✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आयटीच्या गोष्टी - नमन

ध
धन्या यांनी
Sat, 02/16/2013 - 16:35  ·  लेख
लेख
नॉन आयटीवाल्यांना आयटीवाल्यांबद्दल आणि एकंदरीत आयटी क्षेत्राबद्दल खुपच कुतुहल असते. आयटी म्हटलं की सगळ्यात आधी दोनच गोष्टी नजरेसमोर येतात, एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. दोन्ही गोष्टी आयटीमधील सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या प्रमुख अंगाबद्दल शब्दशः खर्‍या असल्या तरी आयटी म्हणजे केवळ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट नाही. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्येही बक्कळ पैसा आणि एसीमधील काम यांच्या जोडीनेच इतरही असंख्य भानगडी असतात. काही चांगल्या तर काही वाईट. आपण भारतीय स्वतःला आयटीतील बाप समजतो. पण ते खरं नाही. या क्षेत्रात काम करणारे (आणि वास्तवाचे भान असलेले) चांगलेच ओळखून आहेत की आपण या क्षेत्रातले पाटया टाकणारे हमाल आहोत. आपल्याला मिळणारा बक्कळ पैसा हा केवळ चलनातील फरकाचा प्रताप आहे. तसेच अमेरिका आणि युरोप खंडांमध्ये वाढलेले संगणकीकरण परंतू स्वस्त आणि कुशल संगणक कामगारांची अनुपलब्धता हीसुद्धा आपल्याला सो कॉल्ड आयटीमधले बाप बनवण्यास कारणीभूत आहे. पुढे हे सारं आपण विस्ताराने पाहूच. बरेच दिवसांपासून मनात होतं की उगाचच प्रतिसादाच्या पिंका टाकण्यापेक्षा काहीतरी चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करावा. पण टंकायचा कंटाळा येत होता. त्याचबरोबर विषय कुठला निवडावा हे ही कळत नव्हतं. माझा हातखंडा असलेला अध्यात्म हा विषय डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या प्रकाशात उलगडून दाखवावा की मानसशास्त्राचं बोट धरुन मनोविकारांबद्दल सहज सोप्या भाषेत लिहावं हे कळत नव्हतं. संगणक सुरक्षा या विषयावर काही खरडावं असंही कधी कधी वाटायचं. नुकतीच चालू झालेली प्रथम फडणीसांची मोबाईल उत्क्रांतीवरील सुंदर मालिका, त्याहीआधीची सोकाजीनानांची अत्याधुनिक तंत्रज्ञान सहज सोप्या भाषेत सांगणारी लेखमाला वाचून वाटलं की आपण आयटीवर का लिहू नये. आणि ठरवलं की आपण आयटीवरच लिहायचं. कमी अधिक अशा साडे सात आठ वर्षांच्या माझ्या आयटी करीयरमध्ये खुप काही गोष्टी पाहील्या, अनुभवल्या. काही आनंद देणार्‍या, काही आपल्या क्षमतेचा कस पाहणार्‍या, काही मनस्वी चीड आणणार्‍या, तर काही नैराश्येच्या खोल गर्तेत फेकून देणार्‍या. या सार्‍याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न असेल. मिपावर आयटीमधील रथी महारथी आहेत. ते माझ्या लेखनात काही चुका झाल्या तर दाखवून देतीलच. तसेच ते प्रतिसादांमधून आपले अनुभवही सांगतील, वाचकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतील याची मला खात्री आहे. नमनाला घडाभर तेल वाहून झालं आहे. मुद्दयाचं असं काही लिहिलंच नाही. ते सारं आपण पुढच्या भागापासून पाहू. तोपर्यंत, स्टे टयुन्ड* !!! *स्टे टयुन्ड - हा आयटी मॅनेजर्सचा आवडता शब्दप्रयोग. शब्दशः अर्थ "तुमचा रेडीओ अमुक अमुक फ्रीक्वेंसीला टयून करा" एव्हढाच असला तरी आयटीमध्ये त्याला खुप मोठा अर्थ आहे. तुम्हीच पाहा: प्रसंग १ : अबक आयटी कंपनी आपली कर्मचारी संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. दे हॅव एक्स्पान्शन प्लान. या संदर्भात एका नामांकीत सरकारी संगणक शिक्षणसंस्थेच्या नोटीस बोर्डवर नोटीस लावली जाते. पोरं पोरी भराभर आपापले रिझुमे, सीव्ही जे काही असेल ते मॅनेजरच्या ईमेल आयडीवर पाठवतात. (कंपनी सध्यातरी छोटी असल्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजरच रीक्रुटमेंट, रीसोर्स मॅनेजमेंट पाहत असतात.) पोरांचा भरभरुन प्रतिसाद पाहून मॅनेजर हरखून जातो. रीप्लाय म्हणून केलेल्या ईमेलमध्ये पोरांना तो खुप मोठी मोठी स्वप्नं दाखवतो. शेवटी थोडंसं रीक्रुटमेंट प्रोसेसबद्दल, इंटरव्ह्यू शेडयुलबद्दल लिहितो लिहितो. अगदी शेवटची ओळ असते, स्टे टयुन्ड !!! प्रसंग २ : कंपनीत अ‍ॅट्रीशन रेट वाढू लागला आहे. मॅनेजमेंटच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. याच गतीने पोरं पोरी जरी कंपनी सोडून जाऊ लागली तर एक दिवस कंपनीला टाळं ठोकावं लागेल याची त्यांना खात्री पटू लागली आहे. काहीतरी करणं भाग आहे. मग एचारमधील चार डोकी/मॅनेजमेंटमधील चार डोकी मिळून काहीतरी प्लान बनवतात. याच कंपनीत पोरांना कसं उज्ज्वल भवितव्य आहे याच्या लंब्याचौडया बाता केल्या जातात. हा प्लान एक खुपच वरचा मॅनेजर एक दिवस टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये सार्‍या कर्मचार्‍यांना समजावून सांगतो. त्याचं ते गाजरदर्षक भाषण संपवता संपवता तो म्हणतो, स्टे टयुन्ड !!! प्रसंग ३ : अबक नावाच्या भारतीय आयटी कंपनीचा कखग नामक अमेरिकन तेल आणि वायू कंपनीशी आयटी सेवा पुरवण्यासाठीचा करार आहे. कधीतरी या अमेरिकन कंपनीचा एक उच्चपदस्थ अधिकारी अबक च्या भारतातील डेव्हलपमेंट सेंटरला भेट दयायला येतो. त्याच्यासाठी पायघडया घातल्या जातात, त्याला टोपी घातली जाते (सॉरी, पगडी घातली जाते), त्याची आरती केली जाते. या सार्‍या पाहूणचाराने तो भारावून जातो. शेवटी तो टाऊन हॉल नामक मीटींगमध्ये भाषणाला उभा राहतो. आमच्या कंपनीला या वर्षी इतके इतकी मिलियन की बिलियन डॉलर नफा होणार आहे. पण हा नफा कमावण्यासाठी आम्हाला तुमच्याकडून उत्तम अशा आयटी सेवेची अपेक्षा आहे अशा टाईपचं ते भाषण असतं. भारतीय कंपनीच्या मॅनेजरच्या डोळ्यांसमोर ऑनसाईट अपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. तो "क्लायंट" आपलं भाषण एकदाचं संपवतो. त्याचं शेवटचं वाक्य असतं, स्टे टयुन्ड !!!
  • आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच
  • आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

