गाथा 'टायटन' ची - Heritage Collection
टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.
ही व्यक्ती होती अभिजीत बनसोड.
कराड येथे मेकॅनिकल इंजिनीयरींगची पदवी व National Institute of Design मध्ये पुढील पदवी मिळवणार्या अभिजीत यांना टायटनने कायमस्वरूपी सामावून घेतले.
टायटनमध्ये काम करण्यास सुरूवात केल्यानंतर तब्बल पाच वर्षे वेगवेगळ्या प्रकाराच्या घड्याळांचा अभ्यास करून, पाश्चिमात्य शैलीप्रमाणे घड्याळे बनवण्याऐवजी 'भारतीय विविधता' घड्याळांमधून टिपण्याचा प्रयत्न म्हणजेच 'हेरीटेज कलेक्शन'. तौफिक कुरेशींच्या एका दिमाखदार कार्यक्रमामध्ये या सुरेख घड्याळांनी बाजारपेठेमध्ये प्रवेश केला.
ऐतिहासीक वारसा आणि कलाकृतीं अत्यंत रेखीवतेने टिपणार्या या घड्याळांचे उत्साहात स्वागत झाले.
हेरीटेज कलेक्शनच्या प्रत्येक घड्याळामागे "Designer Abhijit Bansod" हे ठळकपणे कोरून टायटनने अभिजीत बनसोड यांचा केलेला सन्मानही विरळाच!
हेरीटेज कलेक्शनच्या लोगो पासून पॅकींग मटेरीयल पर्यंत सर्व बाबींवर खास लक्ष दिले गेले.
या भागामध्ये इतकेच.
प्रत्येक घड्याळामध्ये अनेक छोट्या गोष्टी कलात्मकतेने सजवल्या आहेत. सहज सापडण्याजोग्या..
तुम्हालाही सापडतीलच!
******************************************************
माहिती व चित्रे http://www.studioabd.in यावरून. माहिती व छायाचित्रांसाठी अभिजीत बनसोड यांचे आभार.
******************************************************
भाग १ - गाथा 'टायटन' ची - टायटन एज्
******************************************************
'गाथा टायटनची' समाप्त.
प्रतिक्रिया
क्या बात है !
xylys
कराड येथे मेकॅनिकल
आयला ते जंतरमंतर इंस्पायर्ड
मला अजंठा आणि कोणार्क आवडले.
लय भारी
Pagination