Skip to main content

मिपा का आवडते

लेखक शुचि यांनी गुरुवार, 21/02/2013 02:55 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत खूप नाही पण थोड्याफार संस्थळांचा अनुभव नक्कीच गाठीशी धरुन आहे. असे साधारण लक्षात आले की प्रत्येक संस्थळाचा एक बाज आहे, वैशिष्ट्य आहे.म्हणजे बघा काही संस्थळे बाळबोध तर काही टवाळ काही अभ्यासू तर काही शिष्ठ व्यक्तीमत्वाची आहेत्आ बाज मुख्यत्वेकरुन त्यात्या संस्थळावरील सदस्यांच्या लिखाणातून, लेख , प्रतिक्रिया वगैरे बौद्धीक ठशातून आलेला आहे. "अ कंपनी इझ अ‍ॅज गुड अ‍ॅज पीपल इन अ इट" च्या चालीवर संस्थळांना देखील सदस्यांनी दिलेला आकार, रुप मिळालेले दिसते. मिपावर आले तेव्हा मिपा जितकं आवडलं त्याच्या शतपटींनी अधिक आता आवडत आहे. आपुलकीची भावना सखोलच होत गेलेली आहे.अभ्यासू लेख, वात्रट प्रतिक्रिया, चर्वितचर्वण करणारे काथ्याकूट, भावस्पर्शी कविता व ललीत, खमंग पाककृती यातून खूप समृद्ध झाले आहे. माझ्याकरता मिपा फक्त "इंटेलेक्चुअल एक्स्टेन्शनच" नाही तर अतीव आपुलकीचे स्थान आहे. किंबहुना ते तसे नसते तर मी इथे आलेच नसते. "शुचिमामी" हे संबोधन कॉइन करणार्‍याचे खरं तर अनेक आभार. एवढं पुराण लावण्याचं कारण - हे ऐकायला आवडेल की मिपा तुमच्याकरता काय आहे आणि तसे का आहे? तसेच मिपा अधिकाधिक वेलकमिंग/वॉर्म होण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? (आम्ही डायरी लिहीत नाही हे उत्तर चालणार नाही ;) ) अजून एक मुद्दा - खरड फळा व सदस्यातील परस्पर संबंध हे मिपाचे शक्तीस्थान आहेच पण अन्य कोणती शक्तीस्थाने आहेत?

वाचने 16463
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

मला मिपावर काय आवडतं?? ह्म्म्म्म्म.. एक तर इकडे असणारा मनमोकळेपणा, वय, स्थळ कशाचंही बंधन न ठेवता मुक्तपणे चालणारा संवाद, गंभीर धाग्यांवरही येणार्‍या वात्रट प्रतिक्रिया आणि त्यांवर मनमुराद हसून मिळणारा निखळ आनंद... :)

कारणं शोधली नाहीत, अगदी आधीही मिपावर होते, मध्यंतरी बरेच काळ वाचनमात्र होते, पण मिपा सोडून कधी गेले नाहीये. :)

In reply to by प्रभाकर पेठकर

वेळ मिळत नसल्याने इतर संस्थळांचा (मनोगत वगळता, तिथूनच तात्यांनी ओढून इथे आणून सोडलं) अनुभव नाही. मिपासदस्य झाल्यापासून वेळ फारच कमी पडतो आहे. अजून एक राहिलंच, आपण किती म्हातारे झालो आहोत हे मिपावर॑ कळतं, आरसाच म्हणाना.

जेव्हा दिवसभर काम करुन मेंदुचा भुगा होतो, तेव्हा आम्ही मिपा चा रस्ता पकडतो.

पूर्वी इथे बरेच चांगले चांगले लेख वाचायला मिळायचे (आता तितकेसे नसतात), लहर आली की एखादं विडंबन टाकता येतं, भटकंतीचे लेख वाचायला मिळतात, मध्येच सुरु होऊन मध्येच बंद पडलेल्या कोकणी क्लासेसमुळे थोडीफार कोकणी समजू लागली आणि ग्रूपमधल्या एका गोंयकाराबरोबर कोकणीत तोडकंमोडकं बोलता येऊ लागलं, शुचिमामींचे टाईमपास धागे, क्रांतितै/ मिकाच्या कविता, वल्लीची जुन्यापुराण्या गोष्टींची माहिती देणारे लेख, धन्याचं एखादं बोधप्रद काव्य, गणपा/सानिकास्वप्निलच्या रेशिप्यांचे फोटु बरंच काय काय. (शुचिमामी, इतकी कारणं पुरे की पाणी टाकून वाढवू थोडं ;))

