चा करा. मुख्य बोर्डावर निषेधाचे धागे, हॅक करण्याची आव्हाने आणि संपादकांना नकारात्मक पदव्या का म्हणून सहन कराव्यात?
मिपा आपलं आहे, ते सकारात्मक पुढे नेऊया. त्यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षीत आहे.
- नीलकांत
वाचने
19713
प्रतिक्रिया
127
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार करण्यायोग्य...
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार
माझ म्हणन- अश्या घडलेल्या
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार
ऑ ??
In reply to माझ म्हणन- अश्या घडलेल्या by स्पंदना
स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी
In reply to ऑ ?? by परिकथेतील राजकुमार
अरे काय चालु आहे ?
In reply to स्त्रीयांना मोकळे होण्यासाठी by कवितानागेश
पश्चिम युरोप आणि उत्तर रशिया
In reply to अरे काय चालु आहे ? by परिकथेतील राजकुमार
श्या !
In reply to पश्चिम युरोप आणि उत्तर रशिया by कवितानागेश
मस्त प्रतिसाद आणि चपखल उदाहरण
In reply to पश्चिम युरोप आणि उत्तर रशिया by कवितानागेश
पर्या तु म्हण्ला हूतास ना ..
In reply to ऑ ?? by परिकथेतील राजकुमार
पॉइ॑टाचा मुद्दा
In reply to खरेतर ह्या विषयावरती एक अक्षर by परिकथेतील राजकुमार
असे लोक
In reply to पॉइ॑टाचा मुद्दा by किणकिनाट
पैसा ताई, कसे पकडणार हो? समजा
In reply to असे लोक by पैसा
लिहिण्यातला फरक
In reply to पैसा ताई, कसे पकडणार हो? समजा by विश्वनाथ मेहेंदळे
पैसाताई, प्रणाम,
In reply to लिहिण्यातला फरक by पैसा
तारतम्य
In reply to पैसा ताई, कसे पकडणार हो? समजा by विश्वनाथ मेहेंदळे
+१
In reply to तारतम्य by श्रावण मोडक
(No subject)
In reply to तारतम्य by श्रावण मोडक
त्यामुळं 'बालीश बहु 'बडबडणे''
In reply to तारतम्य by श्रावण मोडक
भावना पोचल्या.
In reply to तारतम्य by श्रावण मोडक
मुळात अश्या वेगळ्या दालनाची
या विभागाबद्दल स्त्रिया अन
In reply to मुळात अश्या वेगळ्या दालनाची by कवितानागेश
ऑ?
In reply to या विभागाबद्दल स्त्रिया अन by अग्निकोल्हा
तो कोणत्या लॉजिकने काढला असेल
In reply to ऑ? by पिशी अबोली
माझा या विभागाला विरोध नाही
In reply to तो कोणत्या लॉजिकने काढला असेल by अग्निकोल्हा
(No subject)
In reply to माझा या विभागाला विरोध नाही by मस्त कलंदर
वाक्या वाक्याशी सहमत.
In reply to माझा या विभागाला विरोध नाही by मस्त कलंदर
एका आयडीने जे लिहिलं, त्याचं
In reply to वाक्या वाक्याशी सहमत. by अग्निकोल्हा
:) गफलत होतेय का ?
In reply to एका आयडीने जे लिहिलं, त्याचं by मस्त कलंदर
मग स्वतःशीच व्यनी-मनीच्या
In reply to :) गफलत होतेय का ? by अग्निकोल्हा
मग स्वतःशीच व्यनी-मनीच्या
In reply to मग स्वतःशीच व्यनी-मनीच्या by मस्त कलंदर
बास करा की लेको आता.
+१
In reply to बास करा की लेको आता. by गणपा
+१
In reply to बास करा की लेको आता. by गणपा
बास कि आता
अबोली पूजा.... खिक्क!
In reply to बास कि आता by जेनी...
अबोली
ज्या उदात्त भावनेने हा विभाग
In reply to अबोली by नीलकांत
अजिबात हरकत नाही
In reply to ज्या उदात्त भावनेने हा विभाग by मस्त कलंदर
माझ्या कडुन पण १
In reply to ज्या उदात्त भावनेने हा विभाग by मस्त कलंदर
स्वच्छंदी समर्पक आहे!
In reply to ज्या उदात्त भावनेने हा विभाग by मस्त कलंदर
दामिनी किंवा सौदामिनी नाव
ह्म्म ... नाव नको अबोली ..
In reply to दामिनी किंवा सौदामिनी नाव by निनाद मुक्काम …
मुक्ता.
'मुक्ता'ला अनुमोदन
In reply to मुक्ता. by प्रभाकर पेठकर
प्रतिसाद कोणत्या धोरणात बसला
मी वाचला होता तुमचा प्रतिसाद
In reply to प्रतिसाद कोणत्या धोरणात बसला by लंबूटांग
म्हणून प्रतिसाद उडवणे ग्राह्य ठरत नाही.
In reply to मी वाचला होता तुमचा प्रतिसाद by जेनी...
निर्भया
अवकाश
या धाग्यावरचे काही प्रतिसाद
या धाग्यावरचे काही प्रतिसाद
In reply to या धाग्यावरचे काही प्रतिसाद by आतिवास
अपर्णाताई, आपण एकच गोष्ट
In reply to या धाग्यावरचे काही प्रतिसाद by स्पंदना
हे सगळं वाचून आता संपादिका
हे राम.
मला ह्या धाग्यावर संपादिकांचे
नीलकांता.. तुझ्या सगळ्या
धन्यवाद तात्या
In reply to नीलकांता.. तुझ्या सगळ्या by विसोबा खेचर