Skip to main content

स्वप्नांची शाळा

लेखक राजा सोव्नी यांनी रविवार, 21/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नांच्या शाळेत झालो मी भरती ,झालो ससाणा पोचलो ढगा वरती, दिसला ससा धरती वरी ,झेप घेतली त्यावरी, ससा झाला कावरा बावरा,माझा झाला बैजूबावरा , घेऊ लागलो तान-लकेर ,क्षणात झालो मी फकिर , दुसऱ्या क्षणी होतो मी राजा,वाजू लागला सनई-बाजा, झालो मी राजाचा रंक ,कधी झालो येसाजी कंक , आला हाती दाणपट्टा माझ्या ,चिरू लागलो ताज्या भाज्या, मौजेची ती स्वप्ने पडती ,स्वप्नात माझ्या झाडे उडती, गजर झाला जाग मला आली ,स्वप्नांच्या शाळेची सुट्टी झाली .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1740
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ताज्या भाज्या चिरायला दाणपट्टा ?