✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बस लागणे

त
तुषार काळभोर यांनी
Mon, 07/09/2012 - 09:26  ·  लेख
लेख
तर.... मागील सोमवारी मी नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी दुचाकीवर जायचो. या नविन ठिकाणी मला कंपनीतर्फे बसची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'बस लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ बसपुरता मर्यादित नाही. चारचाकी गाडी (मारुती-८०० पासून ते फोर्ड एण्डेव्हर पर्यंत), एसी चालू ठेवून वा बंद ठेवून, खिडकी उघडी वा बंद ठेवून, उपाशी पोटी वा भरल्यापोटी कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्‍याचदा १-२ किमी अंतरातही त्रास होतो, तर क्वचित २०० किमी सुद्धा मला त्रासरहित प्रवास करता येतो. तर असा त्रास का होतो? त्यावर काय उपाय करता येतात? (बस लागण्यावरची गोळी/आवाळासुपारी/लेमनगोळी असे उपाय मला लागू पडलेले नाहीत.)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32086 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

प्रोब्लेम तुमचा नैये .. बस चा

जेनी...
Mon, 07/09/2012 - 09:29 नवीन
प्रोब्लेम तुमचा नैये .. बस चा आहे .
  • Log in or register to post comments

स्केटींगचा पर्याय कसा वाट्तो

पक पक पक
Tue, 07/10/2012 - 08:12 नवीन
स्केटींगचा पर्याय कसा वाट्तो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

त्यांना विमान नाय घ्यायला सांगत

संजय क्षीरसागर
Tue, 07/10/2012 - 09:03 नवीन
हे नशिब! तरी बरं अजून भुयारी मार्ग नाही सुचवला कुणी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

काय करणार भुयारी मार्गाचं?

शिल्पा ब
Tue, 07/10/2012 - 11:15 नवीन
काय करणार भुयारी मार्गाचं? प्रॉब्लेम गाडीनं जाण्याचा आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

आहो, पेशवे शनिवार वाड्यातनं निघाले की थेट पर्वतीवर प्रकट व्हायचे

संजय क्षीरसागर
Tue, 07/10/2012 - 13:35 नवीन
भुयारी मार्गानं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

घसरगुंड्या बनवा दोन ,घरापासुन

पक पक पक
गुरुवार, 07/12/2012 - 10:19 नवीन
घसरगुंड्या बनवा दोन ,घरापासुन ऑफिसपर्यंत एक अन ऑफिस पासुन घरापर्यंत एक .. :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पेशव्यांना घसरगुंड्यांचा मान

बॅटमॅन
गुरुवार, 07/12/2012 - 11:27 नवीन
पेशव्यांना घसरगुंड्यांचा मान नाहीये ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव

पक पक पक
गुरुवार, 07/12/2012 - 11:32 नवीन
छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव मग ,नाय तर घोड्यावरुन जावा कामाला... :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

???

कवटी
गुरुवार, 07/12/2012 - 14:26 नवीन
नाय तर घोड्यावरुन जावा कामाला... बस लागतीय तेवढे पुरे नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

बस लागतीय तेवढे पुरे नाही का?

पक पक पक
गुरुवार, 07/12/2012 - 15:13 नवीन
बस लागतीय तेवढे पुरे नाही का? :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

आह्हा हा हा हा हा हा हा

बॅटमॅन
गुरुवार, 07/12/2012 - 17:18 नवीन
आह्हा हा हा हा हा हा हा हा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

बस लागतीय तेवढे पुरे नाही का?

अर्धवटराव
गुरुवार, 07/12/2012 - 22:11 नवीन
हो ना. कल्पना करा, जर घोडा "लागला" तर परत कधी बसने जाणे तर दूर, कुठेच बसायच्या लायकीचे राहणार नाहि व्हिक्टीम. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

अरे आवरा !!!

मराठे
गुरुवार, 07/12/2012 - 22:26 नवीन
अरे आवरा !!! :bigsmile: :bigsmile: ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव

मितभाषी
गुरुवार, 07/12/2012 - 16:31 नवीन
छत्रपतींकडुन मगुन घ्या म्हणाव मग ,नाय तर घोड्यावरुन जावा कामाला... पक पक पक पैलवानाला घोडा लागला तर....... :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

ढीशक्याssव!

