पद्य विडंबनानसारखा हा नविन 'गद्य विडंबन' साहित्यप्रकार. स्वागत.
पद्य विडंबनांनी तिथे फारच जेरीस आणले होते बाबा. एक कोणती कविता पडायचा अवकाश कि दहा पंधरा मिनिटात त्याचे दोन चार विडंबने आणी "व्वा छान" वाले दहा पंधरा प्रतिसाद पडायचे. तिथलच्या कविंना फक्त प्रेम अन प्रेयसीच आठवायची, आणी तिथलचे ते विडंबन महर्षी प्रेमाच्या जागी दारुचा गुत्ता किंवा गटार अन प्रेयसीच्या जागी दारु टाकुन विडंबने करायचे. सुटलो बाबा मि.पा. मुळे.
बेसन लाडू,
ह्या रेसिपीसाठी आवश्यक खमंग आणि कुरकुरीतपणा ह्यांचा अभाव असल्याने वाचताना धमाल आली नाही. बर्याच ठीकाणी कोण कुठे चाललाय आणि कशाची खिल्ली उडवली जातेय हे जरा कन्फ्युजिंग वाटले. बेटर लक नेक्श्ट टाईम!!
प्रामाणिक मत राग नसावा
-(जयंता५२ फॅन)कोलबेर
कोलबेर साहेब,
अहो कसला राग आणि कसले काय! प्रामाणिकपणाचा आदरच आहे.
असो. पुन्हा एकदा वाचलेत(च), तर कदाचित कन्फ्यूजन दूर होईल आजच्या दिवसात.
(क्रिस्टल क्लिअर)बेसनलाडू
लेख चांगला झाला आहे परंतु बेसनाच्या लाडवाला यापेक्षाही अधिक उत्तम आणि रंगतदार लिहिता येतं असा आमचा विश्वास आहे. लाडवाचा मधुबालेवरचा आणि आज्जीवरचा लेख आमच्या आजही स्मरणात आहे! अर्थात, या लेखांचे विषय सदर लेखापेक्षा पूर्णत: वेगळे होते हे मान्य.
सबब, कोलबेराच्या म्हणण्याशी काहीही सहमती दर्शवून आम्ही पुढील लेखनाकरता बेसनलाडवाला मनापासून शुभेच्छा देतो...
आमचेही प्रामाणिक मत, राग नसावा!
आपला,
अनन्ता५३! :)
आज खरं तर आमचा बुधवार! परंतु कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज इथे चक्क ड्राय-डे आहे, त्यामुळे आमची काळ्या कुत्र्याची आज कुठेच सोय झाली नाही! नेहमीच्या ठिकाणी खरं तर तसा प्रॉब्लेम येत नाही परंतु त्या हाटेलाचा मालक आज नेमका बाहेर गेला होता! :(
तात्पर्य, म्हणूनही कदाचित बेसनलाडवाच्या लेखाची आम्हाला वाटायला पहिजे होती तेवढी गंमत वाटली नाही! :)
असो,
या काळ्याकुत्र्याने विठ्ठलाचं काय घोडं मारलं आहे कुणास ठाऊक! :)
आपला,
(बुधवार चुकल्यामुळे आता शनिवारपर्यंत बोंबललेला!) तात्या.
हे दुसर्या एका लेखाचे वाक्यशः विडंबन आहे म्हणून गमतीदार आहे. या विषयावर स्वतंत्र विनोदी लेखन लिहायला घेतले असते तर तुम्ही वेगळी रचना केली असती असे वाटते.
वा बे.ला. वा !!!
विडंबनाला पद्याच्या जोखडातून मुक्त केल्याबद्दल अभिनंदन !
लेख खूपच आवडला !
आणि मुख्य म्हणजे, फक्त मूळ लेखाचेच नव्हे, तर त्याला आलेल्या प्रतिसादांचे देखील संदर्भ छान टाकले आहेत.
उदाहरणार्थ, हे बघः
मस्त, छान वगैरे 'देसी' दाद देण्यापेक्षा ***लेले अमेरिक ऍक्सेन्ट मारून मिळालेली कूल, ऑसम् ही दाद जास्त मोलाची नाही का?
काय बाण सोडला आहे ! वा !!!