Book traversal links for आयटीच्या गोष्टी - नमन

  • आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
30839 वाचन

💬 प्रतिसाद (115)

प्रतिक्रिया

हा हा हा!

बाळकराम
Tue, 02/19/2013 - 03:37 नवीन
हा दुसरा ज्योक ऑफ द डे! चालू द्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

भारत आयटी तला "बाप" तेव्हाच होइल- जेव्हा:....

संजय क्षीरसागर
Tue, 02/19/2013 - 11:02 नवीन
प्रतिसाद अत्यंत समर्पक आणि मौलिक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळकराम

यु गाईज नीड तो फोकस ऑन

अमोल खरे
Sun, 02/17/2013 - 17:51 नवीन
यु गाईज नीड तो फोकस ऑन डिलिव्हरेबल्स इन्स्टेड ऑफ वेस्टिंग युअर एनर्जी ऑन मिपा. वि एक्स्पेक्ट अ लॉट फ्रॉम यु, इफ यु डु नॉट शो पॉझिटिव्ह रिझल्ट्स क्विक्ली, वी मे नीड टु पुट यु अन्डर अवर ऑब्सर्व्हेशन. इट मे ऑल्सो अफेक्ट युअर इयर एन्ड अ‍ॅप्रेझल. आय होप आय अ‍ॅम व्हेरी क्लिअर अबाऊट इट मिस्टर धन्या. =))
  • Log in or register to post comments

हाहाहा...

धन्या
Sun, 02/17/2013 - 23:33 नवीन
आयटी स्पेशल सुचना वजा धमकी इथे शेअर करण्यासाठी धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल खरे

येस आय डू अग्री विथ मि.अमोल.

पाषाणभेद
Mon, 02/18/2013 - 02:33 नवीन
येस आय डू अग्री विथ मि.अमोल. इन्क्लूडींग धनाजी, ऑल अ‍ॅट मिपा आर नॉट गिव्हींग देअर १००%. आय अल्सो नो दॅट अदर प्रोजेक्ट्स आर डिलीव्हरींग मोर दॅन अस. देन व्हाय नॉट वी? यू पीपल शुड लर्न फ्रॉम देम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हमाल असे म्हणणे चुकीचे आहे.

मयुरपिंपळे
Sun, 02/17/2013 - 20:53 नवीन
ज्याना कामाची आवड नसते ते पाट्या टाकण्याच काम करतात... ;) पंरन्तु आय टी मधे काम करण्याची मज्जा वेगळी आहे. आमच्या सरामुळे आयटी मधे काम कस कराचय ह्याचे धडे घेतले आहेत.
  • Log in or register to post comments

अधिक वाचायला आवडेल...

धन्या
Sun, 02/17/2013 - 23:40 नवीन
तुमच्या या तीनही वाक्यांचं अधिक विस्तृत स्पष्टीकरण लिहू शकाल का? काही अपवाद सोडले तर अल्मोस्ट प्रत्येक आयटीवाला तुमची ही वाक्ये खोडून काढील.
आमच्या सरामुळे आयटी मधे काम कस कराचय ह्याचे धडे घेतले आहेत.
यावर जरा अधिक लिहा राव. कदाचित काहीतरी नविन हाती लागेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

आमच्या सरामुळे आयटी मधे काम

५० फक्त
Mon, 02/18/2013 - 12:59 नवीन
आमच्या सरामुळे आयटी मधे काम कस कराचय ह्याचे धडे घेतले आहेत. - खरंच सांगाच, कारण काय फार पुर्वीपासुन इथं सरांमुळं अडचण दुर होते असा एक प्रवाद आहे, खरं खोटं सर आणि देव किंवा देवसर जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

विनय सर काय?

स्पा
Mon, 02/18/2013 - 13:53 नवीन
विनय सर काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

विनयशील असावेत बहुदा. बाकी

५० फक्त
Mon, 02/18/2013 - 14:33 नवीन
विनयशील असावेत बहुदा. बाकी त्या सरांचे विद्यार्थी चेपुवर तुमचं स्टेटस शेर करताना आढळले म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

काय सांगता काय?>

स्पा
Mon, 02/18/2013 - 14:48 नवीन
काय सांगता काय?> विनय सरांनी हे असले संस्कार केले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

संस्कार वगैरेचं माहिती नाही...

धन्या
Mon, 02/18/2013 - 20:48 नवीन
पण काम ऐटीत कसे करावे याचं प्रशिक्षण मात्र छान दयायचे सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

होय होय्,पार सिडनी मध्ये

५० फक्त
Tue, 02/19/2013 - 08:17 नवीन
होय होय्,पार सिडनी मध्ये सुद्धा क्लास काहाड्ले होते सरांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ज्याना कामाची आवड नसते ते

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 02/20/2013 - 03:25 नवीन
ज्याना कामाची आवड नसते ते पाट्या टाकण्याच काम करतात... पंरन्तु आय टी मधे काम करण्याची मज्जा वेगळी आहे.
तुमच्या या तीनही वाक्यांचं अधिक विस्तृत स्पष्टीकरण लिहू शकाल का? काही अपवाद सोडले तर अल्मोस्ट प्रत्येक आयटीवाला तुमची ही वाक्ये खोडून काढील.
धन्या भाव, प्रत्येक क्षेत्रात दोन प्रकारची माणसे असतात. काम खरोखर एन्जॉय करणारी आणि आला दिवस ढकलणारी. शिवाय कुठलेही काम १००% enjoyment नसते. कधी interesting तर कधी mundane काम असणे हे साहजिकच आहे. आयटी क्षेत्रात पण अर्थात तसेच असणार. पण आयटी वाल्यांना प्रत्येक गोष्टीत पराचा कावळा करायची सवय असते. तसेच इथेही झाले आहे. पाहिजे तर अजून विस्तृत लिहितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आय टी मध्ये डाऊन टाइमला

शुचि
Mon, 02/18/2013 - 02:50 नवीन
आय टी मध्ये डाऊन टाइमला पाट्या सगळेच टाकतात : ) (कामाची अत्यंत आवड असलेली व पाट्या सुद्धा टाकणारी) शुचि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मयुरपिंपळे

धन्या, सुरुवात झकास रे.

प्रचेतस
Sun, 02/17/2013 - 21:26 नवीन
धन्या, सुरुवात झकास रे. नमनालाच घडाभर तेल ओतलं नाहीस ते बरं केलंस. आता तपशीलवार एकेके गोष्ट येऊ देत.
  • Log in or register to post comments

वाचतीये.

रेवती
Mon, 02/18/2013 - 05:11 नवीन
वाचतीये.
  • Log in or register to post comments

लेख...

नाखु
Mon, 02/18/2013 - 09:00 नवीन
"ऐटीत" झालाय... तांत्रिक बाबी माहीत नाहीत पण कामाची पद्ध्त कशी असते हे समजून घ्यायला आवडेल्..पू.भा.प्र.
  • Log in or register to post comments

लेखाची सुरूवात आवडली. काही

चावटमेला
Mon, 02/18/2013 - 11:40 नवीन
लेखाची सुरूवात आवडली. काही शब्दांचे/वाक्प्रचारांचे खरे अर्थ खाली देत आहे FYI - माझ्या काही कामाचं दिसत नाहीये, तुझ्या असेल तर पाहा नाही तर जाऊदे खड्ड्यात Let's discuss it later - चल फूट, डोकं नको खाऊस Please let me know in case of any issues - असले तरी काय उखडणार आहात? Action Points - अश्या गोष्टी ज्या कुणालाच करायच्या नसतात Out of Office Auto reply - मी आज सुट्टीवर आहे आता बसा बोंबलत appraisal - जे झाल्यावर ह्या पृथ्वीतलावरचं कुणीच खुश नसतं HR - सर्वांत जास्त अकार्यक्षम डिपार्टमेंट (कुणी मिपाकर असतील तर ह.घ्या. ;)), जे कायम तुमची हेल्थकेअर पॉलिसी रिन्यु करायची मेल टाकते.. चला, आता येवढेच, बाकी सवडीने, आय हॅव अ कॉल टू अटेंड :)
  • Log in or register to post comments

looping

चिरोटा
Mon, 02/18/2013 - 13:32 नवीन
1)looping xyz(मला कळते कोणाला कुठली माहिती हवी आहे ते) 2)Are we on same page?(तू चुकतो आहेस किंवा मी तरी चुकतोय). ३)Its not a rocket science.(Software म्हणजे फक्त Input,output,database असा विचार करणारे काही MBA मॅनेजर्स)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चावटमेला

Its not a rocket science

कपिलमुनी
Mon, 02/18/2013 - 14:51 नवीन
मला असे सतत ऐकायला लागयचे !! एका दिवशी वैतागून म्हणालो.. "रॉकेट सायन्स" सोपा असतय... *** ला आग लागली कि उडून जाता !! आणि एवढा सोपा असेल तर करा कि स्वतः !! बादवे ...मॅनेजर मराठी होता , त्या मुळे शुद्ध॑ मराठी मध्ये सांगितल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

रॉकेट सायन्स" सोपा असतय... **

धन्या
Mon, 02/18/2013 - 20:40 नवीन
रॉकेट सायन्स" सोपा असतय... *** ला आग लागली कि उडून जाता !! आणि एवढा सोपा असेल तर करा कि स्वतः !!
त्यापुढचं अप्रेझल कसं झालं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

थांबताहेत कशाला अ‍ॅप्रेझल

५० फक्त
Tue, 02/19/2013 - 08:18 नवीन
थांबताहेत कशाला अ‍ॅप्रेझल पर्यंत, हातात दुसरं ऑफर लेटर असेल म्हणुन तर एवडी डेरिंग केली ना बाप्पा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ते ही खरं आहे म्हणा...

धन्या
Tue, 02/19/2013 - 19:59 नवीन
ईन फॅक्ट आयटीवाला जेव्हा सध्याची नोकरी सोडायची असं ठरवतो तेव्हा त्याच्या हातात दुसर्‍या कंपनीची ऑफर असते. सध्याच्या कंपनीत राजीनामा दिल्यानंतर आठवडाभरात त्याच्याकडे अजून एक ऑफर आलेली असते. ही दुसरी ऑफर पहिल्या ऑफरपेक्षा जास्त पगाराची असते. कारण या दुसर्‍या ऑफरवाल्या कंपनीत मुलाखत देताना त्याने स्पष्ट म्हटलेलं असतं की मी माझ्या सध्याच्या कंपनीत राजीनामा दिला आहे. माझ्याकडे अमुक अमुक कंपनीची ऑफर आहे, ते मला वर्षाला ईतके ईतके लाख देत आहेत. तुम्ही दोन लाख जास्त देत असाल तर्च तुमच्याकडे येईन. बरं एव्हढयावर थांबेल तो आयटीवाला कसला. आता पठठयाकडे दोन ऑफर असतात. दुसर्‍या ऑफरमधील वार्षिक पगार पहिल्या ऑफरपेक्षा दोन लाखांनी जास्त असतो. खरी गंमत पुढे आहे. सध्याच्या कंपनीचा नोटीस पीरीयड तीन महिन्यांचा असतो. आपला हा आयटीवाला भिडू हे तीन महिने अजून ईतर कंपन्यांमध्ये मुलाखती देत राहतो. जर कुठल्या कंपनीत निवड झाली (ती होतेच) तर हा पठठया दुसरी ऑफर पुढे करतो आणि आपली कॅसेट रीवाईंड करतो, "माझ्याकडे अमुक अमुक कंपनीची ऑफर आहे, ते मला वर्षाला ईतके ईतके लाख देत आहेत. तुम्ही दोन लाख जास्त देत असाल तर्च तुमच्याकडे येईन." ती कंपनी तेव्हढा वार्षिक पगार देतेही. न देऊन सांगते कुणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

खर आहे

कपिलमुनी
Fri, 02/22/2013 - 16:53 नवीन
दोन ऑफर असून निर्लज्ज पणे ३ री शोधतो आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

थोडी दुरुस्ती

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 03/12/2014 - 20:09 नवीन
looping xyz--चल हट माझे डोके नको खाउ,त्याला विचार Are we on same page?शिरतय का तुझ्या मट्ठ डोक्यात? Its not a rocket science- काय फालतु लोक्स येतात आजकाल इथे साधे कामही जमेना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

फार वरवरचे होतय

प्रसाद१९७१
Mon, 02/18/2013 - 12:24 नवीन
फार वरवरचे होतय. जास्त आत जावुन लिहायला पाहिजे. आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च
  • Log in or register to post comments

आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च

५० फक्त
Mon, 02/18/2013 - 13:00 नवीन
हो मिळतील त्यापण मिळतील, जेंव्हा श्री. धन्या हे आयटि सोडुन पुर्णवेळ सखुपुराण लिहायला घेतील तेंव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

नाही हो...

धन्या
Tue, 02/19/2013 - 20:04 नवीन
मी आयटीमधला हमाल आहे. आयटीतल्या एखादयाच मुकादमाला आपला आयटीचा धंदा सोडून पुर्णवेळ लेखन करता येणं जमेल. तो तितक्या ताकदीचा असू शकतो. माझ्यासारख्या एका मामूली हमालाला ते शक्य होईल असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हा लेख खुपच वरवरचा झाला आहे

धन्या
Mon, 02/18/2013 - 20:45 नवीन
हा लेख खुपच वरवरचा झाला आहे हे मान्य आहे. हा लेख फक्त श्रीगणेशा होता त्यामुळे फार खोलात गेलो नाही. यापुढचे लेख जास्तीत जास्त माहितीपुर्ण लिहिण्याचा प्रयत्न करेन. >> आणि स्वताच्या काँमेन्ट्स पाहिजेत च दिवसभरात स्वतः प्रतिसाद देणं मला तांत्रिक कारणामुळे शक्य नाही. जमेल तसे प्रतिसाद नक्की देत जाईन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

वाचतोय आतल्या (आय.टी. च्या)

चेतन माने
Mon, 02/18/2013 - 13:01 नवीन
वाचतोय :) आतल्या (आय.टी. च्या) गोष्टी वाचायला आवडतील (आय.टी. त प्रवेश करतानाच धडपडलेला )
  • Log in or register to post comments

सुरवात चांगली आहे, तपशिलवार

श्रिया
Mon, 02/18/2013 - 13:11 नवीन
सुरवात चांगली आहे, तपशिलवार लेख अजून रोचक वाटेल.
  • Log in or register to post comments

धन्याचा

विलासराव
Tue, 02/19/2013 - 11:12 नवीन
लेख म्हनुन हजेरी लावली. बाकी या विषयात आवड शुन्य.
  • Log in or register to post comments

हम्म...

दादा कोंडके
Tue, 02/19/2013 - 19:44 नवीन
धन्याचा लेख म्हनुन हजेरी लावली. बाकी या विषयात आवड शुन्य.
कंपुगिरी-कंपुगिरी म्हणतात ती हीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

नाही हो...

धन्या
Tue, 02/19/2013 - 20:07 नवीन
प्रत्यक्ष ओळखत असल्यामुळे त्यांनी कौतुकाचे चार शब्द लिहिले एव्हढंच. मिपावरचा देवमाणूस आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

हम्म

मी-सौरभ
Tue, 02/19/2013 - 19:02 नवीन
वाचून उपेग होईल्से वाटते... We look forward to further update from you. (आयटीत असूनही आयटीत नसलेला) सौरभ
  • Log in or register to post comments

सुरवात आवडली आहे.

दिव्यश्री
Tue, 03/11/2014 - 23:50 नवीन
सुरवात आवडली आहे. एक म्हणजे बक्कळ पैसा आणि दुसरं म्हणजे एसीत बसून काम करणं. >>> बाहेरच्या लोकांना हेच दिसतं... मलाही असचं वाटत होत . आता ते फक्त तसं नाही हे पुरेपूर समजल आहे . प्यांटवालं मान-पाठ एक होई पर्यंत काम करतात हे माहिती आहे. इथेही राजकारण चालत आणि बर्याच पलीकडच्या गोष्टी कळल्या आहेत. तुम्ही लिहित रहा... :)
  • Log in or register to post comments

मुलींना आयटी वालाच हमाल का

आशु जोग
Wed, 03/12/2014 - 00:03 नवीन
मुलींना आयटी वालाच हमाल का हवा असतो असा एक परेशान पडला
  • Log in or register to post comments

हा प्रश्न नक्की कोणाला आहे ?

दिव्यश्री
Wed, 03/12/2014 - 01:01 नवीन
हा प्रश्न नक्की कोणाला आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

डोमेन एक्स्पर्ट

अत्रन्गि पाउस
Wed, 03/12/2014 - 13:52 नवीन
आयटी मध्ये डोमेन एक्स्पर्ट हा एक अनाकलनीय/काल्पनिक प्रकार आहे ... उदा काही वर्षे बँकिंग कस्टमर साठी प्रोग्रम्मिंग केल्यावर तो 'बँकिंग' आयटी एक्स्पर्ट समजला जावा अशी अपेक्षा असते...इतरांपेक्षा चार बँकिंग संकल्पना माहित असाव्यात हि अपेक्षा ठीक आहे पण एकदम एक्स्परर्त ? हे म्हणजे कंपाऊंडर ला डॉक्टर सारखे ज्ञान असावे हे अपेक्षा करण्यासारखे आहे असो.. 'आयटी मधील मिथ्या समज ' हा एक अतिशय मोSSSSSSSठ्ठा विषय आहे
  • Log in or register to post comments

आइटी हे डोमेन...

वामन देशमुख
Wed, 03/12/2014 - 15:06 नवीन
आयटी मध्ये डोमेन एक्स्पर्ट हा एक अनाकलनीय/काल्पनिक प्रकार आहे ...
अहो, आइटी मधील (डोमेनच नव्हे) कुठलाही एक्स्पर्ट हा एक खरोखरच काल्पनिक प्रकार आहे... आइटी हे डोमेन एखाद्याला एक्स्पर्ट म्हणविण्याइतकं तरी मोठं आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

+१

अविनाश पांढरकर
Wed, 03/12/2014 - 16:07 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.

धन्या
Wed, 03/12/2014 - 17:56 नवीन
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. डोमेन एक्स्पर्ट हा त्या त्या डोमेनमधला तज्ञ असणे अपेक्षीत असते. बहुतेक वेळा डोमेन एक्स्पर्टने त्या त्या क्षेत्रातील औपचारीक शिक्षण (पदवी, पदव्युत्तर पदवी) घेतलेले असते.
उदा काही वर्षे बँकिंग कस्टमर साठी प्रोग्रम्मिंग केल्यावर तो 'बँकिंग' आयटी एक्स्पर्ट समजला जावा अशी अपेक्षा असते...इतरांपेक्षा चार बँकिंग संकल्पना माहित असाव्यात हि अपेक्षा ठीक आहे पण एकदम एक्स्परर्त ?
काही वर्षे बँकिंग कस्टमर साठी प्रोग्रम्मिंग केल्यावर तो 'बँकिंग' आयटी एक्स्पर्ट समजला जात असेल तर ती कंपनी धन्य म्हटली पाहिजे. अमेरिकेच्या एका बलाढ्य पेट्रोलियम कंपनीच्या प्रोजेक्टवर काम करत असताना तिकडे जो डॉमेन एक्स्पर्ट होता त्याने प्रत्यक्ष रिफायनरीमध्ये दहा वर्ष काम करुन तो नंतर आयटीमध्ये आल्याचे आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

हो हो मला हे माहित आहे

अत्रन्गि पाउस
Wed, 03/12/2014 - 19:26 नवीन
बऱ्याच ठिकाणी हि अपेक्षा ठेवली जाते...रेसुमे मध्ये सुद्धा बघा कोणत्या डोमेन्स साठी काम केले ते लिहिलेले असते... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आम्हाला मेकॅनिकल विंजिनियर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/12/2014 - 18:29 नवीन
आम्हाला मेकॅनिकल विंजिनियर लोकांना आय.टी. बद्दल जरा जास्तचं आस्था असते कॉलेजमधे असल्यापासुन. ;) कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय.टी., कॉंप्युटर आणि ईलेक्ट्रॉनिक्स मधे. उगीचं वाळवंटातल्या कॅक्टससारख्या २-४ मुली सगळ्या डिपार्ट्मेंटमधे मिळुन. थोडीशी जलन म्हणजे, साला रोज १०-१२ तास फिजिकली घासुन, विदौट ए.सी मधे उभं राहुन, लोकांच्या शिव्या खाऊन पण लै म्हंजे लै कमी पगार आणि लै म्हंजे लै म्हंजे लै कमी प्रोमोशन्स :( तक्रारीचा भाग सोडला तर बाकि जवळपास सगळे दोस्त लोकं आय.टी. वाले असल्याने जास्त पंगा घेत नाही :).
  • Log in or register to post comments

कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय

धन्या
Wed, 03/12/2014 - 20:20 नवीन
कॉलेजमधे असताना सगळी हिरवळ आय.टी., कॉंप्युटर आणि ईलेक्ट्रॉनिक्स मधे. उगीचं वाळवंटातल्या कॅक्टससारख्या २-४ मुली सगळ्या डिपार्ट्मेंटमधे मिळुन.
खरं आहे. मेकॅनिकल, सिव्हील, इलेक्ट्रीकल अशा अभ्यासक्रमांना मुली सहसा प्रवेश घेत नाहीत.
थोडीशी जलन म्हणजे, साला रोज १०-१२ तास फिजिकली घासुन, विदौट ए.सी मधे उभं राहुन, लोकांच्या शिव्या खाऊन पण लै म्हंजे लै कमी पगार आणि लै म्हंजे लै म्हंजे लै कमी प्रोमोशन्स
असहमत. परिस्थीती बरीच बरी बदलली आहे. क्रीम ऑफ क्रीम आयटीत जाऊ लागल्याने कोअरमधील कंपन्याही चांगले इंजिनीयर्स खेचण्यासाठी आता आयटीच्या तोडीचे पॅकेजेस देतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

क्रीम ऑफ क्रीम आयटीत जाऊ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/12/2014 - 22:26 नवीन
क्रीम ऑफ क्रीम आयटीत जाऊ लागल्याने कोअरमधील कंपन्याही चांगले इंजिनीयर्स खेचण्यासाठी आता आयटीच्या तोडीचे पॅकेजेस देतात.
अहो कंपारेटीव्हली सांगतोय हो. एखाद्या आय.टी. वाल्याला १०० रुपये सॅलरी हाईक+ वरची पोझिशन मिळाली तर मेकॅनिकल वाल्याला साधारण ३५-४०-४५ रुपये मिळते असं निरीक्षण आहे. शिवाय आय.टी. वाल्यांना "ऑन द बेंच" हा नॉलेज अपडेट करायसाठी आणि नवी स्कील्स (ते पण कंपनीच्या खर्चानी) शिकायचा पर्याय असतो. शिवाय मेकॅनिकल मधे वरची पोस्ट मिळेलचं असं नाही. अर्थात कंपनी टु कंपनी बदलते ही गोष्ट. ह्यामागे मुळ कारण असं आहे की मेकॅनिकल ईंडस्ट्री मधे लोकं कमी असुन सुद्धा मोठ्या इन्वेस्ट्मेंट मुळे प्रॉफीट मार्जिन कमी असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तसे नाही ते!

खेडूत
Wed, 03/12/2014 - 23:35 नवीन
तसे नाही ते! २००० पासून मुलीना शिक्षणात ३०% आरक्षण चालू झाले. मात्र ते सर्व इतर आरक्षणा अंतर्गत होते. म्हणजे साठ मुलांच्या वर्गात ३०% विद्यापीठा बाहेरील विभागातून (म्हणजे १८) आणि विद्यापीठ विभागातून ७०% म्हणजे ४२ अशा जागा. यात ५०% आरक्षण, पण एकूण कुठल्याही वर्गात २० मुलीना प्रवेश मिळतो. याशिवाय मुली ३०% बाहेर उर्वरित कोट्यात स्पर्धा करूच शकतात! त्यामुळे मी जेव्हा २००२ मध्ये प्राध्यापकी करत असे तेव्हा मेक्यानिकल ला पण वीसेक मुली असत. विद्युत अभियांत्रिकीला तर निम्मा वर्ग मुलीच असत. शहरी भागात तरी मुली पूर्ण आरक्षणा प्रमाणे प्रवेश घेतात. ग्रामीण विभागात त्यांनी पर्याय न दिल्याने मुलाना त्या कोट्यात प्रवेश मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आमच्याकडे डीप्लोमाला ० आणि

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/13/2014 - 09:41 नवीन
आमच्याकडे डीप्लोमाला ० आणि ईंजिनिअरींग ला पुर्ण डिपार्ट्मेंटला मिळुन जेमतेम ८-१० मुली होत्या, ते पण पुण्यातल्या कॉलेजमधे (कोरडं नशीब ह्यालाचं म्हणत असतील काय?). तेव्हाचं पटलं काँपिटीशन टफ आहे ते :) ;)...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

स्टे ट्युंड ....

बबन ताम्बे
Wed, 03/12/2014 - 20:06 नवीन
कंपनीचे फायनांशियल निकाल येतात तेंव्हाही ट्युंड असावे लागते. निकाल कसा लागेल त्यावर जॉब राहील की नाही अवलंबून असते. खूप लॉस झाला किंवा युरोप अमेरिकेत मंदी आली की आय.टी. मधले टेंशंस विचारू नका ! (विशेषतः एमएनसी मधे). २००१ मधील मंदी (टॉवर पडले तेंव्हा) आणि २००७ मधील मंदीने आय्.टी.ला चांगलेच घुसळून काढले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा