मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

श्रीराम

अनिल आपटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मिसळपाव साठी रामाचे भजन केले आहे पहा तुम्हाला आवडते का श्रीराम विसावले मन माझे श्रीराम चरणी भास मात्र होतो खास माउलींचा मनी राम नाम घेता वाचे काया शुद्ध होई अमृताची गोडी अनुभवास येई वाल्याचा वाल्मिकी झाला राम नाम घेउनी १ नामाचा महिमा आहे अनंत अपार सारी सारी दुखे विघ्ने पळती फार दूर मोक्षं प्राप्ती होते तेव्हा नाम संजीवनी २. दिनांचा दयाळू मनाचा मवाळू तसा माझा सदगुरु नेई पैलपारू सदगुरुसी स्मरता नित्य राम दूर नाही ३. जय श्रीराम

वाचने 2659 वाचनखूण प्रतिक्रिया 8

अनिल आपटे Sat, 03/09/2013 - 11:31
धन्यवाद मूळ लिखाणापेक्षा प्रतिक्रियांचा पाऊस जास्त पडतो म्हणून मला मिसळपाव आवडतो