- सर्किट
पुन्हा एकदा कन्फ्युज केलेस बाबा
'बाय द वे ही ऍक्सेन्टवाली 'दाद' पण स्वानुभूतीच बरे का! :)
काही कळले नाही रे! माझ्यावरचा बाण निदान मला तरी ए़ंजॉय करू दे की! :)
(ईंडीयन बॉर्न कन्फ्युज्ड देसी) कोलबेर
ऍक्सेन्टवाली दाद ही येथे अमेरिकेत तरी नवीन नाही; अनेकदा स्वतः अनुभवली आहे. त्यामुळे स्वानुभूती म्हटले इतकेच.
बाकी सर्कीटकाकांनी बाण योग्य लक्षाकडे वळवला आणि तुम्हाला एन्जॉय करायची इच्छा आहे, हे वाचून बरे वाटले. म्हटले नव्हते तुमचे कन्फ्यूजन आजच्या दिवसात दूर होईल म्हणून?
(स्वानुभूत्युपकृत)बेसनलाडू
अवांतर - तुमच्या आधीच्या कन्फ्यूजनमुळे या प्रतिसादातील तुमची सही प्रथमदर्शनी (इनबॉर्न कन्फ्यूज्ड देसी) अशी वाचली. क्षमस्व.
(देसी)बेसनलाडू
ऍक्सेन्टवाली दाद ही येथे अमेरिकेत तरी नवीन नाही; अनेकदा स्वतः अनुभवली आहे.
म्हणजे बर्याच जणांना ऑसम् म्हणताना ऐकले आहे. असेच का? मी पण ऐकले/ऐकतो म्हणूनच सदर लेखाला 'अनुरूप' अशी दाद ह्याच शब्दाने द्यावीशी वाटल्याने दिली हो. आता त्यात तुम्हाला माझा चांदण्यात न्हालेला ऍक्सेंट कुठे दिसला ते कळले नाही बाबा!
तसेच हा बाण सर्किटकाकांनी वळवण्याआधीच समजला होताच हो.. कन्फ्युजन त्याचे नव्हते.. पण लेखामध्ये कोण कुठे राहते आहे आणि कुठे चालले आहे ह्याचे कन्फ्युजन झाले होते. मुलाची आई/आईची मैत्रीण कॅलीफोरनियात आहेत मुलगा शिकायला भारतात चालला आहे असेच ना? मग जाताना वडिलांसाठी जॅक डॅनियल घेउन जातो म्हणजे वडिल भारतात का? इ.इ. असे कन्फ्युजन झाले. आणि खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणासुद्धा न आल्याने एकूणच रेसिपी फसली एवढेच आमचे मत हो. तसे तुम्ही उत्कृष्ट लिखाण करता ह्या तात्यांच्या मतांशी आम्ही सहमत आहोत हा!
तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऍक्सेन्टवर का ओढवून घेताय बॉ?! ऑसम्, कूल् वगैरेंमधले चांदण्यात न्हालेले ऍक्सेन्ट ऐकायला ते तुमच्याच तोंडून ऐकायला हवेत, असे थोडेच आहे? तुमच्या ऍक्सेन्टबाबत आमचे मत, अनुभव शून्य. सबब, आम्ही त्यावर काही कमेन्ट करू इच्छितच नाही.
फॉलमध्ये युनिवर्सिटी चालू होणे, स्प्रिंगमध्ये चालू होणे, मग दोन दिवस बंद राहून पुन्हा समर सेमेस्टर वगैरे प्रकार भारतात नाही बॉ! तिथल्या युनिवर्सिट्या दिवाळी, स्वातंतत्र्यदिन, नाताळच्या सुट्ट्या अशा वेळी ठराविक दिवस बंद असतात; बाकी सदासर्वकाळ या ना त्या कारणाने चालू असतात. पोरगा वेगळ्याच राज्यात शिकायला, आईबाबा वेगळ्याच राज्यात वास्तव्यास/कामास (एकत्र/वेगवेगळे) असे अमेरिकेतच दिसले बॉ! आणि मग सेमेस्टर संपल्यावर स्वतःच्याच आईबाबांच्या घरी येताना पाहुण्यासारखे भेटवस्तू वगैरे घेऊन येणे!
