राम राम मिपाकर मराठीजनहो!
आत्ताच कानी आलेल्या बातमीनुसार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आता दि ७ ऑक्टोबर पर्यंत दादर कोर्टाने पत्रकार परिषद घेण्यासही बंदी घातली आहे! भाषणबंदी तर त्यांच्यावर या आधीच घालण्यात आलेली आहे!
परंतु आता पत्रकार परिषद घेण्यावरही बंदी?? मिपावर कुणी कायदेतज्ञ असल्यास याचे स्पष्टीकरण देऊ शकेल काय?
नुकतीच जया बच्चन यांनी एका जाहीर कार्यक्रमात मराठी माणसांची, महाराष्ट्राची अन् मराठी भाषेची अत्यंत छद्मीपणे आणि कुत्सितपणे जाहीर टिंगलटवाळी केली, रेवडी उडवली त्याबद्दल जया बच्चन यांच्यावर कोणतीच कायदेशीर कार्यवाही नाही आणि राज ठाकरेंवर मात्र पत्रकार परिषद घेण्यावरही लगेच बंदी??
मला याची पूर्ण कल्पना आहे की न्यायव्यवस्थेचा आदर हा सर्वांनीच केला पाहिजे, परंतु तरीही असा प्रश्न मनात येतो की सरकारने न्यायव्यवस्थेचा सहारा घेऊन राज ठाकरेंची केलेली ही मुस्कटदाबीच नव्हे काय? स्वत:च्या भूमीवर - स्वत:च्या माणसांची, स्वत:च्या मायबोलीची, स्वत:च्या मराठी अस्मितेची बाजू मांडणार्या माणसाला कायद्याचा बडगा दाखवून बोलूही द्यायचे नाही हा अस्मिताहीन राज्यसरकारचा निर्णंय अत्यंत अन्यायकारक आहे, संतापजनक आहे आणि निषेधात्मक आहे!
तात्या.
वाचने
5239
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
तात्या एकदम सहमत....
सहमत
याचा अर्थ एकच..
+१००
In reply to याचा अर्थ एकच.. by एक
सहमत......
+१००
एखादा
च्या मारी
सरकारचा धिक्कार