गुढीपाडवा सण पहिला ।
गुढी उभारुन साजरा केला ।
नविन वार्षास प्रारंभ झाला ।
ये श्री दत्ता ये ये ॥
दुसरा सण व्यासपौर्णिमा ।
सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा ।
त्रीजगती नाही उपमा ।
ये श्री दत्ता ये ये ॥
तिसरा सण पंचमी आली ।
नागराजाची पुजा ही केली ।
झोका खेळाया जमल्या मुली ।
ये श्री दत्ता ये ये ॥
चौथा सण रक्षाबंधन ।
भाऊरायाला राखी बांधीन ।
आई बाबांना प्रथम वंदन ।
ये श्री दत्ता ये ये ॥
पाचवा सण गोपाळ काला
गोप्गोपींचा मेळा जमला
हांडी फोडण्या त्वरे निघाला
ये श्री दत्ता ये ये ॥
सहावा सण श्रावण पोळा ।
बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा ।
शेतकरीदादाला आनंद झाला ।
ये श्री दत्ता ये ये ॥
सातवा सण गणेश चतुर्थि ।
स्थापना करुन श्रींची मुर्ती ।
सकाळ संध्याकाळ गाऊ आरती ।
ये श्री दत्ता ये ये ॥
आठवा सण पित्तर पाठ ।
पंचपक्वानांच करुन ताट ।
स्वर्गीच्या पितरांची पाहूया वाट ।
ये श्री दत्ता ये ये ॥
नववा सण दसरा आला ।
लहान थोरंना आनंद झाला ।
सोने वाटुन साजरा केला ।
ये श्री दत्ता ये ये ॥
दहावा सण आली दिवाळी ।
दारात काढून छान रांगोळी ।
दिप लाऊन रोज ओवाळी ।
ये श्री दत्ता ये ये ॥
अकरावा सण दत्तजयंती ।
काय वर्णावी त्याची महंती ।
स्मरण मात्रे अवगुण जाती ।
ये श्री दत्ता ये ये ॥
बारावा सण आली ही होळी ।
समस्तांचे अवगुण जाळी ।
नैवेद केला पुरणपोळी ।
ये श्री दत्ता ये ये ॥
असे आपुले विविध सण ।
भारतमातेची वाढवी शान ।
पाळणा लिहीतो कवी भगवान ।
ये श्री दत्ता ये ये ॥
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1746
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो पण पाळण्यात जोजवतात ना
+ १ टू शुचि
चचा तुझ्या नव्या बारश्याचा एक
In reply to + १ टू शुचि by लीलाधर
देवाला जोजवायच नसतं; देवाला
हे पाळणे कृपया पहावे.
In reply to देवाला जोजवायच नसतं; देवाला by Bhagwanta Wayal