Skip to main content

२६/११ - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 04/03/2013 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
राम गोपाल वर्माचा २६/११ सिनेमा पाहिला .. - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य आहे हे ! अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत. d उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत. १) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग .. रक्तपात अंगावर काटा उभा करतात. २) कसाबाची भूमिका - उत्तम . हा अगदी खरा खरा कसाब वाटतो. केवळ त्याच्यासाठी सिनेमा बघायला हरकत नाही . hm ३) इतर शहीद पोलिस अधिकारी करकरे , साळस्कर , - फार कमी फ़ुटेज ४) एन एस जी कमांडो , मेजर उन्नी कृष्णन - सिनेमात नाहीतच . ५) नाना पाटेकरने साकारलेली जोइंट कमिश्नर राकेश मारिया यांची भूमिका -अतिसामान्य बाकी तात्पर्य काय - शून्य. दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य कसाब नाना ला सांगतो - काफ़िरांना मारल्या वर जन्नत मिळते . अस कुराणात लिहील आहे. शिणुमात या डायलोग मध्ये कुराण साठि "अल किताब" असा शब्द वापरला आहे. अल किताब म्हण्जे कुराण हे मुस्लिमाना माहित असतं हिंदुना माहित नसत. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांना ते कळत नाही . असो . तर कसाब नाना ला त्याची भूमिका सांगतो .- दिन (इस्लाम धर्म ) खत्र्यात आहे. त्यावेळी जिहाद करायला पाहिजे अस ' किताब ' मध्ये लिहिलेलं आहे. काफिर लोकाना जिहाद करून ठार मारले कि जन्नत (स्वर्ग) मिळते. स्वर्गात हूर (पर्या ) मिळतात . त्या दुधान अंग धुतात . जिहाद मध्ये जिंकलो तर गाझी आणि मेलो तर शहीद वगैरे वगैरे ... अशी शहादत मला मिळवायची आहे. आणि हे सगळ " अल किताब " मध्ये लिहील आहे बर का !अणि मग शेवटी राम गोपाल वर्मा स्टाइल रियलिस्टिक शिव्या - साल्या काफर ***** - पाच अक्षरि मकारी शिवी ज्याच्या शेवटी द येतो . हायला भलताच रियालिस्टिक सिणुमा बाई ! शिव्या म्हण्जे रियालिटी असे ज्यांना वाटते त्यांनी आवर्जून शिणुमा पहावा . yty आता ह्यो सगळा सेन्सोर मध्ये पास कसा व्हायचा ? मंग नाना पाटिकर कासाबला इस्लाम चा खरा अर्थ सांगतो. च्यायला आता मात्र अति होतं ..... पाक मध्ये जन्मलेल्या . त्या धर्माच्या धार्मिक संस्कारात घडलेल्या. ट्रेनिंग झालेल्या कासाबला इस्लाम चा खरा अर्थ माहित नाही. ... मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो. आणि मग .... मग काय एकदम कासाबला भडभडून येत ... कासाबला वाटु लागत हायला चुकलच कि - मग फासावर जाताना तो लहान बालकाप्रमाणे मुळू मुळू रडतो . कारण कि नाना सांगतो ना त्याला -- अरे जन्नत सोड --- जहन्नुम (नर्क) च्या दारावरचा सैतान सुद्धा तुझ्या **वर लाथ मारून हाकलून देईल. ** हा परत एक राम गोपाल वर्माचा ग कारी दोन अक्षरि रियालिस्टिक शब्द... हायला ! आता एव्हढी रियालिटी तुमच्या पचनी पडत असेल .. तर नाना पाटेकरचे ओव्हर एक्टिंग ने भरलेले इस्लामवरील प्रवचन तुम्ही मुळातूनच ऐकल पाहिजे. इथे प्रवचनात स्तुती करताना मात्र कुराण अल्लाह असे कळणारे शब्द येतात . ना - ना पाटेकर कासाबला सांगतो - तू कुराण वाच - तू कुराण वाचलेच नाहीस. इथे मात्र मी हसून हसून लोटपोट झालो होतो. च्यायला जगातल्या सर्व धर्मांचे खरे अर्थ वगैरे सांगण्याची जवाबदारी आपण कधी सोडणार आहोत.? कासाबला कुराण चा खरा अर्थ सांगण्याची जवाबदारी स्वीकारलेला नाना ...... हल्ल्याच्या वेळी रडताना .. भांबवलेला वगैरे दाखवलाय .. नानाचे पोलिस दल रडताना घाबाराताना आपण सिनेमातही पाहू शकता .. कारण त्यावेळी कसाबाचे धार्मिक प्रवचन त्याच्या एके ४७ मधून घडत असते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 15325
प्रतिक्रिया 86

प्रतिक्रिया

मुंबईवरील ताज / ओबेरॉय वगैरे ठीकाणांवरील हल्ला संपल्यावर जेव्हा कोण कसं मेलं ह्याचा पंचनामा सुरु झाला तेव्हा एका पंचतारांकित हॉटेल मध्ये काम करत असणा-या २२-२३ वर्षे वयाच्या तरुण रिसेप्शनीस्ट मुलींना त्यांच्या जवळ जाऊन डोक्यात गोळी घातल्याचे समोर आले होते. ते पाहुन मुंबई पोलिसातले डेअरडेव्हिल अधिकारी सुद्धा ढसाढसा रडले होते असे एका परिचिताकडुन ऐकले होते. सुदैवाने प्रसिद्धी माध्यमांनी संयम दाखवुन हे छापले नाही. मी हा पिक्चर पाहिला नाही, पण त्यात जर पोलिस अधिकारी रडताना दाखवले असतील तर तसं झालंही होतं हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद. पोलिसांनाही भावना असतात. बाकी परिक्षण अजिबात आवडले नाही.

बालिश भाष्याची अजून सेंचुरी कशी झाली नाही?

राजघराणं साहेब, एक नम्र विंनती की असले फुटकळ विषयावर न लिहिता तुम्ही चालु केलेल्या 'बडवा' ह्या लेखाचे पुढचे भाग टाका पटापट....मस्त चालु होती ती मालिका, का बंद केली?

मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो.
ज्वाइंट कमिश्नर सोडा एका इन्स्पेक्टरने दिलेले इस्लामवरचे हे प्रवचन ऐका! -(पुरोगामी पण कडवा नसलेला)सोकाजी

२६/११ पाहिल्यांनतर म्युनिक (हो Steven Spielberg चा) आठवला. (मोदकाने ह्या घटनेबद्दल इथे Munich Massacre... लिहून ठेवलय). दोन्ही चित्रपट दहशतवाद्यांनी केलेल्या विध्वंसावर आणि गडबडलेल्या, हतबल प्रशासन/ पोलिस यंत्रणा ह्यांच्या प्रतिसादावर आहेत आणि त्यामुळेच त्यांची तुलना केल्यावाचून राहावत नाही. नुसत्या काळ्या ब्याग्राउंड आणि शिव्या घालून सवंगतेवर चांगला चित्रपट होऊ शकत नाही. सखोल निरीक्षण, प्रसंगात खोल शिरायची वृत्ती, काम करण्यातले झपाटलेपण तुमच्या कृतीत दिसले पाहिजे जे २६/११ मध्ये अजिबात दिसत नाही. १. रामू ने स्वतः घटनास्थळी जाऊन सगळ्यागोष्टी जवळून पाहिल्या होत्या त्यामुळे प्रसंगात खोल शिरायची त्याला चांगली संधी होती. २. मातब्बर स्टारकास्ट घेऊन काम करत असल्याने, त्याला नानाला अजून चांगले वापरता आले असते असं वाटतं. एकूणात, न्युनिक पुढे खूप आव्हाने असून (आंतर देशीय राजकारण, जर्मनीवर दोषारोपण वगैरे) एक सुंदर चित्रपट झालाय त्याउलट २६/११ ने जखमांवरच्या खपल्या काढण्याव्यतिरीक्त फारसं काही केलय असं वाटत नाही.

In reply to by उपास

उपास राव स्टीवन स्पीलबर्ग व रामू ह्यांची मुळात तुलना कशाला करायची , खुद्द हॉलीवूड वाले चारवेळा विचार करतील. रामू चा प्रयत्न चांगला होता. मागे भारताचे पाकिस्तानात सांस्कृतिक प्रदूषण असा लेख लिहिला होता. तेव्हा फोर्थ जनरेशन वोरफ़ेअर चा उल्लेख केला होता. आतापर्यंत शीत युद्धाच्या काळात हॉलीवूड सिनेमात बहुसंख्य खलनायक रशियन असायचे, त्यांची जागा आता इस्लामी दहशतवाद्यांनी घेतली आहे. समाजात झालेल्या घटनेवर सिनेमे काढणे हा हॉलीवूड चा मक्ता किंबहुना वेस्टन वर्ल्ड चा मक्ता , त्यांचे अश्या सत्य घटनेवर आधारीत सिनेमे पाहिले तर सत्य व कल्पना ह्यांची उत्तम सरमिसळ करून आपल्या जनतेच्या माथी जो संदेश पोचवायचा आहे. तो व्यवस्थित पणे जनतेच्या डोक्यात फिट बसवला जातो , सत्याचा विपर्यास , हे त्याचे खास वैशिष्ट्य किंबहुना आपल्या सोयीचे तेच सत्य ही त्यामागील प्रेरणा असते. भारतीय मुस्लिम जनतेला माथी भडकवणारा विडीयो दाखवून गुमराह करणार्‍यांचे हे तत्त्व असते, आपल्या हाती बॉलीवूड चे माध्यम आहे , आणि तुम्हाला मुस्लिम आवडो किंवा न आवडो त्यांचे अस्तित्व ह्या देशात अटल आहे , तेव्हा त्यांना मुख्य प्रवाहातून लांब ठेवणे म्हणजे पाकिस्तानी हेर संस्थांना आपले भारतात हस्तक निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासारखे आहे. तेव्हा वाटेल त्या मार्गाने मुस्लिम समाजाचे भारताच्या मुख्य प्रवाहात येणे हे त्यांच्या व भारताच्या दृष्टीने मोलाचे आहे , ह्या सिनेमातून कसाब व मारिया ह्यांच्यात फिल्मी संवाद घडवून तोच हेतू साध्य झाला आहे , अजमेर च्या मुस्लिम नागरिकांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे , हे लोण हैद्राबाद मध्ये पोहचले पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचे म्हणजे येथे असा आक्षेप घेतला गेला की मारिया एखाद्या मौलवी प्रमाणे कसाब ला प्रवचन देत असल्याचे दाखवले आहे. ह्यात वावगे असे काहीच नाही आहे , दाउद ची कंपनी आय एस आय च्या नादी लागली व त्यांच्या भारतातील नेटवर्क चा फायदा आय एस आय घेऊ लागली , पुर्वी दाउद ची बातमी देणारे पोलिसांचे खबरी आता आय एस आय च्या धार्मिक चिथावणी ला बळी पडायला लागले . धर्म ह्या अफूच्या गोळी पुढे ते अधीन झाले तेव्हा साहजिकच पोलिसांचे नेटवर्क कमी पडायला लागले , माझ्या मते तेव्हा पासून पोलिसी दलात उच्च स्तरीय अधिकारी इस्लाम धर्माचा ,कुराणाचा अभ्यास करायला लागले , एखाद्या माथेफिरू खबरी किंवा तरुणाचे ब्रेन वॉश झाले असेल तर त्यांच्याकडून बातमी काढून घेण्यासाठी त्यांचे रिव्हर्स ब्रेन वॉश करणे अनिवार्य असते , माझ्या माहितीत आपल्या पोलिसी दलात असे अधिकारी आपल्या कामात निष्णात आहे ,.

पुरोगामित्व दाखविण्यासाठी काढलेला भिकार धागा हेच याचे वर्णन होऊ शकते. मिपाकरांनी त्याला फाट्यावर जागा करून दिलेली असल्याने गर्दी खेचण्यासाठी केलेल्या सवंग विधानांचाही काही उपयोग झालेला नाही. धाग्याने शंभरी सुद्धा गाठलेली दिसत नाही. एकदम बकवास परीक्षण...

इकडे रामुचे बरेच पंखे दिसत असल्यामुळे पुढील प्रतिक्रिया गुंडाळण्यात आलेल्या आहेत. उगीच पंख्यांची घरघर वाढायला नको..

घाबरायचं काय हो? उगाच भांड्याला भांडं कशाला लावायचं? त्याने माझंही मत बदलणार नाही, आणि दुसर्‍यांचंही.. मग निष्कारण वाद का घालावेत?

In reply to by नाना चेंगट

मला वाटते कधीकाळचे मिभो (कुठे गेले कोणास ठाऊक!), त्याला "चुपक्रम" असे देखील म्हणायचे. :-)

तुलना का करावीशी वाटली हे मी वर लिहिलेलेच आहे. मी स्वतः रामूचा पंखा आहे पण ह्या चित्रपटात तो कमी पडलाय असं वाटून गेलं. चित्रपट काढण्याचा उद्देश एक मेसेज देणं, विचार देणं असं काही वाटत नाही (जसा अमीरचे काही पिक्चर्स पाहून वाटतं) निव्वळ एका घटनेचे सादरीकरण केल्यासारखं झालय, ह्यापेक्षा जास्त काहीतरी रामू नक्कीच देऊ शकतो. अमेरीका किंवा तत्सम देश चित्रपटांच्या माध्यमाचा वापर करुन गोष्टी गळी उतरवतात का हा सर्वस्ची वेगळा विषय आहे, पण म्युनिक ची जातकुळीच वेगळी आहे हे खरं!