Skip to main content

कालचा दिवस....

लेखक बाबा पाटील यांनी बुधवार, 20/02/2013 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्यातला एखादा दिवस अचानक भंकस का जातो,हे एकदा त्या ब्रम्हदेवाला विचारल पाहिजे राव.कालचा दिवसही असाच विचित्र गेला का कुनास ठाउक पण आख्या दिवसभरात एकही काम धडपणे झाले नाही. बर्‍याच दिवसानंतर सकाळच्या ओपीडीत फक्त एकच पेशंट झाला,दुपारी १ वाजताच दवाखाण्यातुन बाहेर पडलो व क्रिकेटची बॅट घ्यायला चंदननगर मधुन बोंबलत एफ सी रोडला गेलो तर दुकान बंद्,तेथुन एक महत्वाचे पुस्तक घ्यायला युनिक अ‍ॅकडमीत गेलो तर पुस्तक बाजारातुन संपलेले,वैतागुन घरी आलो तर पिल्लु सर्दी खोकल्याने जॅम झालेल. परत ३.३० ला क्रिकेट प्रॅक्टीस साठी ग्राउंड वर गेलो तर आज आमच्या बॅट आणी चेंडुचा अक्षरशा: झिम्मा चालु होता,सहा षटकात तिन वेळा आउट्, कॅप्टनने डोक्याची मंडई केली.... परत ६.३० ला ओपीडीत येउन बसलो तर दाजीचा फोन आला बाळा काल तु जे दुकानच डील फायनल केल होत तो मालक आता दुकान विकायला तयार नाही,आयच्या गावात आज खरच काय चालल होत काहीच कळत नव्हत्,परत ८.०० वाजत असोसिएन सेक्रेटरीचा फोन आला रात्री १० वाजता टिम कॅप्टनने आनी कोचने मिटींग लावली आहे माझ्या ओपीडीत ये.हरामखोरांनी १२ वाजे पर्यंत डोक खाल्ल ,बरोबर रात्री बारा वाजता बायकोचा फोन घरी येणार आहेस का तुझ्या क्रिकेटच्या ग्राउंडवर जाउन झोपणार आहेस..... हे भगवान ये मेरे साथ ही क्यो.!!!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3464
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

असं समजून समोर आलेला चेंडू खेळा! मागच्यापुढच्या चेंडूचा विचार केला तर विकेट जाण्याचा चान्स जास्त.

In reply to by नानबा

एका वेळी एक बॉल हे खरं प्रिंसिपल आहे.

In reply to by संजय क्षीरसागर

आज सेंचुरी करायचीच असं ठरवून मैदानात उतरायचं हो. सेंचुरी नाही तर नाही गेला बाजार ४०-५० रन्स झाले तरी पुरे की. कुठे प्रत्येक मॅच ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिकेच्या ४३४ रन्सवाल्या मॅच सारखी असते?? :)

In reply to by बाबा पाटील

आम्हाला लहानपणी डॉक्टर डॉक्टर खेळायची हौस होती. तुम्हाला मोठेपणी चान्स मिळालाय!

लेखाचे नाव आजचा दिवस हवा होते, आजच्या दिवसाचा हिशोब आजच मांडायचा असतो, दुसर्‍या दिवशी नाही.

In reply to by तुमचा अभिषेक

`कालचा दिवस' कसा लिहीणार? हा त्यांचा प्रश्न आहे.