✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बस लागणे

त
तुषार काळभोर यांनी
Mon, 07/09/2012 - 09:26  ·  लेख
लेख
तर.... मागील सोमवारी मी नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी दुचाकीवर जायचो. या नविन ठिकाणी मला कंपनीतर्फे बसची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'बस लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ बसपुरता मर्यादित नाही. चारचाकी गाडी (मारुती-८०० पासून ते फोर्ड एण्डेव्हर पर्यंत), एसी चालू ठेवून वा बंद ठेवून, खिडकी उघडी वा बंद ठेवून, उपाशी पोटी वा भरल्यापोटी कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्‍याचदा १-२ किमी अंतरातही त्रास होतो, तर क्वचित २०० किमी सुद्धा मला त्रासरहित प्रवास करता येतो. तर असा त्रास का होतो? त्यावर काय उपाय करता येतात? (बस लागण्यावरची गोळी/आवाळासुपारी/लेमनगोळी असे उपाय मला लागू पडलेले नाहीत.)
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
32086 वाचन

💬 प्रतिसाद (96)

प्रतिक्रिया

सारली का काडी..जरा वेगळी तरी

बॅटमॅन
Mon, 07/09/2012 - 18:09 नवीन
सारली का काडी..जरा वेगळी तरी सारा हो, मग चुळबूळ तरी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

घोड्याबद्दलच्या शंकांबद्दल ...

सातबारा
Mon, 07/09/2012 - 12:14 नवीन
प्रथमतः धागा कर्त्यास यांत्रिक पद्धतींच्या वाहनांचा होणारा त्रास टाळावा म्हणून जैविक पर्याय सुचविला आहे याची मंडळाने कृपया नोंद घ्यावी. - वाहन म्हणून उपयोग करताना बस जशी लागते त्याप्रमाणे वाहन म्हणून उपयोगात आणताना घोडा तरी लागत असल्याचे कोणतेही निरीक्षण / विदा / इतिहास नाही. - त्यातूनही ( वाहन म्हणून उपयोग करताना ) घोड्याने लागायचे ठरवलेच तर होमिओपॅथी, प्लॅसीबो, अ‍ॅन्टीहिस्टेमाईन इ. गोळ्या घोड्याला खाऊ घालण्याचा प्रयोग करुन पहाता येईल. (गवि वगैरे दिग्गजांनी जरा मदत करावी). - आम्ही शेतकरी थोड्या अंतरासाठी अजूनही घोडा, बैल इ. वाहतुकीसाठी वापरतो. - अंडे घालून अथवा घालण्यापूर्वी अथवा वैदिक उपायांनी घोड्याचा वापर करण्याबद्दल काहीही माहीती नाही. - कुत्राही वापरता येईल. पण त्याच्याबरोबर चालत जावे लागेल. हाही एक आनंददायी अनुभव आहे. (स्वानुभव व अनेक श्वानप्रेमीचा अनुभव. पुन्हा कॉलींग गवि. ) - उपरोल्लीखीत प्राणीविशेष हे वाहनेतर उपयोगासाठीही वापरता येवू शकतात.
  • Log in or register to post comments

तब्येत डॉक्टरला का नाही दाखवत?

प्रभाकर पेठकर
Mon, 07/09/2012 - 12:15 नवीन
श्री. गवि साहेबांनी केलेले आपल्या समस्येचे विश्लेषण अतिशय योग्य आहे. चांगल्या डॉक्टरला प्रकृती दाखवा. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि/किंवा आयुर्वेद तज्ज्ञ कोणीतरी नक्कीच औषध देऊ शकेल. असला धागा मिसळपावर टाकण्याआधी डॉक्टरला तब्येत दाखविणे सयुक्तिक नाही का? आणि तज्ज्ञ डॉक्टरला तब्येत दाखवूनही उपयोग झाला नसेल तर मिसळपाव सदस्य काय उपाय सुचविणार?
  • Log in or register to post comments

(लेख लागणे)

नगरीनिरंजन
Mon, 07/09/2012 - 12:48 नवीन
(लेख लागणे) असे याचे एक विडंबन (भडभडून) व्हायला हरकत नाही. आम्हाला आजकाल मिपावरचे अनेक लेख(?!) लागतात.
  • Log in or register to post comments

मग येऊ द्या की जोरकस विडंबन.

अरुण मनोहर
Mon, 07/09/2012 - 14:03 नवीन
मग येऊ द्या की जोरकस विडंबन. बर्‍याच लोकांना मिपावरचे लेख "लागतात", म्हणूनच काहींना ते "लागले" तरी मिपावर असे अनेक लेख सतत "लागत" असतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

सिरिअस प्रतिसाद देणार होतो पण

नितिन थत्ते
Mon, 07/09/2012 - 14:08 नवीन
सिरिअस प्रतिसाद देणार होतो पण धागा उधळला जातोय (आणि धागाकर्त्यांनी संमंकडे तक्रारदेखील केलेली नाही) असं लक्षात आल्याने आता प्रतिसाद देत नाही.
  • Log in or register to post comments

पैलवान, 'जाहिरातींची विनोदी

कवटी
Mon, 07/09/2012 - 14:11 नवीन
पैलवान, 'जाहिरातींची विनोदी "वाट"' धागा प्रवास करताना सतत वाचत रहा.... बघा काय काट्याने काटा निघतोय का ते?
  • Log in or register to post comments

कृपया सदस्यनाम बदला..

चिगो
Mon, 07/09/2012 - 15:35 नवीन
"पैलवाना"ला हा त्रास होतोय, हे बाचून कसेसेच झाले.. बाकी वर दिलेल्या सल्ल्यांनी काही फरक पडल्यास सांगा ब्वॉ..
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

अस्वस्थामा
Mon, 07/09/2012 - 17:55 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

Work From Home.

कवितानागेश
Mon, 07/09/2012 - 15:48 नवीन
Work From Home.
  • Log in or register to post comments

(No subject)

वपाडाव
Mon, 07/09/2012 - 18:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

जर खरोखर गंभीर उत्तर हवे असेल

अस्वस्थामा
Mon, 07/09/2012 - 18:06 नवीन
जर खरोखर गंभीर उत्तर हवे असेल तर आमचा हा अनुभव सांगतो.. गावी असताना मला पण बस लागायची, वडाप सुद्धा. अगदी बस स्थानकाच्या परिसरात गेलो की मळमळ व्हायची. पण मुंबईला गेल्यावर विकांताला घरी जाताना दुसरा उपाय नसायचा, मग आधी जेवण न करता ६ ते ७ तास प्रवास करायचो. प्रवासात डोळे मिटून अक्षरशः ध्यान सुरु.. आणि स्वताला सांगत राहायचे की उलटी होणार नाही, मळमळ होणार नाही. दोन महिन्यात जेवण करून देखील त्रास झाला नाही.. आणि सहा महिन्यात डोळे देखील बंद करून बसायची गरज राहिली नाही ( अर्थात प्रवास दर आठवड्याला होत होता) आता बसच काय पण वडाप देखील लागत नाही..
  • Log in or register to post comments

+१, एक तरी धड उपाय मिळाला

५० फक्त
Mon, 07/09/2012 - 18:29 नवीन
+१, एक तरी धड उपाय मिळाला म्हणायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

जे जे आपणासी ठावे

नितिन थत्ते
Mon, 04/15/2013 - 16:04 नवीन
आता शिरिअस प्रतिसाद...... वर दिसावा म्हणून इथे टाकलाय. :) बस लागणार्‍या माणसाला खूपच त्रास होतो. बरीच रिस्ट्रिक्शन पाळावी लागतात. कामानिमित्त अचानक प्रवास करावा लागला तर फार वाट लागते. मला सुमारे १ किमी अंतरात सुद्धा बस लागते (उलटी झाली नाही तरी मळमळू लागते). अर्थातच झोपाळा, विमान आणि होडीसुद्धा लागते. (रिक्षा व मोटरसायकल सुद्धा जराशी लागण्याचा अनुभव आहे). रेलवे मात्र लागत नाही. (रोलर कोस्टर, एस्सेलवर्ल्ड? हॅ हॅ हॅ) म्हणून माझ्यासारख्या दुर्दैवी जीवांसाठी ....... काही निरीक्षणे: १. वारंवार अ‍ॅक्सिलरेशन आणि रिटार्डेशन झाल्याने वाहन लागते. त्यामुळे ट्रॅफिक असलेल्या रस्त्यावरून वाहन जाते तेव्हा अधिक लागते. त्यातही ड्रायव्हर गाडी भसकन सोडणारा आणि कचकन ब्रेक मारणारा असेल तर तेरावा महिना. २. त्याच कारणाने घाटात गाडी जास्त लागते. वळणावळणांचा रस्ता ही त्यात भर. बहुतेक ड्रायव्हर वळण गेल्यावर बस भरधाव सोडतात (विशेषतः घाट उतरताना) आणि पुढचे वळण आले की एकदम ब्रेक मारतात. उतार + वळण + ब्रेक = उलटी ३. स्वतः गाडी चालवत असल्यास लागत नाही. ड्रायव्हरच्या शेजारी बसला असाल आणि मेंटली तुम्ही सुद्धा गाडी चालवत असाल तर गाडी लागत नाही. (म्हणजे ड्रायव्हर ब्रेक मारणार याचा अंदाज तुम्हालाही आधीच असेल तर). ४. कोकणातल्या लाल डबा एष्ट्या लागण्याचे अजून एक कारण म्हणजे बर्‍याच एष्ट्यांमधून मासळीची वाहतूक केली जाते आणि मासळीचा वास बस स्थानकात आणि बसमध्ये बर्‍याचदा भरून राहिलेला असतो. अर्थात कोकणातले वळणांचे रस्ते हा नॉर्मल फॅक्टर असतोच. त्यामुळे मासळी वाहतुक न करणार्‍या एशियाड सुद्धा लागतातच. ५. आडवे किंवा उलट बसल्याने बस जास्त लागते हे खरे आहे. पण हल्ली बसमध्ये आडव्या सीट नसतात. इतकी वर्षे सिटी बस मध्ये उलट्यासीटही नसत पण हल्लीच्या रिअर इंजिन लेटेस्ट सिटीबसेसमध्ये यडचापसारख्या उलट-सुलट सीट असतात. आता थोडे उपायांविषयी.... ६. घरगुती नुस्के फारसे चालत नाहीत. पोट रिकामे असावे हा उपाय मात्र योग्य आहे. बाकी आवळा सुपारी वगैरेचा काही उपयोग होत नाही. उलट ती खारट असल्याने उलटीला आणखीच ट्रिगर मिळतो. आले (जिंजर रूट) काम करते असे विकिपीडिया सांगतो पण प्रयोग करून पाहिलेला नाही. ७. डोक्याला छान वारा मिळत असेल तर गाडी लागत नाही. पण घाट आला की गाडीचा वेग कमी होतो आणि पुरेसा वारा लागत नाही. मग याचा काही उपयोग नाही. ८. नाक मोकळे नसेल-चोंदलेले असेल तर त्रास जास्त होतो. म्हणून नाक मोकळे राहील असे पहावे. ९. रामबाण उपाय म्हणजे अ‍ॅव्होमीनची गोळी. मात्र याने झोप येते. गोळी घेण्याविषयी बरेच प्रयोग करून पाहिले. ९अ. गोळी प्रवासाच्या बरीच आधी घ्यावी. किमान २-३ तास आधी. ती घेतल्यावर शक्य असेल तर डुलकी काढावी. म्हणजे प्रवासाला सुरुवात होतानाच गोळीचा अंमल सुरू झालेला असेल. अगदी बसमध्ये बसताना गोळी घेतली तर काही उपयोग होत नाही. मी सुरुवातीस अशीच आयत्यावेळी गोळी घेत असे. ९ब. गोळी अशी आधी घेतलेली असल्यास बस लागण्याचा त्रास होत नाही असे आढळल्यावर गोळीची मात्रा कमी करत न्यावी. आपल्याला किती/कोणत्या प्रवासाला किती गोळी पुरते याचा अंदाज हळूहळू येतो. याचा फायदा म्हणजे झोपेचे प्रमाण कमी होते आणि तीनेक तासाचा प्रवास करून (गोळी घेऊनही) आपण कार्यालयीन काम करण्याइतपत हुशार राहू शकतो. मी आता मुंबई-पुणे प्रवासाला फक्त पाव गोळी (२५ मिग्रॅमच्या पावपट) घेतो. (विमान प्रवासाला एक अष्टमांश). ९क. गोळीचा इफेक्ट बराच काळ राहतो. आज सकाळी पुण्याला जाऊन उद्या संध्याकाळी परतायचे असेल तर (मला) परतीच्या प्रवासाला (पावच गोळी घेतली असूनसुद्धा) पुन्हा गोळी घ्यावी लागत नाही. ९ड. अ‍ॅव्होमीनला पर्याय म्हणून (झोप टाळण्यासाठी) स्टेमेटिल वापरून पाहिली पण काही उपयोग झाला नाही. अ‍ॅव्होमीनला (प्रोमेथाझाईन) पर्याय सापडला नाही. ९इ. वाहन लागणे हा आम्लपित्ताचा विकार नाही. त्यामुळे त्यावरचे उपाय इथे चालत नाहीत. ९फ. होमेपदीचा उपाय करून पाहिलेला नाही. डिस्क्लेमर: हे प्रयोग मी माझ्यावर केलेले आहेत. ते इतरांना जसेच्यातसे सूट होतील असे नाही. पण करून पाहण्यात काही धोका नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

वॉव!!!!

