हा धागा "ईंटरॅक्टीव्ह" रुपाचा असून, अतिखाजगी गोष्टींत संदिग्धता राखून प्रतिक्रिया देता आल्यास उत्तमच. आपल्यापैकी प्रत्येकाने आवडो न आवडो, आयुष्यात चढ-उतार अनुभवले आहेत. पैकी "लाईफ डिफायनिंग" असे कोणते क्षण आपल्याला सांगता येतील? म्हणजे काही निर्णय आपण घेतो ज्यांचा परीणाम तेव्हा जाणवत नाही पण कालांतराने खूप प्रभाव जाणवतो. आपल्या एखाद्या निर्णयाने, अन्य व्यक्तीने केलेल्या कृतीने किंवा त्यावरच्या आपल्या प्रतिक्रियेने -आयुष्याला चढती अथवा उतरती कळा लागली असे प्रसंग, निर्णय, क्षण येथे जरुर शेअर करावेत.
"इवलेसे बीज लावियले द्वारी, तयाचा वेलु गेला गगनावरी" असे हे प्रसंग, बी सारखे सुप्त व अतिक्षुल्लक असतात पण संपूर्ण आयुष्यावर अतोनात परीणाम करतात. विवाह होणे, मूल होणे आदि घटना तर दूरगामी, मूलगामी परीणाम करतातच पण या झाल्या कॉमन घटना. काही तुमचे फक्त तुमचे असे प्रसंग असतीलच की. अशा प्रकारचे काही प्रसंग जरुर शेअर करावे.
माझ्यापासून सुरुवात करते.
माझ्या सामान्य आयुष्यात तीन असे प्रसंग आहेत. पैकी एक अत्यंत खाजगी व वेदनामय आहे. २ शेअर करते.
(१) काही वर्षांपूर्वी मी खूप गंभीर आजारी होते. त्या काळात मी वेड्यासारखी मानसिक आधार शोधत होते. नवरा व आई-वडील खूप सावरत होता पण "अधिभौतिक" असा आधारही खूप निकडीचा होता. मी स्वयंप्रेरणेनेच रोज "अमोघ शिवकवच" वाचन सुरु केले आणि खूप फायदा तर झालाच, होतोच आहे पण "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी" अशी काहीशी अध्यात्मिक शिस्त लागली. या वाचनाचा उत्तम परीणाम, शांती आजही मला दिसते. खरं तर आपली कोणतीही साधना चारचौघात सांगू नये (दृष्ट लागते, साधनेत कमतरता येत) असे म्हणतात पण माझा त्यावर विश्वास नाही.
(२)रोहीणी डाके बाईंनी "गणित चांगले असण्याबद्दल केलेल कौतुक". त्या ४ प्रेमळ, प्रोत्साहनपर शब्दांनी मला कुठच्या कुठे पोचविले. गणिताची अतोनात गोडी लागली, ध्यास लागला. मला जे काही चांगले शिक्षक मिळाले त्यापैकी या एक.
वाचने
3656
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान धागा !
बापरे संपूर्ण आयुष्याची घडीच
In reply to छान धागा ! by तर्री
साठीनंतर जगलो वाचलो तर लिहूच.
उगाच मागे वळून बघायचं म्हटलं
In reply to साठीनंतर जगलो वाचलो तर लिहूच. by प्यारे१
+१
गणिताने 'एकच प्रश्न, एकच
In reply to +१ by रमताराम
"नंबर थिअरी" चा डौल काही
In reply to गणिताने 'एकच प्रश्न, एकच by शुचि
धागाकर्ती शुचि यांसः
अतिशय
फिस्सकन् हसले की लेका!
In reply to अतिशय by परिकथेतील राजकुमार
ठ्यांव
In reply to अतिशय by परिकथेतील राजकुमार
शुचीतै, कसं बै सुचतं तुला असं
वर तर्री यांनी
In reply to शुचीतै, कसं बै सुचतं तुला असं by रेवती
नवीन कळले
बरीच माहिती मिळेल अशी अपेक्षा
हाहाहा काय ग!
In reply to बरीच माहिती मिळेल अशी अपेक्षा by स्पंदना
शाळेपासुन ते कालेज संपेपर्यंत
:)
सही है!!!
In reply to :) by अर्धवटराव
"लाईफ डिफायनिंग" - सेलेब्रिटीज.
वा!!
In reply to "लाईफ डिफायनिंग" - सेलेब्रिटीज. by तर्री
महत्त्वाचे निर्णय आणि आयुष्याला कलाटणी.
सुंदर
In reply to महत्त्वाचे निर्णय आणि आयुष्याला कलाटणी. by प्रभाकर पेठकर