माय
माय....
मला सुटता सुटेना
माझ्या लेकराची माडी ..
जोडले घरटे कधी रे
वळखीची काडी काडी..
माझ्या पंखातला चिमणा
नवं घरटं बांधतो ..
वेळ नाही माझ्यासाठी
मला दबकत सांगतो ..
नव्या घरट्यात असल
नव्या चिमणीचे राज्य
बघ माऊलीचे पंख
कसे घायाळ रे आज ..
आज माझच लेकरु
दावी आश्रमाचा रस्ता
कशी आली पहा येळ
आज मावळतीले झुकता
पिल्लाची नवी कोठी
किती मोठी रं असावी?
पण माझ्या अडगळीस
तिथे जागा का नसावी?
प्रभु एकच मागणे
पिल्ला दु:ख न मिळु दे
जरी मिटले डोळे माझे
तरी त्याला न कळु दे ..
सरणाच्या चितेवर
जेव्हा बाळ माझं रे रडेल.
तेव्हा चितेतल्या आगीत रे
माझा देह कळवळेल ..
– कवी पंचम (निशांत तेंडोलकर)
वाचने
1470
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
प्रतिक्रिया
सुंदर रचना.
सुंदर रचना. अजून येउ देत.
माझ्या कवितेला अभिप्राय कळविल्याबद्दल
अजून चांगले लिहण्याचा प्रयत्न करेन ..
कविता छान आहे.
नव्या-नव्या विषयांवरही कविता कराव्यात अशी शुभेच्छा.
सुरेख लिहिले आहे.
मोलकरीण सिनेमाची आणि "देव जरी मज कधी भेटला" गाण्याची आठवण झाली.
घरच्यांना असा त्रास द्यायचा प्रकार स्वातंत्र्यापुर्वी ही होता की, ही प्रथा इंग्रज देशातुन गेल्या नंतर अस्तित्वात आली ?
सुंदर