वा.. फार छान वाटलं असेल नं असे जुने विद्यार्थी भेटून? आम्ही पण जायचो काही शिक्षकांना भेटायला.. पण पूर्वीचे शिक्षकही वेगळे अन विद्यार्थीही!
बाकी, साडी एकदम सुरेख आहे! :)
शिक्षकाना जुने विद्यार्थी भेटायला येणे हाच एक सुंदर अनुभव असतो.
आणि यशस्वी विद्यार्थी हे गुरुचे स्वप्न असते. गुरुचे तेच यश असते
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
सुंदर अनुभव तात्या. तुमचा उर पण आईबद्दलच्या अभिमानाने फुलुन आला असेल.
या वयात असे आठवण ठेउन आले की फार आनंद होतो वयस्कर लोकांना, अहो म्हातारपणी आपला काही उपयोग नाही, आपले आता वय झाले अश्या काही विचारांनी त्यांना वाईट वाटत असते. असे क्षण म्हणजे आयुष्यातल्या कर्तुत्वाची आठवण करुन देणारी सध्याच्या दु:खाला विसरवणारी अन मनावर अलगद फिरणारी मोरपिसंच !
मलाही माझ्या शाळेत असलेल्या "मुळे" बाईंची आठवण आली.
त्याही अत्यंत प्रेमळ होत्या, व खुप छान शिकवायच्या.
आजही आठवण आली की डोळे पाणावतात.:( :(
गुरुर ब्रम्हा, गुरुर विष्णु ,
गुरुर देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रंम्ह ,
तस्मैसी गुरु देवता....
तात्या,
>>>"मला आयुष्यात लाखो कऱोडो रुपये काही मिळवता आले नाहीत परंतु ही साडी आणि हा जो पुष्पगुच्छ आहे ना, त्याची किंमत माझ्याकरता करोडो रुपायांपेक्षाही अधिक आहे, अनमोल आहे!"
निशब्द्च केले
:)
मनाला हर्षित करणारा अनुभव.
मला अजुन ही आठवते, शाळा सोडुन खुप वर्ष झाली तरी रस्त्यात अचानक आमच्या ८ वी. तील वर्गशिक्षिका भेटल्या होत्या, आणि त्यांनी मला खांद्यावर हात ठेवुन विचारले होते काय ग, कशी आहेस.?
तेव्हा मी त्यांना विचारले होते तुम्हाला मी आठवते अजुन :)
आणि मा़झे डोळे भरून आले होते. :)
अतिशय सुखद आहे हे.
एका शिक्षेकेला ४० वर्षांनंतर आपल्या विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारची गुरूदक्षिणा मिळणं म्हणजे शिक्षकी पेशाचा हा सन्मान आहे.
हा सन्मान आपल्या आईंना लाभला. धन्य ती शिक्षिका आणि धन्य ते विद्यार्थी.. :)
आवांतर : काल प्रतिसाद लिहिला होता. पण त्याचे बहुतेक नुसतेच पूर्वपरिक्षण केले गेले .. प्रतिक्रिया प्रकाशित करा..केलेच नाही असे वाटते.. असो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
तात्याशेठ,
खरेच! तुमच्या आईंसाठी फारच संस्मरणीय दिवस.
वाचुन आनंद झाला.
(_/\_)केशवसुमार
बाकी तुम्ही म्हणता ते खरय आपली पिढी खरोखरच नशिबवान..आपल्याला डिव्होटेड शिक्षक लाभले
(कृतज्ञ)केशवसुमार
किंबहुना यामुळेच 'कुपुत्र जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति' असे संस्कॄत सुभाषितकार म्हणून गेले आहेत.
या लेखात पुत्र आणि माता हा संदर्भ नसून विद्यार्थी आणि शिक्षक हा संदर्भ आहे!
आपला,
(मनोगतींना पुरून उरलेला!) तात्या.
शीर्षकातील म्हातारी या शब्दाचा अर्थ काय? विद्यार्थी की शिक्षक?
तो माझ्या म्हातारीचा अनुभव आहे म्हणून तसे शीर्षक फक्त ठेवले आहे!
लेखाचा विषय हा 'विद्यार्थी - शिक्षक' असाच आहे हे एकतर आपण बेअक्कल असल्यामुळे आपल्याला समजले नसावे किंवा आपण एक नंबरचे मिसळपावद्वेष्टे मनोगती असल्यामुळे तसे आपल्याला समजून घ्यायचे नसावे! आणि म्हणूनच आपण मुद्दाम खोडी काढण्याकरता ते संस्कृत सुभाषित टाकले आहे!
असो, मी फालतू मनोगतींशी कुठलाही वाद घालू इच्छित नाही. आपली संस्कृतची ट्यँव ट्यँव ट्यँव तिकडे मनोगतावर जाऊन करा!
यापुढील या संदर्भातले आपले सर्व प्रतिसाद उडवले जातील!
तात्या.
कुपुत्रो जायेत ह उल्लेख शंकराचार्यांच्या देव्यपराधक्षमापन स्तोत्रात आहे.हे स्तोत्र गेय आहे.
आईला(जगन्मातेस) उद्देशून केलेली केलेली आळवणी छान आहे.
अर्थात या लेखासाठी हा संदर्भ किती योग्य आहे अथवा नाही हा विसोबा आणि आजानुकर्ण यांचा आपापसातला वाद चालू द्या.
या स्तोत्राचा शेवट फार छान आहे.
मत्समं पातकी नास्ती
पापघ्नीं त्वत् समा नही
एवं ज्ञाता महादेवी
यथा योग्यं तथा कुरु.
चूभू धोंडोशास्त्रीं सारख्या पंडीतांनी दुरुस्त करावी.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
अहो दुधात साखरे सारखे मिसळुन जा. मिठाचा खडे का टाकताय?
जाऊ द्या हो आनंदराव, सोडून द्या!
आम्हीही यापुढे आजानुकर्णाचे प्रतिसाद एक मानसिक आजार समजून सोडून देऊ. मनावर घेणार नाही..!
४० वर्षांपूर्वीचे काही विद्यार्थी त्यांच्या शिक्षिकेला भेटतात, हातात हात घेऊन प्रेमभरे, "बाई, तब्येतीची काळजी घ्या हां!" असे म्हणतात, हा वास्तविक त्या शिक्षिकेकरता जसा कृतकृत्याचा क्षण तसाच त्या विद्यार्थ्यांकरताही अभिमानाचा क्षण, कृतज्ञतेचा क्षण! आणि फक्त हेच मी या लेखात सांगायचा प्रयत्न केला होता/आहे. असे असताना त्यात प्रतिसाद देऊन 'कुपूत्र' किंवा 'कुमाता' हे विषय मुद्दाम आणले गेले या विकृतीकरता राहून राहून वाईट वाटले!
अजून काय लिहू?
तात्या.
काल आपल्या मिपाचे लेखक विनायक प्रभू यांचे खास शिक्षक पालकांसाठी व्याख्यान घाटकोपरच्या विद्याभवन शाळेत झाले. पाऊस असूनही दोनशे श्रोते आले होते. त्यात तात्या आपल्या मातोश्रींसारख्या जुन्या शिक्षीका आणि त्यांचे जुने पाल्य आले होते. बाई आणि विद्यार्थीनींची गळाभेट हे बघण्यासारखे दृश्य होते.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
गुरवः सन्ति बहवः शिष्यवित्तापहारकः
दुर्लभः स गुरुर्लोके शिष्यचित्तापहारकः
म्हणजे शिष्याचे वित्त अपहरण करणारे गुरू अनेक आहेत, त्यांना तोटा नाही पण.. शिष्यांचे चित्त अपहरण करणारा गुरू दुर्मिळ असतो.
