. . . . . . . . . . .
. . . . . . . . . . .
राहुनी जागा तरीही, शब्द गेला चोरीला
बाजूनी आल्या आरोळ्या, मीच माझा चोर झालो
खाऊनी आसूड त्यांचे, वेदना बोलूनी गेलो
ओढुनी ओझे तरीही, बेईमानी ढोर झालो
"संपले नाते जगाशी " - सांगताना मीच भ्यालो
बेरकी नजरेत त्यांच्या, मी पुन्हा शिरजोर झालो
. . . . . . . . . . . . .
. . . . . . . . . . . . .
वाचने
1877
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरवात व
सुरवात व शेवट नसलेली म्हणण्या ऐवजी शेंडा बुरखा ,आगा पीछा नसलेली कविता असे म्हटले असते तरी चालले असते ना! :)
या अगोदरच्या ओळी
राहुनी जागा तरीही, शब्द गेला चोरीला
बाजूनी आल्या आरोळ्या, मीच माझा चोर झालो
या अगोदरच्या ओळी
झोपे मधुनी जागा झालो ;उठलो मी मोरीला
पाय घसरुनी फरशीवरती उलटा मी पार झालो
अशा येवु शकतील
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत