Skip to main content

भावओली

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 20/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
गहिवरले नभ भिजले कातळ भोर नवीन उगवली वियोगव्याकुळ तरिही मन; का नयने आतुरलेली ? कुंद सभोवर स्तब्ध चराचर प्रतिमा हिरमुसलेली खोल दर्पणी ध्यास एक मज; स्मितरेषा का पुसलेली ? दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली ..............................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3312
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

दुसर्‍या कडव्यातील तिसरी ओळ....न का ... आहे का? खरच अज्ञातकुल , तुम्हे शब्द कोठुन आणता हे आता खरच शोधल पाहिजे. मस्त!

__/\__!!!

छानच.. दूर कुहुक जणु आर्त शोडषी पर कातरलेली गूढ व्यथित आभास स्पंदने पथी विखुरलेली कळे न का असुनी नसलेपण; आभा व्यापलेली भेटीस्तव हुरहुर बहुधा ही; कळा भावओली>> हे विशेष आवडले. ही विरहीण तर प्रत्येकाच्या मनात दडलेली असते च्च. कुणी कितीही नाही म्हणोत ..आणि कातरवेळी ती बर्रोब्बर बाहेर येते न बोलवताच...

In reply to by इन्दुसुता

इन्दुसुता, आपला प्रतिसाद म्हणजे या कवितेतल्या भावनेला मिळालेली एक प्रांजळ पावती आहे. अजून कुणाचीतरी संवेदना अशीच आहे ही जाणीव अतिशय सुखावह आहे. तुमचा "च्च" अतीव महत्वाचा !! मनःपूर्वक आभार :-)

मोहक शब्द, उत्कट भावना. मुजरा शब्दप्रभु!

अप्रतिम काव्य. बरेच दिवसांनी योग आलाय तुमची कविता वाचण्याचा. :)