Skip to main content

वृक्षारव

लेखक अज्ञातकुल यांनी शुक्रवार, 12/04/2013 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाचोळा माझाच पेटला झळा लागुनी दग्ध विशाखा अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा ना सूडाचा लेश तसूही ना रिपुकांचा जंगम विळखा डाव मांडला ऋतुचक्राचा ना कोणी मज आपला परका कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोका पवनाचे हुंकार झेलतो जरी कधी असतो तो धोका .........................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2054
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

सुंदर :)
अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा
आणि
कुणी न माझा असो तरीही "मी" माझ्यातिल उत्कट झोका
अतिशय सुरेख!

चांगली आहे. आवडली.

>>>ना सूडाचा लेश तसूही ना रिपुकांचा जंगम विळखा डाव मांडला ऋतुचक्राचा ना कोणी मज आपला परका सुरेख. संन्यस्त वृक्ष! माणसानं शिकण्यासारखं काही.

पाचोळा माझाच पेटला झळा लागुनी दग्ध विशाखा
परिस्थितीचे सत्य मान्य केले आहे या वृक्षामहानी !
डाव मांडला ऋतुचक्राचा
ह्याची जाणीव सुध्दा आहे आणि म्हणूनच कदाचित
ना सूडाचा लेश तसूही
आहे
पवनाचे हुंकार झेलतो
हे जबरदस्त आवडले ...ह्यातून जो दुर्दम्य आत्मविश्वास ध्वनित होतो, तो फार आवडला, त्याचे कारणही तसेच आहे म्हणा,
अंगावर जळली पाने पण आत अबाधित बहर अनोखा
हे त्याला फक्त माहितीच नाही तर याची त्याला खात्री आहे.