(वालचंद इंजिनियरिंगला मास्तरकी केलेला आणि मायक्रोप्रोसेसर शिकवून विद्यार्थांकडून कौतुकाचे चार शब्द घेतलेला)
रंगराव !!
वालचंदला मीही पार्ट टाईम मास्तरकी केलेली आहे !!! (तशी मास्तरकी आमच्या रक्तातच आहे गेल्या चार पिढ्या ).
व्यनि पाठवतो.
-- सर्किट
एक अभिमान वाटावा असा अनुभव!
शिक्षक विद्यार्थी हे नाते असेच असते. आज कधी कधी वाटते की जर शाळेतले शिक्षक आज भेटले तर तेव्हा केलेल्या उपदव्यापांबद्दल, टिंगली बद्दल ठेवलेल्या टोपण नावांबद्दल चक्क पाय धरुन माफी मागावी आणि म्हणावे की चूक झाली, आमच्या मनात असे काही नव्हते पण त्या वयाचा दोष म्हणून हातुन असे घडले.
तात्या -- ह्या बाबतीत आपण दोघे एकाच नावेचे प्रवासी आहोत. माझीही आई निवृत्त शिक्षिका आहे आणि कुठून कुठून जुने विद्यार्थी भेटायला येतात.
आई अमेरिकेत आली की इथल्या विद्यार्थ्यांचे ही फोन येतात, शाळेच्या आठवणी काढतात.
आता आई शाळेत शिकवत नाही पण काही जुने विद्यार्थी त्यांच्या मुलांना घरी ट्यूशनला घेऊन येतात की तुम्ही घरी तरी ह्याला / हिला शिकवाच :)
तात्याराव,
आपल्या आईचा फोटो पाहिल्यावर मला माझ्या आईची आठवण आली.
"असता जवळी दुनियेतली दौलत जरी
तू असता आम्हा काय जरूरी
अगे,आई
कमलमुखी तू सुंदर असता
रूप तयाचे कसे वेगळे"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
तात्या,आपण आपल्या आईचा अनुभव सुंदर शब्दात सांगितलात.शिक्षकदिनानिमित्त माझ्यातर्फे त्यांना माझ्याही शुभेच्छा द्या !असे अनेक क्षण माझ्याही आयुष्यात आले आहेत.अश्यावेळी असे वाटते की सर्व काही पैशानी विकत घेता असे मानणार्यांना तुच्छतेने म्हणावे,'पहा,हे सुख तुम्हाला मिळते कां ते?'आयुष्य धन्य मानावे असे वाटणारा तो क्षण !
माझी आई पण शिक्षिका आहे.
आईच्या हाताखालुन गेलेले विद्यार्थी आजही घरी येतात आणि तीला शिक्षक दिनाची भेट देऊन जातात.
त्यातील काही विद्यार्थी खुप मोठे झालेत पण वाकुन नमस्कार करतात(लाज वाटुन न घेता) खुप छान वाटत ते पाहुन.
:)
तात्या खरच खुप छान आहे हो हा अनुभव तुमच्या आईचा.
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
प्रतिक्रिया
मी पण !!!
अरे वा, तुम्ही सुद्धा वालचंदवासी?
वा तात्या!
साक्षी महाराजांशी सहमत
एकाच नावेचे प्रवासी
आपल्या आईला दीर्घायुष्य लाभो
धन्यता वाटणारा दिवस !
माझी आई पण