Skip to main content

पाळ्णा

लेखक Bhagwanta Wayal यांनी गुरुवार, 11/04/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडवा सण पहिला । गुढी उभारुन साजरा केला । नविन वार्षास प्रारंभ झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ दुसरा सण व्यासपौर्णिमा । सद्गुरु स्वारीचा गाऊ महिमा । त्रीजगती नाही उपमा । ये श्री दत्ता ये ये ॥ तिसरा सण पंचमी आली । नागराजाची पुजा ही केली । झोका खेळाया जमल्या मुली । ये श्री दत्ता ये ये ॥ चौथा सण रक्षाबंधन । भाऊरायाला राखी बांधीन । आई बाबांना प्रथम वंदन । ये श्री दत्ता ये ये ॥ पाचवा सण गोपाळ काला गोप्गोपींचा मेळा जमला हांडी फोडण्या त्वरे निघाला ये श्री दत्ता ये ये ॥ सहावा सण श्रावण पोळा । बैलांच्या गळ्यात घुंगरमाळा । शेतकरीदादाला आनंद झाला । ये श्री दत्ता ये ये ॥ सातवा सण गणेश चतुर्थि । स्थापना करुन श्रींची मुर्ती । सकाळ संध्याकाळ गाऊ आरती । ये श्री दत्ता ये ये ॥ आठवा सण पित्तर पाठ । पंचपक्वानांच करुन ताट । स्वर्गीच्या पितरांची पाहूया वाट । ये श्री दत्ता ये ये ॥ नववा सण दसरा आला । लहान थोरंना आनंद झाला । सोने वाटुन साजरा केला । ये श्री दत्ता ये ये ॥ दहावा सण आली दिवाळी । दारात काढून छान रांगोळी । दिप लाऊन रोज ओवाळी । ये श्री दत्ता ये ये ॥ अकरावा सण दत्तजयंती । काय वर्णावी त्याची महंती । स्मरण मात्रे अवगुण जाती । ये श्री दत्ता ये ये ॥ बारावा सण आली ही होळी । समस्तांचे अवगुण जाळी । नैवेद केला पुरणपोळी । ये श्री दत्ता ये ये ॥ असे आपुले विविध सण । भारतमातेची वाढवी शान । पाळणा लिहीतो कवी भगवान । ये श्री दत्ता ये ये ॥
लेखनविषय:

वाचने 1746
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

देवाला जोजवायच नसतं; देवाला बोलवायच असत,हे देवा तु नामरुपाने नेहमी माझ्या मुखात ये,माझ्या स्मरणात ये,माझ्या प्रतेक कर्मात ये म्हणून ये ये.