पावसाला बोलवायला हवे आता
पावसाला बोलवायला हवे आता
-------
तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना
तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर
कोरली होतीस
त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या
चक्रव्युहात अभिमन्यु झाला
होता माझा...
-------
अंगणातला पारिजातकही आता फारच
काकुळतीला आला आहे
तुला आठवतं?
पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर
इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ
तुझ्या ओढणीखाली
ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे
.
.
खरचं पावसाला बोलवायला हवे आता
-------
कोसळणाऱ्या धारांमध्ये
खिडकीतुन हात बाहेर काढून
ओंजळीतले छोटेसे तळे
तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर
फक्त निखळ आनंद उरायचा
माझ्या हातात
---------
कुठे दडलाय तो कुणास ठाऊक?
---------
नखशिखांत भिजल्यावर
ओठांवर अडकलेली
तुझ्या केसांची एक चुकार बट
उचलून मी कानामागे सरकवतांना
तुझ्या डोळ्यात फुललेला गुलाब
.
आणि मग त्या गुलाबाचा तो काटा
असा खोलवर गेला होता कि काय सांगू
.
.
स्स... अजुनही बोचतोय..
---------
जातांना तो पाऊस घेऊन गेलीस
निदान त्या पारिजातकाची
समजूत काढून तरी जायचे होतेस...
फारच काकुळतीला आला आहे तो
---------
बस्स
पावसाला बोलवायलाचं हवे आता
|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(२३/०२/२०१३)
वा !
अप्रतिम
+१
वाह !! मस्तच !
अप्रतिम!
साला या मिका मुळे कविता
क्लास !
व्वा!!!!!!!!
नादनक्षी?
मिकाची कविता म्हणजे नेहमीच
मिकाची कविता म्हणजे नेहमीच
खल्ला..............स!!!
ते नादनक्षी अन कुयर्यातला
इतक्या
"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही |
"ना वृत्त ना शब्दजंजाळ काही |
सुंदर !
लाजवाब.. मिका, ही खरी
फर्स्ट क्लास....
त्यातल्या त्यात सरफरोश चं ...
गुड आहे !
लाईक
सुरेख!
सुरेख. अतिशय सुंदर कविता.
+१०००००
+११११११११११
सुरेख!
खरंतर वेगळं काही लिहण्याची
आह्ह्ह!!! नेहमीप्रमाणे क्लासच
फारच आवडली कविता. पराने
सुरेख
लई भारी मिका, खुप खुप धन्यवाद
मिका,
खुप सुरेख झाली आहे कविता....
मिका
सह्ही ....
--^--
वाह..
सुंदर