(अमेरिकास्थित, अमेरिकाशिक्षित)बेसनलाडू
पोरगा वेगळ्याच राज्यात शिकायला, आईबाबा वेगळ्याच राज्यात वास्तव्यास/कामास (एकत्र/वेगवेगळे) असे अमेरिकेतच दिसले बॉ!
काय सांगताय ? भारतातल्या कॉलेजात होस्टेल कशाला असते मग ?
आणि मग सेमेस्टर संपल्यावर स्वतःच्याच आईबाबांच्या घरी येताना पाहुण्यासारखे भेटवस्तू वगैरे घेऊन येणे!
खरंच ? हे भारतात दिसले नाही तुम्हाला ?
अहो, मग पंचविशीत कसले आत्मचरित्र लिहिताय ? अधिक अनुभवी व्हा आधी !
- (अचंभित) सर्किट
भारतातील युनिवर्सिट्यांची हॉस्टेले, खाजगी कॉलेजांची व संस्थांची हॉस्टेले, इतकेच काय पी जी म्हणून राहणारे सगळ्या प्रकारचे मित्र होते कंपूत, आताही आहेत. पण तिथले वसतिगृहातले जीवन आणि अमेरिकेतले यातला फरकही कळलाच इकडे आल्यावर; चांगलाच जाणवला. सुटीत घरी जाताना भेटवस्तू घेऊन जाण्यातली आत्मीयता आणि औपचारीकता/परंपरा/रिवाज न कळण्याइतकेही आम्ही अननुभवी नसल्याने आत्मचरीत्र नक्कीच लिहू शकतो, असे वाटते.
(अनुभवी)बेसनलाडू
तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऍक्सेन्टवर का ओढवून घेताय बॉ?! ऑसम्, कूल् वगैरेंमधले चांदण्यात न्हालेले ऍक्सेन्ट ऐकायला ते तुमच्याच तोंडून ऐकायला हवेत, असे थोडेच आहे? तुमच्या ऍक्सेन्टबाबत आमचे मत, अनुभव शून्य. सबब, आम्ही त्यावर काही कमेन्ट करू इच्छितच नाही.
ठीक. नाही घेत ओढवून. पण हे सुद्धा तुम्हीच म्हणाला होतात त्याचे काय मग??
बाकी सर्कीटकाकांनी बाण योग्य लक्षाकडे वळवला आणि तुम्हाला एन्जॉय करायची इच्छा आहे, हे वाचून बरे वाटले.
तसेच मूळ कथेचे हे वाक्यशः विडंबन असल्याने मूळ कथेतील मुलगा जसा शिकायला/नोकरीला अमेरिकेला जातो तसा विडंबनातील मुलगा भारतात जायला हवा ना? तरच त्याला भेटायला आईवडील भारतवारी काढणार.
आणि मुलाला आलेले डिप्रेशन; त्याला आवश्यक असलेला चेन्ज , तसेच जुन्या विचारांच्या सासूसासर्यांना भारतात परत टाकणाए इ. नाटकी, फिल्मी कारणे लेखातच नमूद केलेली आहेत. पुन्हा लेख वाचलात तर बरे होईल, असे वाटते.
(सूचक)बेसनलाडू
शिव्यांचा डेटा अपडेट करावा लागेल बहुदा :-) (त्यातच आज ड्राय बुधवार ;-)) चांदण्यांचे डीकोडींग खूप डोके फोडूनही झाले नाही.
सर्किटकाकांचा डेटा मात्र अपडेटेड दिसतोय त्यांना डिकोडींग जमलेले दिसते. :-)))
-कोलबेर
प्रतिक्रिया
चालू द्या
हाहाहा
विडंबन
नाही जमले!
राग नाही, दुर्दैव
चांगला..
अवांतर -
खि खि खि
विडंबन म्हणून छान
फारच सुंदर
नशीब!
लाडवा
बाण
ऍक्सेन्टव
पुन्हा चूक!
काय ?
भारतातील युनिवर्सिट्यांची हॉस्टेले
लिहाच
तुम्ही
स्ट्रिअपरशी डायवोर्स
डेटा अपडेट
अरे व्वा