पाचोळा माझाच पेटला
झळा लागुनी दग्ध विशाखा
अंगावर जळली पाने पण
आत अबाधित बहर अनोखा
ना सूडाचा लेश तसूही
ना रिपुकांचा जंगम विळखा
डाव मांडला ऋतुचक्राचा
ना कोणी मज आपला परका
कुणी न माझा असो तरीही
"मी" माझ्यातिल उत्कट झोका
पवनाचे हुंकार झेलतो
जरी कधी असतो तो धोका
.........................अज्ञात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2054
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
व्वाह!
खरच उत्कट अभिव्यक्ती.
आवडली
>>>ना सूडाचा लेश तसूही
फक्त... सलाम सलाम आणी सलाम !
कविता आवडली
वा वा सुरेख कल्पना अन काव्यही
पाचोळा माझाच पेटला
व्वा इंदुसुता, उत्तम विवेचन
In reply to पाचोळा माझाच पेटला by इन्दुसुता
आहा! आवडली रचना.
सर्वांचेच मनापासून आभार.