मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भान

आतिवास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
गोधूळ लेऊन देह मनावर अक्षरांची तरली आण. आकाशाने उचलून घेता तरारले मग अवघे रान. पंचम पंचम मध्यावरती सुरेल, हळवी नाजूक तान. जपले आहे मुठीत इवल्या अव्यक्ताचे अफाट भान.

वाचने 2197 वाचनखूण प्रतिक्रिया 9

ऋषिकेश 01/04/2013 - 13:43
वा! (का कोण जाणे) भान पेक्षा 'अव्यक्त' असे नाव हवे होते असे वाटले (अर्थात नामयोजनेचा अधिकार फक्त कवियित्रीलाच हे मान्य आहेच.. हे फक्त मत)

In reply to by ऋषिकेश

आतिवास 01/04/2013 - 16:10
'अव्यक्त' हेही शीर्षक चांगलं आहे. अनेकदा कवितेचं शीर्षक भुईतून आपोआप उगवून येतं (म्हणजे कवितेबरोबरच)! - पण काही वेळा ते होत नाही. कविता आधी येते आणि शीर्षक शोधावं लागतं. ही कविता या दुस-या प्रकारातली आहे. :-)

सस्नेह 01/04/2013 - 22:40
हेच शीर्षक शोभते. कविता फारशी कळली नाही, पण अखेरचे कडवे भावले..

In reply to by सस्नेह

आतिवास 02/04/2013 - 08:11
कविता मलाही क्वचितच कळतात - अगदी मी लिहिलेल्याही :-) कविता आवडण्याशी/ न आवडण्याशी मतलब - अशी मी स्वतःची अनेकदा समजूत घातली आहे!!

इन्दुसुता 02/04/2013 - 05:03
"पंचम पंचम मध्यावरती सुरेल, हळवी नाजूक तान." हे आणि शेवटचे कडवे अतिशय आवडले.

मिसळलेला काव्यप्रेमी 02/04/2013 - 08:14
सुंदर अ‍ॅबस्ट्रॅक्ट अभिव्यक्ती...

आतिवास 02/04/2013 - 12:32
ऋषिकेश, यशोधरा, लीमाउजेट, स्नेहांकिता, इन्दुसुता, मिसळलेला काव्यप्रेमी - सर्वांचे आभार.