अन्नू
गुरुवार, 07/12/2012 - 22:21 नवीन
प्रोब्लेम तुमचा नैये .. बस चा आहे .
आत्ता कशा डीकटो मिपाकर वाटतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

साधा सरळ उपाय - कंपनीची बस

किसन शिंदे
Mon, 07/09/2012 - 09:42 नवीन
साधा सरळ उपाय - कंपनीची बस सेवा वापरणं बंद करा. :)
  • Log in or register to post comments

आणि एक झक्कास फोर्-व्हीलर

जेनी...
Mon, 07/09/2012 - 09:45 नवीन
आणि एक झक्कास फोर्-व्हीलर घेऊन टाका यंदाच्या दसर्‍याला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

३५ किमी अंतर

तुषार काळभोर
Mon, 07/09/2012 - 10:05 नवीन
आहे. दुचाकीलाच महिन्याला २२००-२३०० रु लागतील. (महिन्याला १७००-१८०० किमी पळून पाठ मोडेल ते वेगळेच!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अहो, पण ते म्हणताहेत ना

किसन शिंदे
Mon, 07/09/2012 - 10:10 नवीन
अहो, पण ते म्हणताहेत ना त्यांना फोर व्हिलर सुध्दा लागते मग त्याचाही काही फायदा होणार नाही. आणखी जास्त सोपा उपाय म्हणजे नविन सायकल घेऊन हापिसला जाणे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

त्यांना फोर व्हिलर सुध्दा

पांथस्थ
Mon, 07/09/2012 - 11:25 नवीन
त्यांना फोर व्हिलर सुध्दा लागते
साधा उपाय. रिक्षा घ्या की राव! येता जाता भाडं घेतलं तर पेट्रोलचे पैसे पण सुटतील!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

चालत्या गाडीत - कोणत्याही -

शिल्पा ब
Mon, 07/09/2012 - 09:57 नवीन
चालत्या गाडीत - कोणत्याही - असा प्रॉब्लेम असेल तर मोशन सिकनेस किंवा vestibular system मधे काही गडबड होत असावी. चांगल्या डॉक्टरला दाखवणे हे उत्तम.
  • Log in or register to post comments

मोशन सिकनेस

तुषार काळभोर
Mon, 07/09/2012 - 10:07 नवीन
दुचाकी/रिक्षा/रेल्वे मध्ये हा त्रास नाही होत. एकदा जंजिर्‍याला जाताना होडीत व एकदा चेन्नईहून येताना विमानात त्रास नव्हता झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

विमानात होत नाही म्हणता? पण

llपुण्याचे पेशवेll
Mon, 07/09/2012 - 13:16 नवीन
विमानात होत नाही म्हणता? पण हॅलिकॉप्टरमधे होतो का? हॅलीकॉप्टरमधे होत नसेल तर एखादे हॅलिकॉप्टर घ्या. कसे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

होडी लागत नाहीये हे बरं आहे.

गवि
Mon, 07/09/2012 - 13:25 नवीन
होडी लागत नाहीये हे बरं आहे. पण होडीने हपीसला जाण्याची संधी पुण्यात लाभेलसे वाटत नाही. मुंबईत पावसाळ्यात शक्य आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

माझाही यासारखा प्रश्न...

श्रीरंग_जोशी
Mon, 07/09/2012 - 10:00 नवीन
आपण हा प्रश्न इथे उपस्थित केला आहे तर मी पण मला लहानपणापासून भेडसावणारा प्रश्न विचारून घेतो कारण म्हणजे विषयातील साम्य. यात कुठल्याही प्रकारचा उपहास नाहीये. लहानपणापासून बघत आलोय की बऱ्याच लोकांना राज्य परिवहन मंडळाची बस लागते. त्यांचे पाहून न लागणाऱ्यांनाही बस लागते. अन उरले सुरले दुर्दैवी जीव असतात ज्यांना बस अजिबात लागत नाही त्या बिचाऱ्यांचे फारच हाल होतात. आता माझा अनुभव सांगतो. लहानपणापासून मी राज्य परिवहन मंडळाच्या बसने भरपूर प्रवास केला आहे. २४ तासांतल्या सर्व वेळी अन वर्षातल्या सर्व ऋतूंमध्ये. कधी कधी अपघातप्रवण अश्या घाटांतून सुद्धा. पण बसमधल्या प्रत्येकाला (चालक वाहक धरून) जरी बस लागली तरी मला अजिबात लागायची नाही. मग मी भरपेठ जेवलेलो असलो किंवा उपाशीपोटी असलो तरी. त्यासाठी मला आवळासुपारी वगैरे कधीच चघळावी लागली नाही. आता मला पडलेले प्रश्न १) मला आजवर एकदाही बस लागली नाही हे काळजीची बाब असावी असे मला वाटते. २) बसच काय काही लोकांना विमानसुद्धा लागताना पाहिले आहे, मी त्या बाबतीतही दुर्दैवी. ३) राज्य परिवहन मंडळाच्याच बस अधिक का लागतात कारण हे प्रमाण खाजगी बसांमध्ये फारच कमी असते. ४) माझ्या निरीक्षणानुसार परदेशात बस लागण्याचे प्रमाण नगण्य आहे, मग भारतातच असे का घडते?
  • Log in or register to post comments

मी पण

चिरोटा
Mon, 07/09/2012 - 10:46 नवीन
माझ्या बाबतीतही अगदी असेच आहे. मी बसच्या टपावर बसून प्रवास करायचो. आपण ?
राज्य परिवहन मंडळाच्याच बस अधिक का लागतात
कारण त्या खाजगी बसेसच्या तुलनेत गलिच्छ असायच्या.
माझ्या निरीक्षणानुसार परदेशात बस लागण्याचे प्रमाण नगण्य आहे
मी ब्राझील,इस्रायल,रशिया,स्पेन,जपान,चिलीमध्ये लोकांना बस लागताना पाहिले आहे. मिसळपाव्,कांदाभजी आणि चहा घेवून लाल डब्यातून भरदुपारी कशेडी घाटातून प्रवास केलाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

+१

मी_देव
Sat, 04/13/2013 - 08:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

बस लागते ? त्याच्या तोट्या

आनंद
Mon, 07/09/2012 - 10:17 नवीन
बस लागते ? त्याच्या तोट्या बरोबर फायदे ही लक्षात घ्या. बस चालु झाल्या थोडे व्याक व्याक !करावे शेजार चा उठुन दुसरी जागा पकडेल. तुम्ही एका तिकाटाच्या पैश्यात दोन शिटांचा आनंद लुटा. किंवा मोकळी झालेली सिट एखाद्या सुबक ठेंगणीला द्या. प्रवास संपेपर्यंत तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. (तेवढी होल्ड करण्याची क्षमता असते शरीराची)
  • Log in or register to post comments

भारी आयडिया ! मला रोज प्रवास

सस्नेह
Tue, 07/10/2012 - 14:04 नवीन
भारी आयडिया ! मला रोज प्रवास करावा लागतो अन बसायला जागा मिळत नाही. त्यावरही काही उपाय सुचवाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

मला रोज प्रवास करावा लागतो अन

पक पक पक
गुरुवार, 07/12/2012 - 15:22 नवीन
मला रोज प्रवास करावा लागतो अन बसायला जागा मिळत नाही. बसलेल्याच्या डोक्याजवळ व्याक व्याक करावे... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

होमिओपथिक

वैशाली१
Mon, 07/09/2012 - 10:21 नवीन
मला आणि माझ्या मुलाला सुद्धा हा त्रास आहे. मी शक्यतो प्रवासात खायचे टाळते . त्याने त्रास कमी होतो. मी मुलासाठी होमिओपथिक गोळ्या सुरु केल्या आहेत. त्याचा त्याला उपयोग होतो . तुम्ही सुद्धा होमिओपथिक डॉक्टर ला विचारून घेऊ शकता .
  • Log in or register to post comments

बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल

गवि
Mon, 07/09/2012 - 11:25 नवीन
बरोबर.. होमिओपॅथीने होत असेल उपाय.. कारण बस लागण्यावर प्लासेबो उपयोगी ठरतं असं एक मॉडर्न मेडिसिनचे डॉक्टरही म्हणाले होते खरे.. मूळ धागाकर्त्यास : अँटिहिस्टामाईन्स वापरुनही तुमचा त्रास अजिबात कमी होत नाही हे आश्चर्य आहे. तरीही रोजच बस लागत असताना रोज या झोप आणणार्‍या गोळ्या घेणं शक्यही नाही. दोन गोष्टी करा, त्रास नक्की कमी होईल याची खात्री बाळगा. कानातल्या बॅलन्सिंग सिस्टीमकडून आलेला शरीराच्या ३ डी पोझिशनचा सिग्नल आणि डोळ्यांनी दिलेला त्याच पोझिशनचा सिग्नल हे जेव्हा मॅच होत नाहीत तेव्हा हा त्रास होतो. कानातील बॅलन्स सिस्टीम किंवा डोळे यांपैकी कोणत्याही एकामधे प्रॉब्लेम असला की असं होतं. तस्मात.. १. कोणत्याही परिस्थितीत जवळच्या वस्तू किंवा बसच्या आतील गोष्टींकडे नजर ठेवून राहू नका. पूर्णवेळ डोळे मिटून बसा किंवा मग खिडकीतून खूप दूरच्या वस्तूकडे नजर लावा. दूरच्या वस्तूंची रिलेटिव्ह मोशन नगण्य असते. डोकंही स्थिर टेकून ठेवता येईल अशी व्यवस्था करा. (अगदी लहान उशी वगैरे) २. मोशन सिकनेसमुळे मेंदूतलं व्हॉमिटिंग सेंटर ट्रिगर होतं. त्यावेळी प्रचंड अन्न / पाणी वगैरे पोटात असेल तर ते बाहेर टाकण्याची क्रिया अधिक जोरात होते. अशा वेळी शक्यतो फार खाऊन प्रवास सुरु करु नका. हपीसात पोचल्यावर खा/प्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली१

हिमालयीन लोकांचा सल्ला

चौकटराजा
Mon, 07/09/2012 - 19:54 नवीन
नैनितालला ला गेलो असताना बस लागली . हिमाचल मधे पहिल्या दिवशी लागली नंतर नाही. तेथील लोकांचे म्हणजे " गवि" प्रमाणेच पण जरासे वेगळे. त्यांचे मते मान व छाती प्रवासात एकीकडेच असली की ओकारी होत नाही. त्यामुळे ड्रायव्हरला कधी बस लागत नाही. तसेच झोपल्यामुळे बस लागण्याचे टळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नक्की कळले नाही

तिमा
Wed, 07/11/2012 - 13:38 नवीन
मान व छाती प्रवासात एकीकडेच याचा अर्थ कळला नाही. आपली मान आपल्याच छातीवर असते ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मानेचा पुढचा भाग ..

चौकटराजा
Wed, 07/11/2012 - 19:14 नवीन
मानेचा पुढचा भाग म्हणजे गळा व छाती यात पीळ निर्माण होता कामा नये. ( twist) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

बहुतेक

तुषार काळभोर
Mon, 07/09/2012 - 20:10 नवीन
मात्रा लागू पडली असावी. आता येताना बसमध्ये बसल्याक्षणी जे डोळे मिटले ते सहकर्‍याने हडपसरचा थांबा आल्याचे सांगितल्यावरच उघडले. थोडं ढवळत होतं आणि गरगरतही होतं पण निम्म्याहून कमी. मुख्य म्हणजे आतलं बाहेर नाही आलं. बाकी उपाशीपोटी ते भरपेट या दरम्यानच्या सार्‍या लेव्हल्स वर प्रवास करून त्रास होतोच, त्यामूळे माफक खाऊन वगैरे काही फरक पडेलसे वाटत नाही. उद्या जाताना डोळे मिटण्याचा प्रयोग पुन्हा करतो. बादवे: कोणत्याही चारचाकीच्या जवळ गेल्यावर मला त्याच्या वासाची अत्यंत शिसारी येते. बहुतेक सगळ्यांना असे होत नसावे. याचं काय कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बेताचे खाऊन निघाल्याने बस

गवि
Mon, 07/09/2012 - 20:45 नवीन
बेताचे खाऊन निघाल्याने बस लागणं कमी होत नाही. फक्त ननंतर होणारी उलटीची तीव्रता कमी होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

थोडं ढवळत होतं आणि गरगरतही

जेनी...
Mon, 07/09/2012 - 22:13 नवीन
थोडं ढवळत होतं आणि गरगरतही होतं _______________________ खरच एखाद्याडॉक्टरला दाखवा ...कुणी सांगाव ..काही वेगळच असलं तर? :-o कोणत्याही चारचाकीच्या जवळ गेल्यावर मला त्याच्या वासाची अत्यंत शिसारी येते. __________________ नेमका कसला वास ..म्हणजे नक्की कशाचा आणि कसा वास येतो ..ते लिहाकिओ पैल वान .... \(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

ते नै म्हैत...

तुषार काळभोर
Tue, 07/10/2012 - 05:52 नवीन
पण अत्यंत घाणेरडा वास येतो, हे नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

बहुतेक

तुषार काळभोर
Mon, 07/09/2012 - 20:11 नवीन
मात्रा लागू पडली असावी. आता येताना बसमध्ये बसल्याक्षणी जे डोळे मिटले ते सहकर्‍याने हडपसरचा थांबा आल्याचे सांगितल्यावरच उघडले. थोडं ढवळत होतं आणि गरगरतही होतं पण निम्म्याहून कमी. मुख्य म्हणजे आतलं बाहेर नाही आलं. बाकी उपाशीपोटी ते भरपेट या दरम्यानच्या सार्‍या लेव्हल्स वर प्रवास करून त्रास होतोच, त्यामूळे माफक खाऊन वगैरे काही फरक पडेलसे वाटत नाही. उद्या जाताना डोळे मिटण्याचा प्रयोग पुन्हा करतो. बादवे: कोणत्याही चारचाकीच्या जवळ गेल्यावर मला त्याच्या वासाची अत्यंत शिसारी येते. बहुतेक सगळ्यांना असे होत नसावे. याचं काय कारण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

एस. टी. बसला एक विचित्र वास

बाळ सप्रे
Mon, 04/15/2013 - 12:38 नवीन
एस. टी. बसला एक विचित्र वास असतो हे मान्य.. त्याने लगेच ढवळायला लागु शकतं.. कारण तो वास तम्बाखूच्या वासासारखाच असतो जवळपास.. पण सर्व चारचाकींच्या वासाने शिसारी येते हे बाकी नवलच.. तुम्ही कदाचित चारचाकी म्हणजे फक्त भाड्याच्या सुमो/ट्रॅक्स वगैरे म्हणताय का? .. कारव आजकालच्या नव्या कार्सचा वास काही दिवस खूप चान वाटतो (परफ्यूमशिवायचा) अगदी नव्या पुस्तकांचा वास जसा छान वाटतो तसाच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

एक्झ्याक्टली!!!

तुषार काळभोर
Mon, 04/15/2013 - 14:01 नवीन
मला शिसारी आणणार्‍या गोष्टी: १. तोच....तंबाखूसारखा वास २. कारमध्ये वापरले जाणारे उग्र सुगंध (त्यातपण लेमन-सिट्रस लई बेक्क्कार!!) ३. एसी वापरताना दिवसेंदिवस खिडक्या बंद राहतात, त्यामुळे अत्यंत कुबट वास येतो. विशेषतः जे नवकारमालक आहेत, ते गाडीला एसी आहे म्हणून उन्हाळा-पावसाळा-हिवाळा-सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र-मध्यरात्र सदासर्वकाळ खिडकी बंद ठेवून एसी वापरत राहतात. त्यातही एसीच्या कंट्रोल पॅनेल वरचे बाहेरची हवा आत घेणारे बटन कायम बंद असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

एसी वापरण्याची कारणे

पैसा
Mon, 04/15/2013 - 14:13 नवीन
१) धूळ, धुके गाडीत येत नाही. २) खिडक्या उघड्या टाकल्यामुळे पावसात पाणी सूक्ष्म प्रमाणात गाडीत येऊन काचेवर जे बाष्प धरते त्यापासून एसी लावल्याने संरक्षण होते. नाहीतर सीट कव्हर्स ओली होऊन आणखीच विचित्र वास यायला लागतो. ३) खिडक्या उघड्या असतील तर वार्‍यामुळे गाडीच्या गतीला काहीसा अवरोध येतो. ४) एसी लावल्यास गाडीबाहेरच्या आवाजांचा त्रास होत नाही. ५) एसी लावल्यामुळे लांबच्या प्रवासात फार दमणूक वाटत नाही. कृत्रिम सुगंधांबाबत सहमत. पण बाहेरून हवा आत घेणारे बटन सतत चालू न ठेवता थोड्या थोड्या वेळाने तसे करणे फायदेशीर ठरते. गाडीतला कुबट वास बाहेर घालवण्यासाठी गाडी सुरू केल्यावर काही वेळ खिडक्या उघड्या टाकणे आणि गाडी नियमित स्वच्छ करणे हे दोन उपाय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

+१ योग्य सल्ला. एकदा डायविंग

ऋषिकेश
गुरुवार, 07/12/2012 - 10:35 नवीन
+१ योग्य सल्ला. एकदा डायविंग करायच्या आधी आयुष्यात पहिल्यांदा मला होडी लागली होती (भरपूर भरतीमुळे नुसती डुचमळत होती). तेव्हा इन्सट्रक्टरने पाण्यात उडी मारायला आनि होडीत असला तर क्षितीजाकडे लक्ष द्यायला सांगितले होते. दूरवर लक्ष देबणे व कानात गाणी वाजवणे उपयुक्त ठरावे. शिवाय प्लासिबो देखील काम करेलसे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माताय आम्हाला बस, विमान ,

सूड
Mon, 07/09/2012 - 11:06 नवीन
माताय आम्हाला बस, विमान , होडगं काहीच लागलं नाही आजतागायत. या गोष्टी लागणार्‍या लोकांचा आपल्याला जाम हेवा वाटतो ब्वॉ!!
  • Log in or register to post comments

आरे चाल्लय काय?? हे असले कसले

Dhananjay Borgaonkar
Mon, 07/09/2012 - 11:19 नवीन
आरे चाल्लय काय?? हे असले कसले वांझोटे धागे निघायला लागले? मला हे लागतय नि ते लागतय....
  • Log in or register to post comments

वांझोटा?

तुषार काळभोर
Mon, 07/09/2012 - 12:08 नवीन
तुम्हाला कदाचित कल्पना नाहिए हे प्रकरण किती त्रासदायक आहे ते. मी हडपसर(पुण्याचं पुर्वेकडील उपनगर)मध्ये राहतो. आठवीला असताना शुक्रवार पेठेतील एका नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेतला. रोज पीएमटीने जाताना आमचा कार्यक्रम व्हायचा. वर अजून शाळेत जाऊन मी झोपून राहयचो. शेवटी वैतागून २ महिन्यांनी घराजवळील शाळेत प्रवेश घेतला. शाळा चालू होऊन २ महिने झाले होते, त्यामुळे हडपसरलाही चांगली शाळा मिळाली नाही. शेवटी १०वी पर्यंत एका कमी बर्‍या शाळेत शिक्षण घेतले. तुम्ही नशिबवान आहात, तुम्हाला बस लागत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Dhananjay Borgaonkar

अ गा गा गा गा

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/09/2012 - 12:17 नवीन
आठवीला असताना शुक्रवार पेठेतील एका नावाजलेल्या शाळेत प्रवेश घेतला.
शुक्रवार पेठेत नावाजलेली शाळा ? आली आली तुमची मर्यादा लक्षात आली. तुम्हाला बस लागते ह्यात आश्चर्य काही नाही. तुम्ही सरळ नोकरी सोडा आणि घरी एक शिवणयंत्र घेउन टाका. म्हणजे उगा इकडे तिकडे बोंबलत हिंडायला नको, आणि बसल्या जागी फॉल -पिको, अस्तर लावणे इ. धंदे करून चार पैसे पण सुटतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पुणे ३०

तुषार काळभोर
Mon, 07/09/2012 - 17:02 नवीन
नावाजलेल्या शाळा फक्त पुणे-३० मध्ये असतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुम्ही यावर काही " वैदिक "

सुहास..
Mon, 07/09/2012 - 11:42 नवीन
तुम्ही यावर काही " वैदिक " उपाय का करीत नाही ;)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा