Skip to main content

रात्रीच्या पावसाने

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 28/03/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . तुझ्या घरातील काही गळक्या कौलांना वाहून घेऊन आला वाहत वाहत त्या कौलांनी माझ्या घराशी आधार घेतला त्यांनी माझ्या मनाचा नकळत ठाव घेतला . . पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही? . काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला . येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा ना? राख उडवतो आणि निखारे भडकावतो . खरचं काल रात्रीच्या पावसाने खूपच गोंधळ केला |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२८/०३/२०१३)
काव्यरस

वाचने 2739
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

आधी दूष्काळ...आता पाऊस :).....छान आहे :)

'काल रात्रीच्या' ऐवजी 'काल रात्री' असा किंचित बदल करुन कविता वाचली आणि मग अधिक आवडली.

मिका, तोडलंस मित्रा... कमाल म्हणजे प्रचंड कमाल आवडली कविता...
येतांना बरोबर वाऱ्याला घेऊन आला विझणाऱ्या निखाऱ्यांना धग देऊन गेला अन् वरची राख तेवढी उडवून गेला . . वारा तरी कसा ना? राख उडवतो आणि निखारे भडकावतो
व्वाह वा !

पाणी वाहते असले तर किती गोष्टी धुतल्या जातात नाही? >>> छान !!

नो मिका दादा .... नाहि ........ खुपच वरवर वाटलं ... कुठल्याच ओळीत काहिच नसल्यासारखं सॉरी ....

सारे अंगण मनासारखेच भिजवून गेला भिजल्या मनाने भिजल्या अंगणात जीव कासावीस झाला अंगणातून कुंपणाजवळ धावाधाव करत राहिला . . घरांना कुंपण असणे किती आवश्यक असते नाही?
आणि फक्त या ओळीच अर्थगर्भ. कदाचित बाकिची कविता मला कळली नसेल. .