डिसक्लेमर: हि एक विडंबित कविता आहे. ह्या द्वारे कोणाच्याही (डूआयडी धारक,डूआयडी समर्थक आणि डूआयडी विरोधक) भावना दुखविण्याचा अथवा खतपाणी घालण्याचा हेतू नाही. तथापि कोणत्याही व्यक्तीशी अथवा प्रसंगांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजाव, अशी नम्र विनंती.
=================================================================================
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
-------------------------------------------------
जालावर खेळ चाले, हा गूढ आयडींचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||ध्रु||
आभास ललना ती, असतो खरा पुरूष
जी तलवार भासते तो, असतो खरा धनुष्य
फसवी ओळख मिरवी, उद्देश द्वाड त्यांचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||१|| (डूआयडी विरोधक उवाच)
कधी धागा नसे स्वयंभू, लागतो जीवास घोर
डू आयडी असता, सहज होई सेटल स्कोर
फसतात डू आयडीला, हा दोष भूलणार्यांचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||२|| (डूआयडी समर्थक उवाच)
ह्या साजिर्या धाग्याला, का वितंडवाद हे दिठीत
गहजब हा कशाला, ना घेतले कुणा मिठीत
विसरा आता हे सारे, असे मी लाडका सार्यांचा
संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||३|| (डूआयडी धारक उवाच)
----------------------------------------------------
मुळ गाणे -
रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा..||ध्रु||
हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा... ||१||
आभास सावली हा, असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते, असती नितांत भास
हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा.. ||२||
या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा.. ||३||
गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - महेंद्र कपूर
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा
काव्यरस
वाचने
5618
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
कै हो!
आदर्णीय ज्योती म्याडम,
In reply to कै हो! by पैसा
ब्वॉर्र.
In reply to आदर्णीय ज्योती म्याडम, by अधिराज
म्याडम काळजी नसावी, ते १००%
In reply to ब्वॉर्र. by पैसा
पापभिरु?
In reply to म्याडम काळजी नसावी, ते १००% by अधिराज
कोणी घेतली होती हो शंका? कोण
In reply to पापभिरु? by अभ्या..
ऑ ?
In reply to कै हो! by पैसा
अर्रर्र
In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार
भारी
झकास!!
खुप भारि झालय..
खुमखुमीत विडंबन
डू आय डी कसले मी तर ऐकलय ३/४
बापरे! हे तर नविनच ऐकतोय. पण
In reply to डू आय डी कसले मी तर ऐकलय ३/४ by शुचि
+१
In reply to बापरे! हे तर नविनच ऐकतोय. पण by अधिराज
लयच कडक!!!!!
भारी....
कोणास का कळेना, घोळ छूS आयडींचा
तुमचाही छुपा आयडी आहे का?
In reply to कोणास का कळेना, घोळ छूS आयडींचा by संजय क्षीरसागर
तुमचाही छुपा आयडी आहे का?
In reply to तुमचाही छुपा आयडी आहे का? by श्री गावसेना प्रमुख
व्यथा
In reply to कोणास का कळेना, घोळ छूS आयडींचा by संजय क्षीरसागर
ये हुइ ना लाख टके की बात
In reply to व्यथा by प्रसाद गोडबोले
बाईमाणसाला असं चारचौघात काय विचारताय
In reply to ये हुइ ना लाख टके की बात by श्री गावसेना प्रमुख
-१
In reply to बाईमाणसाला असं चारचौघात काय विचारताय by संजय क्षीरसागर
मेरे पास खुदके धागे है, खफ है
टाळ्या !!
In reply to मेरे पास खुदके धागे है, खफ है by खटासि खट
तेरा मुझसे है पहले का नाता
In reply to मेरे पास खुदके धागे है, खफ है by खटासि खट
वाह
गिरिजा म्याडम,
कविता कशी वाटली ते सांगा.
In reply to गिरिजा म्याडम, by अधिराज
प्रासंगिक आणि मिपा डिपेन्डंट
In reply to कविता कशी वाटली ते सांगा. by प्रसाद गोडबोले
विडंबन आवडले.
आभास बाईचा पण, असतो खरा पुरूषमाझ्या इ-करांत आयडी मुळे मी "स्त्री" असा आभास होत असे. ( मी खुलासा केला आता माझ्या धाग्यावारचे प्रतिसाद कमी झाले)खी: खी: खी:
In reply to विडंबन आवडले. by तर्री