Skip to main content

आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांचा हौतात्म्यदिन

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 27/02/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक २७ फेब्रुवारी. आजपासून ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी,हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताकसेनेचे सेनापती हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांना आल्फ्रेड पार्क, अलाहबाद येथे वीरमरण प्राप्त झाले होते. हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2784
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अभिवादन. हा धागा अभिवादनापुरताच मर्यादित रहावा अशी अपेक्षा. वेगळी चर्चा करायला दुसरा धागा काढावा.

चंद्रशेखर आजाद यांना विनम्र आदरांजली. प्रसिद्ध लेखक सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतू नामक अप्रतिम आत्मचरित्रात आझादांच्या हौतात्म्याबद्दल थोडेसे आले आहे. त्यांनी आझादांना शेवटच्या गोळीबारावेळेस पाहिले होते. ते तेव्हा अलाहाबाद युनिव्हर्सिटीत शिकत होते. सायकलवरून जात असताना झाडांआड एक बंगाली पद्धतीचे धोतर घातलेला माणूस इंग्रजांवर गोळ्या झाडताना पाहिला आणि घाबरून ते तिथून पळाले. नंतर दुसर्‍या दिवशीच्या पेपरात पाहिले तर तो माणूस म्हंजे दुसरातिसरा कोणी नसून चंद्रशेखर आझाद होते!!!!!!!!!!!! लै खतरनाक किस्सा. वाचतानासुद्धा कळायचं बंद झालं होतं.

_/\_

हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन