मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे
पहा तुम्हाला आवडते का
श्रीराम
विसावले मन माझे श्रीराम चरणी
भास मात्र होतो खास माउलींचा मनी
राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई
अमृताची गोडी अनुभवास येई
वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १
नामाचा महिमा आहे अनंत अपार
सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर
मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २.
दिनांचा दयाळू मनाचा मवाळू
तसा माझा सदगुरु नेई पैलपारू
सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३.
जय श्रीराम
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2692
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय श्रीराम!!
छानचं झालयं.
जय श्रीराम!!
सुन्दर
मस्तच !
॥जय श्रीराम॥
खूप छान.
खूप छान.
दिनांचा दयाळू मनाचा मवाळू
ही ओळ मनाच्या श्लोकांमधली आहे असे वाटते.
असो. सुंदर रचना आहे.
सुंदर कवने
जय रामजी की.
अर्धवटराव
धन्यवाद
धन्यवाद
मूळ लिखाणापेक्षा प्रतिक्रियांचा पाऊस जास्त पडतो
म्हणून मला मिसळपाव आवडतो
रचना आवडली
काही ओळी हरिपाठासारख्या वाटल्या.