✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जालावर खेळ चाले, हा गूढ.....

अ — अधिराज, गुरुवार, 02/21/2013 - 12:54
डिसक्लेमर: हि एक विडंबित कविता आहे. ह्या द्वारे कोणाच्याही (डूआयडी धारक,डूआयडी समर्थक आणि डूआयडी विरोधक) भावना दुखविण्याचा अथवा खतपाणी घालण्याचा हेतू नाही. तथापि कोणत्याही व्यक्तीशी अथवा प्रसंगांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजाव, अशी नम्र विनंती. ================================================================================= चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा ------------------------------------------------- जालावर खेळ चाले, हा गूढ आयडींचा संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||ध्रु|| आभास ललना ती, असतो खरा पुरूष जी तलवार भासते तो, असतो खरा धनुष्य फसवी ओळख मिरवी, उद्देश द्वाड त्यांचा संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||१|| (डूआयडी विरोधक उवाच) कधी धागा नसे स्वयंभू, लागतो जीवास घोर डू आयडी असता, सहज होई सेटल स्कोर फसतात डू आयडीला, हा दोष भूलणार्‍यांचा संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||२|| (डूआयडी समर्थक उवाच) ह्या साजिर्‍या धाग्याला, का वितंडवाद हे दिठीत गहजब हा कशाला, ना घेतले कुणा मिठीत विसरा आता हे सारे, असे मी लाडका सार्‍यांचा संपेल ना कधीही, घोळ डू आयडींचा ||३|| (डूआयडी धारक उवाच) ---------------------------------------------------- मुळ गाणे - रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा..||ध्रु|| हा चंद्र ना स्वयंभू, रवी तेज वाहतो हा ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा प्रीतीस होई साक्षी, हा दूत चांदण्यांचा... ||१|| आभास सावली हा, असतो खरा प्रकाश जे सत्य भासती ते, असती नितांत भास हसतात सावलीला, हा दोष आंधळ्यांचा.. ||२|| या साजीऱ्या क्षणाला, का आसवे दिठीत मिटतील सर्व शंका, उबदार या मिठीत गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा.. ||३|| गीत - सुधीर मोघे संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - महेंद्र कपूर चित्रपट - हा खेळ सावल्यांचा

प्रतिक्रिया द्या
5592 वाचन

💬 प्रतिसाद (33)

कै हो!

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 13:03 नवीन
ते खटासि खट तुम्हीच कै? :D कविता विडंबन असेल तर कोडाइइकॅनॉल आणि भूछत्र हे वैभाग राहिलेत. तसाच नृत्य आणि रौद्ररस पण राहिलाय बघा!
  • Log in or register to post comments

आदर्णीय ज्योती म्याडम,

अधिराज
गुरुवार, 02/21/2013 - 15:54 नवीन
आदर्णीय ज्योती म्याडम, खटासि खट आणि आम्ही एकच असल्याचा संशय ह्या आधीही खफवर एका पापभिरु माणसाने घेतल्याचे स्मरते. (त्यांचे आणि तुमचे विचार एवढे जुळलेले बघून मन भरून आले.) त्यावेळीच खट यांनी त्यांच्यासारख्या सज्जनाची तुलना माझ्यासारख्याशी करु नये असे बजावले होते. त्यामुळे माझ्याशी त्यांची तुलना हि त्यांच्या प्रतिमेला धक्का लागणारी आहे, हे नम्रपणे नमुद करतो. सिन्सिअर्ली योर्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

ब्वॉर्र.

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 15:58 नवीन
तुमचा डु आयडीचा अभ्यास आणि खटसाहेबांनी केलेली चर्चा पाहून उगीच आपलं विचारलं. हे पापभिरू महाशय कोण म्हणे? तो कदाचित तुमचा नैतर माझा डु आयडी असायचा एखादेवेळी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

म्याडम काळजी नसावी, ते १००%

अधिराज
गुरुवार, 02/21/2013 - 16:06 नवीन
म्याडम काळजी नसावी, ते १००% ओरीजिनल आहेत, त्यांना "पापभिरु" म्हटलं ह्यातच सर्व काही आलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

पापभिरु?