अभ्यंकरकाकूंच्या बाबतीत वरील सुभाषित चपखल लागू पडते. आयुष्यभर काकूंनी ज्ञानदानाचे जे कार्य नि:स्वार्थीपणे केले त्याला याहून मोठी पावती कुठली असू शकते? हा प्रसंग दुर्मिळ आहे.
केवळ पाट्या टाकायच्या आणि तास भरायचे म्हणून शिकवणारे रग्गड. आज तसेच लोक सर्वत्र भरलेले आहेत. पण विद्यार्थ्यांना आपुलकीने शिकवणारे फारच कमी. काकूंची आपुलकी आम्ही त्यांच्याघरी गेल्यावर प्रत्येकवेळी अनुभवतो. ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत असते. त्या जशा उत्तम शिक्षिका आहेत तशाच उत्तम माणूस आहेत. उत्तम सुगरण आहेत. स्वतःच्या पाकनैपुण्याने बनविलेले उत्तमोत्तम पदार्थ आपुलकीने खाऊ घालणारी माऊली आहेत.
जीवन सार्थकी लागावं, कृतकृत्य व्हावं असा हा क्षण काकूंनी अनुभवला, याचा आम्हांदिकांस अवश्यमेव आनंद आहे. अभ्यंकरकाकूंना आमचा दंडवत.
त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि असाच आनंद मिळत राहो, अशी श्री स्वामीचरणी प्रार्थना.
आपला,
(नतमस्तक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
घोटवीन लाळ, ब्रह्मज्ञान्या हाती | मुक्ता आत्मस्थिती, सांडवीन ||
पंत,
आपण आपल्या अनुदिनीवर अगदी आवर्जून आमच्या म्हातारीबद्दल जे काही आदरयुक्त गौरवोद्गार काढले आहेत त्याकरता आमच्यापाशी शब्द नाहीत!
आहे ती केवळ अन् केवळ कृतज्ञतेची भावना!
आपल्याही मातोश्रींच्या चरणी आमचा दंडवत रुजू करतो!
स्नेहांकित,
तात्या.
तात्या भाय
मस्त अनुभव लिहिला आहे.
समोर विद्यार्थी म्हणुन असलेल्या लोकांचे फोटो पाहिले तर ते जवळपास माझ्या वडीलांच्या वयाचे असावेत.
:)
इतक्या वर्षानी देखील त्यानी केलेल त्यांच्या गुरुप्रती प्रेम उच्चच. आणि हे प्रेम मिळवणारी गुरु देखील.
तुमच्या मातुश्रींच्या चरणांवर आमचा दंडवत घाला आज घरी गेल्या गेल्या. :)
(अवांतर : तेवढाच तात्याचा व्यायामदेखील होइल )
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
तात्या,
आपण सगळे आपल्या शैलीत लिहिल्यामुळे खुपच छान आणि मनाला भावणारे झाले आहे. अभिनंदन.
शिक्षकदिवसाला अगदी आवर्जुन येऊन आपल्या शिक्षिकेचा सत्कार करणार्या आणि असे विद्यार्थी निर्माण करणार्या दोघांनाही माझे मनपूर्वक अभिवादन.
तात्या, आपणही मिपानिर्माण करुन मराठीची अमुल्य अशी सेवाच केली आहे. यात आपल्या आईचा वाटा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष असा दिसतच आहे.
भारतीय संस्कृतीचे गुरु आणि शिष्य असे अभिन्न आणि सुंदर असे अंग आहे त्याचा प्रत्यय आला आहे.
द्वारकानाथ
तात्या,
मनाला भावणारा अनुभव आवडला. शिक्षकांना आपल्या श्रमाचं खरं चीज अशा घडलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीनेच होते.
विद्यार्थ्यांसाठी वाहून घेतलेल्या विद्यार्थीप्रिय शिक्षिकेला, माझ्याही शिक्षणदिनाच्या शुभेच्छा !!!