चुनिन्दा दोस्तोंसे मतलब है, कुछ जिन्दगी की तलब है, गैर-आजमी है सवालसे तेरे, आना, न आना, गैरमतलब है. :)

भंगार नाद आहे राव,सगळ्या कामधंद्याची वाट लागतीय्,परत वरुन या मिपापाई पाटलीनीच्या शिव्या पन खाव्या लागतात,"आग लाव तुझ्या मिपाला" म्हणुन.....

बऱ्याच गोष्टी बघण्याचा नवा चष्मा इथे मिळाला, आमच्या शाळेत कवितांचे चोथा ग्रहण चालायचं, आधीच कविता या प्रकाराशी भयानक वाकडं होते, आमच्या मास्तरनी पारवा कवितेचा केलेला चुरा अजून लक्षात आहे. एक पारवा आहे , तो धर्माशालेवर बसलाय , आणि ठणाणा करतोय...... १० पैकी ४ चे आयएमपी मधले प्रश्न वाचून जायचो.१० वि संपल्यानंतर असले काही परत नाही म्हणून खुश झालेलो, इथे जरा थोडे फार वाचल्यानंतर कविता पण आवडायला लागल्या... कळतातच असे नाही पण व्ह्यू नक्की बदलला... पाककृती बघून थोडे प्रयत्न करावे म्हणले, पण माझ्या एन्ट्री नंतर चांगले होत असेलेले पदार्थ बिघडायला सुरुवात झाली. आणि माझी स्वयंपाकघरातून हकालपट्टी झाली. घरी कोणी नसताना काही प्रयत्न झाले .त्यात एकदा उत्तपा बनवायला घेतला आणि त्याचा भुर्जी सदृश्य पदार्थ बनला असे बरेच प्रयोग झाले. असं बरंच काही ....

In reply to by खटासि खट

त्यांचे लग्न आहे म्हणे. आणी तो अ वरुन नाव सुरु होणार्‍या एका आयडीचा डुआयडी आहे म्हणे.

In reply to by खटासि खट

खट्टु काका .. तुमच्या वाढलेल्या आदराला मी नित्यनेमाने खतपाणि घालीन असे आपणास वचन देते :) सो नायिसोफ्फ्यु खट्टु काका ;)

माझ्या मते प्रत्येक संस्थळाचे प्रोज आणि कॉन्स असतात ....त्याच्याविषयी इथे बोलायला हरकत नसावी असे वातते म्हणुन बोलत आहे पुढील सगळी वैयक्तिक मते आहेत : राग नसावा : मनोगत वर प्रत्येक गोष्ट संपादक स्कॅन करुनच पोस्ट करतात अर्थात एक्क्ष्ट्रीम गव्हर्नन्स आहे आता ह्यामुले उगाचच बाष्कळ लेखन तिथे कधीच पहावयाला मिळाले नाही पण ह्याचीच दुसरी बाजु की जवळपास तुमच्या प्रत्येक लेखनावर संपादकांचा प्रतिसाद असतो " व्याकरण तपासुन पहा " ...एकदम शाळेत असल्यासारखे वाटते ...भाषाशुध्दीबाबतीत मनोगत एकदम कट्टरपंथीय पुणेकर आहे. मायबोली वर पब्लिक इन्टरूकश्न प्रचंड आहे ...पण तसेच प्रचंड बाश्कळपणाही आहे ...खूप जण चांगले मित्र आहेत ...पण प्रचंड कंपुबाजी असल्याने इतर जणांशी मिक्स होण्यात लईच प्रॉब्लेम येतो ...ह्या संकेतश्तळाचे सर्वात भारी वैशिष्ट्य तुम्ही स्वतःचे लेखन अप्रकाशित करु शकता . आणि ह्या शळाचे (माझ्यामते )सर्वात वाईट वैशिष्ट्य की हे गांधी आणि गांधी घराण्याविषयी अजिबात टीका खपवुन घेत नाही . सदर लेखच नव्हे तर आय डी ही डीलीट केला जातो . आता सर्वात महत्वाचे मिपा का आवडते नुकताच मिपावर आलो आहे ( ज्यामाणसाचे लेखन वाचुन मिपावर आलो त्याचा उल्लेख जाणिवपुर्वक टाळत आहे :( ). अजुन तरी कंपुबाजी निदर्शनास आलेली नाहीये . येथील संपादक लगेच रीप्लाय करतात. आणि सगळ्यात महत्वाचे की मी काढलेल्या एका धाग्यावर अनेक लोकांचे उत्तमोत्तम लेखनाचे धागे मिळाले आहेत त्यामुळे ४-५ महीने तरी वाचनाची मज्जा .!! तोवर बघुया काही कॉन्स सापडतात का ते !!

