गोधूळ लेऊन
देह मनावर
अक्षरांची
तरली आण.
आकाशाने
उचलून घेता
तरारले मग
अवघे रान.
पंचम पंचम
मध्यावरती
सुरेल, हळवी
नाजूक तान.
जपले आहे
मुठीत इवल्या
अव्यक्ताचे
अफाट भान.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2200
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!
'अव्यक्त' हेही शीर्षक चांगलं
In reply to वा! by ऋषिकेश
भारी!
फार छान.
अव्यक्त
कविता कळणे!
In reply to अव्यक्त by सस्नेह
"पंचम पंचम
सुंदर
आभार