-दिलीप
वा तात्या,मनाला स्पर्शून जाणारा अनुभव! काकूंना इतके जुने विद्यार्थी आवर्जून भेटायला आल्याचे पाहून धन्य वाटलं असेल आणि त्या हृद्य क्षणांचा साक्षीदार म्हणून तुलाही ..
आपली पिढी खरंच भाग्यवान की आपल्याला असे डिव्होटेड शिक्षक लाभले,
स्वाती
चाळीस वर्षांपूर्वीचे विद्यार्थी शोधाशोध करून आपल्या बाईंना शोधायला आले याचे कौतुक वाटले. विद्यार्थ्यांच्या आठवणीत अनेकानेक वर्षे राहणार्या बाईंचेही.
गोष्ट वाचून परवा एक आज्जी भेटल्या होत्या त्याची आठवण झाली. दुपारी कुठे चाललात म्हटलं तर 'चष्मा दुरुस्तीला टाकलाय, तो घ्यायला' म्हणाल्या. नंतर चष्मा कसा मोडला वगैरे गोष्ट सांगून म्हणाल्या, "आता तो चष्म्याच्या दुकानातला मुलगा, सेल्समन गं, मला म्हणाला, 'मिस, या वेळेला दुरुस्त करून देतो पण परत मोडून नका.' 'मिस' म्हणतो अजून. तो प्राथमिक शाळेत माझ्या वर्गात होता. वय सहा ते दहा. चार वर्षं. आणि म्हणाला, 'परत मोडू नका, पुढच्या महिन्यात निवृत्त होतो आहे मी.' हा मुलगा, मुलगा कसला आजोबाच! अजून मला मिस म्हणून हाक मारतो." आजींच्या डोळ्यासमोर तो आठ नऊ वर्षाचा मुलगा दिसत असणार. त्या तृप्त चेहर्यानी स्वत:शीच हसत होत्या. मी मात्र मुलगा (!) ६५ वर्षांचा म्हणजे या टुणटुणीत आ़ज्जी कितीच्या असा हिशोब करत होते.
शीर्षकातले ५०/५० :
सुरुवातीला, मला लाभलेल्या चांगल्या नि न-चांगल्या शिक्षकांचे प्रमाण ५०/५० असा काहीसा प्रतिसाद द्यायचा विचार होता. लिहिता लिहिता तो किस्सा आठवला आणि मूळ वाक्य विसरलेच.
उत्तम अनुभव तात्या
शाळेत मलाही असेच तळमळीने शिकवणारे शिक्षक लाभले.
तुमच्या आईला माझा नमस्कार कळवा.
आपला
(तासिका तत्वावर मास्तरकी केलेला आणि 'सर तुमच्यामुळे प्रॅक्टीकल चांगले गेले' हे ऐकल्यावर अपार आनंदी झालेला) गणा मास्तर
आणि हृदय्स्पर्शी अनुभव.
लेख आवडला. मनापासुन आवडला.
दोन्ही; ते शिक्षक/शिक्षिका आणि विद्यार्थी ह्यांचं कौतुक आणि आदर वाटतो.
अवांतरः- माझी म्हातारी आजही दटावुन "वेळेवर झोपत जा. आणि खाण्याची हेळसांड करुन घेउ नकोस." हे जेव्हा दर वेळेला( ती स्वतःच दवाखान्यात ऍड्मिट असताना!)
घरी गेल्यावर सांगते; तेव्हाच खरी अशी दटवुन घेण्याची मजा कळते.
आपलाच,
मनोबा
चाळीस वर्षांनी आपली आठवण काढीत आपले तेव्हाचे विद्यार्थी आवर्जून घरी येतात, भेटतात, बोलतात हा कोणत्याही शिक्षकासाठी असणारा आनंदाचाच क्षण. दिलेल्या भेटवस्तूंचे मूल्य ही बाब गौण.