अभ्या..
गुरुवार, 02/21/2013 - 16:13 नवीन
तरीपण तुमच्याचर शंका घेतली म्हणजे पापभिरु कुठले? माथेफिरु च असतील ते. कोणी घेतली होती हो शंका? कोण आहे तो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

कोणी घेतली होती हो शंका? कोण

अधिराज
गुरुवार, 02/21/2013 - 16:18 नवीन
कोणी घेतली होती हो शंका? कोण आहे तो
हे ईश्वरा! कोणत्या धर्मसंकटात टाकलेस, अशी वेळ डू.आयडीवरही यायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ऑ ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 02/21/2013 - 16:37 नवीन
पैसातैने ह्या आयडीने असा प्रतिसाद दिलेला पाहून आश्चर्य वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अर्रर्र

पैसा
गुरुवार, 02/21/2013 - 16:48 नवीन
परिकथेतिल राजकुमार या आयडीने लॉगिन करायला विसरले वाटटं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

भारी

सुधीर
गुरुवार, 02/21/2013 - 13:20 नवीन
भारी! तुमचा आयडी "डू-आयडी" तर नाही ना? :)
  • Log in or register to post comments

झकास!!

अनन्न्या
गुरुवार, 02/21/2013 - 16:11 नवीन
मस्त जमलय विडंबन!!
  • Log in or register to post comments

खुप भारि झालय..

पक पक पक
गुरुवार, 02/21/2013 - 18:54 नवीन
खुप भारि झालय.. :)
  • Log in or register to post comments

खुमखुमीत विडंबन

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 02/21/2013 - 19:00 नवीन
अधिराजमाऊली दंडवत स्विकारा...!
  • Log in or register to post comments

डू आय डी कसले मी तर ऐकलय ३/४

शुचि
गुरुवार, 02/21/2013 - 20:30 नवीन
डू आय डी कसले मी तर ऐकलय ३/४ सदस्य एकच आय डी वापरतात :) आणि इतरांना मल्टीपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर चा भास होत रहातो. :D
  • Log in or register to post comments

बापरे! हे तर नविनच ऐकतोय. पण

अधिराज
Fri, 02/22/2013 - 10:14 नवीन
बापरे! हे तर नविनच ऐकतोय. पण एकच आय डी ३-४ जणा.नी वापरायचा उद्देश काय असेल? चला अशा आयद्डी ना "द्रौपदी आय डी" म्हणायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

+१

निवेदिता-ताई
Fri, 02/22/2013 - 10:36 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

लयच कडक!!!!!

बॅटमॅन
गुरुवार, 02/21/2013 - 23:02 नवीन
लयच कडक!!!!!
  • Log in or register to post comments

भारी....

सुहास झेले
Fri, 02/22/2013 - 11:04 नवीन
भारी.... :)
  • Log in or register to post comments

कोणास का कळेना, घोळ छूS आयडींचा

संजय क्षीरसागर
Fri, 02/22/2013 - 11:19 नवीन
आभास बाईचा पण, असतो खरा पुरूष डेटला बोलावणे, कावा खरा अदृष्य बायकांशी सलगी, उद्देश साधे त्याचा कोणास का कळेना, घोळ छूS आयडींचा
  • Log in or register to post comments

तुमचाही छुपा आयडी आहे का?

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/22/2013 - 14:04 नवीन
तुमचाही छुपा आयडी आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

तुमचाही छुपा आयडी आहे का?

संजय क्षीरसागर
Fri, 02/22/2013 - 14:20 नवीन
एकच आयडी आणि एकच बायडी हा आमचा फंडा आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

व्यथा

प्रसाद गोडबोले
Fri, 02/22/2013 - 14:16 नवीन
आमचे डु आयडी घेणे हा प्रकार भलताच लागलेला दिसतोय ;) काय राव अधिराज , तुम्ही जरा लवकरच भांडाफोड केलीत नाहीतर जरा मजा केली असती कोणाची तरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

ये हुइ ना लाख टके की बात

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/22/2013 - 14:20 नवीन
तुम्ही जरा लवकरच भांडाफोड केलीत नाहीतर जरा मजा केली असती कोणाची तरी
हे मुद्द्याच बोलले/लात तुम्ही ,तुम्हाला बाइ समजाव की माणुस की बाइमाणुस तेच कळत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

बाईमाणसाला असं चारचौघात काय विचारताय

संजय क्षीरसागर
Fri, 02/22/2013 - 14:24 नवीन
प्रमुखराव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

-१

श्री गावसेना प्रमुख
Fri, 02/22/2013 - 14:33 नवीन
आता बाइमाणुस जर पब्लिक प्लेस मध्ये,चावट आमंत्रण देतात तर आपण का म्हणुन लाजावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

मेरे पास खुदके धागे है, खफ है

खटासि खट
Fri, 02/22/2013 - 13:31 नवीन
मेरे पास खुदके धागे है, खफ है, खव है, व्यवि है, आयडी है, ड्युआयडी है, मिपा है, माबो है, ऐअ है, ऐपै है... क्या है तुम्हारे पास ? - मेरे पास कामधंदा है
  • Log in or register to post comments

टाळ्या !!

सूड
Fri, 02/22/2013 - 14:13 नवीन
या प्रतिसादाला टाळ्या पाह्यजेत राव !! \m/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

तेरा मुझसे है पहले का नाता

अधिराज
Fri, 02/22/2013 - 14:33 नवीन
तेरा मुझसे है पहले का नाता कोई यूँ ही नहीं दिल लुभाता कोई... जाने तू... या जाने ना... माने तू... या माने ना...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

वाह

प्रसाद गोडबोले
Fri, 02/22/2013 - 14:00 नवीन
वाह अधिराज ! विसरा आता हे सारे, असे मी लाडका सार्‍यांचा >>>ह्यावरुन आपण खरडवहीतली नोंद मोकळ्या मनाने स्विकारली असे वाटते.... आभारी आहे . :)
  • Log in or register to post comments

गिरिजा म्याडम,

अधिराज
Fri, 02/22/2013 - 14:27 नवीन
गिरिजा म्याडम, कविता वाचण्याच्या आधी डिसक्लेमर वाचावे. उगा स्वतःच्या अंगावर ओढवून घेऊ नये. (स्वतःच्या अंगावर ओढण्याची सवय भांडणउकरू खाष्ट काकूंना असते). कवितेमध्ये डूआयडी विरोधक, समर्थक, व धारक या तिघांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कविता कशी वाटली ते सांगा.
  • Log in or register to post comments

कविता कशी वाटली ते सांगा.

प्रसाद गोडबोले
Fri, 02/22/2013 - 15:45 नवीन
छान आहे . (पण प्रासंगिक आणि मिपा डिपेन्डंट आहे ... अर्थात ज्याला हा सगळा प्रकार माहीत नाही तो अ‍ॅप्रीशियेट करु शकणार नाही .. असो .आपले इतर लेखन वाचायला आवडेल :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अधिराज

प्रासंगिक आणि मिपा डिपेन्डंट

अधिराज
Fri, 02/22/2013 - 16:35 नवीन
प्रासंगिक आणि मिपा डिपेन्डंट आहे
हा निव्वळ योगायोग (डिसक्लेमर वाचा). हा प्रकार मिपा पुरताच मर्यादीत नसावा.
आपले इतर लेखन वाचायला आवडेल
आमच्या लेखनात इंटरेस्ट दाखवल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

विडंबन आवडले.

तर्री
Fri, 02/22/2013 - 14:28 नवीन
विडंबन आवडले. मूळ कविता देताना , कवीचे नाव दिलेत हे चांगले केलेत . आभास बाईचा पण, असतो खरा पुरूष माझ्या इ-करांत आयडी मुळे मी "स्त्री" असा आभास होत असे. ( मी खुलासा केला आता माझ्या धाग्यावारचे प्रतिसाद कमी झाले)
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:

प्रसाद गोडबोले
Fri, 02/22/2013 - 15:43 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा