महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या मित्रांशी गेल्या आठवड्यात मुद्दाम एक विषय काढुन संवाद साधला - त्या त्या ठिकाणी असणा-या पाण्याच्या उपलब्धतेचा विषय ! पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा !!! अंगावर शहरा आणणारी माहिती मिळाली. महाराष्ट्रातला दुष्काळ किती भीषण आहे याची कल्पना फक्त बोलण्यातून मला समजली. रोज अनुभवत असतील त्यांची परिस्थिती किती भयाण असेल याची कल्पना करवत नाही. आमच्या नाशिक मध्ये किंवा पुण्या मुंबईत आज पाणी उपलब्ध आहे. आणखीही काही भागात महारIष्ट्रात असेल. त्यामुळे आम्हाला पाणी नसण्याची परिस्थिती लक्षात येत नाही. माणसाना पाणी प्यायची मारामारी आहे. खायचे वांदे आहेत मग गुरांना कोण विचारणार ? रात्री हळूच माणसे गुरे रस्त्यावर सोडून देतात. एका रात्रीत त्यांना बेवारस ठरवतात. माणसे अशी वागतात हे मी स्वत: अनुभवलंय. नाशकात झालेल्या कुंभमेळ्यात. गेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. कित्येक चेंगरून मेले. बरेच जखमी झाले. बातमी समजताच आपल्याकडून काही मदत व्हावी म्हणून सिव्हिल इस्पितळ गाठलं. हाहाकार उडाला होता. बहुतेक सगळे वयोवृद्ध. मेलेल्यांकडे फारसे लक्ष देणं शक्यच नव्हतं. जखमींना काही हवे नको बघणं. त्यांच्या खाण्याची व्यवस्था. पांघरायची व्यवस्था. वगैरे. एक व्यवस्था अचानक उद्भवलि. लाखोंच्या त्या बाजारात नाशिक बहुतेकांना नविनच. ताटातूट झालेल्या आप्ताना एकमेकांना जोडून द्यायची व्यवस्था. सगळ्यात अवघड व्यवस्था होती ती. घरचा फोन नंबर माहिती नाही. बरोबर आलेल्या आप्तांचा मोबाईल नंबर माहिती नाही. जवळपास छदाम नाही. असे काही होते ज्यांना हिंदी येत नव्हते आणि त्यांची भाषा कोणती हे समजत नव्हते. त्यांची स्थिती केविलवाणी होती. बऱ्याच जोड्या जमविल्या. पण काहींच्या शेवट पर्यंत जुळल्या नाहीत. त्या दोनचार दिवसात एक भीषण अमानवी, अत्यंत पाशवी सत्य समजलं आणि हादरलोच !!!! काहींच्या जोड्या जमत होत्या पण जमू दिल्या जात नव्हत्या. कुंभमेळा हे काही लोकांसाठी आपल्याला नको असलेल्या घरच्या वृद्धांना गर्दीत बेवारस टाकून देण्याचेही ठिकाण आहे याचा मी पुरावा आहे. देवदर्शनाचे आमिष दाखवुन घरातले तरुण आपल्या अत्यंत अडाणी म्हाता-यांना कुंभमेळ्यात घेऊन येतात आणि त्या लाखोंच्या गर्दीत सोडून देतात. आयुष्यभर घरचा उंबरठा न ओलांडलेल्या त्या माईला तिचे गांव कुठल्या राज्यात आहे हे ही सांगता येत नव्हतं !!!!!! गुरांना रात्रीतून बेघर करणारे जरा कमी निर्दयी ! या बेवारस गुरांची व्यवस्था काही ठिकाणी सरकार करते आहे. गुरांसाठी महाराष्ट्र सरकारने छावण्यांची व्यवस्था केली आहे. छावण्यांमध्ये पाणी आणि चा-याची व्यवस्था सरकारने केली आहे. …… पण छावण्यात तरी प्यायला पाणी मिळेल या भरवशाने आता काही ठिकाणच्या छावण्यांमध्ये माणसे चोरून राहत आहेत ……….!