प्रसंग हृदयस्पर्शी आणि तो मांडला आहे तोही सुंदर रीतीने.
(सद्गदित) सुनील
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
माझी आईपण शिक्षिका होती. माझ्या आणि आईच्या चेहय्रात अगदी चित्रपटात शोभेलसं साम्य आहे. अजूनही मला रस्त्यात अचानक माझ्यापेक्षा १०-१२ वर्षांनी मोठे, अनोळखी लोक थांबवतात, चौकशी करतात माझी, घरच्यांची आणि नंतर जोशीबाईंच्या आठवणी सांगतात, छान वाटतं. नंतर मला माझा आणि आईचा एक संवाद आठवतो.
आम्ही, मी आणि भाऊ, शाळेतल्या बय्राच शिक्षकांना नावं ठेवायचो. आई म्हणायची, "तुमचे आई-वडील शिक्षक आहेत, त्यांना कुणी नावं ठेवली तर?" त्यावर माझं उत्तर तयार होतं, "तुम्ही दोघं वाईट शिकवत असाल तर तुमचेही विद्यार्थी नावं ठेवतील तुम्हाला!" आणि ती त्यावर शांत बसायची, नुसतं हसायची!
आज त्यांच्या शाळा-कॉलेजात गेलं, त्यांचे माजी विद्यार्थी भेटले की जाणवतं त्या नकळत्या वयात आमचा त्यांच्यावर असलेला विश्वास किती सार्थ होता ते!
शाळा-कॉलेजात नाही पण सुदैवाने पुढे विद्यापीठात शिकताना मला खूप चांगले शिक्षक भेटले, आणि आजही माझा त्यांच्याशी इ-संपर्क आहे.
आपल्या मातोश्रींना शिक्षिकेच्या भूमिकेचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले! :)
आपल्या शिक्षिकेची मनापासून आठवण ठेवणार्या त्या विद्यार्थ्यांचेही कौतुक
(आमच्या चौथीतल्या रसाळ बाईंची आठवण झाली. दरवर्षी त्यांच्याकडून तीळगूळ घेत होतो गेल्या दोन भारतवार्यांमधे भेट झालेली नाही. जवळ घेऊन, "कसा आहेस रे बाळा? आयुष्मान भव." म्हणून त्यांनी प्रेमाने डोक्यावरुन फिरवलेला हात हा जन्माची शिदोरी आहे!)
तात्या, आपल्या पिढीला डेडिकेटेड शिक्षक/शिक्षिका लाभले हे खरे आहे. आता ते प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.
(वालचंद इंजिनियरिंगला मास्तरकी केलेला आणि मायक्रोप्रोसेसर शिकवून विद्यार्थांकडून कौतुकाचे चार शब्द घेतलेला)
चतुरंग
प्रतिक्रिया
वा.. फार छान
शिक्षकाना
सुंदर अनुभव
मन गहीवरुन आले....
वॉ...
हेच म्हणते तात्या..
सुखद अनुभव
छान
वा!!
+१ !
+२
+१
+१
किंबहुना
म्हातारी?
शीर्षकाती
'कुपुत्र जायेत् क्वचिदपि कुमाता न भवति'
मिठाचा खडा
जाऊ द्या हो आनंदराव...
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
असेच म्हणतो
+१
सहमत मी पण
मी पण सहमत
सहमत!
कालचा शिक्षक दिन
पैशापेक्षा अनमोल
भाग्य
+१
दुर्लभः स गुरुर्लोके शिष्यचित्तापहारकः
कृतज्ञ!
हृद्य
पंत,
फार ह्रद्य
तात्या,
+१
सुंदर
तात्या
खुपच छान.
असेच
सुंदर अनुभव !!!
छान
वा..
५०/५०
शीर्षक
उत्तम
सुरेख वर्णन
हृदयस्पर्शी अनुभव
माझी आईपण
तात्या, अतिशय हृद्य अनुभव!