नवा भगवा दहशतवाद??
नुकतीच ही घटना वाचनात आली आणि मनाला अस्वस्थ करून गेली.
म.प्र.मधील धार येथील भोजशाळा येथे सरस्वतीचे(वाग्देवी) प्राचीन मंदिर आहे. तेथील मूर्ती नेहमीप्रमाणे(?) लंडनमध्ये आहे. मंदिर म्हणे पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे, तरीही १९९३ मध्ये दिग्विजयने तेथे नमाज अदा करायची परवानगी दिली... तेव्हापासून किमान वसंतपंचमीच्या दिवशी हिंदुना तेथे पूजा करायला मिळावी यासाठी शांततामय आंदोलन चालु होते. येत्या शुक्रवारीच वसंतपंचमी येत असल्याने भा.ज.पा.सरकारने नमाजात व्यत्यय नको या उदात्त हेतूने हिंदुना परिसरबंदी केली. त्याबाबत माहिती पत्रकार परिषदेत द्यावी म्हणून नवलकिशोर शर्मा अलाहाबादहून मुंबईला यायला निघाले पण येथे पोचलेच नाहीत.... शोध घेतला तेव्हा ते इंदौरच्या एम.वाय.रुग्णालयात अती दक्षता विभागात असल्याचे कळले... त्यांना पोलिसांनी इतके मारले आहे की ते जगतील की नाही ते सांगता येत नाही... त्यांच्या वकिलांना भेटूही दिले जात नाही... भर म्हणजे त्यांच्या जवळ पिस्तुल व काडतुसे मिळाल्याचा अजब दावा प्रशासन करीत आहे... लक्षात घ्या हे सर्व हिंदुत्वाच्या नावावर निवडून आलेल्या लोकांच्या राज्यात चालले आहे.... नवलकिशोर मृदू भाषी व अत्यंत विनयी आहेत.. त्यांना आता हिंदू आतंकवादी ठरविण्यात येणार काय...??
भोजशाळा प्रकरणाची माहिती येथे वाचण्यास मिळेल...शर्मांची मुलाखतही थोडा शोध घेतला तर सहज मिळेल ती पाहा आणि एका अतिरेक्याला(?) पाहिल्याचे समाधान मिळते का याचा शोध घ्या..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
भोजशाला: इथे पहा
बरं
आणि वसंतपंचमीची पुजा झाली का
वसंतपंचमीची पुजा झाली
वसंत पंचमी साजरी करणे म्हणजे काय?
फोटू
भगव्यापेक्षा तो बराचसा लाल
...
...
@परिकथेतील राजकुमार