तुषार काळभोर
Mon, 04/15/2013 - 17:47 नवीन
धागा नविन असताना का नाही हे सांगितलं??? जेन्युईन गाडी लागणारे आहात तुम्ही! र. च्या. क. ने. गाडीमध्ये बसताना शक्य तितके मध्यभागी बसणे आणि नजर व ध्यान समोर ठेवणे (मी समोर जाणार्‍या गाडीकडे बघत राहतो), याने त्रास पुर्णतः बंद झाला आहे. कधी ट्रॅफिक जाम असेल तर मलमळतं पण १० महिन्यात उलटी नाही झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>>>नविन असताना का नाही हे

प्यारे१
Mon, 04/15/2013 - 18:46 नवीन
>>>>नविन असताना का नाही हे सांगितलं??? कारण काँग्रेसचे समर्थकसुद्धा 'सबुरी'चेच नि हेच धोरण वापरतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

धागा नवीन असताना सगळे टीपी

नितिन थत्ते
Mon, 04/15/2013 - 21:32 नवीन
धागा नवीन असताना सगळे टीपी करत होते म्हणून तेव्हा नाही दिला. आता जरा सिरिअस चर्चा चाललेली दिसली म्हणून आता प्रतिसाद दिला. ता. क. - रोज ऑफीसला जाणार्‍या बससाठी अ‍ॅव्होमीन कामाची नाही. पण सवयीने ती बस लागेनाशी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

उलट अनुभव

दादा कोंडके
Mon, 04/15/2013 - 20:09 नवीन
पोट रिकामे असावे हा उपाय मात्र योग्य आहे.
मला क्वालेज पर्यंत बस लागायची. बसमध्ये उलटी होइल म्हणून काहिही खायचो नाही. पण त्यामुळे अधिकच डोकं दुखून मळमळाय लागायचं. उलट एके दिवशी जेवण केल्यावर अचानक प्रवास घडला आणि त्रास झाला नाही. तेंव्हा पासून कधिही त्रास झाला नाही. त्यामुळे प्रवासाआधी अगदी तडस लागे पर्यंत खात नाही पण थोडं खाउनच प्रवास करतो. खरंतर आता पोट रिकामं असं कधी नसतंच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

गविचा अ‍ॅनॅलिसिस बरोबर आहे

संजय क्षीरसागर
Mon, 07/09/2012 - 18:59 नवीन
डोळे आणि कान यांच कोऑर्डिनेशन शरीराच्या सतत हालण्यामुळे मिसमॅच होतं त्यामुळे चक्कर आल्याचा फिल येतो आणि प्रार्थमिक संरक्षक योजना म्हणून शरीर पोटातलं अन्न बाहेर फेकतं. एक सिंपल उपाय करा, प्रवासापूर्वी कमीतकमी खा आणि प्रवासात इयरप्लग्ज वापरा एकादिवसात तुमचा त्रास थांबेल. रोज संध्याकाळी आणि सकाळी उठल्यावर, बसून पिंगा* घाला (उजवीकडून डावीकडे) त्यानं हे कोऑर्डिनेशन सुधारतं काय फरक पडला ते इथे जरुर कळवा * शरीराचा वरचा भाग चक्राकार फिरवणं (तुम्ही बसलेले असल्यानं चक्कर येणार नाही)
  • Log in or register to post comments

ईअर प्लग्जनी या यंत्रणेला

गवि
Mon, 07/09/2012 - 19:13 नवीन
ईअर प्लग्जनी या यंत्रणेला काही फरक पडेलसे वाटत नाही. कानांनी ऐकणं आणि बॅलन्ससिस्टीम ववेगवेगळ्या आहेत. बाकी उपाय योग्य...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

वर प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारे कोऑर्डिनेशन शक्य होतं