In reply to by प्रसाद गोडबोले

गिरीजा ताई/दादा शी सहमत. तुम्ही सगळे माझे रोजच्या दादर ते ठाणे प्रवासातील सोबती आहात. कित्येक वेळा विनोदी लेख/प्रतिसाद वाचल्यावर जोरात हसल्यशिवाय राहवत नाही, तर काही लेख वाचुन डोळ्यातुन जास्त पाणी येऊ नये म्हणुन मोबाईल बंद करावा लागतो.

In reply to by चैदजा

तुमचं ठीक आहे, तुम्ही मोबाईल बंद करता, पण ज्यांच्या डोळ्यातील आसवांच्या महापुरामुळे ऑफिसचे किबोर्ड वाहुन जातात किंवा खराब होतात त्यांनी काय करावं.

एका शब्दात सांगायचे झाल्यास मी म्हणेण की मला मिपा आवडतो तो तो "प्रगल्भ " आहे म्हणुन.त्याला माहीत आहे कुठे सुरुवात करायची आणी कुठे थांबायचे (त्याला : इथले सं.मं ,लेखक ,प्रतिसादक) बाकी जसे मिसळ पाव खाल्यानंतर इतर काही खाण्यास भुक उरत नाही...तसेच मिपावर आल्यानंतर पोट भरुन जाते.

वाचनाची आवड आहे, त्यातून ऑफिस मध्ये नेट चा स्वैर वापर असल्याने फावल्या वेळेत मराठी वाचनासाठी चा शोध शुरू झाला आणि गुगल वरून मिपा ची ओळख झाली, मिसळपाव नावाचे संकेत स्थळ असू शकते हेच कुतूहल वाटले आणि मग सर्वाचे लेख, कविता वाचून मी पण मिपाची " Fan " झाले....... हो आता सदस्य पण आहे.

जुन्या नाक्यावर आल्यासारख वाटत. फुल्ल टु दंगा, मस्ती आणि प्रतीसादांची दबंगगीरी.अजुन बरच काही .........अव्यक्त. खुप सारे खरे आणि व्हर्चुअल मित्र (साला "भोचक" आणि "यक्कु" अचानक चटका लावुन गेले :-()

ह्या शुचिच्या तर....! सगळ्या गोष्टी का अशा बोलून दाखवायच्या असतात का? आमच्या सार्ख्या सगळ्या संस्थळांवर वावरणार्‍या लोकांनी काय करायचं? बाकी मराठी आंजा (किंवा एकंदरित च आंजा) म्हणजे स्वतःच स्वतःच्या (म्हणजे कुणी कुणाच्या वीचारु णये) बडवून घेण्याचा एक सं(हे संपादकीय देखील असू शकतं)क्शीण प्रयत्न आहे असं णमूद करु इच्च्चितो.

In reply to by प्यारे१

अरे आपण आपलं तुणतुणं वाजवायचं नाही तर कुणी रे? तसही मिपा गुणाचं आहेच्च्च!!!

मिपा का आवडते? इथल्यासारखे हलकट दोस्त नाहीतर आणखी कुठे मिळणार? नांवं घेत नाही कारण त्या चोरांना नक्की माहिती आहे ते कोण आहेत ते!!! :) फड गप्पांचा रंगात आला, फड गप्पांचा, रंगात आला, तुज्या मिपाला लागंल कोल्हा रं, तुज्या मिपाला लागंल कोल्हा!!!! :)

मिपा खरतरं लेखांना मिळणाऱ्या प्रतिसादांमुळे आवडते .एकमेकांची जी खिल्ली उडवली जाते ती खरंच वाचण्यासारखी असते.