महाराष्ट्रातल्या कित्येक गावात आज आठ दहा दिवसातून येणारी पाण्याची गाडी तिथल्या जनतेला तडफडण्या पासून आज दूर ठेवते आहे. गाडी आली की घागरी बरोबर झिंज्या आणि झुंबड असे चित्र हमखास आहे. काही ठिकाणी पंधरा दिवसांनी एकदा तास दोनतास नळाला पाणी येते…! आमच्यासाठी दुष्काळ ही अनेकापैकी एक टीवीवरली फक्त सनसनाटी बातमी आहे, Channel बदलले की संपून जाणारी. किमान शंभर मित्रांचे वा परिचितांचे फार्म हॉउस असतील. माझ्या एकट्याच्या संबंधितांचे सरासरी एक एकरचे फार्म तरी नक्की असेल. म्हणजे एकूण किमान शंभर एकर तरी नक्की जमिनीवर मजेसाठी गुलाब फुलताहेत, शोभेची झाडे लावली आहेत. शोभेचे गवत आहे. उन्हाळ्यातही हे सारे हिरवे गार आणि रंगी बेरंगी आहे. विकेंडला -सुट्टीच्या दिवशी मजा करायची, पार्टी करायची एव्हढाच त्याचा वापर आहे. त्यासाठी किती पाणी वापरले जात असेल ? हे सगळं पाणी, गाडी धुण्याचे पाणी, शॉवरमध्ये अंघोळ न करता बादलीने आंघोळ केल्यामुळे वाचणारे पाणी, संडासात पांढ-या टाकीतल्या पाण्याने फ्लश न करता टमरेल वापरून आवश्यक तेव्हढेच फ्लश केल्यामुळे वाचलेले पाणी …. जर वाचवलं तर किती माणसं गुरांच्या वाटणीचे पाणी पीत छावणीत न राहता आपल्या घरी राहतील ? आणि, बाय द वे, नाशिकपासून दुष्काळ किती किलोमीटर म्हंजे छावणी किती दिवस दूर असेल……?
वाचन संख्या
8492
प्रतिक्रिया
46
मिसळपाव
प्रतिक्रिया
भीषण पण सकारात्मक.
लेखातील प्रसंग वाईट वाटायला
दुसरी बाजू
In reply to लेखातील प्रसंग वाईट वाटायला by रेवती
अज्याबात नाही.
In reply to दुसरी बाजू by कपिलमुनी
म्हातार्या माणसांबद्दल काही
In reply to दुसरी बाजू by कपिलमुनी
पाण्या बाबत दुसरि बाजु
In reply to म्हातार्या माणसांबद्दल काही by रेवती
नाय बा! लै मोठा विषय आहे तो!
In reply to पाण्या बाबत दुसरि बाजु by मराठी_माणूस
काळजी
In reply to नाय बा! लै मोठा विषय आहे तो! by रेवती
नाय वो, म्हातारबुवा आणि
In reply to काळजी by कपिलमुनी
पयल्यांदाच ?
In reply to नाय वो, म्हातारबुवा आणि by रेवती
काशीबद्दल माहित होतं पण इतर
In reply to पयल्यांदाच ? by कपिलमुनी
कुंभमेळ्यात नकोशा झालेल्या
+१
In reply to कुंभमेळ्यात नकोशा झालेल्या by आतिवास
+१
In reply to +१ by दादा कोंडके
आमच्या नगर जिल्ह्यात तर कायमच
अगदी सहमत. मलाही हेच सांगायचं
In reply to आमच्या नगर जिल्ह्यात तर कायमच by शिल्पा ब
नगर जिल्ह्याच्या अकोले
In reply to आमच्या नगर जिल्ह्यात तर कायमच by शिल्पा ब
जोग साहेब नगर जिल्ह्यामध्ये
In reply to नगर जिल्ह्याच्या अकोले by आशु जोग
किमान पश्चिम महाराष्ट्रात
या विषयावर बोलणे म्हणजे
+११११११११११११११११११११११११११११
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
सहमत.
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
एक राहिलं
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
शहरी लोक अज्ञानीपणा करतात तो
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
दुर्दैवाने खरं आहे.
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
फक्त इतकेच नाही, प्रचंड पैदास
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
हेच लोक वृक्षतोड करतात किंवा
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
अत्यंत generalised statement असणारा प्रतिसाद
In reply to या विषयावर बोलणे म्हणजे by काळा पहाड
+१
In reply to अत्यंत generalised statement असणारा प्रतिसाद by lakhu risbud
दुष्काळाबद्दल लिहिलय ते ठीक
जमीनीवर पडनारा पाण्याचा
नळांमधे कली शिरलाय सगळ्या..
जाऊ द्या हो! असं काय काय़ आणि
कालच सोलापूरला जायचा योग आला.
पाण्याचं कठीन आहे.
दुष्काळी परिस्थिती निर्माण
सरकारदरबारी अनास्था आहे,
कित्येक जिल्ह्यांचे
In reply to सरकारदरबारी अनास्था आहे, by नानबा
आपल्या इथे मुळातच अशी
कारण....
लोकशाही इतकेच ठोस कारण
In reply to कारण.... by दिपस्तंभ
अवघड आहे
दुष्काळी राज्याला आयपीएलची तहान ! :(
लोकांना पण एक फार खाज
In reply to दुष्काळी राज्याला आयपीएलची तहान ! :( by मदनबाण
शिल्पा .....
In reply to लोकांना पण एक फार खाज by शिल्पा ब
>>>ही दादागिरी नाही का ?
In reply to शिल्पा ..... by सुधीर मुतालीक