संजय क्षीरसागर
Mon, 07/09/2012 - 21:07 नवीन
एक, डोळे मिटून किंवा दोन, कान बंद करुन. डोळे फार वेळ बंद ठेवण्यापेक्षा कान प्लग करणं सोपयं. बॉडी बॅलन्सींगच्या आपल्या क्षमतेला सिक्स्थसेन्स म्हटलय ती यंत्रणा कानाच्या अस्थी साखळीशी रिलेटेड आहे त्यामुळे इयरप्लग्ज काम करतील. नुसतं समोर स्थिर बघून देखील बॅलन्स साधतो पण ते दीर्घकाळ शक्य होत नाही, जरा इकडची तिकडची चाहूल घेण्याचा प्रयत्न झाला की पुन्हा इंबॅलन्स होतो तस्मात इयरप्लग्ज बेस्ट, ट्राय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तरीही

गवि
Tue, 07/10/2012 - 11:17 नवीन
विनम्र असहमती.. कानाची "ऐकण्याची" सिस्टीम आणि बॅलन्स सिस्टीम या आपापतः एकाच जागी असल्या तरी कानावर आवाज पडण्याचा आणि बॅलन्स सिस्टीमचा संबंध नाही. ईअरप्लग्जनी कान बंद होतील ते आवाजासाठी/हवेसाठी. कानाच्या मधल्या भागात असलेला तीन वक्राकृती हाडांचा संच त्यातल्या द्रवाच्या हालचाली आणि केसांसारखे बारीक सेन्सर्स यांच्या मदतीने शरीराची पोझिशन समजून त्याचे सिग्नल मेंदूकडे पाठवतो. बाह्यकर्ण बुचाने बंद करुन अर्थात आवाजाची किंवा हवेची कानात एंट्री थांबवून या अंतर्गत यंत्रणेला काही फरक पडणार नाही. डोळा मात्र थेट दृश्यसंकेत टिपून मेंदूला पाठवतो.. अशा वेळी डोळा बंद करण्याने तो सिग्नलच ब्लॉक होतो आणि गोंधळ टळतो.. तेव्हा कान ईअरप्लगने बंद करणं हे या प्रक्रियेसंदर्भात डोळे बंद करण्यासारखं (इक्विव्हॅलंट) नाहीये.. तुम्ही सांगितलेली हालचाल मात्र यासाठी जरुर उपयोगी पडत असेल कारण कानातील त्या हाडनलिकांमधल्या द्रवात तयार होणारे गाळसदृश कण सेन्सर्सना बिघडवतात आणि संदेशात गडबड होऊन चक्करल्यासारखं होतं. डोक्याच्या काही ठराविक हालचाली सुरक्षितपणे / सुपरव्हिजनखाली करुन हे गाळाप्रमाणे खाली सेटल झालेले कण वेगवेगळे (डिस्पर्स) करता येतात आणि त्यांचा एकत्रित तीव्र परिणाम कमी करता येतो असं वाचलं आहे. काहीजण तर अशा हालचालींनी हे कण / सूक्ष्म खडे त्या कॅनाल्सच्या बाहेर ढकलू शकत असल्याचाही दावा करतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

>कानावर आवाज पडण्याचा आणि बॅलन्स सिस्टीमचा संबंध नाही

संजय क्षीरसागर
Tue, 07/10/2012 - 11:41 नवीन
अरे, असा संबंध आहे. ती सिस्टम ध्वनीनं उद्दिपित होते त्यामुळे जितका गोंगाट कमी तितकी सिस्टम रिसेट व्हायला मदत होते (कारण तेवढं इरिटेशन कमी). डोळे बंद होऊ शकतात पण कान सदैव ओपन असल्यामुळे कानावर आपल्या नकळत ध्वनींचे अविरत आघात होत असतात. कधीही इयरप्लग्ज वापरुन पाहा तुम्हाला शांत वाटेल, या शांततेतनं ते कोऑर्डिनेशन सुधारतं असा ज्यांना तो उपाय सुचवलाय त्यांचा अनुभव आहे. त्यांना प्रयोग तर करुन पाहू दे, नंतर त्यांचा अनुभव बघूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

(लेख लागणे)

सुनील
Mon, 07/09/2012 - 20:59 नवीन
तर.... मागील सोमवारी मी नवीन संस्थळावर रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी एका आयडीने जायचो. या नविन ठिकाणी मला नव्या आयडीची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'लेख लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ लेखापुरता मर्यादित नाही. काथ्याकूट, कविता, पाकृ पर्यंत काहीही लागते, जिलब्या खाऊन वा न खाता, वैदिक उपचार करून वा न करता कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्‍याचदा १-२ वाक्यातच त्रास होतो, तर क्वचित कित्येक क्रमशः सुद्धा मला त्रासरहित लेख वाचता येतो. तर असा त्रास का होतो? त्यावर काय उपाय करता येतात? (लेख लागण्यावरचे इनो घेणे इ. उपाय मला लागू पडलेले नाहीत.)
  • Log in or register to post comments

एखाद्या

कुंदन
Tue, 07/10/2012 - 00:55 नवीन
एखाद्या चांगल्या संपादकाला दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

(लेख लागणे)

परिकथेतील राजकुमार
Tue, 07/10/2012 - 12:32 नवीन
मा. सुनील शेठ, तुम्हाला हा त्रास प्रत्येक वेळी लॉग-इन केल्यावरती जाणवतो, का फक्त बुधवारी रात्री वैग्रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

गवि महाराज की जय!!!

तुषार काळभोर
Tue, 07/10/2012 - 20:22 नवीन
आज जाताना अन येतानापण डोळे गच्च मिटून घेतले आणि कमी त्रास झाला. प्रवासादरम्यान थोडं पोटात ढवळत होतं, पण आज सहनशक्तीच्या मर्यादेत होतं. आता उद्या क्षीरसागरसाहेबांनी सांगितले तसे करतो (पण डोळे मिटून!). इयरप्लग्ज ऐवजी एयरफोन वर गाणी ऐकत बसतो. बघू दोन्हीचा काही एकत्रित फायदा होतो काय!! तर.... १ तासाच्या असह्य प्रवासातून बर्‍यापैकी सुटका करण्यासाठी मदत करणार्‍या सर्वांचे (विशेषतः गवि) आभार! जे सुदैवी या त्रासापासून अनभिज्ञ आहेत, त्यांचे अभिनंदन!!
  • Log in or register to post comments

मला आश्चर्य वाटतं...

अर्धवटराव
Tue, 07/10/2012 - 21:27 नवीन
तुम्हाला हा त्रास फार पुर्वीपासुन होतोय, आणि वर सांगितलेले उपाय कुठलिही स्पेशल ट्रीटमेण्ट न देणारे सहज साधे असे आहेत. तुम्हाला पुर्वी हे कुणिच सुचवलं नाहि? बस लागण्याचा इतका त्रास होणारा व्यक्ती प्रवासात आपसुक डोळे बंद करुन गप पडुन राहिल, अगदी सहज प्रतिक्रिया आहे ति. आणि त्यामुळे त्याला बरं वाटलं तर आणखी नेटाने प्रयत्न करेल... तुमची लिंक कुठे तुटली असावी? अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

पैलवानाच्या ओकारीची डायरी....

चौकटराजा
Wed, 07/11/2012 - 06:52 नवीन
पैलवान, तुम्ही हा काहींच्या मते टुकार धागा काढला व काहींच्या " ज्वलंत" प्रश्नाची दखलही तुमच्या धाग्याने घेतलीय. आता यातून अफगाण डायरी, अ‍ॅन फ्रॅंकची डायरी, या धर्तीवर आपण " पैलवानाच्या ओकारीची डायरी" असे पुस्तक काढा. प्रकाशनाचा व्यवसाय करणारा आय डी इथे असेल तर त्याला पकडा. दोघानाही अनुक्रमे लेखक व प्रकाशकाचे एखादे मेडल मिळून जाईलही ! कुणी सांगावे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मळमळायला लागलं की तोंडात

रेवती
Wed, 07/11/2012 - 01:11 नवीन
मळमळायला लागलं की तोंडात बर्फाचा खडा ठेवावा असे म्हणतात पण रोज बर्फ कसे मिळणार म्हणून हा उपाय सुचवत नाहीये. ;) बाकी मिपाकरांच्या प्रतिक्रिया वाचून गेलात तरी मळमळ थांबेल.
  • Log in or register to post comments

जितेंद्रिय

मराठे
Wed, 07/11/2012 - 02:03 नवीन
बसमधे पेट्रोल किंवा डिझेलच्या वासाने काही जणांना मळमळतं! असं होत असेल तर नाक मुठीत धरून बसण्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे वर म्हटल्यांप्रमाणे, डोळे, कान आणि आता नाकही बंद करून बस मधे बसावं ! पंचेंद्रियांपैकी तीन बाद झाली. आता राहिले स्पर्ष आणि स्वाद. बसमधे काही खाण्यासाठीतरी तुम्ही तोंड उघडण्याची काही शक्यता नाही. त्यातून लिमलेटच्या गोळ्यांची गुळणी तोंडात घेऊन बसलातच तर खाली उतरल्यानंतरच तोंड उघडा, नाही तर बसमधे पुन्हा रंगपंचमी व्हायची. राहता राहिला स्पर्ष! बरं, पैलवान तुम्ही , त्यामुळे तुमच्या अंगाला हात लावायची कोणाची टाप असणार! (तुम्ही कोणाला हात लावायला गेलात आणि त्यातून काही राडा झालाच तर मंडळ जबाबदार नाही) थोडक्यात बसमधे बसल्यानंतर कोणताही अवयव खिडकीतून बाहेर काढू नये म्हणतात ना! तसंच तुम्ही तुमच्या सगळ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा !! म्हणजे थोडक्यात आदिभौतिक बशीतून प्रवास करता करता तुम्हाला डायरेक आध्यात्मिक पियच्डीचा अभ्यास करता येईल की हो! अधिक माहिती साठी मिपावर चिक्कार जितेंद्रिय आहेतच!
  • Log in or register to post comments

पैलवानश्री अभिनंदन!

संजय क्षीरसागर
Wed, 07/11/2012 - 11:16 नवीन
आज पहिल्यांदा फिडबॅक पाहिला नाही तर संकेतस्थळावर सल्ला मागितला जातो पण उपयोग झाला किंवा नाही ते कळवलं जात नाही. तुमच्या अनुभवाचा अनेकांना फायदा होईल. तुमच्या प्रश्नावर मी देखील विचार करत होतो पण क्लू मिळत नव्हता, गविनं एकदम जिनीअस आणि अचूक कारणमिमांसा केली त्याचं कौतुक आहे. इयरफोन वापरणार असाल तर चाललेलं गाणं लक्षपूर्वक ऐका त्यानं एकाच वेळी डायवर्शनही होतं आणि तोल रहायला मदत होते. बॅलन्स रिस्टोअर होण्यासाठी घरात उलटं चालणं (बॅक वॉक) सकाळ- संध्याकाळ रोज दहा मिनीटं आणि वर सांगितलेलं रोटेशन करा तुमचा त्रास संपेल
  • Log in or register to post comments

एकदा पालखी करुन बघा.

कवितानागेश
Wed, 07/11/2012 - 14:07 नवीन
एकदा पालखी करुन बघा.
  • Log in or register to post comments

खांदा तुम्ही देणार का? नै

शिल्पा ब
Wed, 07/11/2012 - 14:09 नवीन
खांदा तुम्ही देणार का? नै म्हणजे पालखी उचलायला पालखे लागतात ना म्हणुन आपलं विचारलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

नाही. मी इतकी कनवाळू

कवितानागेश
Wed, 07/11/2012 - 14:18 नवीन
नाही. मी इतकी कनवाळू नाही. मी फक्त माझे मौलिक विचार फुकट वाटते. बाकी कुणासाठी काहीही करत नाही. त्यांचे ते बघतील अजून ४ पैलवान.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पालखीसाठी चार कशाला, दोन भोई

सूड
Wed, 07/11/2012 - 14:38 नवीन
पालखीसाठी चार कशाला, दोन भोई पुरतील की माऊ. फक्त पालखी चांगल्या मजबूत लाकडाची बघा म्हणावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अस्से क्काय? मला माहित

कवितानागेश
Wed, 07/11/2012 - 15:23 नवीन
अस्से क्काय? मला माहित नव्हते. आमच्याकडे नै ना पालखी. :( त्य पालखीला खाली २ चाके बसवून घेतली तरी बरे पडेल. ( ४ नकोत. लागतील) १ भोई सुट्टीवर गेला कि दुसरा हातगाडीत कन्व्हर्ट करेल पालखी. त्या थ्रीडी वाल्याला बोलवा रे कुणीतरी पालखी कम हातगाडीच्या डिझाईनसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आयला कधीही आले तरी कोणी ना

कवटी
Wed, 07/11/2012 - 14:28 नवीन
आयला कधीही आले तरी कोणी ना कोणी ओकून हा धागा पयल्या नंबरात आणलेला असतोच.... सारखा हा धागा बघुन अम्हाला हापिसात बसल्या बसल्या डुचमळायला लागतय आणि अता खुर्ची लागेल का काय असे वाटतय.... संपादकांनी हा धागा लवकरात लवकर वाचनमात्र करावा.
  • Log in or register to post comments

अग...अप्प्प्प्प् ..दी

प्यारे१
गुरुवार, 07/12/2012 - 11:46 नवीन
अग...अप्प्प्प्प् ..दी ग्ळूकक्क्क... ख -ग्ळू.. रं -बो ललात... ब्ळॉक्क्क्क्क्क्क्क्क! वॉSSSSSSक. - <अतृप्त आत्मा.> ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी

उपाय म्हणजे प्रवासाची सवय !

आर्य
गुरुवार, 07/12/2012 - 16:08 नवीन
माझ्या काही मित्रांना / मैत्रीणींना हा त्रास होता किंवा कहींना कमी जास्त प्रमाणात अजुनही आहे. रिक्षा / दुचाकी / विमान यांना लागत नाही पण सर्व प्रकारच्या (खासगी / सरकारी - अगदी शिवनेरी किंवा ऐरावत दर्जाच्या मल्टी-एक्सेल देखील) बस लागायच्या. विमान उतरताना / बंपी असेल तर ऐक दोनदा त्रास झालेला बघीतलाय, तिरुपतीचा घाट उतरताना हमखास......काय तेदृष्य बस थांबवून बाया ओकतायत नुस्त्या. माझ्या सहकार्‍याला प्रवासात वाचले की गरगरते. या वर उपाय म्हणजे प्रवासाची सवय .............. ३ वर्षापुर्वी बेंगलोरला असताना (आता मुंबईत) रोज / शनिवार-रविवारी जवळपास फिरायला न्यायचो, अर्थातच जबरदस्ती 'कर्नाटक एस्टीने'. वाटेत गप्पा गोष्टी करायच्या, गाणी एकाची पण उलटीचा विचार येऊ द्यायचा नाही, अवोमीन ची गोळी किंवा चुरमुरे खाणे उपयुक्त आहे. वाचन, चित्रपट पहाणे / गेम्स टाळा. ' प्रेशर ' (लधवी / संडासचे) असल्यास प्रवास करुन नका नाहितर तुमची पालखी वर जाणार हे नक्की. बस जरा बर्‍या दर्जाची पाहुन बसणे. हलका आहार " तेलकट नाही "तसेच प्रवासा पुर्वी आणि नंतर आइसक्रीम उपयुक्त आहे. थोडी गंमत - शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या खुर्चीला / बाकाला / बस मधल्या सिटला पाय लाऊन हालवा .....मग बघा असे उलटी वाले लोक बाहेर जाऊन येतात ......नाहीतर तुम्हाला बाहेर काढतात कि नाही ते.
  • Log in or register to post comments

एस टी बसला नावे ठेवण्यामागे

आशु जोग
Fri, 04/12/2013 - 15:53 नवीन
एस टी बसला नावे ठेवण्यामागे एक कावा आहे यामुळेच इतर खासगी बसवाल्यांचे फावते. गर्दीच्या काळात तर दीड दोन पट महाग करतात तिकिट. आम्हा विदर्भवाल्यांना xता वोल्वो, xराणा ट्रॅवल्स लुटतात. आणि गरीबरथमधे गरीबांची गर्दी. त्यातही जागा मिळत नाही
  • Log in or register to post comments

खाजगी बस लागत नाही?

नितिन थत्ते
Fri, 04/12/2013 - 17:59 नवीन
खाजगी बस लागत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

यस टी ला नवे ठेवण्यामागे

श्री गावसेना प्रमुख
Sat, 04/13/2013 - 08:47 नवीन
यस टी ला नवे ठेवण्यामागे आवळ्याचे पाकीटे विकनार्यांचा कावा आहे,यस टी ज्याला लागते तो हमखास आवळा घेतो.
  • Log in or register to post comments

आवळा....सॉरी सॉरी....आवरा!

आदूबाळ
Sat, 04/13/2013 - 11:42 नवीन
आवळा....सॉरी सॉरी....आवरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

बस ,लेख ,आणि आयडिपण लागतात

कंजूस
Mon, 04/15/2013 - 12:08 नवीन
बस ,लेख ,आणि आयडिपण लागतात .मूळ मुद्यावर येतो . हैंड सैनिटाझर ,विमचे पाणी ,अथवा कोका कोला यामध्ये रुमाल भिजवून नाकाशी धरून पाहा . बसच्या सीट कवरर्समध्ये एक प्रकारची बुरशी असते तिचा संपर्क आपल्याच हाताने नाकातोंडाशी होतो आणखी बसचे विचित्र हलणे भर घालते .या बुरशीची काहींना फार अॅलर्जी असते . कोका कोलातील फास्फोरिक अॅसिड अथवा विम पाउडरमधले ट्रायसोडिअम फॉस्फेट काम करेल .
  • Log in or register to post comments

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 11/28/2014 - 16:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा